दि. २२ जून २०१४ रोजी झालेल्या मि.पा. कट्ट्याचा वॄतांत
मी तसा मिपाचा दोन वर्षे जुना सदस्य आहे. परंतू मिपाकरांना भेटण्याची माझी ही पहिलीच वेळ. खुप दिवसांपासून मि. पा. करांना भेटायची इच्छा होती ती श्रीरंग जोशी, वल्ली, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा यांच्यामुळे पूर्ण झाली त्याबद्दल त्यांचे आभार.
शनिवारी वल्लींनी मेसेज करून सांगितले की रविवारी कट्टा आहे श्रीरंग जोशी व इतर सदस्य येणारेत. तेव्हाच ठरवले की हा चान्स सोडायचा नाही. रविवारी संध्याकाळी ४ ला शनिवार वाड्याला पोहोचलो. शनिवार वाड्यात पोहोचल्यानंतर मी व चौकटराजे दोघेच होतो कारण वल्ली आमच्याआधी शनिवार वाड्यात आले होते. तेव्हा कोणीच दिसले नाही. वाटले कदाचित ५-६ जण येतील. परंतू वल्ली आल्यानंतर मागे पाहिले तर सर्व मिपाकर उभे! मग प्रत्येकाने एकमेकाची ओळख करून घेतली.
आम्ही सर्व शनिवार वाड्याच्या बाहेरील चबूतर्यावर उभे होतो.
शनिवार वाड्याचा दर्शनी भागाचा फोटो खाली पहावा.
(Photo Credit : Shrirang Joshi)

शनिवार-वाड्याच्या कोरीवकामाचा फोटो.
(Photo Credit : Shrirang Joshi)

खाली उभे असताना देशपांडे काकांनी पानशेत धरणफुटीचा 'आखोदेखा' वृतांत आम्हाला सांगितला. वयाच्या १८ व्या वर्षी असा प्रसंग पाहणार्या काकांचे धरणफुटीचे वर्णन ऐकल्यावर हाच तो शनिवार वाडा ज्याच्या भिंतींपर्यंत पाणी आले होते हे ऐकल्यावर खरंच काकांनी किती धैर्य बाळगून प्रसंग निभावून नेला असेल याची कल्पना आली. आजूबाजूला फिरणारे लोक हे अधे-मधे येऊन काका सांगत असलेला प्रसंग ऐकत होते. देशपांडे काकांना दुरून पाहिल्यावर मला क्षणभर ते बाबासाहेब पुरंदरे वाटले होते. कदाचित इतर लोकांनाही तसाच भास झाला असावा. ( या गोष्टीला देशपांडे काकांनी पण दुजोरा दिला.).
पानशेत धरणफुटीचा वृतांत ऐकल्यावर तिथेच ग्रूप फोटो काढले ते खाली पहावेत.
(Photo Credit : Shrirang Joshi)


श्रीरंग जोशी यांनी आणलेली चॉकलेट्स, पैसाताईंनी गोव्यावरून आणलेले काजू, अपर्णाताईंनी आणलेला बेळगावचा कुंदा, ५० फक्त यांनी कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे आणलेली सोनपापडी अशा starters नी कट्ट्याला सुरूवात झाली. खादाडीचे पदार्थ खाली.
(Photo Credit : Shrirang Joshi)


आत गेल्यानंतर शनिवार वाडा दर्शन फक्त नावालाच झाले कारण खुप दिवसांनी कट्टा जमल्याने गप्पांनाच जास्त प्राधान्य होते. शनिवार वाड्यातून आतील भागाचा काढलेला लँडस्केप खाली पहावा.

थोड्या गप्पा झाल्यानंतर पुन्हा ग्रूप फोटो घेणे सुरू. फोटो खाली पहावेत.
(Photo Credit : Shrirang Joshi)




सर्व मिपाकरांचा एकत्रित फोटो
(Photo Credit : Shrirang Joshi)

तसा प्लॅन मंगळवार पेठेतील शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिर पहाण्याचा ही होता परंतू वेळेअभावी तो रद्द झाला. त्यामूळे तेथीलच एका बुरुजातून पलीकडे दिसणार्या मंदीराचा फोटो घेतला. तो खाली पहावा.

त्या मंदिराकडे पाहताना अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्या मंदीराकडे पाहताना Optical Illusion चा आविष्कार. खालील Crop केलेला फोटो पहावा म्हणजे आपल्या लक्ष्यात येईल. फोटो मधील मंदीर हे एक मजला खाली होते परंतू ते त्या बुरुजावरील कमानीमध्येच आहे असे वाटते.

तिथून पुढे गेल्यावर एका बुरूजावर काढलेला चौकटराजा व इस्पिकचा एक्का यांचा फोटो.

गप्पा झाल्यानंतर संध्याकाळी ६ ला शनिवार वाडा बंद होत असल्याची सूचना देणारी शिट्टी वाजली आणि आम्ही सर्व मिपाकर बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर अपर्णाताई, पैसा ताई, अजित सावंत, देशपांडे काका आणि मोदक यांचा निरोप.
(Photo Credit : Shrirang Joshi)


वरील मंडळींचा निरोप घेऊन हॉटेल भोज च्या दिशेने वाटचाल सुरू. हॉटेल भोजमधील जेवणानंतर सर्व मिपाकर बाहेरील कट्ट्यावर स्थानापन्न आणि खर्या अर्थाने कट्ट्याला सुरूवात. शनिवार वाड्यात फिरताना बसायला कट्टा असा कुठेच मिळाला नसल्याने या कट्ट्याचा आनंद वेगळाच होता.
(Photo Credit : Shrirang Joshi)


साधारण ९ च्या सुमारास हॉटेल भोजवरून घराकडे प्रयाण. श्रीरंग जोशी, वल्ली, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा यांचे कट्टा आयोजन केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
कट्ट्याला उपस्थित असलेल्या सभासदांची नावे व फोटो पुढीलप्रमाणे. .
. . .
१. वल्ली (डावीकडे) आणि अत्रुप्त आत्मा (उजवीकडे) 
२. ५० फक्त 
३. अजित सावंत 
४. अपर्णा ताई 
५. देशपांडे काका 
६. हुकुमीएक्का(डावीकडे), चौकटराजा(मध्यभागी) आणि इस्पिकचा एक्का(उजवीकडे) 
७. मोदक 
८. समीर शेलार 
९. पैसा ताई 
१०. प्रशांत 
११. श्री.श्री.श्री. धनाजीराव वाकडे

१२. श्री व सौ. श्रीरंग जोशी 
१३. सूड 
. . .
. . .
आता वाट पहायची पुढील कट्ट्याची. . .
---समाप्त---