Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आता, 'न्याय' ही संतापला..!

अ
अँड. हरिदास उंबरकर
Mon, 12/11/2017 - 12:05
💬 89 प्रतिसाद
आता, 'न्याय' ही संतापला..! 'तपास सुरु आहे' असं ठरीव आणि ठाशीव उत्तर देणाऱ्या तपास यंत्रणांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. चार वर्ष होतात तरी नरेंद्र दाभोलकर, कॉ पानसरे यांच्या खुनाचा तपास का लागत नाही? दोभोळ्कर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे? असा सवाल विचारत या दोन्ही प्रकरणातील तपासाची सद्यस्थती न्यायालयात दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. दाभोळकर- पानसरे हत्येप्रकरणी एका याचिकेवर सुनावणी करत असताना देशातील सद्यस्थतीतवर चिंता व्यक्त करत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला. लोकशाहीप्रधान देशात विचारवंतावर हल्ले केले जातात, कलाकारांना धमक्या दिल्या जातात. त्यामुळे देशाची प्रतिमा मालिन होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दाभोळकर -पानसरे प्रकरणाचा छडा लागत नसल्याने सर्वसामान्य जनतेत असलेली संतापाची भावना न्यायालयाने मांडल्याने आता, 'न्याय' ही संतापला..! असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अर्थात, न्यायालयाचा असो कि सामान्य जनतेचा हा संताप आजचाचं नाही. यापूर्वीही न्यायालयाने अनेकवेळा तपासयंत्रणांना धारेवर धरले आहे. सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दाभोळकर पानसरे प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी सातत्याने लावून धरली. मात्र अद्यापही या प्रकरणांचा उलगडा झालेला नाही, हे वास्तव आहे. दाभोळकर हत्याकांडाला चार वर्ष पूर्ण झाली, पानसरे यांच्या प्रकरणाला दोन वर्ष झाली. तरी ना तर त्यांचे मारेकरी पकडले गेले, ना त्यामागील सूत्रधार.. तपासयंत्रणा तापस सूर असल्याचं उत्तर देत राहिल्या, अन विचारसरणीच्या नावाखाली एकामागून एक विचारवंतांचे मुडदे पाडले जाण्याचं सत्र सुरूच राहिलं..दाभोळकर नंतर पानसरे त्यांच्यानंतर कर्नाटकात डॉ. कलबुर्गी तर आता सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील “लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांचीही हत्या झाली. एकाच 'मोडस ऑपरेन्डीने' प्रागतिक चळवळीतील चार कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र, सीबीआय, सीआयडी सारख्या नामवंत तपास यंत्रणांनाही या प्रकरणाचा उलगडा करता आलेला नाही. त्यामुळे यावर न्यायालयाचा असो कि सामान्य जनतेचा संताप व्यक्त होणे सहाजिकच.. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुरोगामी चळवळीचे आधारवड डॉ नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येच्या पहिल्या दिवसापासून पोलीस प्रशासन तपासाला लागल्याचे वरकरणी दिसले, परंतु पोलिसी तपासाची ढिसाळ कार्यपद्धती पदोपदी समोर येत राहिली. सुरवातीचा काही काळ प्राथमिक तपासात गेला. दाभोलकरांच्या खुनाचा छडा लावण्यासाठी ‘प्लँचेट’ चा वापर करण्यात आल्याचा आरोपही या काळात झाला. २०१४ मध्ये मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांवर डॉ. दाभोळकर यांच्या हत्येसाठी पिस्तूल पुरवल्याचा आरोप करण्यात आला. मात्र न्यायालयात नागोरीने एटीएसवर गुन्हा काबुल करण्यासाठी २५ लाखाची ऑफर दिल्याचा आरोप केला. ९ मे २०१४ ला दाभोळकर प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपविण्यात आला. तीन वर्षानंतर म्हणजे १० जून २०१६ ला सनातन संस्थेच्या वीरेंद्र तावडे याला सीबीआयने ताब्यात घेतेले. फरार असलेले विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप ठेवत तावडेला मुख्य आरोपी करून ७ सप्टेंबर २०१६ ला सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. परंतु आजून आरोप निश्चित झालेले नाही. संशयित अटक झालेले नाही. लंडन वरून येणाऱ्या बॅलेस्टिक अहवालाचा घोळ सुरूच आहे. निव्वळ तारखमागून तारखा वाढवून घेण्याचा प्रकार सुरु असून डॉ. दाभोळकरणांचे मारेकरी कोण, त्यामागील सूत्रधार, याचा कोणताच थांगपत्ता अजून लागलेला नाही. डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास रेंगाळत असतानाच त्याच पद्दतीने कोल्हापुरात कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रावर दुसरा आघात झाला. याही प्रकरणाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई झाली. सुरवातीला कोल्हापूर एटीएस आणि नंतर सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात आला. दाभोळकर प्रकरणातील आरोपींशी पानसरे हत्याप्रकरणाचे धागे दोरे आढळले. समीर गायकवाडला हत्येच्या ८ महिन्यानंतर अटक झाली. बॅलिस्टिक अहवाल अगोदर स्कॉटलंड यार्ड कडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले, नंतर त्याला परवानगीच नसल्याचे समोर आले. मुंबई आणि गुजरातच्या लॅबमधून बॅलेस्टिक अहवाल मागविण्यात आला. मात्र त्यात पराकोटीची विसंगती आढळून आली. तपास संस्थांच्या गडबडीमुळे समीर गाकवाडला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला. पोलिसांचे आरोपपत्र सीबीआयने रद्द ठरविले आणि आपले आरोपांतर दाखल केलं परंतु त्याच्यातही समोर काहीच झालं नाही. दाभोळकर आणि पानसरे प्रकरणातील साम्य पाहता दोन्ही प्रकरणाचा संयुक्तिक तपास करण्याचाही प्रयत्न झाला, पण आउटपुट शून्य..! दाभोळकर-पानसरे प्रकरणाचा तपास रेंगाळला. परंतु, बंदुकीच्या गोळीने विचार संपविन्याचे सत्र मात्र थांबले नाही. कर्नाटकात डॉ. कलबुर्गी यांनाही समाजकंटकांनी गोळ्या घातल्या. सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील “लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांचीही त्याच पद्धतीने हत्या झाली. एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नसतील तर त्याच्याशी विचारांचा संघर्ष करण्याऐवजी त्या व्यक्तीलाच संपविण्याची प्रवृत्ती संवैधानिक विचार स्वातंत्र्याच्या तत्वाला तर मारक आहेच, शिवाय देशाच्या इभ्रतीसही कलंक लावणारे आहे. चार वर्षात प्रागतिक चळवळीतील चार कार्यकर्त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडणारे 'हात' कुणाचे होते? हे तपास यंत्रणांना कदाचित माहीत नसेलही, मात्र त्यामागे 'मेंदू' कोणत्या विचार प्रवृत्तीचा आहे, हे सर्वसामान्य जनतेला दिसते. पण ते सरकारला आणि तपास यंत्रणांना का दिसत नाही, हा अस्वस्थ करणारा सवाल आहे. म्हणूनच न्यायालयाने यावरून तपास यंत्रणांना धारेवर धरले. विवेकवादाची लढाई लढता लढता चार शिलेदार धारातीर्थी पडले. अर्थात त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही आणि जाणार नाही. बंदुकीच्या गोळीने विचार संपवू पाहणाऱ्या प्रवृत्तीला नेहमीच कठोर प्रतिउत्तर दिल्या गेले आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्या निधनानंतरही चळवळ थांबली नाही, उलट ती फोफावते आहे. परंतु तरीसुद्धा माणुसकीचा प्रकाश देणाऱ्या या 'पणत्या' विझवण्याचे कुकर्म कुणाचे ? याचा शोध लागणे गरजेचे आहे. न्यायालयाच्या ताशेऱ्यांना गांभीर्याने घेऊन तपास यंत्रणांनी या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवे. न्यायालयाने व्यक्त केलेला संताप लोकांनाही रस्त्यावर मांडला तर, परिस्थती हाताबाहेर जाईल याची जाण तपास यंत्रणा आणि सरकारने ठेवायला हवी..!!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • 16133 views

💬 प्रतिसाद (89)
ग
गामा पैलवान Mon, 12/11/2017 - 17:38 नवीन
अधिवक्ते हरिदास उंबरकर, हिंदू दहशतवादाच्या भाकड आरोपांखाली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांना ९ वर्षं तुरुंगात डांबून ठेवलं होतं. याच भारतद्रोही शक्ती दाभोलकरादिंच्या हत्यांच्या तपासांत अडथळे उत्पन्न करत आहेत. या प्रकरणांशी सनातन संस्थेचा काडीमात्र संबंध नसतांना डॉक्टर वीरेंद्र तावडे आणि समीर गायकवाड यांना अटक करण्यांत आली. गायकवाड यांना जमीन मिळाला पण डॉक्टर तावडे आरोपांविना आजूनही तुरुंगात आहेत. निरपराध्यांच्या या अटकांची संगती कशी लावायची? आ.न., -गा.पै.
अ
अँड. हरिदास उंबरकर Mon, 12/11/2017 - 20:19 नवीन
सनतान संस्था किंव्हा अन्य कोणत्याच् संस्थेवर आरोप नाही.. तपास यंत्रणा तपासात कमी पड़त असल्याच वैषम्य आहे.. गायकवाड़ यांना जामिन मिळाला आहे.. तावड़े यांचा सुद्धा जामिन होईल अशी शक्यता दिसतेय.. अर्थात न्यायालय जामिन देते म्हणजे पुरावे नसनार म्हणुन च ना..माझा तो मुद्दा मुळीच नाही..प्रश्न फ़क्त इतकाच Who Killed Dabholkar??
आ
आनन्दा Mon, 12/11/2017 - 18:45 नवीन
बोलायची इच्छा आहे, पण पुरोगामी लोकांच्या नादाला लागायचे नाही असे ठरवले आहे.
ज
जानु Mon, 12/11/2017 - 18:52 नवीन
तुम्हाला काय वाटतय? तपास यंत्रणा खरच काम करीत नाहीत? की त्यांना करु दिले जात नाही? या हत्या ज्या काळात झाल्या त्या काळात कोणता मेंदु कार्यरत होता? झारीतील शुक्राचार्य कोण झालेत? असे काय गुपीत आहे की जे सापडत नाही, माहित नाही? खरच गुपित आहे का नुसते साप साप म्हणुन भुई धोपटणे? तपास यंत्रणेपेक्षा सक्षम खुनी असतील तर मग आपण फुकटे का पोसायचे? कलबुर्गी आणि लंकेश तर कर्नाटकात आणि महाराष्ट्रात पानसरे आणि दाभोळकर, मग दोन तपास यंत्रणा खरच अकार्यक्षम आहेत का? थोडा वेळ समजुया की यात हिंदु संघटनांचा हात आहे. आजवर याबाबत काय पुरावा पोलिसांनी न्यायालयाला दिलाय? पुरावा दिला तर त्यावर न्यायालय काही आदेश न देता पोलिसांवर का राग काढतय? जर आपण म्हणता मेंदु माहित आहे, ते कोणत्या आधारावर? न्यायालयात कसे सिध्द करणार? मेंदुवर कशी कार्यवाही करावी? याप्रकारानेच, अतिरेकीपणाने सर्व सामान्य सरळ हिंदु कट्टर होत चाललाय.....
अ
अँड. हरिदास उंबरकर Mon, 12/11/2017 - 20:24 नवीन
तेच तर.. नेमके काय कारण आहे.. का लागत नाही तपास? कुणी करू देत नाही की काय? नेमकं काय सुरु आहे हेच माझेही प्रश्न आहेत.
स
समीर वैद्य Mon, 12/11/2017 - 18:55 नवीन
ह्यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ताहिर हुसेन नावाच्या माणसाला अटक केली आहे. आता ताहिर हुसेन हा सनातन चा कार्यकर्ता होता असा शोध अडव्होकेट साहेबांनी लावला नाही म्हणजे मिळवलं........
अ
अँड. हरिदास उंबरकर Mon, 12/11/2017 - 20:28 नवीन
समीर वैद्य जी, गैरसमज नको.. मी कुठेच् कोणतीच संस्था म्हटलेली नाही.. आरोप ही नाही.. फ़क्त आरोपी का सापडत नाही.. हा कोर्टाने उपस्थित केलेला प्रश्न थोडासा विश्लेषित करण्याचा प्रयत्न केला आहे.
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 12/12/2017 - 02:29 नवीन
समस्त सरकारांनी हत्येच्या दोन तासातच ह्या विचारसरणीच्या लोकांनी खून केला असे जाहीर केले अन तपास यंत्रणेवर तशाच अँगलनं तपास करायचा बोजा वाढला. मीडिया किंवा खून झालेल्यांच्या संबंधितांनी तपासाची दिशा सनातन संस्थेकडे वळवली. त्यामुळं इतर बाबी निसटल्या अन मारेकरी कुठच्या कुठं निघून गेले. तपास निष्पक्ष झाला नाही हेच तपास निष्फळ ठरल्याचे मुख्य कारण.
अ
अँड. हरिदास उंबरकर Tue, 12/12/2017 - 04:41 नवीन
मुद्दा पटन्यासारखा वाटतो.. तपास यंत्रनेवर दबाव आल्याने कदाचित त्यांची दिशा भरकटली असेल. वरिष्ठ आणि मिडियाचा प्रचंड दबाव, यात तपास अधिकारी यांना योग्य त्या पद्धतीने सर्व बाजू हाताळत्या आल्या नसतील. पण सिबिआय, सीआइडी, स्पेशल पथक यासारख्या नामवंत तपास संस्था असताना एक साधा दुवा सुद्ध हाती लागू नये..? दोभळकर प्रकरणी जे झाले तेच पानसरे यांच्या बाबतीतही व्हावं.. म्हणूनच कुठेतरी दिरंगाइ झाली अशी शंका येते. पानसरे केस मधे तपास संस्थेने न्यायालयात आधी सांगितले की, गोळ्या फॉरेन्सिक टेस्टसाठी स्कॉटलंडला पाठवण्यात आल्या. पण नंतर आठ महिन्यांनी म्हटले की, स्कॉटलंडला पाठवण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मुंबई आणि गुजरातच्या लॅबमध्ये पाठवल्या आहेत. अर्थात गुजरात आणि मुंबई लॅबचे अहवालही वेगवेगळे आहेत. गुजरातचा अहवाल म्हणतो की, एकाच पिस्तुलाने पानसरेंवर गोळीबार करण्यात आला होता; तर मुंबईच्या अहवालानुसार, दोन वेगवेगळ्या देशी पिस्तुलांतून गोळीबार झाला. हे काय सुरु आहे..? अर्थातच, तपास निष्पक्ष आणि योग्य पद्धतीने झाला नाही.. त्यामुळेच ही विसंगती दिसते.
स
सुबोध खरे Tue, 12/12/2017 - 05:10 नवीन
ऍडव्होकेट साहेब दोन्ही हत्याकांडे झाली तेंव्हा त्या त्या राज्यात काँग्रेसची सरकारे होती. त्यांचे आणि सनातन संस्थेचे विळ्याभोपळ्यासारखे सख्य आहे असे असूनही मारेकरी सापडत नाहीत. जे सापडले त्यांच्या विरुद्ध सकृतदर्शनीही ठोस पुरावा सापडला नाही. केवळ कायद्यातील लफडी कुलंगडी करून त्यांना अडकवून ठेवलेले आहे. तरी बरं या दोन्ही राज्यात हत्या झाली "त्या"वेळेस भाजपचे सरकार नव्हते. अन्यथा सर्व डावे, पुरोगामी, उदारमतवादी इ इ लोकांनी केवढा धुराळा उडवला असता. नशीब कोणत्याही उजव्या संस्थेने यात काँग्रेसचे साटे लोटे आहेत असा आरोप केल्याचे निदान मी तरी वाचले नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि हत्या करणारे किंवा करविणारे हे पोलिसांच्या चार पावले पुढे आहेत. केवळ राजकीय वजन वापरले म्हणून १०० टक्के गुन्ह्यांची उकल होत नाही. उलट दबावाखाली निरपराध माणसे गोवले जाण्याची शक्यता जास्त असते. जे झाले ते अतिशय चूक आहे परंतु डावे, पुरोगामी, उदारमतवादी इ इ लोक केवळ त्यांच्या हातात पत्रकारिता आहे म्हणून त्याचा "राजकीय फायदा" उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत हि हि वस्तुस्थिती.
अ
अँड. हरिदास उंबरकर Tue, 12/12/2017 - 12:30 नवीन
दोन्ही हत्याकांडे झाली तेंव्हा त्या त्या राज्यात काँग्रेसची सरकारे होती. पानसरे यांची हत्या झाली त्यावेळी २०१५ मधे काँग्रेसचे सरकार नव्हते..
A
arunjoshi123 Tue, 12/12/2017 - 07:09 नवीन
दोभोळ्कर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे?
असं विचारणं न्यायालयाच्या अधिक्षेत्रात येत नाही.
अ
अँड. हरिदास उंबरकर Tue, 12/12/2017 - 12:31 नवीन
पण हा प्रश्न न्यायाल्यानेच उपस्थित केला आहे.. माझ्या माहिती प्रमाणे न्यायालय अशी विचारणा करू शकते.
क
कपिलमुनी Tue, 12/12/2017 - 12:42 नवीन
इथे न्यायलयापेक्षा शहाणे सदस्य आहेत हे आपणाला बहुतेक माहिती नसावे. इथे सर्वोच्च न्यायायलयाची अक्कल काढणारे हुषार पन आहेत . येइल तुम्हाला अनुभव
स
सुबोध खरे Tue, 12/12/2017 - 14:06 नवीन
न्यायालयाने असा प्रश्न विचारला आणि आतापर्यंत काय प्रगती झाली हे ते विचारू शकतात हे मान्य. पण पोलिसांना खरोखरच( राजकीय हस्तक्षेप सोडून द्या) काही धागा दोरा लागला नसेल तर ते काय उत्तर देणार? एखादी सर्वसामान्य व्यक्ती हरवली आहे म्हणून कोर्टाने पोलिसांना तिला शोधून काढा म्हणून हुकूम दिला पण प्रत्यक्षात पोलिसांना तपास करून काहीच हातास लागले नसेल तर पोलीस काय करतील. आणि असे शपथपत्र जर पोलीस महासंचालकांनी न्यायालयात दाखल केले तर न्यायालय काय करू शकेल? पोलीस महासंचालकांना बडतर्फ करा म्हणून हुकूम देऊ शकेल? शक्य नाही. न्यायालयांना पण आपली मर्यादा आहे. हे सर्वच लोक विसरतात. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे पण स्खलनशील नाही-- सोली सोराबजी, पूर्व महाधिवक्ता, भारतीय संघराज्य
A
arunjoshi123 Tue, 12/12/2017 - 07:11 नवीन
सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दाभोळकर पानसरे
पानसरे यांनी केलेल्या सुधारणा कोणत्या?
श
श्रीगुरुजी Tue, 12/12/2017 - 07:52 नवीन
त्यांनी "शिवाजी कोण होता" या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यातील काही पाने मी वाचली होती. भारतातील मुस्लिम आक्रमकांनी देवळे वगैरे पाडलेली नाहीत, ते लुटीच्या उद्देशाने भारतात आले होते, धर्मप्रसार त्यांचा हेतू नव्हता असा टिपीकल जनेविछाप इतिहास त्यात लिहिलेला आहे. हेमंत करकरे, साळसकर इ. ची हत्या संघाने केली, संघानेच २६/११ चा हल्ला केला होता असले हास्यास्पद दावे करणारे एक पुस्तक कोल्हापूरच्या मुश्रीफने लिहिले आहे. त्याच्या प्रकाशन समारंभास कोळसेपाटील, पानसरे इ. तथाकथित विचारवंत उपस्थित होते व त्यांनी भाषणे ठोकून संघावर जोरदार टीका केली होती.
A
arunjoshi123 Tue, 12/12/2017 - 07:28 नवीन
अन विचारसरणीच्या नावाखाली एकामागून एक विचारवंतांचे मुडदे पाडले जाण्याचं सत्र सुरूच राहिलं
कोणत्या विचारसरणीच्या? यांच्यात काहीतरी साम्य होतं का? काय साम्य होतं? फक्त यांचीच का लिस्ट बनवली आहे?
ग
गंम्बा Tue, 12/12/2017 - 07:29 नवीन
जागतीक पातळीवर अनेक हत्यांच्या मागचा खुनी मिळत नाही. तुम्ही विदा काढुन बघा. नॉर्मली जेंव्हा नातेसंबंधातुन किंवा प्रेमप्रकरणातुन/आर्थिक फसवणुकीतुन हत्या होतात त्यांचे खुनी सापडणे जमते. पण सुपारी घेउन कोणी बंगाल बिहार मधला माणुस आणुन खुन करुन गेला तर सापडणे अशक्य आहे. तुम्ही स्वताला पोलिसांच्या जागी कल्पुन बघा.
ग
गंम्बा Tue, 12/12/2017 - 07:30 नवीन
पानसरे यांनी केलेल्या सुधारणा कोणत्या?
माहिती नाही, पण ते शरद पवांरांच्या बरोबर अनेक वेळेला व्यासपीठावर असायचे कोल्हापुर भागात.
A
arunjoshi123 Tue, 12/12/2017 - 07:31 नवीन
डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास रेंगाळत असतानाच त्याच पद्दतीने कोल्हापुरात कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रावर दुसरा आघात झाला
पानसरे कम्यूनिस्ट होते. त्यावेळी महाराष्ट्रात प्रतिगामी भाजपचे सरकार होते. मग "पुरोगामी महाराष्ट्र" कुठून आला?
A
arunjoshi123 Tue, 12/12/2017 - 07:41 नवीन
संघाचे लोक रांडेची पोरे आहेत म्हणणार्‍या गौरी लंकेशचे जीवनकार्य काय आहे? खूनाचा तपास व्हावा नि आरोपिंना शिक्षा व्हावी हा भाग वेगळा, प्रत्येकाला न्याय मिळावाच, पण मेली आहे म्हणून फालतूची स्तुती करू नये. -------------------------------------- असल्या लोकांना दाभोळकरांसोबत बसवून चांगल्या पुरोगामीपणाचा अपमान होत आहे.
श
श्रीगुरुजी Tue, 12/12/2017 - 07:48 नवीन
सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दाभोळकर पानसरे प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी सातत्याने लावून धरली. मात्र अद्यापही या प्रकरणांचा उलगडा झालेला नाही, हे वास्तव आहे. दाभोळकर हत्याकांडाला चार वर्ष पूर्ण झाली, पानसरे यांच्या प्रकरणाला दोन वर्ष झाली. तरी ना तर त्यांचे मारेकरी पकडले गेले, ना त्यामागील सूत्रधार.. एका विशिष्ट दिशेनेच तपास केल्यानेच या प्रकरणांचा छडा लागलेला नाही. दाभोळकरांच्या खुनानंतर काही मिनिटांतच "ज्या विचाराच्या लोकांनी गांधीजींची हत्या केली त्यांनीच दाभोळकरांची हत्या केली आहे" असे उद्गगार पृथ्वीराज चव्हाणांनी काढून तपासाचा लंबक सनातनच्या दिशेने फिरविला होता. त्यामुळे जे खरे खुनी होते त्यांना पळून जाण्यास व पुरावे नष्ट करण्यास भरपूर वेळ मिळाला. कलबुर्गी व लंकेश यांच्या खुनानंतरसुद्धा तेथील सत्ताधार्‍यांनी याचाच कित्ता गिरविला. त्यामुळे तेथील तपासही भरकटलेला आहे. तपासाला विशिष्ट दिशा देणे हे अजाणता घडले होते का जाणूनबुजून तपास भरकटविलेला होता हे एक गुढच आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन सरकार सनातनवर बंदी आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते. अशा परिस्थितीत हा खून झाल्यानंतर सनातनला यात अडकवून त्या संस्थेवर बंदी घालता यावी व भाजपला बॅकफूटवर ढकलून त्याचा फायदा २०१४ च्या निवडणुकीत उठवावा हा त्यामागचा मूळ हेतू असावा. सप्टेंबर २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटानंतर याच पद्धतीने कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, दयानंद पांडे, स्वामी असीमानंद यांना याच पद्धतीने या प्रकरणात अडकविण्यात आले होते. नंतर त्यांना समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातही अडकवून मोका लावून तब्बल ९ वर्षे विनाजामीन, विना आरोपपत्र, विना खटला तुरूंगात डांबून ठेवण्यात आले. २००९ मधील निवडणुकीत याचा फायदा खांग्र्सला मिळाला होता. तोच विचार २०१३ मध्ये दाभोळकरांच्या खुनानंतरही खांग्रेसींनी केला असावा त्यामुळेच त्यांनी जाणूनबुजून तपास भरकटला जाईन अशी विधाने केली असावीत. तपासयंत्रणा तापस सूर असल्याचं उत्तर देत राहिल्या, अन विचारसरणीच्या नावाखाली एकामागून एक विचारवंतांचे मुडदे पाडले जाण्याचं सत्र सुरूच राहिलं. यातील फक्त दाभोळकरांना काही अंशी विचारवंत म्हणता येईल. बाकीचे निव्वळ ढोंगी होते. निव्वळ तारखमागून तारखा वाढवून घेण्याचा प्रकार सुरु असून डॉ. दाभोळकरणांचे मारेकरी कोण, त्यामागील सूत्रधार, याचा कोणताच थांगपत्ता अजून लागलेला नाही. असे असेल तर डॉ. वीरेंद्र तावडेंना १८ महिने विनाजामीन का तुरूंगात ठेवले आहे? एकीकडे म्हणतात की खुनी विनय अकोलकर व सारंग पवार आहेत आणि दुसरीकडे कोणताही पुरावा नसताना डॉ. तावडेंना पकडून ठेवले आहे. समीर गायकवाडलाही असेच २१ महिने तुरूंगात ठेवले होते. एकीकडे म्हणतात खरे खुनी अजून मोकळेच आहेत आणि दुसरीकडे डॉ. तावडे व समीरच्या जामिनाला मात्र विरोध. या लोकांना काहीतरी करून या प्रकरणाचा संबंध सनातनशी जोडायचा आहे व त्यासाठीच ही धडपड सुरू आहे. त्यांच्या दुर्दैवाने या प्रकरणासंबधांत जंगजंग पछाडूनसुद्धा सनातनविरूद्ध कणभरही पुरावा मिळालेला नाही. एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नसतील तर त्याच्याशी विचारांचा संघर्ष करण्याऐवजी त्या व्यक्तीलाच संपविण्याची प्रवृत्ती संवैधानिक विचार स्वातंत्र्याच्या तत्वाला तर मारक आहेच, शिवाय देशाच्या इभ्रतीसही कलंक लावणारे आहे. खून झालेल्या चौघांचे विचार पटत नसल्याने त्यांना मारण्यात आले हा जावईशोध कसा काय लावला? खून कोणी केला, का केला, सर्व खून एकाच व्यक्तींनी केले आहेत का प्रत्येक खुनामागे वेगवेगळी माणसे आहेत याविषयी काहीही माहिती नसताना खुनामागचा हेतू तुम्हाला कसा काय समजला? दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडणारे 'हात' कुणाचे होते? हे तपास यंत्रणांना कदाचित माहीत नसेलही, मात्र त्यामागे 'मेंदू' कोणत्या विचार प्रवृत्तीचा आहे, हे सर्वसामान्य जनतेला दिसते. पण ते सरकारला आणि तपास यंत्रणांना का दिसत नाही, हा अस्वस्थ करणारा सवाल आहे. त्यामागे 'मेंदू' कोणत्या विचार प्रवृत्तीचा आहे हे सांगता का. आणि हे तुम्हाला कसे समजले तेसुद्धा सांगा. ज्या गोष्टी ४ वर्षानंतर सुद्धा तपास यंत्रणांना समजलेल्या नाहीत त्या तुम्हाला अशा काय समजल्या हे सांगा. जी माणसे खुनी म्हणून सापडावीत अशी तुमची इच्छा आहे त्यांनी प्रत्यक्षात हे खून केलेलेच नसतील तर तपास यंत्रणांना ते कसे सापडतील? विवेकवादाची लढाई लढता लढता चार शिलेदार धारातीर्थी पडले. अर्थात त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही आणि जाणार नाही. काहीही. काही अंशी दाभोळकरांचा अपवाद सोडला तर उर्वरीत तिघांचा व विवेकवादाचा कणभरही संबंध नाही. ते धारातीर्थी पडले, बलिदान असले काही तरी अलंकारिक शब्द वापरून त्यांचे उदात्तीकरण करू नका. त्यांचा खून झाला आहे. ते धारातीर्थी वगैरे पडलेले नाहीत व त्यांनी बलिदान वगैरेसुद्धा दिलेले नाही. ते गुन्ह्याचे बळी आहेत. भारतात व जगात रोज हजारो माणसे अशा गुन्ह्याचे बळी होतात. डोळ्यावरील धुरकटलेला लाल चष्मा उतरवून या गुन्ह्यांकडे पहा.
A
arunjoshi123 Tue, 12/12/2017 - 08:00 नवीन
काही अंशी दाभोळकरांचा अपवाद सोडला तर उर्वरीत तिघांचा व विवेकवादाचा कणभरही संबंध नाही.
+१
स
सुमीत Tue, 12/12/2017 - 10:50 नवीन
++१
B
babu b Tue, 12/12/2017 - 14:41 नवीन
"ज्या विचाराच्या लोकांनी गांधीजींची हत्या केली त्यांनीच दाभोळकरांची हत्या केली आहे" असे उद्गगार पृथ्वीराज चव्हाणांनी काढून तपासाचा लंबक सनातनच्या दिशेने फिरविला होता. हे विधान तपासाचा लंबक सनातनकडे कसे काय फिरवते म्हणे ? म्हणजे गांधीहत्येचा अन सनातनचा संबंध आहे ?
ग
गामा पैलवान Tue, 12/12/2017 - 09:01 नवीन
श्रीगुरुजी,
तपासाला विशिष्ट दिशा देणे हे अजाणता घडले होते का जाणूनबुजून तपास भरकटविलेला होता हे एक गुढच आहे.
आजिबात गूढ नाही. पृथ्वीराज चव्हाणाच्या दोन मुस्कटांत भडकावल्या की तो पोपटासारखा बोलू लागेल. मात्र मांजराच्या गळ्यांत घंटा कोणी बांधायची, असा प्रश्न आहे. आ.न., -गा.पै. वि.सू. : १. बोलतांना बोलतात, पण प्रत्यक्षांत मुस्कट फोडायची जरुरी नाही. फक्त खोपच्यात घेतला तरी चालेल. २. मांजर कोण हा प्रश्न कृपया विचारू नये!
स
सुमीत Tue, 12/12/2017 - 10:52 नवीन
++१,
स
सिंथेटिक जिनियस Tue, 12/12/2017 - 13:08 नवीन
मला तर जाम शंका आहे की टनाटनचा आठवलेच दाभोळकरांच्या हत्येमागे असावा.पण भाजपसारख्या भुक्कड पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही.या उजवाविचारसरणीच्या कट्टरवादी आठवलेच्या सनातन संस्थेच्या बंदीवर काँग्रेस सरकार वेळकाढूपणा करत होते त्याचं परिणीती दाभोळकर यांच्या हत्येत झाली. आता तर हिदुत्ववाद्यांचेच सरकार आहे,त्यांच्याकडून तपासाची अपेक्षा म्हणजे चोरालाच पोलिस करण्यासारखे आहे.अजून हत्या होतील व पुरोहीतसारखे हिंदू आतंकवादी गरीबांचा जीव ही घेतील व त्याला राजमान्यता देण्यात संघोटे मागे कशाला राहतील.
स
सुबोध खरे Tue, 12/12/2017 - 13:56 नवीन
सिंथे जिनी २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ दाभोलकर यांची हत्या झाली. भाजपचे सरकार ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी आले. या सव्वा वर्षात काँग्रेसचेच पुरोगामी सेक्युलर सरकार होते या कालावधीत एकही आरोपी काय, साधा धागा दोराही सरकारला मिळाला नाही? का उगाच आपला भाजपद्वेष असा उघडा करताय? मोराची कहाणी माहित आहे ना? काही सबळ पुरावा असेल तर बोला. चोरालाच पोलिस,संघोटे, पुरोहीतसारखे हिंदू आतंकवादी उगाच शिव्या देऊन आपलं हसं करून घेण्याची हौस आहे का?
स
सिंथेटिक जिनियस Tue, 12/12/2017 - 14:07 नवीन
उगाच शिव्या देऊन आपलं हसं करून घेण्याची हौस आहे का? >>> कुटं शिव्या दिल्यात डॉक्टर? पण आहे हिंदुत्वावादी हे पराकोटीचे क्रुर असतात असे आपले माझे मत आहे.कारण एकलव्याचा अंगठा कापून घेण्यापासून यांचा इतिहास सुरु होऊन गांधीहत्येपर्यंत उच्चांक गाठू शकतो हे इतिहासात नोंदलेले आहे.आपण" खरे" आहात,त्यामुळे तुमच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही,नमस्ते सदा वत्सले ची नागपुरी ची कॅसेट लावून बसाल
ट
टवाळ कार्टा Tue, 12/12/2017 - 14:25 नवीन
जास्तीत जास्त क्रुरपणा ते कमीत कमी क्रुरपणा या क्रमाने खालील धर्मांचा क्रम लावून देता का? हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, ज्यू
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 08:16 नवीन
पुरोगामी लोक नसतील तर जगातले सर्व धर्म अत्यंत सलोख्याने एकत्र राहू शकतात. राहिलेत. राहतील. धर्मांमधे १९-२० असेल, पण ते मॅनेज करता येईल. =================== कोणत्याही धर्मात क्रूरपणा नसतो. ======================== सर्वात क्रूर पुरोगामी धर्म आहे.
ग
गामा पैलवान Tue, 12/12/2017 - 16:40 नवीन
काय हो सिंजि, एकलव्य आणि हिंदुत्ववाद्यांचा संबंधच काय मुळातून? उद्या औरंग्याचा क्रूरपणा हिंदूंवर खपवाल. आ.न., -गा.पै.
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 08:11 नवीन
कारण एकलव्याचा अंगठा कापून घेण्यापासून यांचा इतिहास सुरु होऊन गांधीहत्येपर्यंत उच्चांक गाठू शकतो हे इतिहासात नोंदलेले आहे.
एकलव्याचा अंगठा काँग्रेसचे पहिले पंतप्रधान लफडेश्री नेहरू यांनी (सर्वात लायक आंबेडकर असताना त्यांना पंतप्रधान बनायचा प्रस्तावही कुठे आला नाही) आंबेडकरांचा मुंबईत एका चाटूकाराकडून सर्व मेहनत घेऊन, प्रचंड सभा घेऊन, खोटारडे आरोप करून, फालतू मंत्रालय देऊन, पक्षातून बाहेर निघायला मजबूर करूचा, आंगठा कापला. ======================== बाकी गांधी नावाच्या अपरिपक्व माणसाने राजकारणात जो आंधळेपणा केला त्यासाठी ईश्वर त्याला कधीच क्षमा करणार नाही. एक गांधी मेला तर लोक एवढे बोंबलतात, आमच्या पंजाब, बंगाल आणि हैदराबाद मिळून १०-२० लाख लोक मेले त्यांचं रक्त पातळ होतं का? त्यांना मारणारांपैकी कुणाला फाशी द्यायला नेहरूला का वेळ नव्हता?
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 08:18 नवीन
नमस्ते सदा वत्सले ची नागपुरी ची कॅसेट लावून बसाल
प्रत्येकाची संगीताची आवड वेग्वेगळी असते. तुम्हाला राग जेएनयू तुकडे आवडत असेल.
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 08:20 नवीन
गांधीहत्येपर्यंत उच्चांक गाठू शकतो हे इतिहासात नोंदलेले आहे.
गांधीहत्येमुळे निजाम संस्थान आज शांतीपूर्वक भारतात आहे. याचं श्रेय नथुराम गोडसेंना द्यायला हवं.
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 07:58 नवीन
मला तर जाम शंका आहे की
तुम्ही नॅचरल जिनियस नाहीत ना. म्हणून अशा शंका येतात.मला १००% शंका आहे की दाभोळकरांचा खून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ==================
सनातन संस्थेच्या बंदीवर काँग्रेस सरकार वेळकाढूपणा करत होते त्याचं परिणीती दाभोळकर यांच्या हत्येत झाली.
माझी शंका खरी ठरवलीत. पण मला इतक्या अप्रत्यक्ष अपेक्षित म्हणायचं नव्हतं. ====================================== एखाद्या कट्टर डाव्या माणसाने, डोके फिरलेल्या पुरोगाम्याने पण दाभोळकरांची हत्या केलेली असू शकते. त्यामुळे फटकन तो कायदा पास झाला. ===================================
त्यांच्याकडून तपासाची अपेक्षा म्हणजे चोरालाच पोलिस करण्यासारखे आहे.
अगोदर स्वतःकडून अपेक्षा करायला शिका. =======================
आता तर हिदुत्ववाद्यांचेच सरकार आहे.
याची सवय करून घ्या. ================================
उजवाविचारसरणीच्या कट्टरवादी आठवलेच्या सनातन संस्थेच्या बंदीवर
देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. फक्त पुरोगामीपणा नावाचाच मूर्खपणा करायला स्वातंत्र्य नाही. सर्व प्रकारचा मूर्खपणा अलाउड आहे. बंदी का घालायची म्हणे सनातन वर? ज्या नियमांनी सनातनवर बंदी घालाल, त्या नियमांनी पुरोगाम्यांना १०० मी जमिनीत पुरावे लागेल. ========================
पुरोहीतसारखे हिंदू आतंकवादी गरीबांचा जीव ही घेतील व त्याला राजमान्यता देण्यात संघोटे मागे कशाला राहतील.
तुमच्या काँग्रेसने नेल्लीत मारलेले मुस्लिम आणि दिल्लीत मारलेले शीख फार समाजशोषक, समाजकंटक धनदांडगे होते वाटतं!!
स
सुबोध खरे Tue, 12/12/2017 - 14:34 नवीन
माझा आणि रा स्व संघाचा काहीही संबंध नाही. गांधी हत्या करणारे नथुराम गोडसे हे एके काळी हिंदू महासभेचे सदस्य होते. हिंदू महासभा म्हणजेच हिंदुत्ववादी हा मूळ गैरसमज काढून टाका. पुरोहित यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा न मिळाल्याने न्यायालयाने त्यांना जमीन दिला आहे आणि लष्कराने त्यांना सन्माननीय रित्या नोकरीत सामावूनही घेतले आहे. उगाच पुराव्याअभावी एखाद्या लष्करी अधिकाऱ्यावर आरोप करणे आपल्याला शोभत नाही. काँग्रेसच्या सव्वा वर्षात काहीच पुरावा का मिळाला नाही याबद्दल आपण मूग गिळून गप्प आहात. तुमच्या कडे सज्जड पुरावे असतील तर बोला. अन्यथा फालतू बडबड म्हणून आम्ही सोडून देऊ. उगाच वैयक्तिक पातळीवर उतरू नका.
स
सिंथेटिक जिनियस Tue, 12/12/2017 - 16:22 नवीन
उगाच पुराव्याअभावी एखाद्या लष्करी अधिकाऱ्यावर आरोप करणे आपल्याला शोभत नाही. >> पुरावा नव्हता तर कोर्टाने त्याला इतक्या वर्षं का डांबला होता म्हणे ,नऊ वर्ष ना? आहे का उत्तर? न्यायव्यवस्था काँग्रेस चालवत होती असा आरोप करुन टाका ,नागपुरी कुजबुज कशी चालते हे माहीत आहे आम्हाला.काय नवीन नाय त्यात.
ग
गामा पैलवान Tue, 12/12/2017 - 16:42 नवीन
पुरावा नसतांना इतके वर्षं डांबला हाच न्यायाचा गर्भपात आहे. -गा.पै.
स
सिंथेटिक जिनियस Tue, 12/12/2017 - 16:48 नवीन
नितीन आगेचे मारेकरी पुराव्याअभावी सुटले हे श्रीगुरुजी एका धाग्यावर रेटून सांगत होते,आता इथे येउन पुरोहीतला पुराव्याअभावी कसे डांबुन ठेवले याच्या सुरस कथा सांगत द्राविडी प्राणायाम ते करतीलच. बघा उद्या गंमत त्यांची.
स
सुबोध खरे Tue, 12/12/2017 - 19:03 नवीन
https://www.dailyo.in/politics/lt-col-prasad-shrikant-purohit-bail-malegaon-blasts-army-nine-years-jail-supreme-court/story/1/19137.html आपल्या कृत्रिम बुद्धिमत्तेत बसत असेल तर चष्मा काढून वरील दुवा वाचून पहा.
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 08:28 नवीन
पुरावा नव्हता तर कोर्टाने त्याला इतक्या वर्षं का डांबला होता म्हणे ,नऊ वर्ष ना? आहे का उत्तर?
उत्तर असं आहे कि घटनेत स्वातंत्र्य इ इ बोलाचाच भात बराच शिजवला असला तरी सरकार कोणत्याही माणसाला काही कायद्यांनुसार अकारण विनापुरावा कितीही काळ अटक करू शकते (वा कायद्याला खोटे सांगून एनकांउंटर करू शकते.). यात फार मोठी गोश्ट नाही. =============== हे जंड्रली फक्त देशहितासाठीच वापरले जाते. पण काँग्रेसचे सरकारच शत्रू देश चालवत होता. म्हणून हा सगळा मेकॅनिझम देशहितवादी लोकांना खच्ची करायला वापरला गेला.
स
सिंथेटिक जिनियस Wed, 12/13/2017 - 09:11 नवीन
पुरोहीतसारख्या लोकांना देशहितवादी ठरवणार्या लोकांच्या अकलेचे दिवाळे वाजले आहे.२०१४ नंतर यांचा माज आणि मुजोर्या भलत्याच वाढलेल्या दिसत आहेत. (संपादित) सभासदांनी सभ्य, अप्रक्षोभक आणि अवैयक्तित भाषेत संवाद साधणे अपेक्षित आहे. : संपादक मंडळ
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 13:07 नवीन
संपादित
त्याला गांधीहत्या कशाला पाहिजे? काश्मिरमध्ये देखील या दहशतवादी नागपुरी प्रवृत्तीला मार बसला. हे सगळे जे पुरोगामी आहेत ना, त्यांच्या आणि नागपुरी दहशतवाद्यांच्या लुक्स आणि आडनावांत फार फरक नाही. आंगलट आल्यावर हे एत्तद्देशीय नॉन-दहशतवादी फटके त्यांनाही पडणार आहेत. ============== पुरोहीत देशप्रेमी आहे की देशद्रोही हे इथल्या संस्था ठरवतील. कदाचित काही हिंदूत्ववादी लोकांनी ब्लास्ट केले असतील. नाहीच्च असं म्हणायला तितकी १००% फूलप्रूफ माहिती नाही. यात राजकीय कट असेल तर सामील झालेल्या कितीतरी अधिकार्‍यांना शिक्षा होइल, जे पुन्हा चांगले नसेल. ============== बाकी अफजल गुरु देशहितवादी आहेतच, नै का? ==========================
पुरोहीतसारख्या लोकांना देशहितवादी ठरवणार्या लोकांच्या अकलेचे दिवाळे वाजले आहे.
असं काही ठरवलेलं नाही. मोदी २००२ चे गुन्हेगार, राहुल गांधी बलात्काराचा गुन्हेगार, सर्व मुसलमान पाकप्रेमाचे गुन्हेगार, हिंदु दहशतवादाचे गुन्हेगार असं सगळं जग नाही. ज्यांना सगळे गुन्हेगार, ईंटॉलरन्स दिसतात ... ======================== बाय द वे, मराठी एत्तदेशीय अब्राह्मण लोकांना उत्तर भारतात गांधीहत्येनंतर गोडसेबांधव समजून लोकांनी चोपलेला. तेव्हा चोपाचोपी फाळणीछाप न करता काळजीपूर्वक करावी, किमान आपले बांधव सुरक्षित राखावेत. तशी चोपाचोपीची लालसा वाईट. ==================== पण तरी, जालमित्र म्हणून अशा मच अवेटेड कयामत दिनासाठी शुभेछा.
श
श्रीगुरुजी Wed, 12/13/2017 - 14:50 नवीन
संपादित याच शूर, पराक्रमी एत्तदेशीयांनी मराठवाड्यात १९७८ मध्ये गरीब दलितांना असेच ठेचून महापराक्रम गाजविला होता आणि हेच शूर, पराक्रमी आता राखीव जागांची भीक मागत आहेत.
A
arunjoshi123 Wed, 12/13/2017 - 09:05 नवीन
न्यायव्यवस्था काँग्रेस चालवत होती असा आरोप करुन टाका
नाय नाय नाय. पोलिस व्यवस्था काँग्रेस चालवत होती. =============== आम्हाला मुक्तपणे योग्य ते आरोप तरी करू द्या ना राव. मूर्खासारखे आरोप करायचे (मश्रूम - गोरा रंग) इटलीतल्या तालमीत शिकवले जाते.
स
सिंथेटिक जिनियस Tue, 12/12/2017 - 16:45 नवीन
हिंदुत्ववाद्यांचे सरकार आल्यावर हे पुरोहीत वगैरे लगेचच कसे सुटले यातून?,निश्चितच पुरावे नष्ट केले गेले असणार,मला तर यात फाऊल प्ले दिसत आहे.
ग
गामा पैलवान Tue, 12/12/2017 - 17:48 नवीन
पुरोहित लगेच सुटले कारण की त्यांच्यावर कोणतेही आरोप नव्हते. -गा.पै.
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 11 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा