Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

दवणीय अंडी - अंडे ४थे - सुविचारी सकाळ

आ
आदिजोशी
Fri, 11/17/2017 - 11:12
💬 29 प्रतिसाद

Book traversal links for दवणीय अंडी - अंडे ४थे - सुविचारी सकाळ

  • ‹ दवणीय अंडी - अंडे ३रे - शाळेची ऊब
  • Up
आजचा सुविचारः न पिणार्‍याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते. अंडी घालण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ. सूर्य काही तासांपूर्वीच उगवलेला असतो, मेंदू मस्त रिकामा असतो, मन मात्र भावनांनी ओथंबलेले हवे. रात्री नंतर रोज येणारी सकाळ हँगओवर सोबत इतरही अनेक गोष्टी घेऊन येते. प्रत्येक सकाळ ही एका नव्या आयुष्याची सुरुवात होऊ शकते. रोज नवं आयुष्य. नवी बायको/नवरा, नवी नोकरी, नवे आई-बाप, नवे शेजारी, नवे मित्र, नवे कपडे... साबण मात्र जुनाच असावा. शरीरावर चढलेली पुटं घालवण्याचं पुण्यकर्म साबणच करतो. मन स्वच्छ करणारा साबण मात्र कुणी बनवला नाही. पण काहीही असलं तरी 'नाही निर्मळ मन, काय करील साबण...' असं म्हणून अंघोळ टाळणं हा पलायनवाद आहे. पाणी वाचवायचे अनेक इतर पर्याय उपलब्ध आहेत. शरीरासोबतच मनात साचलेलं, साठून राहिलेलंही वाहून जायला हवं. भावना उचंबळत्या, विचार प्रगल्भ आणि जाणीवा टोकदार असल्या की आयुष्याला नवी दिशा मिळते. आयुष्य फार सुंदर आहे. फक्त नजर हवी. सकाळी जेव्हा चहा पितो तेव्हा त्यातल्या प्रत्येक घटकाने स्वतःच अस्तीत्व एकमेकांत विरघळवून टाकलेलं असतं. चहा पावडर, दूध, साखर, आलं, गॅस... प्रत्येकानी स्वतःची चव जपली तर चहाची चव येणार कशी? आणि चहाची चव आली नाही तर किक न बसल्याने सुखाच्या प्रत्येक अनुभुतीसाठी कुंथावं लागणार. तसंच आयुष्याचं आहे. कुटुंबातल्या प्रत्येक घटकाने स्वतःच वेगळं अस्तीत्व जपलं तर घरात आणि लोकल ट्रेनच्या डब्यात फरक तो काय? सगळे एकत्र बसणार, जाणारही एकाच ठिकाणी... पण कुणाचा कुणाशी संबंध नाही. मोटरमनरुपी आई आणि गार्डरुपी बाप ह्यांच्यामधे पोरं चेन खेचायची वाट बघत बसतील. गंमत बघायला जमणारे पाकिटमार नातेवाईक वेगळेच. सकाळी पेपर पूर्ण वाचून झाल्यावर त्या २०-२२ पानांमधल्या ठळक बातम्याच केवळ लक्षात राहतात, फाफट पसारा विस्मॄतीत जातो. तसंच आयुष्याचंही असायला हवं. नको त्या आठवणींचा पसारा गुंडाळून, दु:खद आठवणींची जळमटं काढून, ठळक आणि आयुष्य उजळ करणार्‍या गोष्टीच लक्षात ठेवायला हव्या. वर्तमानपत्राचा उपयोग दुसर्‍या सकाळी कशासाठी केला जातो ते माहिती आहेच. जशा आपल्याला आठवणी असतात तशाच लोकांनाही असतात. त्यामुळे लोकं आपल्याला कसं आठवतात हे सुद्धा महत्वाचं आहे. काही गोष्टींचा वापरानंतर कचरा होतो, पण फुलांचं मात्र निर्माल्य होतं. आयुष्यातील सुंदर क्षण वेचून ठिपक्यांची रांगोळी रेखाटायची, की जे आपलं नव्हतंच ते न मिळाल्याच्या काल्पनीक दु:खात हातात असलेल्या सुखक्षणांकडे दुर्लक्ष करून आयुष्याच्या हसर्‍या फुलांवर शेण फिरवायचं, हे आपल्याच हातात आहे. शेणावरून आठवलं, गाईच्या शेणाला पंचगव्यात स्थान आहे; बैलाच्या शेणाला मात्र बुलशीट म्हणतात. अंड्यांचे ऑम्लेट अथवा बुर्जी करून क्षणीक मजा करायची की तीच अंडी उबवून त्यातून अजून कोंबड्या काढून पुढच्या अंड्यांची सोय करायची हे आपल्या हातात आहे. आयुष्याचंही असंच असतं. आठवणींची अंडी मात्र उबवू नये. आपला, आदि जोशी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10465 views

💬 प्रतिसाद (29)
प
पुंबा Fri, 11/17/2017 - 11:14 नवीन
ज्जे बात!! आता, अंडी चांगलीच दवणीय व्हायलीत राव... हे पण अंडं आवडलं.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Fri, 11/17/2017 - 11:36 नवीन
:)) झकास!!
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 11/17/2017 - 11:36 नवीन
हे अंडं खरं दवणीय झालं आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/17/2017 - 13:41 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Fri, 11/17/2017 - 14:14 नवीन
आता जमायला लागलं. पुलेशु.
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 11/17/2017 - 12:32 नवीन
वाह!!
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 11/17/2017 - 13:36 नवीन
मागच्या शाळेतील लेखात ट्रीप्पल सेंच्युरी हाणणारा फलंदाज, या वेळी मात्र अंड्यावर परतला...पॅव्हेलिअन कडे
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Fri, 11/17/2017 - 13:56 नवीन
फारच छान! पुढील वाक्ये अगदी दवणीय झाली आहेत.
शरीरासोबतच मनात साचलेलं, साठून राहिलेलंही वाहून जायला हवं
तसंच आयुष्याचंही असायला हवं. नको त्या आठवणींचा पसारा गुंडाळून, दु:खद आठवणींची जळमटं काढून, ठळक आणि आयुष्य उजळ करणार्‍या गोष्टीच लक्षात ठेवायला हव्या.
आयुष्यातील सुंदर क्षण वेचून ठिपक्यांची रांगोळी रेखाटायची, की जे आपलं नव्हतंच ते न मिळाल्याच्या काल्पनीक दु:खात हातात असलेल्या सुखक्षणांकडे दुर्लक्ष करून आयुष्याच्या हसर्‍या फुलांवर शेण फिरवायचं, हे आपल्याच हातात आहे.
शेवटच्या ओळींमध्ये तर आकाशगंगेएवढ्या विचारांना जणू एका लहानश्या अंड्यात बंदिस्त करून ठेवल्यासारखं वाटतंय :)
अंड्यांचे ऑम्लेट अथवा बुर्जी करून क्षणीक मजा करायची की तीच अंडी उबवून त्यातून अजून कोंबड्या काढून पुढच्या अंड्यांची सोय करायची हे आपल्या हातात आहे. आयुष्याचंही असंच असतं. आठवणींची अंडी मात्र उबवू नये.
पण न जाणो कधी स्वतःच्याच प्रतिभेची टाचणी लागून ते अंडे फुटले तर मग फारसा विचार न करता सरळ झणझणीत भुर्जी करणेच श्रेयस्कर. मुळात माझ्या प्रतिभेचा वारू चौखूर उधळलेला असताना माझ्या लेखनाने दगडालाही मी पाझर फोडतो तर ते अंडे ना फुटल्याशिवाय राहील का ?(उगाच नाही मला साहित्यातील रडका बुकल म्हणत! डिहायड्रेशन झालेल्या माणसाच्या शरीरात एकवेळ पाणी शिल्लक नसेल पण माझे साहित्य वाचल्यावर त्याच्या डोळ्यांतून अश्रू येणार हे मात्र नक्की!)
दारूची ओढ रक्तातच असावी लागते.
हे वपु वाटतंय.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 11/17/2017 - 14:04 नवीन
या गुलाबजाम लेखात दवणीय पाक ठायीठायी आहे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/17/2017 - 14:21 नवीन
बाकी आजचा सुविचार भारी आहे आजचा सुविचारः न पिणार्‍याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 11/17/2017 - 14:37 नवीन
मस्तच जमलीत दवणीय अंडी. यांचा पुर्ण पोल्ट्रीफॉर्म होणार आता. ;-)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 11/17/2017 - 15:45 नवीन
मोटरमनरुपी आई आणि गार्डरुपी बाप ह्यांच्यामधे पोरं चेन खेचायची वाट बघत बसतील. गंमत बघायला जमणारे पाकिटमार नातेवाईक वेगळेच.
_/\_
  • Log in or register to post comments
R
Rahul D Fri, 11/17/2017 - 17:45 नवीन
1 no
  • Log in or register to post comments
स
संग्राम Fri, 11/17/2017 - 20:09 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश Fri, 11/17/2017 - 21:50 नवीन
हे खरं दवणीय झालं आहे. येऊ द्या अजून.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 11/18/2017 - 02:00 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 11/18/2017 - 03:18 नवीन
अंड्याचं आम्लेट करायची इच्छा आहे, पण सुचत नाहीये. त्यामुळे माझी अवस्था दयनीय झालीय
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 11/18/2017 - 06:12 नवीन
छान लिहील आहे.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 11/18/2017 - 07:21 नवीन
तुम्ही अंड्यांचा नविन ब्रँड तयार करायला हरकत नाहि. ब्रँडेड दवणीय अंडी. पुण्यातुन खुप येईल तुम्हाला .
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 11/18/2017 - 07:22 नवीन
पुण्यातुन खुप मागणी येईल तुम्हाला.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 11/18/2017 - 08:11 नवीन
हे पण अंडे भारीच.. स्वाती
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 11/18/2017 - 14:05 नवीन
प्रात:दवणीय!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 11/18/2017 - 16:17 नवीन
भारी जमलंय!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sat, 11/18/2017 - 18:04 नवीन
शत प्रतिशत दवणीय
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 11/21/2017 - 19:36 नवीन
किती सुंदर लिहिताहात!! पट्टीच्या गवयाचा सूर लागल्यावर कसं भारावून जायला होतं अगदी तसंचं वाटतंय हो ;)
  • Log in or register to post comments
श
शित्रेउमेश Tue, 11/28/2017 - 11:41 नवीन
||| अंड्यांचे ऑम्लेट अथवा बुर्जी करून क्षणीक मजा करायची की तीच अंडी उबवून त्यातून अजून कोंबड्या काढून पुढच्या अंड्यांची सोय करायची हे आपल्या हातात आहे. आयुष्याचंही असंच असतं. आठवणींची अंडी मात्र उबवू नये. ||| बापरे खूपच भन्नाट
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 11/28/2017 - 11:52 नवीन
मस्तं लिहिताय :) मी पुर्वी कधीतरी वाचलेला हा सुवीचार--- 'घर म्हणजे एक पिझाबॉक्स असतो. त्यातले कुटुंबीय म्हणजे पिझाचे तुकडे. दिसायला वेगळे आणि त्रिकोणी असु देत पण शेवटी असतात सगळे एकाच गोल पिझ्याचा भाग' =))
  • Log in or register to post comments
च
चारु राऊत Wed, 11/29/2017 - 11:31 नवीन
सुंदर लिहील आहे.
  • Log in or register to post comments
च
चारु राऊत Wed, 11/29/2017 - 11:31 नवीन
सुंदर लिहील आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा