Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

माचू पिक्चू - भाग १

उ
उदय
Wed, 11/22/2017 - 22:19
💬 10
  • माचू पिक्चू - भाग २
  • माचू पिक्चू - भाग ३
  • माचू पिक्चू - भाग ४
  • माचू पिक्चू - भाग ५

Book traversal links for माचू पिक्चू - भाग १

  • माचू पिक्चू - भाग २ ›
भाग १...भाग २...भाग ३...भाग ४...भाग ५...भाग ६ गेल्या अनेक वर्षांपासून मला माचू पिक्चूला जायची इच्छा होती आणि ते पण कसे तर पूर्वीच्या काळी इंका लोक जसे पायीपायी तिथे जायचे तसे. हा ४ दिवसाचा प्रवास "क्लासिक इंका ट्रेल" म्हणून ओळखला जातो आणि तो बर्यापैकी कठीण समजला जातो. माचू पिक्चू हे जगातील ७ आश्चर्यापैकी १ आहे आणि युनेस्को हेरिटेज साईट आहे. माचू पिक्चूला बरेच जण माचू पिचू असे म्हणतात, पण आमच्या गाईडने सांगितले की त्यांच्या केचुआ भाषेत "माचू पिचू" चा अर्थ असभ्य (म्हणजे न सांगण्यासारखा) आहे आणि पिक्चू हाच उच्चार बरोबर आहे. तर माचू म्हणजे old or ancient आणि पिक्चू म्हणजे पर्वत. तिथे इंका राजाची वसाहत (estate) होती आणि मंदिरे होती. अगदी वर मंदिर बांधण्याचे कारण म्हणजे इंका लोकांचा समज होता की जितक्या वर आपण राहू तितक्या जवळ आपण देवाच्या जवळ आपल्याला राहता येईल. माचू पिक्चूला खूप पर्यटक जातात आणि १४ व्या शतकातील या वास्तूची नासाडी होऊ शकते या भीतीने आता तिथे परमिट पद्धत सुरू केली आहे. इंका ट्रेलसाठी इथे रोज फक्त ५०० परमिट देतात, ज्यात साधारण ३०० पोर्टर असतात आणि उरलेले २०० ट्रेल करणारे. साहाजिकच परमिटसाठी साधारण ६ महिने आधी बुकिंग करावे लागते. प्रत्येक परमिट हे पासपोर्टशी संलग्न असते आणि ते दुसर्या कुणालाही ट्रान्स्फर करता येत नाही. जर पासपोर्ट विसरला किंवा पासपोर्ट बदलला तर इंका ट्रेलवर जाता येत नाही. प्रत्येक चेकपोस्टवर माझा पासपोर्ट तपासला गेला. इथे ऑकटोबर ते एप्रिल पाऊस असतो. फेब्रुवारीत तर हा ट्रेल पावसामुळे बंदच असतो. जून-जुलै-ऑगस्ट हा पीक सिझन असतो, त्यामुळे मी शोल्डर सिझन बघून जायचे ठरवले आणि ३ ते ६ नोव्हेंबर २०१७ असे परमिट काढायचे ठरवले. आता आयुष्यात एकदाच जातोय तर मग माचू पिक्चूच्या समोरच हुआना पिक्चू (young mountain) आहे, तिथे पण हायकिंग करायचे ठरवले. हुआना पिक्चू साठी वेगळे परमिट लागते आणि तिथे फक्त ४०० लोकांना जायची परवानगी देतात. इंटरनेटवर बराच रिसर्च करून कुठल्या कंपनीबरोबर जायचे ते ठरवले आणि ऍडव्हान्स पैसे भरले. माचू पिक्चू साधारण ८,००० फूट उंचीवर आहे, म्हणजे फार विशेष नाही. पण इंका ट्रेलवरचा सर्वोच्च पॉईंट Dead Woman's Pass आहे जो १३,८०० फूट आहे आणि अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास होऊ शकतो. शिवाय ट्रेलमध्ये झपाट्याने ८८०० फूट ते १०,८०० फूट, मग १३,८०० फूट मग ११,८०० फूट असा फार बदल होतो. म्हणून किमान २ दिवस तरी कुस्को शहरात acclimatization करावे लागते जिथे उंची १०,५०० फूट आहे आणि ते माचू पिक्चूपेक्षा जास्त उंचीवर आहे. अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास होतो का हे बघण्यासाठी मी गेल्या वर्षी लेह-लडाखला जाऊन आलो. लेह साधारण ११,५०० फूटांवर आहे. तिथे ऑक्सिजनची कमतरता जाणवली होती, पण मी मॅनेज केले होते, त्यामुळे इंका ट्रेल जमू शकेल असे वाटले होते. शेवटी एकदाचे कुस्कोमध्ये हजर झालो, परमिट पदरात पडले आणि माचू पिक्चू चढाईला सज्ज झालो. फोटो: इंका ट्रेल Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: माचू पिक्चू आणि हुआना पिक्चूचे परमिट Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; क्रमशः>

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15202 views

💬 प्रतिसाद
ए
एस गुरुवार, 11/23/2017 - 00:13 नवीन
भारी. वाचतोय. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 11/23/2017 - 01:02 नवीन
मजा आहे!!
  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 11/23/2017 - 01:59 नवीन
वाचतेय.
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक गुरुवार, 11/23/2017 - 02:35 नवीन
माझी खूप वर्षांपासून इच्छा आहे मचू पिकचू ला जाण्याची खर्चाचा अंदाज पण द्या
  • Log in or register to post comments
उ
उदय गुरुवार, 11/23/2017 - 05:15 नवीन
माचू पिक्चू इंका ट्रेलवर जाताना स्थानिक कंपनीबरोबरच जावे लागते कारण गाइड, पोर्टर्स, परमिट यांची सोय ते करतात. ४ दिवसाच्या इंका ट्रेलसाठी $६६५ + हुआना पिक्चूसाठी अजून $७५ असे एकूण $७४० लागले. स्लीपिंग बॅग आणि ट्रेकिंग पोल्स भाड्याने मिळतात किंवा स्वतःचे आणू शकता. मी स्लीपिंग बॅग आणि ट्रेकिंग पोल्स हे $७४० मध्येच निगोशिएट केले होते. बाकी खर्च म्हणजे घरापासून लिमा, पेरु इथे विमानाने जायचे तिकिट. मग पुढे लिमा ते कुस्को आणि कुस्को ते लिमा हे विमानाचे तिकिट (साधारण $१००-२०० पर्यंत मिळते, मला डील मध्ये एव्हिआंका एअरचे $६९ प्रत्येकी असे मिळाले.) हॉटेल जशी घ्याल तशी, पण स्वस्त आहेत. मी चांगली होटेल्स घेतली होती जी दिवसा $१००-१२० पर्यंत मिळाली, पण $४०-५० पर्यंत पण मिळतात. पेरू हा तसा गरीब देश आहे, बर्‍याच घरांना तर बाहेरून प्लॅस्टरिंग पण केलेले नसते, अशी परिस्थिती आहे. महागडे जेवण ३०-४० सोल्स मध्ये ($१०-१२) होते, लिमा शहराच्या टूरमध्ये तर एकदा ११ सोल्समध्ये (~$३) जेवलो होतो. पिस्को सावर हे तिथले नॅशनल ड्रिंक म्हणता येईल. ते २०-२५ सोल्स फॉर २ (साधारण $३ एका ड्रिंकला) इतके स्वस्त मिळते. बियर पण साधारण त्याच किमतीत, म्हणजे $३ मध्ये, पण इथल्या १२ औंसपेक्षा बरीच मोठी बाटली मिळते.
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक गुरुवार, 11/23/2017 - 07:36 नवीन
एकंदरीत फार महाग प्रकरण दिसत नाही अवघड मात्र दिसते आहे रेल्वे हा पर्याय बरा
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय गुरुवार, 11/23/2017 - 03:26 नवीन
व्वा व्वा, मस्त. एकदा माचू पिक्चूला नक्कीच भेट देणार.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय गुरुवार, 11/23/2017 - 03:26 नवीन
व्वा व्वा, मस्त. एकदा माचू पिक्चूला नक्कीच भेट देणार.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 11/23/2017 - 03:33 नवीन
वाह! छान वर्णन.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/25/2017 - 15:52 नवीन
मस्तं सुरुवात ! माचू पिक्चू हे भेट देण्याच्या यादीत बरेच वरचे ठिकाण आहे. या लेखमालेची वाखु साठवली आहे, हेवेसांन ! :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा