शनिवारवाडा कट्टा - २७ जानेवारी दुपारी ४ वाजता
यापूर्वी २२ जून २०१४ रोजी मी प्रथमच मिपा कट्ट्याला उपस्थित राहिलो. त्या कट्ट्याच्या गोड आठवणी अजूनही ताज्या आहेत.
त्या कट्ट्याचा धागा अन वृत्तांत.
पुन्हा एकदा तसाच धमाल कट्टा अनुभवण्यासाठी नव्या कट्ट्याचा बेत आखला आहे.
भेटीचे स्थळ: शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारासमोरचे प्रांगण
तारीख व वेळ: शनिवार २७ जानेवारी, दुपारी ४ वाजता
अधिकाधिक मिपाकरांनी, मिपावाचकांनी या कट्ट्याला आवर्जून यावे ही विनंती.
गेल्या कट्ट्याच्या वेळी काढलेला हा फोटो.
२७ जानेवारीच्या कट्टयाबद्दल काही प्रश्न असल्यास प्रतिक्रियेद्वारे विचारावे ही विनंती.
गेल्या कट्ट्याच्या वेळी काढलेला हा फोटो.
२७ जानेवारीच्या कट्टयाबद्दल काही प्रश्न असल्यास प्रतिक्रियेद्वारे विचारावे ही विनंती.
💬 प्रतिसाद
(70)
क
कंजूस
Mon, 01/29/2018 - 08:37
नवीन
मुंबईकडून रेल्वे रिटन तिकिट रु१२०,
२)बाहेरून खाद्य पदार्थ आणले तर ते कोणत्याच उपहारगृहात खाल्लेले चालत नाहीत परंतू इथे चहा कॅाफी, नाश्ता करून नंतर नदीवर जाऊन तिथे आणलेले डबे खाता येतील. शिवाय भरपूर झाडे असलेले आवार आणि बाकडी आहेत बसायला.
३) मळवली स्टेशनकडून चालत वीस मिनिटे लागतात. रेल्वे फाटकाकडून ओटो असतातच पण त्या मोठ्या रसत्याने फिरून जातात.
४) पुण्याकडचे लोणावळा लोकलने / कारने येऊ शकतात.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 01/29/2018 - 16:22
नवीन
असा मध्यवर्ती कट्टा झाला तर मी येणार ... म्हणजे येणारच !
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 01/27/2018 - 21:55
नवीन
अर्थात,
कट्याला किती मिपाकर आले हा मूद्दा फारच गौण.
कधी-कधी मी एका मिपाकराबरोबर पण कट्टा केला आहे.
माझा पहिला कट्टा दुबईत कुंदनशेख बरोबरच झाला होता आणि आम्ही दोघेच रात्रभर कट्टा साजरा करत होतो.
असो,
वृत्तांताच्या अपेक्षेत आम्ही सगळेच आहोत.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 01/28/2018 - 10:42
नवीन
.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 01/28/2018 - 10:55
नवीन
....आता आम्ही वाड्यात शिरणार तेवढयात अभिजित अवलिया दाखल झाले. अशा प्रकारे आम्ही ५ मिपाकर आणि २ वाचक असे सप्तक पूर्ण झाले होते. 'हम पांच' म्हणजे डॉ. सुहास, श्रीरंग, जुई, अभिजित अ आणि मी . आणि हो! लहानग्या उमाला आम्ही 'भावी मिपाकर'च समजून घेतले. ☺
मग वाड्यात रांगेने प्रवेश, फेरफटका, इतिहासाची उजळणी, काही मिपाकरांच्या आठवणी आणि हास्यविनोद करत दोन तास आनंदात गेले.
आता तेथील शिरस्त्याप्रमाणे बाहेर पडण्यासाठी च्या सूचक शिट्ट्या वाजू लागल्या. मग आमचे निरोपाचे हस्तांदोलन झाले आणि उत्साहित मनाने आम्ही घराकडे मार्गस्थ झालो.
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 01/28/2018 - 12:47
नवीन
अरे वा! मस्त झाला की कट्टा.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Sun, 01/28/2018 - 14:18
नवीन
सर्वाना भेटून आनंद झाला. मी श्रीरंग ह्यांना ४:२० पर्यंत येतो असे सांगून ठेवले होते. आजकाल डिमेन्शिया झाल्यासारखी माझी अवस्था असल्याने मी शनिवारवाड्याच्या जवळ पोचल्यावर आत जायचे गेटच विसरलो आणि चुकून पुढे निघून गेलो. ह्या भागात सगळे वन वे असल्याने गावाला वळसा घालून परत गेट पर्यंत येण्यात १० मिनिटे गेली. अतृप्त आत्मा येतो येतो असे सांगून पण ६:१५ झाले तरी अवतरले नाहीत. वास्तविक आत्म्याला कुठेही एका क्षणात पोचता आले पाहिजे. पण असो. मजा आली.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 01/28/2018 - 21:24
नवीन
"अ.आंचे" दर्शन घ्यायला घरात एखादा सत्यनारायण ठेवायचा.
कट्ट्या परी कट्टा पण होईल.
स्वगत : ह्या सत्यनारायण कट्ट्याला मात्र जावेच लागेल.प्रसादाचा शिरा खाऊन खूप काळ लोटला.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 01/29/2018 - 08:40
नवीन
भूतकथा लेखक स्पांडुरंग न आल्याने आत्माही अतृप्तच.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 01/29/2018 - 05:29
नवीन
ह्यावेळी कट्ट्याला येणे काही अपरिहार्य कारणांमुळे जमले नाही.
कट्टा मात्र छान झालेला दिसतोय.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Mon, 01/29/2018 - 06:07
नवीन
छान सह-वृतांत !
:-)
इथला ध्वनी-प्रकाशाचा खेळ पाच-सात वर्षांपुर्वी पाहिला होता. आवडला होता. आता बरा चाललाय का?
फोटोमध्ये डॉ. सुहास दिसत नाहीयत का?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 01/29/2018 - 07:12
नवीन
बहूदा त्यांनीच फोटो काढलेले दिसत आहेत.
मिपाकरांना सेल्फीचे वेड नाही, हे पण एक निरिक्षण...
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Mon, 01/29/2018 - 07:28
नवीन
या वेळेस माझी एकाही मिपाकराची ओळख नव्हती त्यामुळे कट्टास्थळी पोचल्यावर जी अडचण जाणवली त्यातून मी कट्टा संयोजनासाठी काही सूचना करत आहे:
१. ज्यांनी ‘नक्की येणार’ असे प्रतिसादात कळवले असते त्यांना संयोजकाने व्य नि तून आपला मोबाइल क्र कळवावा. म्हणजे प्रथम येणाऱ्यास खूप फायदा होतो. नाहीतर कोणास विचारायचे असा पेच पडतो. हे पसंत नसल्यास…
२. संयोजकाने वेळेआधी 5 मि येऊन हातात ठळक दिसेल असे ‘मिपाकट्टा’ चे पत्रक ठेवावे. किंवा…
३. भेटीचे ठिकाण मोकळ्या सार्वजनिक जागेऐवजी रेस्तराँ ठेवावे म्हणजे काउंटर वर तशी सूचना देता येते.
इतरांची मते / अनुभव जरूर लिहा
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Mon, 01/29/2018 - 07:31
नवीन
फोटोमध्ये डॉ. सुहास दिसत नाहीयत का?>> होय, हा फोटो त्यांनी काढला आहे.
दुसरा फोटो श्रीरंग यांनी काढला आहे त्यात डॉ आहेत. तो येथे प्र करावा ही विनंती
- Log in or register to post comments
ज
जुइ
Tue, 01/30/2018 - 00:09
नवीन
कट्ट्याला शुभेच्छा देणार्या व कट्ट्यामध्ये सामिल होणार्या सर्व मिपाकरांना धन्यवाद.
माझ्या फोनने काढलेले कट्टेकर्यांचे फोटोज.

- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Tue, 01/30/2018 - 00:35
नवीन
.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 01/30/2018 - 02:31
नवीन
उजवीकडून डावीकडे -
कुमार१, अभिजीत अवलिया, माझे सासरे, डॉ. सुहास म्हात्रे, मी (श्रीरंग_जोशी कडेवर कन्येला घेऊन), माझी आई.
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Tue, 01/30/2018 - 04:37
नवीन
धन्यवाद श्रीरंग_जोशी.
तुमची आणि डॉ. सुहास म्हात्रे यांची फोटो-ओळख होतीच.
कुमार१ आणि अभिजीत अवलिया यांची देखील फोटो-ओळख झाली.
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Tue, 01/30/2018 - 04:37
नवीन
धन्यवाद श्रीरंग_जोशी.
तुमची आणि डॉ. सुहास म्हात्रे यांची फोटो-ओळख होतीच.
कुमार१ आणि अभिजीत अवलिया यांची देखील फोटो-ओळख झाली.
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Tue, 01/30/2018 - 00:46
नवीन
मिपाकर द्वि-चक्री, त्री-चक्री आणि चार-चक्री रथ दौडत कट्टास्थानी पोहोचले तर !
ज्या शनिवार वाड्यात "ध चा मा" ची कारस्थानं झाली त्या शनिवार वाड्यात एका मिपाकरास "कार-स्थान" मिळाले नाही हे वाचून मौज वाटली.
या पुढे शनिवार वाड्यात कट्टा केल्यास "कार-पागा" ची सोया करावी लागेल असे दिसते.
खादाडीचे फोटो नसल्याने जळजळ कमी झाली हे नमूद करतो.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2