Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

ग्रामीणांचा आहार

ड
डॉ. सुधीर राजाराम देवरे
गुरुवार, 02/15/2018 - 12:57
💬 62 प्रतिसाद
- डॉ. सुधीर रा. देवरे बाजरीची भाकरी आणि कोणतीही भाजी हा गावातल्या लोकांचा रोजचा मुख्य आहार असायचा. भाजीला पूर्वी या परिसरात अहिराणी भाषेत शाक म्हटलं जायचं. ऋतू कोणताही असो दररोज बाजरीची भाकर जेवणात असायची. भाकर गरम पडते वा डांजते असं कधी चुकूनही कोणाकडून ऐकायला मिळायचं नाही. आणि आजारी पडल्यावर असं निदान इथल्या डॉक्टरनेही कधी केलं नाही. या परिसरात त्यावेळी बाजरी मुबलक प्रमाणात पिकत असल्यामुळे इथल्या जेवणात बाजरीच्या भाकरी शिवाय अजून काही पर्याय असू शकतो अशी कल्पनाही कोणाला नव्हती. इथं गहूही पिकायचा. पण घरचा गहू असूनही कोणी रोज चपात्या खात नव्हतं. अशा जेवणा व्यतिरीक्‍त कुठं वेगळं जेवण दिसलं की ती खाण्याची चैन समजली जायची. नातेवाईकांकडे- भावबंदांकडे पाहुणे आले की पाहुण्यांना जेवण सांगण्याची पध्दत होती. पाहुण्याला त्यातल्यात्यात उजवं जेवण म्हणून भजींची आमटी, भाकर, भात, लोणचं, पापड, कांदा असं ताट भरून वाढलं जायचं. ज्या पाहुण्याला जेवायला बोलवलं त्याला कोणी बाहेर विचारलं, ‘काय जेवण होतं’, तर तो पाहुणाही केवळ भजींची आमटी न म्हणता ताट भरून आलेल्या सगळ्या जीनसांची नावं सांगायचा. भात हा अलिकडील जेवणात नैसर्गिक पदार्थ समजला जात असला तरी, खिचडी- भात त्याकाळी इथल्या जेवणाचा भाग नव्हता. लोकांकडे केवळ सणाच्या दिवशी सार सोबत भात खावा लागतो म्हणून दुकानातून तेवढ्यापुरता बिटेभर वा चिटेभर तांदुळ मागवला जायचा. तांदळाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या प्रकारानुसार त्याची किंमत ठरलेली असते हे ही त्यावेळी माहीत नसायचं. दुकानदार जो काही बिटेभर तांदूळ देईल आणि जी किंमत सांगेल तो तांदुळ भातासाठी घेतला जायचा. म्हणजे गावात तांदळाच्या व्हरायट्या दुकानदाराकडे नसत. भाकरी सोबत आजच्या काही भाज्या त्या काळात दिसत होत्या तरी तेव्हा रानभाज्यांचे प्रमाण जेवणात जास्त प्रमाणात होतं. ज्याला कदान्न म्हटलं जाईल अशा प्रकारचे पदार्थ त्यावेळी नाइलाज म्हणून खावे लागत असले तरी तो एक पारंपरिक खाद्य पदार्थांचा आणि लोकजीवनाचाच अविभाज्य भाग बनून गेला होता. म्हणून ते कदान्नही आवडीने खाल्लं जायचं. यापैकी काही पदार्थांना सणसणीत चव असायची. सोलासनं बट्ट, सोलासनं तिखं, लसुननं तिखं, कोंडाळं, घाटा, बेसन, सुघरं भुगरं, मटमुंगना वडानं बट्ट, मिरचीना खुडा, कुळीदनी घुगरी, कुळीदना मुटकळा,‍ लोंचाना खार, मिरचीना ठेचा, काळा समार, तेलगुळना काला, चिखल्या, गुळ टाकून शिजवलेले शिळ्या भाकरीचे तुकडे अशा प्रकारचे पौष्टीक नसलेले आणि काही बेचव असलेले पदार्थ कांदा तोंडी लावून भाकरी सोबत खाऊन लोक आपल्या कामाला लागायची. झिंदरं आणि वांगानं भरीत त्यातल्या त्यात चविष्ट पदार्थ असायचे. आता सांगितलेले अनेक खाद्य पदार्थ आज एकतर नामशेष झाले आहेत वा आपल्या ‍जीवनातून हद्दपार होण्याच्या बेतात आहेत. आजचा आहार हा समतोल आहाराऐवजी गरजेपेक्षा जास्त आणि चमचमीत चवीचा आहार दैनंदिन जेवणात घेतला जातो. मात्र हा आहार दुर्गम खेड्यातले गरीब लोक अजूनही घेत आहेत. असं कदान्न खाऊनही ते अर्धपोटीच राहतात. ज्यांची स्थिती आज मध्यमवर्गीय म्हणता येईल अशी प्रगती केलेले लोक हे पदार्थ विसरून गेले आहेत. (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.) – डॉ. सुधीर रा. देवरे इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11521 views

💬 प्रतिसाद (62)
क
कपिलमुनी गुरुवार, 02/15/2018 - 13:10 नवीन
कोकणात असला काही खात नाहीत , आमच्या पश्चिम महाराष्ट्रात ज्वारीची भाकरी खातात. वरचे वर्णन कुठले आहे ? *उत्तराची अजिबात अपेक्षा नाही
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित गुरुवार, 02/15/2018 - 14:14 नवीन
पूर्वीच्या खान्देश चे वर्णन केले आहे बहुतेक... बाकी आठवणी छान होत्या. अजून येउद्या
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:04 नवीन
बर
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 02/15/2018 - 14:30 नवीन
अहिराणी भाषेचा उल्लेख केलाय म्हणजे वरचे वर्णन, खानदेश वगैरे भागातले असावे असा एक अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:06 नवीन
उत्तराची अपेक्षा नसली तरी सांगतो. उत्तर महाराष्ट्रात हे पदार्थ खाल्ले जात होते- जातात. विशेषत: खानदेश आणि नाशिक परिसर. बागलाण.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/15/2018 - 15:35 नवीन
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र फक्त हाच महाराष्ट्र नसून इतरही भाग महाराष्ट्रात समाविष्ट होतात. गरजेचं नाही जे कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोक खातात तेच उर्वरित महाराष्ट्रानेही खावे.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 02/16/2018 - 08:19 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 02/16/2018 - 04:53 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:03 नवीन
उत्तराची अपेक्षा नसली तरी सांगतो. उत्तर महाराष्ट्रात हे पदार्थ खाल्ले जात होते- जातात. विशेषत: खानदेश आणि नाशिक परिसर. बागलाण.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:04 नवीन
उत्तराची अपेक्षा नसली तरी सांगतो. उत्तर महाराष्ट्रात हे पदार्थ खाल्ले जात होते- जातात. विशेषत: खानदेश आणि नाशिक परिसर. बागलाण.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:06 नवीन
उत्तराची अपेक्षा नसली तरी सांगतो. उत्तर महाराष्ट्रात हे पदार्थ खाल्ले जात होते- जातात. विशेषत: खानदेश आणि नाशिक परिसर. बागलाण.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/15/2018 - 15:32 नवीन
छान लेख.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:07 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 02/15/2018 - 16:00 नवीन
आमीर खान रोज नाचणीची भाकरी खातो, असे त्याने कुठल्या तरी मुलाखतीत सांगितले होते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:09 नवीन
बर
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/15/2018 - 19:19 नवीन
ज्याला तुम्ही कदान्न म्हटले तो सध्या हूच्चभ्रू लोकांचा तब्ब्येत सुधारण्यासाठी आहार आहे. प्रत्येक प्रदेशात जे नैसर्गिक पीक आहे तेच तिथल्या लोकांसाठी योग्य असते. म्हणून "कोकण्ये भात बोकण्ये" म्हण प्रसिद्ध आहे. ५०/६० वर्षापूर्वी कोकणात पोळी/चपाती रोजच्या जेवणात नव्हती. कारण कोकणात गहू पिकत नाही आणि तेव्हा मुबलक मिळतही नसे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:08 नवीन
बरोबर.धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 02/16/2018 - 02:50 नवीन
लेख आवडला! मलाही पहिल्यांदा विशेष वाटले होते माझ्या मित्राकडून ऐकून की, बाजरीची भाकर फक्त थंडीतच खावी! मनात म्हटलं, च्यामारी, असलं जर्नल नॉलेज आपल्याला कस काय नसतंय? अजून एक, आमच्या गावाकडे हुलगे खूप पिकतात आणि नेहमी जेवणातही असायचे. आता त्याच प्रमाण कमी झालंय आणि शहरात तर हुलगे कित्येक जणांना माहीतही नसतात. Sandy
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 02/16/2018 - 04:56 नवीन
हुलगे म्हणजे कुळीथ ना? कुळीथ हा शब्द जास्त प्रचलित आहे.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 02/16/2018 - 07:45 नवीन
कुळीथ म्हणजे हुलगे हे मला मिपावरच वाचून/पाहून समजलं. :) Sandy
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 02/16/2018 - 08:12 नवीन
कुळीथ हा शब्द जास्त प्रचलित आहे.
अजूनही खेड्यांमधल्या लोकांना कुळीथ हा शब्द ठाऊक नाही. तिथे हुलगे हाच शब्द वापरला जातो, एकुणात कुळीथ हा हुच्च शब्द वाटतो हुलग्यांसांठी. आमच्याकडे या हुलग्यांची 'शेंगोळी' बनवायची पद्धत आहे. बाकी पुण्याजवळच्या बर्‍याच खेडेगावांमध्ये भाजीला कालवण, कोड्यास हा शब्द वापरला जातो.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 02/16/2018 - 11:04 नवीन
कोड्यास की कोरड्यास? मी इतके दिवस कोरड्यास समजत होते. हुलगे आमच्याही इथे म्हणतात. पण बाजारातल्या पिशवीवर कुळीथ लिहिलेलं असतं.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 02/16/2018 - 11:08 नवीन
कोरड्यास. कोरड्याबरोबर (म्हण्जे पोळी/भाकरीबरोबर) लागणारे कालवण किंवा तोंडी लावणे ह्या अर्थी.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 02/16/2018 - 13:13 नवीन
कोरड्यासच.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 02/16/2018 - 08:45 नवीन
याच कुळथाच्या पिठात पाणी घालून "डांगार" नावाचा खाद्य पदार्थ बनवला जायचा व तो नाचणीच्या भाकरी बरोबर खाल्ला जायचा.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 02/16/2018 - 08:49 नवीन
डाळीच्या पिठाचेही डांगर होते.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 02/16/2018 - 10:22 नवीन
डांगर हे उडदाच्या पिठाचेच राखीव नाव.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 02/16/2018 - 11:00 नवीन
कुळथाच्या पिठीचे पण डांगर करतात. छान लागतं.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:10 नवीन
खरय. धन्यवाद
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:11 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Fri, 02/16/2018 - 03:13 नवीन
प्रत्येक भागातले खाद्य पदार्थ जतन झाले पाहिजेत. हाच निसर्गाचा ठेवा आहे.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 02/16/2018 - 08:54 नवीन
हो अगदी खरे. पारंपारीक पदार्थांची मजाच वेगळी असते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:13 नवीन
खरय.धन्यवाद
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:12 नवीन
खरय. धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 02/16/2018 - 04:59 नवीन
आज काल रुजुता दिवेकर ट्रेंड असल्याने स्थानिक पदार्थांना पुन्हा अच्छे दिन येत आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:14 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/16/2018 - 06:00 नवीन
वैद्यकीय शास्त्राप्रमाणे भारतात जे जे पारंपरिक पदार्थ ज्या ज्या प्रदेशात आणि ऋतू मध्ये खाल्ले जातात ते अतिशय पौष्टिक आहेत. उदा पंजाब मध्ये गव्हाची रोटी आणि छोले/राजमा, दक्षिण भारतात सांबार भात किंवा महाराष्ट्रातील वरण भात इ. पश्चिम महाराष्ट्रात अगदी गरीब धनगर लोक खात असलेला आहार म्हणजे शेळी/ बकरीच्या दुधात कुस्करलेली बाजरीची भाकरी हा अतिशय पौष्टिक आहे. १०० ग्राम बाजरी मध्ये प्रथिने (११ ग्राम ) (लोह ३ mg) मँगनीज खनिजे आणि तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात. बाजरीच्या प्रथिनामध्ये १३ अत्यावश्यक अमिनो अम्ले असल्यामुळे त्याच्या प्रथिनांचा दर्जा (प्राणिजन्य प्रथिनांसारखा) उच्च आहे. १६ ते २० रुपये किलोने मिळणारे हे धान्य स्वस्त सुद्धा आहे. बाजरी हे धान्य गहू ज्वारी किंवा तांदुळापेक्षा पौष्टिक आहे आणि पोटाचे आजार असणाऱ्या (ग्लूटेन एंटेरोपॅथी किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम)सारख्या लोकांना ते जास्त सोयीस्कर/ आरोग्यदायक आहे. ते अतिशय कमी पाण्यावर/ कोरडवाहू जमिनीवर येणारे पीक आहे. महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान येथे येणारे हे पीक स्थानिक लोकांच्या आहारासाठी अतिशय उपयुक्त आणि स्वस्त असा घटक आहे. बाजरीचा चारा हा गुरांना सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. दुर्दैवाने पाश्चात्य आहार विहाराचे आकर्षण असणारे आपण आता सकस आहार ऐवजी चावायला आणि गिळायला सोपा ( पण आरोग्याच्या दृष्टीने तितका गुणकारी नसलेला) आहार घ्यायला लागलो आहोत. हर हर न हिंदू : न यवन किंवा we are neither forward nor backward we are just awkward अशी परिस्थिती झाली आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:15 नवीन
खूप छान प्रतिक्रिया. धन्यवाद
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 02/16/2018 - 07:22 नवीन
आमच्या रायगड जिल्ह्यात तांदुळ पिकतो त्यामुळे पूर्वीपासूनच तांदळाच्या भाकर्‍या घरोघरी असायच्या. आमच्याघरीही पिकायचा तांदुळ. त्यात जया तांदुळाची जात होती ती भाकरीसाठी वापरायचे. भाताच्या तांदळाचे नाव आता आठवत नाही. त्याही आधी लाल तांदुळ ज्याला आम्ही राता म्हणायचो आणि पटणीही म्हणतात तो पिकायचा. हा तांदुळ गोड असायचा चविला. भातही गोड लागायचा आणि भाकरी चविष्ट आणि नाचणीच्या भाकरीसारखी लाल. नंतर हळू हळू घरा घरात चपात्या व्हायला कधी सुरुवात झाली ते कळल नाही. पण मांसाहारी जेवणात आम्ही भाकरीलाच प्राधान्य देतो. पूर्वी गरजा होत्या आता जीभेचे चोचले झाले आहेत दुसरे काय.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/16/2018 - 11:10 नवीन
भाताच्या तांदळाचे नाव आता आठवत नाही. कोलम.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 02/16/2018 - 11:11 नवीन
कोलम उशिरा आला. कोलम म्हणजे महागड बियाणं होत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:17 नवीन
एकदम बरोबर.धन्यवाद
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 02/16/2018 - 18:22 नवीन
रत्ना आणी रातांबा
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 02/17/2018 - 07:36 नवीन
बरोबर रत्ना चे पीक असायचे. हे माझे बालपणीचे तांदळाच्या शेताचे अनुभव https://www.misalpav.com/node/28089
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 02/17/2018 - 08:34 नवीन
रायगड जिल्हा: घरी पीक जया आणि रत्ना, स्वप्न कोलमची :)
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 02/16/2018 - 07:56 नवीन
कोणत्या काळातले हे वर्णन आहे ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 02/16/2018 - 13:18 नवीन
30-40 वर्षांपूर्वीचे
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 02/16/2018 - 08:40 नवीन
गहूक्रांतीची विषवल्ली हा योगेंद्र यादवांचा लोकसत्तामधील लेख यानिमित्ताने वाचनीय ठरावा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/16/2018 - 09:13 नवीन
योगेंद्र यादवांचा लेख त्यात बरेच तथ्य आहे हि वस्तुस्थिती गृहीत धरली तरी थोडा टोकाचा वाटतो हि हरित क्रांतीमुळे आपल्याकडे भूक बळी आणि कुपोषण मोठ्या प्रमाणावर कमी झाले हि वस्तुस्थिती. तेंव्हा केवळ हरितक्रांतीलाच दोष देणं चूक आहे.वेळो वेळी सरकारची धोरणे र्हस्व दृष्टीची होती किंवा सवंग लोकप्रियतेची असल्यामुळे हे नवे प्रश्न उद्भवले आहेत. ग्लुटेन या प्रथीनाची ऍलर्जी उत्तर भारतात साधारण १ % लोकांमध्ये आहे. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/21182543 गव्हाची पोळी हि करणे ज्वारी बाजरीच्या भाकरीपेक्षा जास्त सोपे आणि सोयीचे आहे. आकार वेडा वाकडा झाला तरी तव्यावर सहजासहजी तुकडे पडत नाहीत. शिवाय त्याला तूप तेल लावले तर ती जास्त वेळ मऊ राहते ती चावायला जास्त सोपी आहे हि वस्तुस्थिती मान्य करायलाच हवी. याउलट ज्वारी किंवा बाजरीची भाकरी हि थंड झाल्यावर कडक होते.भाकरी थापायाला आणि ती भाजायला वेळ जास्त लागतो आणि ती करण्याला स्त्रियांना कष्ट जास्त लागतात. ( ती जास्त टिकत असली तरी कोरडी पटकन होते आणि मग दूध किंवा कालवणात भिजवून खावी लागते) या सर्व गोष्टी गृहीत धरल्यास आजही ९० % जनतेला गव्हापासून दूर करून ज्वारी बाजरीच्या भाकरीची सवय लावणे कठीणच आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 02/16/2018 - 09:31 नवीन
ज्वारीची पातळ भाकरी खूप वेळ मऊ रहाते. तसेच मिक्सर, फूडप्रोसेसर ई शिवाय हाताने गव्हाचे पीठ मळणे किचकट व वेळखाऊ तर ज्वारी वा बाजरीचे पीठ मळणे गव्हाच्या पिठापेक्षा खूप सोपे आहे असंच मत मी साधारणपणे घरातील स्त्रियांकडून (आई, पत्नी) ऐकत आलो आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 18 hours ago
  • सुंदर !!
    5 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा