Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आता, 'न्याय' ही संतापला..!

अ
अँड. हरिदास उंबरकर
Mon, 12/11/2017 - 12:05
💬 89 प्रतिसाद
आता, 'न्याय' ही संतापला..! 'तपास सुरु आहे' असं ठरीव आणि ठाशीव उत्तर देणाऱ्या तपास यंत्रणांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. चार वर्ष होतात तरी नरेंद्र दाभोलकर, कॉ पानसरे यांच्या खुनाचा तपास का लागत नाही? दोभोळ्कर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे? असा सवाल विचारत या दोन्ही प्रकरणातील तपासाची सद्यस्थती न्यायालयात दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. दाभोळकर- पानसरे हत्येप्रकरणी एका याचिकेवर सुनावणी करत असताना देशातील सद्यस्थतीतवर चिंता व्यक्त करत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला. लोकशाहीप्रधान देशात विचारवंतावर हल्ले केले जातात, कलाकारांना धमक्या दिल्या जातात. त्यामुळे देशाची प्रतिमा मालिन होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दाभोळकर -पानसरे प्रकरणाचा छडा लागत नसल्याने सर्वसामान्य जनतेत असलेली संतापाची भावना न्यायालयाने मांडल्याने आता, 'न्याय' ही संतापला..! असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अर्थात, न्यायालयाचा असो कि सामान्य जनतेचा हा संताप आजचाचं नाही. यापूर्वीही न्यायालयाने अनेकवेळा तपासयंत्रणांना धारेवर धरले आहे. सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दाभोळकर पानसरे प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी सातत्याने लावून धरली. मात्र अद्यापही या प्रकरणांचा उलगडा झालेला नाही, हे वास्तव आहे. दाभोळकर हत्याकांडाला चार वर्ष पूर्ण झाली, पानसरे यांच्या प्रकरणाला दोन वर्ष झाली. तरी ना तर त्यांचे मारेकरी पकडले गेले, ना त्यामागील सूत्रधार.. तपासयंत्रणा तापस सूर असल्याचं उत्तर देत राहिल्या, अन विचारसरणीच्या नावाखाली एकामागून एक विचारवंतांचे मुडदे पाडले जाण्याचं सत्र सुरूच राहिलं..दाभोळकर नंतर पानसरे त्यांच्यानंतर कर्नाटकात डॉ. कलबुर्गी तर आता सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील “लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांचीही हत्या झाली. एकाच 'मोडस ऑपरेन्डीने' प्रागतिक चळवळीतील चार कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र, सीबीआय, सीआयडी सारख्या नामवंत तपास यंत्रणांनाही या प्रकरणाचा उलगडा करता आलेला नाही. त्यामुळे यावर न्यायालयाचा असो कि सामान्य जनतेचा संताप व्यक्त होणे सहाजिकच.. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुरोगामी चळवळीचे आधारवड डॉ नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येच्या पहिल्या दिवसापासून पोलीस प्रशासन तपासाला लागल्याचे वरकरणी दिसले, परंतु पोलिसी तपासाची ढिसाळ कार्यपद्धती पदोपदी समोर येत राहिली. सुरवातीचा काही काळ प्राथमिक तपासात गेला. दाभोलकरांच्या खुनाचा छडा लावण्यासाठी ‘प्लँचेट’ चा वापर करण्यात आल्याचा आरोपही या काळात झाला. २०१४ मध्ये मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांवर डॉ. दाभोळकर यांच्या हत्येसाठी पिस्तूल पुरवल्याचा आरोप करण्यात आला. मात्र न्यायालयात नागोरीने एटीएसवर गुन्हा काबुल करण्यासाठी २५ लाखाची ऑफर दिल्याचा आरोप केला. ९ मे २०१४ ला दाभोळकर प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपविण्यात आला. तीन वर्षानंतर म्हणजे १० जून २०१६ ला सनातन संस्थेच्या वीरेंद्र तावडे याला सीबीआयने ताब्यात घेतेले. फरार असलेले विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप ठेवत तावडेला मुख्य आरोपी करून ७ सप्टेंबर २०१६ ला सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. परंतु आजून आरोप निश्चित झालेले नाही. संशयित अटक झालेले नाही. लंडन वरून येणाऱ्या बॅलेस्टिक अहवालाचा घोळ सुरूच आहे. निव्वळ तारखमागून तारखा वाढवून घेण्याचा प्रकार सुरु असून डॉ. दाभोळकरणांचे मारेकरी कोण, त्यामागील सूत्रधार, याचा कोणताच थांगपत्ता अजून लागलेला नाही. डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास रेंगाळत असतानाच त्याच पद्दतीने कोल्हापुरात कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रावर दुसरा आघात झाला. याही प्रकरणाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई झाली. सुरवातीला कोल्हापूर एटीएस आणि नंतर सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात आला. दाभोळकर प्रकरणातील आरोपींशी पानसरे हत्याप्रकरणाचे धागे दोरे आढळले. समीर गायकवाडला हत्येच्या ८ महिन्यानंतर अटक झाली. बॅलिस्टिक अहवाल अगोदर स्कॉटलंड यार्ड कडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले, नंतर त्याला परवानगीच नसल्याचे समोर आले. मुंबई आणि गुजरातच्या लॅबमधून बॅलेस्टिक अहवाल मागविण्यात आला. मात्र त्यात पराकोटीची विसंगती आढळून आली. तपास संस्थांच्या गडबडीमुळे समीर गाकवाडला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला. पोलिसांचे आरोपपत्र सीबीआयने रद्द ठरविले आणि आपले आरोपांतर दाखल केलं परंतु त्याच्यातही समोर काहीच झालं नाही. दाभोळकर आणि पानसरे प्रकरणातील साम्य पाहता दोन्ही प्रकरणाचा संयुक्तिक तपास करण्याचाही प्रयत्न झाला, पण आउटपुट शून्य..! दाभोळकर-पानसरे प्रकरणाचा तपास रेंगाळला. परंतु, बंदुकीच्या गोळीने विचार संपविन्याचे सत्र मात्र थांबले नाही. कर्नाटकात डॉ. कलबुर्गी यांनाही समाजकंटकांनी गोळ्या घातल्या. सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील “लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांचीही त्याच पद्धतीने हत्या झाली. एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नसतील तर त्याच्याशी विचारांचा संघर्ष करण्याऐवजी त्या व्यक्तीलाच संपविण्याची प्रवृत्ती संवैधानिक विचार स्वातंत्र्याच्या तत्वाला तर मारक आहेच, शिवाय देशाच्या इभ्रतीसही कलंक लावणारे आहे. चार वर्षात प्रागतिक चळवळीतील चार कार्यकर्त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडणारे 'हात' कुणाचे होते? हे तपास यंत्रणांना कदाचित माहीत नसेलही, मात्र त्यामागे 'मेंदू' कोणत्या विचार प्रवृत्तीचा आहे, हे सर्वसामान्य जनतेला दिसते. पण ते सरकारला आणि तपास यंत्रणांना का दिसत नाही, हा अस्वस्थ करणारा सवाल आहे. म्हणूनच न्यायालयाने यावरून तपास यंत्रणांना धारेवर धरले. विवेकवादाची लढाई लढता लढता चार शिलेदार धारातीर्थी पडले. अर्थात त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही आणि जाणार नाही. बंदुकीच्या गोळीने विचार संपवू पाहणाऱ्या प्रवृत्तीला नेहमीच कठोर प्रतिउत्तर दिल्या गेले आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्या निधनानंतरही चळवळ थांबली नाही, उलट ती फोफावते आहे. परंतु तरीसुद्धा माणुसकीचा प्रकाश देणाऱ्या या 'पणत्या' विझवण्याचे कुकर्म कुणाचे ? याचा शोध लागणे गरजेचे आहे. न्यायालयाच्या ताशेऱ्यांना गांभीर्याने घेऊन तपास यंत्रणांनी या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवे. न्यायालयाने व्यक्त केलेला संताप लोकांनाही रस्त्यावर मांडला तर, परिस्थती हाताबाहेर जाईल याची जाण तपास यंत्रणा आणि सरकारने ठेवायला हवी..!!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • 16133 views

💬 प्रतिसाद (89)
B
babu b Tue, 12/12/2017 - 18:10 नवीन
मग आधी का नव्हते सुटले ?
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 09:10 नवीन
मग आधी का नव्हते सुटले ?
आणिबाणीत अटक केलेले लोक आणिबाणी नंतर का सुटले? तसेच. ============================ आधीच्या सरकारला भारतीय विरोधी पक्ष, सेना, संघ, हिंदू धर्म, इ इ पासून देशाला असलेला धोका माहित होता. अतिरेक्यांचे देशप्रेम माहित होते. ================================= चांगले मास्तर आले मनून सनी पोरगं पास झालं. मंग इचारायचं आदि काबर पास झाल्नवतं. ह्येला काय अर्थ आहे का?
न
नाखु Tue, 12/12/2017 - 18:11 नवीन
सरकारचा मुर्खपणा पुढच्या सरकारने कोडगेपणाने चालू ठेवला असता तर तेही यांच्या लेखी "जिनीयस"ठरले असते असा सिंथेटिक विचार करून पहा गामाजी
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 12/12/2017 - 19:10 नवीन
मान गये नाखुजी!!
ट
ट्रेड मार्क Tue, 12/12/2017 - 19:49 नवीन
आरोप करायच्या आधी थोडा अभ्यास केला असतात तर बरं झालं असतं. मालेगाव बॉम्बस्फोट झाल्यावर हिंदू दहशतवाद ही नवी संज्ञा उदयास आली. मग त्याप्रमाणे या आरोपींना TADA लावायला पाहिजे होता. पण पुरोहित आणि इतर आरोपींवर Maharashtra Control of Organised Crime Act or MCOCA लावला गेला कारण MCOCA लावलेल्या आरोपीला जामीन मिळत नाही. आता मोक्का कधी लावतात हे बघू. The Act is imposed in cases of organised crime syndicates, and requires two previous chargesheets against at least one accused within six months of the application of MCOCA. त्यामुळे फक्त एका मालेगाव प्रकरणात त्यांना गोवून चालणार नव्हतं. म्हणून त्यांना २ गुन्ह्यात उगाच गोवण्यात आलं. २००८ च्या शेवटी अटक केली आणि जर सज्जड पुरावे आहेत असा दावा होता, तसेच २००९ ते एप्रिल २०१४ एवढी वर्षे पुरोगामी सरकार सत्तेत असताना, कोर्टात ग्राह्य मानतील असा एकही पुरावा का सादर करता आला नाही? जरा वाचन करायची आणि अभ्यास वाढवायची इच्छा असेल तर इथे आणि इथे अधिक माहिती मिळेल.
B
babu b Wed, 12/13/2017 - 04:43 नवीन
http://indianexpress.com/article/india/army-probe-had-found-shrikant-prasad-purohit-dealt-in-illegal-weapons-deals-4813974/
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 09:12 नवीन
आम्ही लिंक वाचली. ============= यात त्या माणसाला ए टी एस ने अटक करावं असं काय आहे?
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 09:00 नवीन
https://www.thequint.com/news/india/pathankot-jem-handler-shahid-latif-was-freed-by-upa-govt-in-2010 https://www.hindupost.in/politics/sonia-gandhi-led-upa-2-free-dreaded-jihadis-2010/ पुरोगाम्यांचे सरकार आल्यावर हे काश्मिरी अतिरेकी वगैरे लगेचच कसे सुटले यातून?,निश्चितच पुरावे नष्ट केले गेले असणार,मला तर यात फाऊल प्ले दिसत आहे. =========================== http://www.espncricinfo.com/india/content/story/640911.html पुरोगाम्यांचे सरकार आल्यावर हे बेटींग करणारे इ इ वगैरे लगेचच कसे सुटले यातून?,निश्चितच पुरावे नष्ट केले गेले असणार,मला तर यात फाऊल प्ले दिसत आहे. =========================== http://www.thehindu.com/news/national/kerala/balakrishna-pillai-released-from-jail/article2588236.ece पुरोगाम्यांचे सरकार आल्यावर हे भ्रष्टाचारी राजकारणी इ इ वगैरे लगेचच कसे सुटले यातून?,निश्चितच पुरावे नष्ट केले गेले असणार,मला तर यात फाऊल प्ले दिसत आहे.
स
सिंथेटिक जिनियस Wed, 12/13/2017 - 04:04 नवीन
त्यामुळे फक्त एका मालेगाव प्रकरणात त्यांना गोवून चालणार नव्हतं. म्हणून त्यांना २ गुन्ह्यात उगाच गोवण्यात आलं. >> तुमच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी.पण काय हो ,पायलीला पंचविस हिंदू दहशतवादी पडलेले असताना काँग्रेस सरकारने बरे लष्करातल्या माणसालाच अटक करुन लष्कराचे मॉरल कमी करण्याचा प्रयत्न केला.चेरी पिकिंगला दादच द्यायला हवी यांच्या ,आणि बरा पुरोहीतच सापडला .महाराष्ट्रातला एक बेडेकर नावाचा तथाकथित इतिहासकारही या कटात सामिल असल्याचा संशय होता कारण तसे परीस्थीतिजन्य पुरावे होते,पण थोडक्यात निसटला.
स
सुबोध खरे Wed, 12/13/2017 - 08:04 नवीन
पायलीला पंचविस हिंदू दहशतवादी पडलेले असताना ह ह पु वा असेच अजून विनोद येऊ द्या.
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 09:19 नवीन
पायलीला पंचविस हिंदू दहशतवादी पडलेले असताना
अहो अहो, जागे व्हा. तो २६/११ हिंदूंनी केला हे सिद्ध करायचा मुश्रिफचा, दिग्गीचा, सोनियाचा प्रयत्न कसाब अटक झाल्यामुळं फसला आहे. असं काहीही बरळू नका. पुरोगामी पकडले जातील. ================= जगात धर्माने हिंदू असलेले अतिरेकी आहेत. पण ते हिंदू धर्म प्रेरित अतिरेकी नाहीत. असलेच तर हिंदू धर्माच्या विरोधातच आहेत. ============================ जगात हिंदू धर्माने प्रेरित हत्या करणारे दंगेखोर जरूर आहेत. पण दंगा शांत झाला कि सर्व धर्माचे लोक शांतपणे राहतात.
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 09:21 नवीन
पायलीला पंचविस हिंदू दहशतवादी पडलेले असताना
हिंदू अतिरेकी तुमच्याइतकेच विद्वान आहेत कि त्यांच्या काही मागण्या देखील आहेत? का शौक म्हणून लोक मारतात? कुठे त्यांची काय मागणी आहे हे कळेल? त्यांच्या संघटनेचे नाव? नेत्याचे नाव? उद्दिष्टे?
श
श्रीगुरुजी Wed, 12/13/2017 - 09:28 नवीन
पायलीला पंचविस हिंदू दहशतवादी पडलेले असताना पायलीला पंचवीस हिंदू दहशतवादी तयार होणं हे पायलीला पंचवीस डूआय तयार करून प्रत्येक आयडी मार्फत पंचवीसशे पिंका टाकण्याइतकं सोपं वाटतं का?
स
सिंथेटिक जिनियस Wed, 12/13/2017 - 09:42 नवीन
श्रीगुरुजी, गोंदवल्याला जाऊन या .इथे जिलब्या टाकण्यापेक्षा तिथे जाऊन प्रसादभोजनात यथाशक्ती मदत करा.
श
श्रीगुरुजी Wed, 12/13/2017 - 09:58 नवीन
डूआयची जिलबी आवडलेली दिसत नाही. साहजिकच आहे. पिंका टाकणार्‍यांना जिलबी कशी आवडणार? बादवे, तुमच्या "ह्यांचं" मत सांगा.
B
babu b Wed, 12/13/2017 - 12:22 नवीन
हे त्या नाहीत.
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 09:31 नवीन
काँग्रेस सरकारने बरे लष्करातल्या माणसालाच अटक करुन लष्कराचे मॉरल कमी करण्याचा प्रयत्न केला.
पुरोगाम्यांना नेहमी अतिरेक्यांसोबतच राहिल्याने काँग्रेस आणि लष्कराचे मॉरल यांचे गणित माहित नाही. जरा लष्कराच्या अधिकार्‍यांसोबत बोला. निवृत्त अधिकार्‍यांसोबत बोला. काँग्रेसचा एक दिवटा विद्यमान लष्करप्रमुखाबद्दल एक दगडफेक्याच्या बाजूने बोलताना काय म्हटला ते बघा. http://www.huffingtonpost.in/2017/06/11/congress-leader-sandip-dixit-calls-army-chief-sadak-ka-gunda_a_22137158/ भारताचे लष्करप्रमुख रस्त्यावरचा गुंडा म्हणे तुमच्या काँग्रेसचे खासदार. ================= बाटला हाऊस, कर्नाटक टेररिस्ट ट्रेनिंग सेंटर, .... ================ पुरोगाम्यांचे मित्र समाजवादी - http://www.dailypioneer.com/state-editions/lucknow/sp-defends-release-of-youth-arrested-on-terror-charges.html
श
श्रीगुरुजी Wed, 12/13/2017 - 09:54 नवीन
वरील बर्‍याच प्रतिसादांना एकत्रित उत्तर - मालेगावची केस बघूया. ऑगस्ट २००८ मध्ये मालेगावमध्ये मशिदीबाहेर बॉम्बस्फोट होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले. पोलिसांनी सप्टेंबर २००८ मध्ये ९ स्थानिक मुस्लिमांना अटक करून चौकशी सुरू केली. कालच हॅप्पी बर्थडे झालेल्या बर्थडे बॉयने ऑक्टोबरमध्ये अचानक जाहीररित्या सांगितले की "कोणताही मुसलमान इतर मुसलमानांना मशिदीमध्ये, विशेषतः शुक्रवारच्या दिवशी कधीही मारणे शक्य नाही. हे मुस्लिमांचं काम नाही.". वास्तविक पाहता पाकिस्तान, सिरिया, इराण, इराक, इजिप्त अशा अनेक ठिकाणी मुस्लिमांना मारणारे मुस्लिमच आहेत व त्यातील कित्येक बॉम्बस्फोट शुक्रवारी नमाजाच्या वेळी मशिदीपाशी झाले आहेत. त्यावेळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत बर्थडे बॉयचा पक्ष सत्तेत होता. बर्थडे बॉयने तपासाची सुई १८० अंशांनी फिरविल्यानंतर कुठेतरी काहीतरी चक्रे फिरली आणि ऑक्टोबर २००८ मध्ये साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित आणि इतर ९ जणांना या बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अटक केली. त्यांना जामीन मिळू नये यासाठी त्यांच्यावर मोक्का लावायचा निर्णय झाला. यातील कोणावरही भूतकाळात एकही गुन्हा दाखल नव्हता. मोक्का लावण्यासाठी किमान दोन गुह्यांमध्ये संशयित असणे आवश्यक होते. त्यामुळे यांची नावे २००६ मध्ये झालेल्या समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटामध्ये सुद्धा संशयित म्हणून घुसडण्यात आली. त्याचबरोबर २००६ मध्ये मालेगावमध्येच अजून एक बॉम्बस्फोट झाला होता. यांची नावे त्या प्रकरणातही गुंतविण्यात आली. त्यात भर म्हणून हैद्राबादमधील २-३ बॉम्बस्फोटातही यांची नावे संशयित म्हणूण टाकली गेली व नंतर त्यांच्यावर मोक्का लावला गेला. मोक्का लावल्यामुळे त्यांना जामीन मिळू शकला नाही. ते सुटू नयेत म्हणून आरोपपत्र दाखल करण्याची टाळाटाळ करण्यात आली. त्यांना पकडल्यावर सुरवातीला स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. नंतर हेमंत करकरेंच्या नेतृत्वाखाली एटीएसने चौकशी केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. मग महाराष्ट्र सीआयडीने चौकशी केली. तरीही काही मिळाले नाही. मग एक एसआयटी नेमून त्यांनी चौकशी केली. तरीही पुरावे मिळाले नाहीत. मग एकदा नव्हे तर तब्बल ४ वेळा या सर्वांची नार्को चाचणी केली. तरीही पुरावे नाहीत. मग सीबीआयला चौकशीसाठी पाचारण केले. सीबाआयला पुरावे जमविण्यात अपयश आल्यावर पुन्हा एक दुसरी एसआयटी नेमून चौकशी केली. त्यांनाही काही मिळाले नाही. आता शेवटी एनआयए चौकशी करत आहे. त्यांनाही अजून कणभरही पुरावा मिळाल्याचे दिसत नाही. पुरावे असते तर न्यायालयात आरोपपत्र दाखल करून खटला केव्हाच सुरू झाला असता. प्रत्येकवेळी आरोपींनी जामिन मागितला किंवा आरोपपत्र दाखल करून खटला सुरू करण्याची मागणी केली की सरकारी वकील एक ठरलेले छापील उत्तर देत होते. "आम्हाला अजून नवीन पुरावे सापडले असून चौकशी सुरु आहे. त्यामुळे जामिन देऊ नये.". मोक्काखाली अटक केली असल्याने न्यायालय सरकार पक्षाच्या संमतीशिवाय जामिन देऊ शकत नाही. दरम्यान अगदी याच आरोपाखाली अटक केलेल्या ९ मुसलमानांना न्यायालयाने जामिन दिला (कारण सरकार पक्षाने त्यांच्या जामिनाला विरोध केला नाही), पण साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित इं. ना जामिन देण्यास तत्कालीन सरकारने विरोध केला. तुरूंगवासात असताना या आरोपींचा प्रचंड छळ करण्यात आला. साध्वी प्रज्ञासिंगला जेवणात मांसाहार देणे, अश्लील फिल्म्स दाखविणे, कर्नल पुरोहितांना उलटे टांगून मारहाण करणे इ. प्रकार केले. पण तरीही कोणीही कबुलीजबाब दिलेला नाही. महिला आयोग या अत्याचारांबद्दल मूग गिळून गप्प बसला. साध्वी प्रज्ञासिंहच्या वडीलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी व अंतिम संस्कारांसाठी उपस्थित राहण्यासाठी तिला २-३ तास तुरूंगाबाहेर काढायला सुद्धा सरकारी वकीलांनी विरोध केल्याने तिला वडीलांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन मिळू शकले नाही. तुरंगवासाच्या काळात साध्वी प्रज्ञासिंगचे पाय निकामी झाले (ती आता व्हीलचेअर वापरते) व तिला कर्करोग झाला. परंतु तिला उपचारासाठी सोडण्यात आले नाही. २००६ साली समझोता एक्सप्रेसमद्ये बॉम्बस्फोट झाल्यावर तत्कालीन फॉरेन्सिक प्रयोगशाळेने चाचणी करून न्यायालयात असे सांगितले होते की त्यात आरडीएक्स नव्हते. पण नंतर कर्नल पुरोहितला २००८ मध्ये पकडल्यावर चौकशी करणार्‍या समितीने न्यायालयात सांगितले की समझोता प्रकरणात आरडीक्स वापरले होते व ते पुरोहितने पुरविले होते. लष्कराने पुरोहितला ६ टन आरडीक्स तामिळनाडूहून काश्मिरला नेऊन तेथील लष्कराच्या ताब्यात देण्यास सांगितले होते. पण त्याने ते तिथे न पोचविता बॉम्बसाठी वापरले. हा तद्दन खोटा आरोप वाचल्यावर दुसर्‍या दिवशी लष्करप्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की लष्कराने पुरोहितला असे काहीही सांगितले नव्हते. लष्करात प्रत्येक बुलेटचा हिशोब ठेवला जातो. जर पुरोहितने तब्बल ६ टन आरडीक्स गडप केले असते, तर ते केव्हाच लक्षात आले असते. हे ऐकल्यावर चौकशी समितीने न्यायालयात जाऊन आरडीक्सबद्दलचे आपले निवेदन मागे घेतले. असीमानंदची वेगळीच कहाणी आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार असीमानंदला पकडून तुरूंगात ठेवल्यावर, समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटासाठी आरोप लावलेल्या एका मुस्लिम तरूणाला असीमानंदच्या सेवेसाठी ठेवले होते. त्याच्या सेवेमुळे असीमानंदला पश्चाताप झाला व उपरती होऊन त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तुरूंगात असलेल्या एका आरोपीच्या सेवेसाठी दुसरा आरोपी अधिकृतरित्या नियुक्त केला जातो हे बहुधा भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असावे. हा चौकशी समितीच्या खोटारडेपणाचा कळस होता. नंतर लगेचच असीमानंदने पत्रकारांना सांगितले की पोलिसांनी छळ करून त्याच्याकडून जबरदस्तीने कबुलीजबाब लिहून घेतला. आपल्याविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्याने आपल्याला जामिनावर सोडावे यासाठी सर्वजण अनेक वर्षे प्रयत्न करीत होते. मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्यावरील मोक्का हटविण्यात आला व त्यानंतर २०१७ मध्ये जवळपास ९ वर्षे तुरूंगात विनाजामीन राहिल्यानंतर यातील बहुतेकांना जामीन मिळाला आहे. त्यांच्याविरूद्ध पुरावे शून्य आहेत. जोपर्यंत ते तुरूंगात होते व खटला सुरू होत नव्हता तोपर्यंत भाजपला व संघपरिवाराला झोडपण्यासाठी हत्यार म्हणून काँग्रेस व देशातले इतर निधर्मांध त्यांचा वापर करीत होते. खटला सुरू झाला तर ते निर्दोष सुटणार याची खात्री असल्याने आरोपपत्र दाखल न करता चौकशीचा निव्वळ फार्स केला जात होता. २००९ मधील निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांना अडकविण्यात आले. त्यांना अडकवून मुस्लिमांना खूष करणे व भगवा दहशतवाद असा प्रचार करून भाजपला बॅकफूटवर ढकलणे या युक्तीला २००९ मध्ये चांगलेच यश मिळाले होते. याचीच पुनरावृत्ती २०१३ मध्ये करण्याचा प्रयत्न झाला. बर्थडे बॉयने ज्याप्रकारे २००८ मध्ये तपासाची दिशा फिरविली होती, तसाच प्रयत्न २०१३ मध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी दाभोळकरांच्या खुनानंतर केला. खुनानंतर संशयाची सुई सनातनच्या दिशेने वळवून पुन्हा एकदा २०१४ च्या निवडणुकीसाठी हिंदू दहशतवाद असा प्रचार करून भाजपला बॅकफूटवर ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र पूर्ण फसला. मालेगाव व समझोता प्रकरणामध्ये दहशतवादी मुस्लिमांना क्लीन चिट देऊन व त्यात निरपराध हिंदूंना गोवून काँग्रेसने देशद्रोहीपणाचे अत्यंत नीच कृत्य केले आहे. समझोता प्रकरणामध्ये पाकिस्तानचाच हात होता असा सीआयएने अहवाल दिला होता. हा बॉम्फस्फोट आमच्याच देशातील लोकांनी केला याची कबुली एका पाकिस्तानच्या मंत्र्याने दिली होती. त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष कृत्य करून त्यात निरपराध हिंदूंना गोवण्याचे नीच कृत्य खांग्रेसींनी केले. २००८ नंतर जेव्हा जेव्हा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा पाकिस्तान या दोन प्रकरणांकडे बोट दाखवून तुमचेच लोक यामागे आहेत असे दाखवून भारताच्या आरोपातील हवा काढून घेतात. पक्षीय स्वार्थासाठी देशहिताचा बळी देण्याचे जे अधम कृत्य खांग्रेसींनी केले त्यांना क्षमा नाही.
B
babu b Wed, 12/13/2017 - 10:05 नवीन
सगळे लिहिले , पण साध्वीच्या स्कूटरबद्दल नाय लिहिले ! बाँबस्फोटातील स्फोट ज्या स्कूटरच्या सहाय्याने केला ती साध्वीच्या मालकीची होती ना ?
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 10:27 नवीन
http://www.livemint.com/Politics/HwVVdPXpl0RKoNt4MMUWeL/Malegaon-blasts-case-Bombay-HC-grants-bail-to-Sadhvi-Pragya.html
Sadhvi Pragya’s lawyer said, “There were two allegations against her. One was that her scooter was used in the blast, although there was evidence that the scooter was sold off in 2004 and the blast happened in 2008. The second allegation was that she was part of two meetings in Bhopal and Faridabad. In the Faridabad meeting, the entire conspiracy of Malegaon blast was planned. However, there was no evidence of her participating in the meeting, and there was no such conspiracy in the Bhopal meeting. Barring that there was nothing absolutely against her.”
तुम्ही विकलेल्या गाडीच्या ड्रायवरने अ‍ॅक्सिडेंट केला तर पोलिसात सरेंडर कराल का?
B
babu b Wed, 12/13/2017 - 12:19 नवीन
साध्वीने स्कूटर विकली होती तर स्कूटर नव्या मालकाच्या नावाने झाली असती व अटक नव्या मालकाला केली गेली असती. ... असो , सध्या साध्वी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याने तिच्याबद्दल इतर चर्चा करण्यात अर्थ नाही. आधिदैविक , आधिभौतिक आणि अध्यात्मिक अशा तीतीन्ही द्:खातून तरुन जाण्यास हिंदुधर्म तिला शक्ती देवो.
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 10:28 नवीन
बाँबस्फोटातील स्फोट ज्या स्कूटरच्या सहाय्याने केला ती साध्वीच्या मालकीची होती ना ?
पुरोगाम्यांच्या मते हो, कायदेशीरपणे नो.
श
श्रीगुरुजी Wed, 12/13/2017 - 10:35 नवीन
न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर आदळलेली विमाने सुद्धा साध्वीच्या मालकीची होती.
स
सिंथेटिक जिनियस Wed, 12/13/2017 - 10:36 नवीन
ही साध्वी आणखी एक गुन्ह्यात होती असा संशय आहे,मालेगाव कट शिजला त्यात एक जोशी नावाचा प्रचारक होता,साध्वीकडे त्याने बरेचदा लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता असे तपास यंत्रणांचे म्हणने आहे.माझ्याशी संबंध ठेव नाही तर कटाचि माहीती पोलिसांना देईन अशी त्याने धमकी दिल्यावर त्याला २००७ साली संपवले गेले म्हणे. ब्रह्मचर्य हेच जीवन ,विर्यनाश हा मृत्यु असे वैचारीक टॉनिक भोळ्याभाबड्या हिंदूना पाजणारे तथाकथित साध्वी आणि प्रचारक वास्तवात कसे विषयवासनेत बुडालेले असतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. http://indianexpress.com/article/india/india-others/pracharak-killed-after-he-made-sexual-advances-on-sadhvi-nia/
श
श्रीगुरुजी Wed, 12/13/2017 - 10:46 नवीन
ही साध्वी आणखी एक गुन्ह्यात होती असा संशय आहे, ९/११ आणि २६/११ च्या हल्ल्यात तसेच दुसर्‍या महायुद्धात जपानवर टाकलेल्या अणुबाँबच्या प्रकरणात सुद्धा या साध्वीचा हात होता असा संशय आहे. मालेगाव कट शिजला त्यात एक जोशी नावाचा प्रचारक होता,साध्वीकडे त्याने बरेचदा लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता असे तपास यंत्रणांचे म्हणने आहे.माझ्याशी संबंध ठेव नाही तर कटाचि माहीती पोलिसांना देईन अशी त्याने धमकी दिल्यावर त्याला २००७ साली संपवले गेले म्हणे. साध्वी, कर्नल पुरोहित इ. ना काहीतरी करून या प्रकरणात अडकविण्यासाठी एनआयएने असे अनेक बिनबुडाचे आरोप केले होते. हा आरोप त्यातलाच अजून एक. ब्रह्मचर्य हेच जीवन ,विर्यनाश हा मृत्यु असे वैचारीक टॉनिक भोळ्याभाबड्या हिंदूना पाजणारे तथाकथित साध्वी आणि प्रचारक वास्तवात कसे विषयवासनेत बुडालेले असतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. अनेकवेळा हाकलून लावूनसुद्धा कोडगेपणे नवीन आयडी घेऊन परत येऊन त्याच त्याच ओकार्‍या परत काढणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे . . .
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 12:04 नवीन
ब्रह्मचर्य हेच जीवन ,विर्यनाश हा मृत्यु असे वैचारीक टॉनिक भोळ्याभाबड्या हिंदूना पाजणारे तथाकथित साध्वी आणि प्रचारक वास्तवात कसे विषयवासनेत बुडालेले असतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.
पुरोगामी पंडित नेहरूंची प्रेरणा, दुसरं काय. गांधीजी सुद्धा तसलेच. तरण्या नातींसोबत नागडे झोपायचे आणि जगाला ब्रह्मचर्य शिकवायचे. https://blogs.timesofindia.indiatimes.com/the-interviews-blog/gandhi-was-obsessed-with-sex-while-preaching-celibacy-to-others-kusoom-vadgama/
स
सिंथेटिक जिनियस Wed, 12/13/2017 - 13:02 नवीन
गांधीजी सुद्धा तसलेच. तरण्या नातींसोबत नागडे झोपायचे आणि जगाला ब्रह्मचर्य शिकवायचे. >> एक कविमनाचा "अटळ "विचारांचा भाजपेई पंतप्रधान होऊन गेला ,तो दिल्लीतील संघ मुख्यालयात पोरी आणून कसा अय्याशी करायचा ह्याचे सुरस किस्से तेव्हा राजधानीत चर्चीले जात होते .
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 13:10 नवीन
हे मी देखील ऐकलं आहे. याला किती खरं मानावं देव जाणो. -------------------- पण गांधीजींचं सेक्स्यूअल पाप सिद्ध आहे. वाजपेयींवर केवळ आरोप आहे.
B
babu b Wed, 12/13/2017 - 13:55 नवीन
मै शादीशुदा नही हू इसका मतलब ये नही की मै ब्रह्मचारी हू .... असे सोत्ता तेच सोत्ताबद्दल बोलले होते ना ?
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 16:25 नवीन
पण ते गांधीजीं इतका विकृत प्रकार करत नसावेत. मी दिलेली लिंक वाचलीत का? =============== आरोप करणारे आणि भाजप / संघ यांचा संबंध नाही. ============================== माझे सत्याचे प्रयोग वाचले आहे का? त्यात आहे.
स
सिंथेटिक जिनियस Wed, 12/13/2017 - 14:27 नवीन
पण गांधीजींचं सेक्स्यूअल पाप सिद्ध आहे. वाजपेयींवर केवळ आरोप आहे. >> कुठे सिद्ध झाले बुवा हे! गांधी विरोधकांनि उठवलेल्या अफवांना सिद्धता मानता का जोशी? तशी अफवा तर मग हिंदू महासभेच्या एका मोठ्या मराठी नेत्याबाबतही आहे,त्याचे आणि गोडसेचे समलिंगी संबंध असल्याचे तत्कालीन तपास् अधिकार्यांनी जाहीरपणे कोर्टात सांगितले होते हे विसरलात काय.?
श
श्रीगुरुजी Wed, 12/13/2017 - 14:55 नवीन
कुठे सिद्ध झाले बुवा हे! गांधी विरोधकांनि उठवलेल्या अफवांना सिद्धता मानता का जोशी? एका पुस्तकात कन्फेशन आहे.
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 12:33 नवीन
मालेगाव कट शिजला त्यात एक जोशी नावाचा प्रचारक होता,साध्वीकडे त्याने बरेचदा लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता असे तपास यंत्रणांचे म्हणने आहे.माझ्याशी संबंध ठेव नाही तर कटाचि माहीती पोलिसांना देईन अशी त्याने धमकी दिल्यावर त्याला २००७ साली संपवले गेले म्हणे.
कटात तो स्वतः होता तर माहीती पोलिसांना कळल्यावर त्याला काय सोडणार होते का? ======================== लैंगिक अ‍ॅडवान्सेस करणे क्रिमिनल आहे, त्यासाठी साध्वीने त्याचा खून करणे क्रिमिनल आहे. पण इंडीयन एक्सप्रेसने आणि एन आय ने ओढून ताणून तिचे हात पाय तोडून याचा संबंध ब्लास्टशी लावला आहे. ========================= केरळच्या मंदिरात सोने सापडले तेव्हा काँग्रेसच्या मुख्यालयातूने दोन जहाजे इटलीतून मागवली गेली (ते सोनं घेऊन जायला) तसं साध्वीला शंकराचार्य आणि संघप्रमुखांचं मार्गदर्शन होतं असं म्हणायचं आहे का?
इ
इरसाल Wed, 12/13/2017 - 10:46 नवीन
थराला जावु शकतो. कहर आहे.
प
पुंबा Wed, 12/13/2017 - 12:32 नवीन
गांधीहत्येचे या धाग्यावर खुलेपणाने समर्थन होत आहे. त्याचा मी तीव्र निषेध करतो.
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 13:13 नवीन
गांधी हत्येचं समर्थन मंजे काय हे तरी कळतं का तुम्हाला? ======= आम्हाला काय शौक आहे का कोणाच्याही हत्येचं समर्थन करायला? ================ मी कधीही कोणत्याही प्रकारच्या वाईट गोश्टीचा, हिंसेचा, दुर्वर्तनाचा, इ इ समर्थन केले नाही, करणार नाही. त्यात गांधींची हत्या ही एक अशीच असमर्थनीय गोष्ट आहे.
श
श्रीगुरुजी Wed, 12/13/2017 - 13:28 नवीन
वर एका प्रतिसादात ब्राह्मणांचा उल्लेख कुत्रा असा केलेला असून त्यांची घरे जाळल्याचे समर्थन केलेले आहे. तो प्रतिसाद आपण पाहिला नसणारच.
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 13:39 नवीन
त्यांची घरे जाळल्याचे समर्थन केलेले आहे.
पुढे असाच प्रसाद द्यायची इच्छा देखील व्यक्त केली आहे. ============================================ पुंबासारख्या पुरोगाम्यांना १०-२० लाख पंजाबी, बंगाली लोकांवर झालेले अनन्वित अत्याचार दिसत नाहीत. हे ज्यांच्या मूर्खपणाने झाले त्यांना कुणी चोपले तर मेणबत्ती काढून चौकात.
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 16:32 नवीन
हे लोक गांधीजींच्या धोतरावर ढेकूण चढला तरी आकांडतांडव करतील. तेच्च २० लाख लोकांचे जीव गेले आणि लाखो बायकांवर बलात्कार झाले तर कुठेत्तरी कोपर्‍यात "वैष्णव जन तो" वर टाळ बडवत बसणार. गांधी मारले गेले ते वाईट, मारणारा वाईट - अरे पण त्या लाखो लोकांवर बोला जरा.
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा