Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

माचू पिक्चू - भाग ४

उ
उदय
Sun, 11/26/2017 - 06:04
💬 10

Book traversal links for माचू पिक्चू - भाग ४

  • ‹ माचू पिक्चू - भाग ३
  • Up
  • माचू पिक्चू - भाग ५ ›
भाग १...भाग २...भाग ३...भाग ४...भाग ५...भाग ६ दिवस ३ रात्रभर तुफान पाऊस पडला, पण त्यामुळे की काय, आज हवा खूप छान होती. थोडी वाऱ्याची झुळूक पण येत होती आणि ऊन पण चांगले होते (म्हणजे सनग्लासेस वापरावे लागले नाहीत). आज जरा उशीरा म्हणजे ७ वाजता निघालो. आजचा प्रवास बऱ्यापैकी फ्लॅट + उताराचा होता (म्हणजे तुलनेत सोपा होता). त्यामुळे सगळेजण आरामात चालले होते. आज फक्त ५ तास चालायचे होते, पण आरामात, सगळीकडे बघत बघत गेलो त्यामुळे ६-६:३० तास लागले. १:३० वाजता कॅम्प साईटवर पोचलो आणि साधारण २ वाजता जेवायला बसलो. असेच चालता चालता माझ्यापुढे चालणारी चिनी मुलगी अक्षरश: मरता मरता वाचली. ती वॉकिंग स्टिक न घेता उतरत होती. उतरताना अचानक दगडावरून तिचा पाय घसरला आणि उजवीकडे जवळपास १०,००० फुटाची खोल दरी होती त्यात ती घसरत पडू लागली. केवळ तिचे नशीब बलवत्तर म्हणून तिच्या जस्ट मागेच गाईड चालला होता त्याने हात देऊन कसे बसे तिला पकडले. हे अगदी हिंदी सिनेमासारखे वाटले तरी इतके फास्ट झाले की क्षणभर आम्हाला तिघांनाही काही कळले नाही. पण मग काय होतेय ते त्या मुलीला जाणवले तेव्हा तिचा चेहरा अक्षरश: पांढराफट्टक पडला आणि तिचे शरीर खरोखर थरथरत होते. शेवटी गाईडने तिला खाली बसवले, पाणी दिले, कुठले तरी औषध हातावर टाकून वास घ्यायला दिला, तेव्हा २-३ मिनिटांनी She was OK. कुणालाही मृत्यूच्या इतक्या जवळून जाताना मी आजपर्यंत बघितले न्हवते, पण खरं सांगतो, हे सर्व बघून मी पण बराच वेळ सुन्न झालो.शेवटी तिला माऊंटन साइडने चाल, दरीच्या बाजूने नको असे सांगून गाईडने कॅम्प साईटवर आणले. एक चांगले झाले की संध्याकाळी ती तिच्या मैत्रीणीबरोबर मस्त हसत-हसत गप्पा मारत होती. बहुधा सकाळचा प्रसंग विसरली ती. फोटो: इंका लोक गवतापासून दोरखंड कसा बनवायचे, याचे प्रात्यक्षिक Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: आता एका गुहेतून जायचा रस्ता येणार आहे, ज्यात अगदी वाकून जावे लागते. Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: Phuyupata इथे ग्रुप फोटो. हा ट्रेलवरचा तिसरा पास (उंची १२,१०० फूट) Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: अतिशय निसर्गरम्य परिसरात ट्रेलवर जाताना. रात्रभर पाऊस पडून गेल्याने आज हवा पण छान होती. Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: अजून एका गुहेतून जाणारा रस्ता. इंका लोकांची खरंच कमाल आहे. किती कठीण परिस्थितीत त्यांनी मार्ग शोधून काढले आहेत ते बघून थक्क व्हायला होते. Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;
फोटो: वाटेत अचानक लामा समोर आले. फोटो: लामाचे पिल्लू
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;
फोटो: Intipata येथील अजून १ इंका साईट Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: इतका रम्य देखावा होता की तिथून उठावेसे वाटत न्हवते. Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: टेरेस Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;
फोटो: भयानक पायऱ्या
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;
फोटो: नशीब की इथे वर चढायचे न्हवते तर खाली उतरायचे होते. नाही तर काही खरे नाही. Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;
फोटो: ऑर्किड
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;
फोटो: आता फक्त ही इंका साईट पार केली की जेवायला जायचे. भूक लागलीये ना? Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: दुपारचे जेवण Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; आज जिथे दुपारचे जेवण होते, तिथेच रात्रीचा मुक्काम पण होता. जवळच विनेवायना winay wayna म्हणजे चिरतरुण (forever young) येथील इंका साईट होती. माचू पिक्चू ची छोटी प्रतिमाच आहे ही, आणि या दोन्ही जागांची स्पॅनिश लोकांकडून नासधूस झाली नाही, कारण नशीबाने त्यांना माचू पिक्चू आणि विनेवायना या दोन्ही जागा सापडल्या नाहीत. फोटो: वायना पिक्चू (winay wayna) दरीत खालून वाहणारी उरूबाम्बा नदी वरून मस्त दिसते. Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: शेवटचा भोजन समारंभ म्हणून शेफने खास केक बनवला. "Welcome to Machu Picchu" Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; आता उद्या भल्या पहाटे ३ वाजता उठायचे आहे, म्हणून ७-७:३० ला झोपायला गेलो. (क्रमशः) इथे टाकलेले फोटो आकाराने लहान आहेत. फोटोवर क्लिक केले तर मोठ्या आकारातले फोटो बघता येतील, जे अधिक सुस्पष्ट आहेत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10882 views

💬 प्रतिसाद
ए
एस Sun, 11/26/2017 - 06:18 नवीन
एव्हढ्या उंचीवर केक बनवला? कमाल आहे! जेवण अगदी छान दिसते आहे. या ट्रेलमध्ये इतकी उत्तम सुविधा पुरवणाऱ्या लोकांना सलाम! थोडे माचूपिक्चूबद्दलही माहिती द्या.
  • Log in or register to post comments
उ
उदय Sun, 11/26/2017 - 06:26 नवीन
अगदी माझ्या मनात पण हाच विचार आला होता की केक कसा बनवला? मी विचारले पण की सोबत घेऊनच आला होता का? पण म्हणे की नाही, आजच बनवला. माचू पिक्चूबद्दल माहिती पुढील भागात.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 11/26/2017 - 09:56 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 11/27/2017 - 05:32 नवीन
सुरेख वर्णन आणि फोटो. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 11/27/2017 - 07:08 नवीन
वाचतोय. फोटो थोडे मोठे करून टाकायला हवे होते.
  • Log in or register to post comments
उ
उदय Mon, 11/27/2017 - 08:32 नवीन
फोटो थोडे मोठे करून टाकले आहेत. फोटोवर क्लिक केले तर मोठ्या आकारातले फोटो बघता येतील, जे अधिक सुस्पष्ट आहेत. काही काही जण मोबाईलवर बघतात म्हणून छोट्या आकाराचे टाकले होते आणि घाबरत-घाबरत कमीच फोटो टाकले आहेत. जास्त वाटले तर कमी करतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/27/2017 - 08:52 नवीन
घाबरत-घाबरत कमीच फोटो टाकले आहेत. जास्त वाटले तर कमी करतो. भरपूर फोटोंचे मिपाकर चाहते आहेत. शिवाय त्यांच्यामुळे लेखाची खुमारी अधिकच वाढते. तेव्हा बेलाशक फोटो टाका ! :) लेखमाला मस्तं चालली आहे, हेवेसांन !
  • Log in or register to post comments
न
निशाचर Mon, 11/27/2017 - 21:29 नवीन
खूप छान चालल्येय लेखमाला. फोटोही मस्तच! जेवणाची एवढी रेलचेल असेल असं वाटलं नव्हतं. वर एस यांनी लिहिल्याप्रमाणे माचूपिक्चू आणि इंका संस्कृतीबद्दल वाचायला आवडेल. फोटो अवश्य टाका. पुभाप्र
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 11/28/2017 - 04:19 नवीन
भारी आहे हे सगळं.
  • Log in or register to post comments
ए
एमी Tue, 11/28/2017 - 08:26 नवीन
मस्त! माचूपिक्चू आणि इंका संस्कृतीबद्दल वाचायला आवडेल. >> +१
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा