ग्लुकोज : आपली उर्जा, संपत्ती आणि बरंच काही
अनुक्रमणिका | १. इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा | २. मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक | ३. कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ ! | ४. हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन | ५. रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर | ६. बिलिरूबिन : काविळीतला पिवळा डँबिस | ७. युरिआ व क्रिअॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक | ८. ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’ वर शिक्कामोर्तब | ९. थायरॉइड हॉरमोन्स आणि त्यांचा गोतावळा
आपल्या शरीराचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. निरनिराळ्या अवयवांमध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात. सर्व पेशींना त्यांच्या अस्तित्वासाठी सतत उर्जानिर्मिती करावी लागते. त्यासाठी अर्थातच पुरेसे इंधन उपलब्ध झाले पाहिजे. ज्याप्रमाणे वाहनांसाठी काही प्रकारची इंधने असतात त्याचप्रमाणे पेशींमध्येही वेगवेगळी इंधने उपलब्ध आहेत. जो रासायनिक पदार्थ इंधन म्हणून वापरला जातो त्याचे ज्वलन (oxidation) होऊन त्यातून रासायनिक उर्जा (ATP) तयार होते. पेशींमधली विविध इंधने अशी आहेत:
ग्लुकोज
मेदाम्ले
ग्लिसेरॉल
किटोन बॉडीज
अमिनो आम्ले
यांपैकी कशाचा वापर उर्जानिर्मितीसाठी करायचा हे पेशीचा प्रकार आणि त्यातली परिस्थिती यानुसार ठरते.
बहुसंख्य पेशींच्या बाबतीत ग्लुकोज हे महत्वाचे इंधन आहे. काही पेशी त्याव्यतिरीक्त इतर इंधनेही वापरू शकतात. पण, रक्तातील लालपेशी मात्र फक्त ग्लुकोजच वापरतात. म्हणजे त्या ‘खाईन तर तुपाशी’ या प्रकारच्या पेशी आहेत. मेंदू सुद्धा शक्यतो ग्लुकोजचीच मागणी करतो पण आणीबाणीच्या परिस्थितीत तो इतर इंधन वापरू शकतो.
आहार आणि ग्लुकोजचा पुरवठा
आता एक नजर टाकूया आपल्या रोजच्या आहारावर. आहाराचा ६०-७०% भाग हा कर्बोदकांच्या रुपात असतो. पोळी, भाकरी आणि भात हे आपले पोट भरायचे मुख्य पदार्थ. त्या सगळ्यांत असतो ‘स्टार्च’. तर मांसाहारातून ‘ग्लायकोजेन’ हे कर्बोदक मिळते. मुळात स्टार्च आणि ग्लायकोजेन हे ग्लुकोजचे polymers आहेत. त्यांचे पचनसंस्थेत पूर्ण विघटन झाल्यावर आपल्याला भरपूर ग्लुकोज मिळते.
तसेच आपण आहारात अनेक गोड पदार्थ, दूध व फळेही घेतो. त्यातून आपल्याला ग्लुकोजची भाईबंद असलेली अन्य काही कर्बोदके मिळतात. ती पचनसंस्थेतून शोषून जेव्हा पेशींत पोचतात तेव्हा त्यांचेही ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात कुठलेही कर्बोदक आहारात घेतले तरी पेशींमध्ये शेवटी त्याचे ग्लुकोज बनवले जाते. त्यामुळे ग्लुकोज हेच आपल्या शरीराचे मुख्य इंधन ठरते.
कर्बोदकांच्या पचनातून निर्माण झालेला ग्लुकोज नंतर रक्तात शोषला जातो. रक्तप्रवाहातून तो शरीराच्या सर्व अवयवांना पोचवला जातो. आता तो प्रत्यक्ष पेशीत शिरणे ही एक महत्वाची पायरी असते. यकृताच्या पेशींमध्ये तो अगदी सहज शिरतो पण स्नायू आणि मेदपेशींमध्ये मात्र तसे होत नाही. या दोन्हीकडे शिरण्यास त्याला इन्सुलिनची मदत लागतेच.
पेशींमध्ये ग्लुकोजचा वापर तीन प्रकारे होतो:
१. ५०% लगेचच ऊर्जानिर्मितीसाठी वापर. उरलेला ५०% हा पेशींना लगेच लागणार नसतो. म्हणून त्याचा ‘साठा’ खालील रूपांमध्ये होतो
२. १०% ग्लुकोजचे ‘ग्लायकोजेन’ मध्ये रुपांतर होते आणि
३. ४०% चे रुपांतर मेदात होते.
ग्लुकोजचा साठा करण्याचे मार्ग
आता ग्लुकोजचे जे दोन साठे होतात त्यांचा हेतू समजून घेऊ. इथे मला बँकेत पैसे ठेवण्याच्या ज्या नेहमीच्या पद्धती आहेत त्यांची उपमा द्यावी वाटते. समजा, मला रोज १०० रु. मिळतात. त्यातले ५० मला रोजच्या खर्चासाठी लागतात, म्हणून मी ते घरीच ठेवतो. उरलेल्या ५० मधले १० रु. मला त्या आठवड्यात कधीही लागू शकतात. पण, मला ते घरी ठेवायचे नाहीत कारण ते लगेच खर्च होण्याची भीती वाटते. मग मी ते माझ्या बचत खात्यात ठेवतो. शेवटी जे ४० उरले आहेत ते मला कधीतरी अडीअडचणीतच लागतात. म्हणून मी त्यांची मुदत ठेव बनवतो.
आता वळूया ग्लुकोजकडे. त्याचा १०% साठा हा ग्लायकोजेनच्या रुपात केला जातो. हे संयुग मुख्यतः यकृत व स्नायूंमध्ये साठवले जाते.यापैकी यकृतातील ग्लायकोजेनचे गरजेच्या वेळी अत्यंत वेगाने ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात हे झाले ग्लुकोजचे बचत खाते! आता त्याचा उपयोग बघा. रोज रात्रीचे जेवणानंतर ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या न्याहारीपर्यंत आपण ‘उपाशी’ असतो. तेव्हा मध्यरात्र ते सकाळ या काळात यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. मग सर्व पेशी ते वापरू लागतात. म्हणजेच, रोज दिवसभरात आपण आहारातला ग्लुकोज थेट वापरतो तर रात्रीत हा ‘बचत’ केलेला ग्लुकोज वापरात आणतो.
शेवटी जो ४०% ग्लुकोज उरलाय त्याचे मेदात रुपांतर केले जाते आणि ते मेद (fat) शरीराच्या मेदसाठ्यांमध्ये( adipose tissue) साठवले जाते. हे साठे खर्या अर्थाने ‘fixed deposits’ असतात! जेव्हा काही कारणाने दीर्घकाळ उपोषण घडते, त्या काळात त्यांचे विघटन करून त्यातून काही प्रमाणात ग्लुकोज मिळवला जातो. तसेच त्यातून मिळालेली मेदाम्लेही इंधन म्हणून वापरली जातात.
आपण साठवलेला मेद ही एका अर्थी आपली ‘संपत्ती’च असते. ज्याप्रमाणे व्यवहारातील कुठलीही संपत्ती निर्माण करण्यास मुळात आपल्याकडे भरपूर ‘चलन’ असावे लागते, तद्वत शरीरात जेव्हा ग्लुकोजचा पुरवठा भरपूर असतो तेव्हाच आपण मेदरुपी संपत्ती निर्माण करतो. ज्याप्रमाणे गरजेहून अधिक संपत्ती आयुष्यात कटकटी निर्माण करू शकते त्याप्रमाणे मेदाचे साठेही नको इतके झाल्यास काही व्याधी उत्पन्न होतात.
शरीरातील ग्लुकोजचे कार्य
१. सर्व पेशींमध्ये इंधन म्हणून ऊर्जानिर्मितीत वापर
२. ग्लुकोजपासून ribose तयार होते, जे DNA व RNA यांच्या उत्पादनासाठी लागते.
३. पुरुषाच्या जननेंद्रियात ग्लुकोजपासून fructose तयार होते, जे शुक्राणूंना उर्जा पुरवते.
४. स्तनांमध्ये स्तनपानाच्या काळात जे Lactose तयार होते त्यासाठी ग्लुकोज आवश्यक असते
५. ग्लुकोज हा अन्य मेद व प्रथिनांशी संयोग पावतो आणि त्यातून काही महत्वाची संयुगे तयार होतात, जी पेशींच्या बळकटीसाठी आवश्यक असतात.
या विवेचनातून लक्षात येईल की ग्लुकोज हा शरीरातील अनेक रासायनिक घटनांचा मूलाधार आहे.
ग्लुकोजचा चयापचय आणि हॉर्मोन्सचे कार्य
जेव्हा आपण नियमित पुरेसा आहार घेतो तेव्हा ग्लुकोजचा ग्लायकोजेन व मेदांच्या रुपात साठा केला जातो. या दोन्ही कामांत इन्सुलिनचा वाटा मोठा आहे. हे हॉर्मोन आपल्या स्वादुपिंडात तयार होते. जेवणानंतर जेव्हा आपली ग्लुकोजची रक्तपातळी वाढू लागते तेव्हा इन्सुलिनही अधिक प्रमाणात रक्तात सोडले जाते. ते पेशींमध्ये ग्लुकोजचा व्यवस्थित वापर आणि साठा करण्यात मोलाची मदत करते. त्याच्या या महत्वाच्या क्रियेमुळेच ग्लुकोजची वाढलेली रक्तपातळी अल्पावधीत पूर्ववत केली जाते. तेव्हा पुरेसा आहार आणि इन्सुलिनचे कार्य यांचा मिलाफ होऊनच ग्लुकोजपासून मेदनिर्मिती होते.
जेव्हा बऱ्याच तासांसाठी आपण आहार घेत नाही तेव्हा शरीरातील घडामोडी बघू. सुरवातीस रक्तातील ग्लुकोज पेशींकडून वापरले जाते. ते बऱ्यापैकी वापरल्यावर त्याची रक्तपातळी कमी होऊ लागते. आता हा ‘संदेश’ अन्य काही हॉर्मोन्सकडून टिपला जातो आणि ती अधिक प्रमाणात स्त्रवू लागतात. या हॉर्मोन्समध्ये प्रामुख्याने ‘ग्लुकॅगॉन’ व ‘एपिनेफ्रीन’ चा समावेश आहे.
मुळात ही दोन्ही ‘इन्सुलिन-विरोधी’ गटातील आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्व कृती या बरोबर इन्सुलिनच्या विरुद्ध असतात. आता ती कार्यरत झाल्यावर यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. जोपर्यंत पुढील अन्नग्रहण होत नाही तोपर्यंत हे ग्लायकोजेन ग्लुकोजची रक्तपातळी टिकवते. जास्तीतजास्त १६ तासांच्या उपासापर्यंत हा ग्लायकोजेनचा साठा टिकतो.
समजा, आता एखाद्याने त्याहीपुढे उपोषण करायचे ठरवले तर काय होते ते पाहू. आपण वर पाहिले आहे की लालपेशी आणि मेंदू यांना सतत ग्लुकोज लागतेच.त्यामुळे आता ती पातळी टिकवण्यासाठी एक नवीन प्रक्रिया यकृतात होते. तिला ‘नव-ग्लुकोज निर्मिती’ असे म्हणतात. ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. त्यामध्ये शरीरातील प्रथिने आणि मेद यांच्या विघटनातून ग्लुकोज तयार होतो आणि मग रक्तात सोडला जातो. किंबहुना या अनोख्या क्रियेमुळेच माणूस( मर्यादित काळाचे) उपोषण करूनही जिवंत राहतो. या प्रक्रियेस गती देण्याचे काम
ग्लुकॅगॉन व एपिनेफ्रीन ही हॉर्मोन्स करतात.
रक्तातील ग्लुकोजची योग्य पातळी
आपले खाणे आणि ही पातळी यांचा थेट संबंध आहे. सकाळी उपाशी पोटी ही सर्वात कमी असते( ७० – १०० mg/dL ). जेवणानंतर ती वाढू लागते आणि एक तासाने ती सर्वोच्च असते. दरम्यान जे वाढीव इन्सुलिन स्त्रवलेले असते त्याच्या प्रभावाने ती पुढील तासाभरात बऱ्यापैकी खाली येते. निरोगी अवस्थेत जेवणानंतर दोन तासाने ती १४० mg /dL चे आत असते. ज्या लोकांचा जेवणानंतरचा ‘इन्सुलिन-प्रतिसाद’ अत्युत्तम असतो, त्यांचे बाबतीत तर ती उपाशी-पातळी इतकी खाली येते.
आपण आहारातील कर्बोदकांचे प्रमाण जेवढे वाढवू त्याच प्रमाणात स्वादुपिंड अधिक इन्सुलिन सोडते. ग्लुकोजची पातळी खाण्यानंतर बेफाम वाढू नये यासाठीच इन्सुलिनचा लगाम आपल्याला निसर्गाने दिला आहे. इन्सुलिन आणि इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वयाने संपूर्ण २४ तासांत ग्लुकोज-पातळी नियंत्रित राहते.
बिघडलेल्या ग्लुकोज-पातळीचे परिणाम
जेव्हा ग्लुकोज, इन्सुलिन आणि त्याविरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वय बिघडतो तेव्हा अर्थातच ग्लुकोजची रक्तपातळी जास्त वा कमी होते. या दोन स्थिती अशा:
१. ग्लुकोज अधिक्य(hyperglycemia) : याची महत्वाची कारणे अशी:
अ) इन्सुलिनची कमतरता
आ) इन्सुलिनचा पेशींवर प्रभाव न पडणे (resistance)
इ) इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्सचे अधिक्य
यापैकी (अ) आणि (आ) मिळून जो आजार होतो तोच ‘मधुमेह’. मधुमेह हे अवाढव्य प्रकरण असून तो एका स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. त्याबद्दल लिहिणे हा या लेखाचा उद्देश नाही.
मधुमेह या ‘कादंबरी’चा ग्लुकोज हा नायक तर इन्सुलिन ही नायिका आहे! निरोगी अवस्थेत या दोघांचा कसा सुंदर मिलाफ होतो ते आपण पाहिले आहे. किंबहुना ही पूर्वपीठीका समजून घेणे हे मधुमेहाबद्दल वाचण्यापूर्वी आवश्यक आहे. इन्सुलिनच्या कार्याअभावी गरजेपेक्षा जास्त ग्लुकोज रक्तात साठून राहतो कारण तो पेशींमध्ये शिरू शकत नाही. मग हा साठून राहिलेला ग्लुकोज ‘बिनकामाचा’ ठरतो आणि तो कटकटीही निर्माण करतो.
२. ग्लुकोज-कमतरता (hypoglycemia) : याची महत्वाची कारणे अशी:
अ) जे मधुमेही इन्सुलिनचे उपचार घेत असतात त्यांच्यात कधीकधी त्याचा ‘ओव्हरडोस’ होतो. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज जास्त प्रमाणात पेशींत शिरते आणि रक्तपातळी नको इतकी कमी होते.
आ) अतिरिक्त मद्यपान : जर एका बैठकीत फाजील मद्यपान केले आणि त्यानंतर अन्न खायची शुद्धी राहिली नाही तर हा बाका प्रसंग ओढवतो. अल्कोहोलच्या प्रभावाने पेशींमधील नव-ग्लुकोजनिर्मितीस मोठा अडथळा होतो.
जेव्हा ग्लुकोजची रक्तपातळी कमी होत होत ४० mg/dL इतकी उतरते तेव्हा रुग्णात लक्षणे (चक्कर, आकलन न होणे) दिसू लागतात. याहीपुढे जर पातळी २० mg/dL चे खाली उतरली तर मात्र रुग्ण बेशुद्ध पडतो. ही स्थिती धोकादायक असते आणि तेव्हा रुग्णास तातडीने ग्लुकोज पुरवावे लागते.
.....तर असे हे ग्लुकोज – आपले महत्वाचे इंधन. आपल्याला क्षणोक्षणी लागणारे. तसेच आपल्या पेशींचा रासायनिक मूलाधार. मात्र त्याची रक्तपातळी योग्य प्रमाणातच हवी. ती फार जास्त झाल्यास कटकटीची तर फार कमी झाल्यास धोकादायक ठरणार. आपणा सर्वांची ती कायम आटोक्यात राहो या सदिच्छेसह लेख संपवतो.
*****************************************************************************
टीप: आरोग्य लेखमालेतील या १०व्या लेखाबरोबरच ही माला आता थांबवत आहे. यादरम्यान वाचकांनी जे अजून काही विषय सुचवले आहेत त्यावर आता चिंतन व मनन करेन. कालांतराने त्यावर स्वतंत्र लेख लिहीता येतील. आपणा सर्वांचे सहकार्याबद्दल मनापासून आभार!
💬 प्रतिसाद
(84)
म
मंदार कात्रे
Tue, 02/20/2018 - 07:40
नवीन
मधुमेह या ‘कादंबरी’चा ग्लुकोज हा नायक तर इन्सुलिन ही नायिका आहे!
आवडलं
चांगला लेख . आभार्स
- Log in or register to post comments
N
Nitin Palkar
Fri, 02/23/2018 - 13:51
नवीन
+१११
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sat, 02/24/2018 - 14:00
नवीन
धन्यवाद. थोडी भर घालतो :
...आणि खलनायक म्हणजे सर्व इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्स.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 02/20/2018 - 08:39
नवीन
मन्दार कात्रे, आभारी आहे !
- Log in or register to post comments
श
शलभ
Tue, 02/20/2018 - 09:32
नवीन
नेहमीप्रमाणेच छान माहिती.
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 02/20/2018 - 09:33
नवीन
ही लेखमाला थांबवू नये अशी आग्रहाची विनंती.
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Tue, 02/20/2018 - 12:28
नवीन
असेच म्हणतो. अतिशय उपयुक्त लेखमाला आहे ही.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 02/20/2018 - 13:17
नवीन
अहो चाणक्य, तुमच्या आस्थेवाईक प्रतिसदाबद्दल तितक्याचे वेळा आभारी आहे!!
एका विषिष्ट कल्पनेत गुंफलेल्या लेखांची ही माला थांबवत आहे, माझे लेखन नाही ! पुरेशा लेखन-विश्रांती नंतर स्वतंत्र आरोग्य-लेख जरूर लिहीन.
लोभ असावा
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 02/20/2018 - 09:51
नवीन
श ल भ आणि एस, आभार!
आता काही काळ मला लेखन - विश्रांती घेऊ द्यावी ही विनंती ☺
- Log in or register to post comments
अ
अनिंद्य
Tue, 02/20/2018 - 09:53
नवीन
@ कुमार१,
उत्तम लेख.
उपोषणाच्या परिणामांबाबत सांगितलेत त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. परिचयातले काही लोक फक्त पाण्यावर राहून आठवडा-पंधरवडा असा उपास करतात ! मधुमेहींनी हे अजिबात करू नये ना?
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 02/20/2018 - 10:21
नवीन
मधुमेहींनी हे अजिबात करू नये ना?>>> बरोबर, करू नये. त्यांचा एकूण चयापचय व हॉर्मोन्स चा समन्वय बिघडलेला असतो
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Tue, 02/20/2018 - 10:00
नवीन
अगदी हेच म्हणतो.
मी हे सर्व लेखन माझ्या कुटुम्बियांना ही वाचून दाखवतो य.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 02/20/2018 - 10:23
नवीन
प्रमोद, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे
लेखन उपयुक्त वाटल्याचे समाधान आहे
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 02/20/2018 - 10:31
नवीन
प्रशांत ( सा सं ) यांचेशी संपर्क कसा करावा ? कोणी सांगेल का? अनुक्रमणिकेचे काम आहे
- Log in or register to post comments
द
दीपक११७७
Tue, 02/20/2018 - 11:02
नवीन
नेहमी प्रमाणे छान लेख!
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Tue, 02/20/2018 - 13:53
नवीन
पोट सुटलेल्या व्यक्तींमध्ये, काही कारणाने त्यांना एक/जास्त दिवस उपाशी राहावे लागले, तरी सुटलेल्या पोटाच्या आकारात काहीच बदल होत नाही. तसंच चरबी ऐवजी स्नायू जाळून शरीरासाठी ऊर्जा मिळवली जाते, ह्याचे काही कारण स्पष्ट झाले आहे का ?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 02/20/2018 - 14:49
नवीन
मजेदार उपयुक्त माहिती.
विश्रांती घ्याच. एखादा लेख फक्त प्रश्नांसाठी( कोणताही रोग/इलाज) काढता येईल. मग त्यांची उत्तरे ओडिओफाइलमध्ये MP3 देता येईल॥ लिहिण्याचा त्रास वाचेल.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 02/20/2018 - 15:07
नवीन
कंजूस, भारी कल्पना आहे तुमची. बघूया करून !
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Tue, 02/20/2018 - 14:50
नवीन
@ तेजस :
अगदी तुम्ही म्हणता तसे नाही होत. उपोषणाचा कालावधी किती त्यानुसार घडामोडी अशा होतात :
सुरवातीस बघा. मुख्य हेतू असतो ‘नव-ग्लुकोजनिर्मिती’. त्यासाठी दोन पर्याय असतात:
१. स्नायुतील प्रथिने >> त्यांचे विघटन >> १९ प्रकारची अमिनो आम्ले सुती होऊन यकृतात जातात >> त्यांपासून ग्लुकोज तयार होतो.
२. मेदसाठ्यांचे विघटन >>> ग्लीसेरोल + मेदाम्ले .यातील फक्त ग्लीसेरोलचेच ग्लुकोज होते.
आता लक्षात येईल की १९ अमिनो आम्ले वि. एकटा ग्लीसेरोल यात आम्लांचा वाटा खूप आहे. म्हणजेच त्यासाठी जास्त स्नायू-प्रथिन विघटीत होते.
पण.....
जेव्हा उपोषणाचा कालावधी बराच वाढेल तेव्हा मात्र स्नायूंना spare करून मेदसाठ्यांचे विघटन अधिक होईल.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Tue, 02/20/2018 - 17:47
नवीन
धन्यवाद. अजून एक प्रश्न विचारतो...
समजा एखादा माणूस दुर्घटनेत सापडून एका निर्जन बेटावर/ पर्वतावर अडकला. ह्या बेटावर फक्त बटाटे/रताळी(पिष्टमय पदार्थ) आहेत बाकी काहीही खायला नाही.
अश्या स्थितीत त्याच्या शरीराचे चलनवलन कसे चालेल. तो ते खाऊन नक्कीच जिवंत राहील पण चौरस आहार न मिळाल्याने कमतरतेमुळे काही आजार / प्रश्न होतील ना?
हीच परिस्थिती फक्त मधाची पोळी (खायला त्या बेटावर फक्त मध आहे) असे समजूया तर मग शरीर त्या मधाचे कशाकशात रूपांतरण करेल?
सहज म्हणून विचारले....
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Wed, 02/21/2018 - 05:35
नवीन
ह्या बेटावर फक्त बटाटे/रताळी(पिष्टमय पदार्थ) आहेत बाकी काहीही खायला नाही.
अश्या स्थितीत त्याच्या शरीराचे चलनवलन कसे चालेल. >>>>>>
शरीराची उभारणी आणि पोषण मुख्यतः तीन घटकांवर होते : कर्बोदक, मेद आणि प्रथिन. यापैकी कर्बोदक व मेद हे कार्बन व हायड्रोजनने बनलेले आहेत. प्रथिने तयार करताना मात्र त्याहून अधिकचा नायट्रोजन लागतोच.
वरच्या कथेत तो माणूस फक्त कर्बोदके खातोय. त्यामुळे उर्जा व मेद
निर्मिती होत राहील व तो जिवंत राहील. पण, पुरेसा नायट्रोजन (डाळी, दूध, अंडे इ.) न मिळाल्याने प्रथिन-निर्मिती मार खाईल. परिणामी शरीर-सांगाड्याची बळकटी आणि प्रतिकारशक्ती दुबळी होईल.
शेवटी आपले हिमोग्लोबिन व इम्म्युनोग्लोब्यूलिनस मजबूत असतील तरच दणकट आयुष्य जगता येते.
(कृपया हे उत्तर वाचल्याची पोच द्यावी ही वि.)
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Wed, 02/21/2018 - 09:56
नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद कुमारजी.
- Log in or register to post comments
श
शेखरमोघे
Tue, 02/20/2018 - 15:48
नवीन
ग्लुकोजचा वापर आणि ग्लुकोजचा साठा याची उपयुक्त माहिती - नेहमीसारखाच सुरेख लेख.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Tue, 02/20/2018 - 18:54
नवीन
उत्तम लेखमालिका आणि हा लेख... अशीच नवीन लेखमालिका घेऊन या ही विनंती.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Wed, 02/21/2018 - 02:28
नवीन
शेखर व अमित, उत्साहवर्धनाबद्दल अनेक धन्यवाद !
- Log in or register to post comments
अ
अश्फाक
Wed, 02/21/2018 - 01:30
नवीन
रक्तपातळी नको इतकी कमी होते
रक्तपातळी नव्हे ग्लुकोजपातळी
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Wed, 02/21/2018 - 02:30
नवीन
रक्तपातळी नव्हे ग्लुकोजपातळी>>> बरोबर.
लिहिण्याच्या ओघात झाले, आभार
- Log in or register to post comments
क
कलंत्री
Wed, 02/21/2018 - 05:41
नवीन
कृपया या सूचनेचा विचार करावा.
मिपा प्रशासनानेही अशी छान छान माहिती मिपाच्या नावानिशी whats app वर पाठवता येईल याचा विचार करावा.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Wed, 02/21/2018 - 07:06
नवीन
मला असे वाटते की इथला लेख whats app वर पाठवण्याऐवजी त्याचा फक्त दुवा तिकडे द्यावा. यामुळे आपण काही नवे वाचक मिपाकडे वळवू शकू.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 02/21/2018 - 05:42
नवीन
गोड पदार्थ किंवा इतर कर्बोदकं तुपाबरोबर वा दुधाबरोबर खल्ल्यास त्या गोडामुळे रक्तातील ग्लुकोज प्रमाण कमी प्रमाणात वाढते यात कितपत तथ्य आहे.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Wed, 02/21/2018 - 05:54
नवीन
गोड पदार्थ किंवा इतर कर्बोदकं तुपाबरोबर वा दुधाबरोबर खल्ल्यास त्या गोडामुळे रक्तातील ग्लुकोज प्रमाण कमी प्रमाणात वाढते यात कितपत तथ्य आहे. >>>>
माझ्या मते तथ्य नाही. आता बघा, तूप आणि दूधात सुद्धा कर्बोदके आहेत ना ! मग एकूण ग्लुकोज जास्तच गेला ना पोटात ?
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 02/21/2018 - 09:03
नवीन
ओके! कुठेशी वाचलेले म्हणुन विचारलं. धन्यवाद!
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Wed, 02/21/2018 - 06:25
नवीन
अगदी तरुणपणापासून मला एक प्रॉब्लेम आहे पण तो hypoglycemia नव्हे हे नक्की तर तो काय व कशामुळे?
मला giddy वाटू लागते, हातपाय थरथरतात, मी घामाघूम होतो. (हे सामान्यतः संध्याकाळी घडते, सकाळी जवळजवळ नाहीच.) अशा वेळेस मला फक्त भूक ही एकमात्र जाणीव असते, त्यापलीकडे काही नाही. त्यावर एकच उपाय असतो; काहीतरी खाणे.
मौज अशी की ही अवस्था एकाएकी निर्माण होते, अचानक spike यावी, तसे. बरे, हे होण्याआधी काही दमवणाऱ्या वगैरे गोष्टी घडलेल्या असतात असेही नाही. खुर्चीत अगदी स्वस्थ बसून वाचन करतोय, अशा वेळीही हे होऊ शकते.
त्यामुळे चटकन तोंडात टाकण्याजोगे काहीतरी नेहमी - अगदी गाडी चालवितानासुद्धा - मी ठेवतो. केळे, बिस्कीट, लाडू, इ. ह्यापैकी काहीही तोंडात टाकले की दोन-चार मिनिटात मी ठीक होतो. चहा मिळाला तर छानच.
आतापर्यंत एक-दोनदाच असे झाले की माझ्याकडे काहीच खायला नव्हते, व खाण्याची संधीही. मग मी तसाच स्वस्थ बसून राहिलो. आणि बऱ्याच वेळानंतर जरा सावरलो.
आपल्या मते glucose ची लेव्हल अशी अचानक आणि झपाट्याने खाली कशी जाऊ शकते?
PS. my fasting and PP sugar levels are normal.
- Log in or register to post comments
क
कलंत्री
Fri, 03/02/2018 - 15:44
नवीन
मागच्या ४ / ५ वर्षापासून हीच समस्या झाली आहे. दुपारी ४ वाजता काहीतरी खावेच लागते. त्यात थोडाही उशीर झाला तर, अस्वस्थ वाटते. घाम येतो, तोंडाची चव जाते. हे लक्षात आल्यापासून मीही काहीतरी खायचे ठेवतोच. फुटाणे, मूरमूरे, एखादे फळ ही अश्यावेळेस चालते.
अश्यावेळेस पाण्याच्या घोटानेही बरेच दिलासा मिळतो.
वैद्यांना विचारले असता त्यांनी सांगितली की हे सर्व नैसर्गिकच आहे.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Fri, 03/02/2018 - 15:58
नवीन
खरे आहे काही वेळेस स्पष्टीकरण देता येत नाही.
उपचार घेणाऱ्या मधुमेहींच्या बाबतीत असे होऊ शकते
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Wed, 02/21/2018 - 06:45
नवीन
my fasting and PP sugar levels are normal. ">>
याचा स्पष्ट अर्थ आहे की ती ग्लुकोज-कमतरता नाही.
फिजिशियन ला दाखवून योग्य त्या तपासण्या केल्यावर प्रश्नाचे उत्तर देता येईल
- Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II
Wed, 02/21/2018 - 13:04
नवीन
उत्तम लेख .....
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 02/22/2018 - 05:29
नवीन
१६/१०/२०१७ ला इन्सुलिनच्या लेखाने सुरवात केलेली ही मालिका आज समाप्त करीत आहे. या लेखनामागची भूमिका अशी होती.
सध्या अनेक माध्यमांतून बरेच आरोग्य लिखाण चालू असते. त्यातील बरेचसे हे 'आजार-केंद्रित' असते. त्याचीच री मला ओढायची नव्हती. म्हणून या मालेत मी थोडा वेगळा प्रयोग केला.
त्यातील विषय ( इन्सुलिन, कोलेस्टेरॉल, हिमोग्लोबिन, बिलिरुबिन, ग्लुकोज , इ.) पाहता हे लक्षात येईल. प्रत्येक लेखात शरीरातील एखाद्या महत्वाच्या रासायनिक पदार्थाला मध्यवर्ती भूमिका दिली होती. म्हणजेच ही माला 'पदार्थ-केंद्रित' होती. त्या पदार्थाची मूलभूत माहिती, इतिहास आणि मग संबंधित आजाराचा थोडक्यात आढावा असा येथे दृष्टीकोण होता.
या लेखनाचे आपण स्वागत केलेत तसेच चर्चेत सहभागी झालात याबद्दल मी आपला आभारी आहे. बऱ्याच सदस्यांनी सातत्याने प्रोत्साहन देऊन मला लेखनाची स्फूर्ती दिली. तसेच लेखमाला थांबवायचा निर्णय घेतल्यावर काहींनी तसे न करण्याची आग्रही व प्रेमळ विनंती केली. आपणा सर्वांचा मी ऋणी आहे.
लेखकाने एकाच धाटणीतले लेखन दीर्घकाळ न करता काही वेगळे करावे हे माझे मत. कारण वाचकाला सतत काहीतरी नाविन्यपूर्ण हवे असते. दरम्यान काही मिपाकरांनी काही आरोग्य विषय लेखनासाठी सुचवले आहेत. ते स्वतंत्रपणेच हाताळायचे आहेत. त्यातील एका विषयाच्या मी प्रेमात पडलो आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. सध्या मी त्याचा गृहपाठ करीत आहे. माझे पुरेसे समाधान झाल्यावरच लेखनाला हात घालेन.
या लेखमालेदरम्यान अनेक मिपाकरांनी वैयक्तिक संपर्कातून त्यांच्या आजारांची माझ्याशी चर्चा केली याचे खूप समाधान वाटते. त्यामुळे मिपा हे माझे एक विस्तारित कुटुंब झाल्याची सुखद भावना जाणवली.
तसेच याच दरम्यान ‘मिपा-पुणे कट्टा’ झाला व मला आपल्यातील काहींच्या भेटीचा आनंद मिळाला. या सगळ्याचा परिणाम म्हणूनच मनापासून लेखन करता आले.
प्रशासक आणि साहित्य संपादक यांचेही आभार.
लोभ असावा
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 02/22/2018 - 06:22
नवीन
दैनिक सकाळ मध्ये डॉ एम वाय बापये हे लेख लिहित. मला ते लेख आवडत. एका नातेवाईकाच्या दुखण्याच्या निमित्ताने त्याना भेटण्याचा योग आला त्यावेळी लेख यायचे थांबले होते. मी त्याना विचारले की आपण आता लिहित का नाही ? त्यावर त्यांचे मिशकील उत्त्तर असे की " मध्ये थांबलेले बरे.. नाहीतर लोक म्हणतात .. रिकामा असतो वाटते दवाखाना हल्ली ... !
- Log in or register to post comments
अ
अनिंद्य
गुरुवार, 02/22/2018 - 06:30
नवीन
@ कुमार१,
ही भूमिका आवडली. लेखन तर आवडतेच तुमचे.
पुढील लेखनाची प्रतीक्षा असेल.
अनिंद्य
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 02/22/2018 - 06:31
नवीन
प्राधान्याने शरीर जर ग्लुकोज रक्तातील वापरीत असेल तर .. मी असे विधान करीन की कमीतकमी मधुमेही लोकांनी सकाळी उठल्यावर चालत जाणे बंद करून दोन वेळच्या मुख्य भोजना नंतर दोन तासांनी ( स्वादुपिंडाने शरणा गती पत्करल्यावर ) चालण्याचा व्यायाम करावा . ही वेळ साधारण पणे अशी येईल दुपारी तीन ते चार व रात्री दहा ते साडेदहा . दोन्ही वेळा गैरसोयीच्या आहेतच पण सैधान्तिक रित्या बरोबर !
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 02/22/2018 - 06:45
नवीन
चौरा, सहमत. विशेषतः ज्यांची PP ग्लुकोज जास्त वाढते त्यांना हे अगदी उपयुक्त.
अनिंद्य, तुमच्याही आगामी लेखनाची प्रतीक्षा !
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
गुरुवार, 02/22/2018 - 15:32
नवीन
शब्दात मांडत आहात ही माहीती. समजावून सान्ग्ण्याची हातोटी छान आहे. सोदाहरण मस्त समजावता!!
धन्यवाद
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 02/22/2018 - 15:44
नवीन
अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! आपणा सर्वांना आरोग्य्-सुख लाभू देत आणि आपण तुमच्यासारखेच सुखी राहू !
- Log in or register to post comments
ड
डॉ श्रीहास
Sat, 02/24/2018 - 16:48
नवीन
किटोन डायट बद्दल सांगा ना _/\_
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 02/25/2018 - 05:34
नवीन
‘केटोजेनिक’ आहार :
१) यात कर्बोदकांचे प्रमाण बरेच कमी व प्रथिनाचे मध्यम असते. या आहाराचे प्रयोग बऱ्याच मधुमेहींवर केले गेले आहेत आणि त्याचे फायदे दिसून आले आहेत. अशा नियमित आहारानंतर पेशींमधील घडामोडी अशा होतात:
कमी कार्बोदके >>> कमी ग्लुकोज पुरवठा >> शरीरातील मेदसाठ्यांचे अधिक विघटन >> आता ग्लुकोज ऐवजी मेदाम्ले ही प्रमुख इंधन होतात >>> वजन कमी होते आणि ग्लुकोजची रक्तपातळीही कमी. तसेच मधुमेह-औषधांचेही प्रमाण कमी होऊ शकते.
या प्रकारच्या उपचाराला nutritional ketosis म्हणतात.
२) अलीकडे अजून एक नवीन प्रयोग निरोगी व्यक्तींवर करण्यात आले. त्यात ग्लुकोज खाण्यापूर्वी अर्धा तास आधी ते लोक 'केटो-पेय' पितात. त्याने ग्लुकोज- इन्सुलिन समन्वय सुधारतो आणि ग्लुकोज पातळी आटोक्यात राहते. पण या पेयाची चव अतिशय घाण (अगदी याक-थू !) असते.
अद्याप हा प्रयोग पुरेशा मधुमेहींवर झालेला नाही.
- Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर
Mon, 03/05/2018 - 03:08
नवीन
वाटणारी लेखमाला संपन्न होत आहे. हुरहूर लागलीच. माझ्या मते पूर्णविराम देऊं नका. अर्धविराम द्या. याच अनुषंगाने कितीही काळानंतर आणखी एखादा विषय सुचला की जरूर लिहा. आणखी पाचदहा लेख वर्षादोनवर्षात सहज येऊन जातील.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Mon, 03/05/2018 - 03:43
नवीन
आभार ! नुकतीच माझी नवी लेखमाला 'तंदुरुस्त का नादुरुस्त?' ही मिपावर सुरू झाली आहे.
तेव्हा आरोग्य लेखन चालू आहे ☺
- Log in or register to post comments
ल
लई भारी
गुरुवार, 03/08/2018 - 07:51
नवीन
अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल आभार.
अगदीच बाळबोध शंका(काहीतरी चुकतंय माहित आहे :) )
जर ४०% ग्लुकोजचे रुपांतर नेहमीच मेदात होते, आणि उपाशी राहण्याची वेळच आली नाही, तर मग मेद बेसुमार वाढतच राहणार नाही का?
आपली नेहमीची जीवनशैली आणि मर्यादित व्यायाम(!) पुरेसा आहे का हे मेद वापरण्यासाठी? की इथेच मग व्यायामाची गरज सुरु होते?
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 03/08/2018 - 08:22
नवीन
@ लई भारी, तुमचे एकदम बरोबर आहे. याबद्दल अजून थोडेसे:
• मानवाच्या आदिम अवस्थेत शारीरिक श्रम भरपूर होते आणि अन्न मात्र मोठ्या कष्टाने मिळवावे लागे.
• म्हणून तेव्हा अन्न कधीतरी मिळायचे. त्यामुळे आपल्या जनुकांमध्ये इंधन हे मेदरुपात साठवण्याची प्रक्रिया नोंदली गेली, जेणेकरून जर काही दिवस अन्न मिळाले नाही तरी आपण जिवंत राहू.
• आज बघा काय झालंय! अन्नाची मुबलकता, खूप खायची सवय आणि व्यायामाचा मात्र अभाव.
• म्हणून आपले मेदसाठे सातत्याने वाढतात.
• मेदपेशींचे वैशिष्ट्य बघा. सुरवातीस जसा मेद वाढू लागतो तसा त्यांचा आकार वाढतो. पण हे एका मर्यादेपर्यंत होते. मग पुढचा मेद स्वीकारण्यासाठी त्या पेशींचे विभाजन होऊन दुप्पट पेशी बनतात.
• एकदा का पेशीसंख्या वाढली की ती कधीही कमी होत नाही.
• परिणाम –लठ्ठपणा !
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »