दवणीय अंडी - अंडे १ले - एक कॉल स्वतःला
- दवणीय अंडी - अंडे २रे - नात्यांची श्रीमंती
- दवणीय अंडी - अंडे ३रे - शाळेची ऊब
- दवणीय अंडी - अंडे ४थे - सुविचारी सकाळ
Book traversal links for दवणीय अंडी - अंडे १ले - एक कॉल स्वतःला
'दवणीय अंडे' हा वाक्प्रचार मराठी भाषेला अर्पण करणार्या समस्त गुरुजनांच्या उलट्या पायांना कोपरापासून नमस्कार करून ह्या लेखमालेतील पहिले अंडे आपल्यासमोर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
अंडे १ले - एक कॉल स्वतःला
फार दिवसांनी परवा कट्ट्यावर जायचा योग आला. सगळे उटाणटवळे भेटले. पण मध्यंतरीच्या काळात आम्ही कार्यमग्न असल्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात एक अदॄष्य अशी कम्युनिकेशन गॅप तयार झाली होती. नक्की काय बिनसलंय हे कळत नव्हतं. कालौघात काही गोष्टी बदलल्या होत्या... अण्णाचे चहाचे ग्लास अजून थोडे खरपूर्स झाले होते, वडे तळायच्या तेलाने आता ग्रीसची तैलता धारण केली होती, पाखरांची एक अख्खीच्या अख्खी नवी बॅच भिरभिरत होती... पण बाकी सगळं तसंच होतं... अण्णासकट... पण लवकरच कारण लक्षात आलं. संपर्क कमी झाल्यामुळे आमचे विषय आणि त्यांचे विषय हे समान राहिले नव्हते. जे होते ते जुने झाले होते. त्यामुळे एकेकाळी ज्यांच्यासोबत आम्ही आयुष्यातले अमूल्य क्षण शून्यप्रकारे सार्थकी लावत होतो तेच मित्र आज अपरिचीत वाटत होते. बंड्याला पूर्वी टक्कल होतं की नव्हतं हे आठवेना... भैय्या आमचा ब्रँड विसरला होता... निघताना सगळ्यांची गळाभेट घेतली आणि किमान आठवड्यातून एक तरी फोन करायचे वचन देऊन त्यांची रजा घेतली. कॉल करेन हे वाक्य मनात अडकून राहिलं होतं. थोडं पुढे गेल्यावर मला जाणवलं... जाणवलं नव्हे... साक्षात्कार झाला... अरे हे असंच आपलं स्वतःच्या बाबतीतही घडतं... आणि आपलंच आयुष्य स्वतःलाच अपरिचीत वाटू लागतं. आठवा बरं, तुम्ही खास स्वत:साठी असा वेळ शेवटचा कधी काढला होता? तुमच्या आवडी, छंद जपण्यासाठी कधी शेवटची सुट्टी घेतली होती? एकटेच... स्वतःसोबत शेवटचे कधी फिरायला गेलात? एखादा विकेंड धुणी-भांडी केर-वारे बाजूला ठेऊन फक्त स्वतःसाठी जगलात? नाही आठवत ना? खरी मेख इथेच आहे. लोकांसाठी जगताना आपण स्वतःसाठी जगायचंच विसरून जातो. अंतर पडत जातं... हळू हळू वाढत जातं... आपल्या आयुष्याबद्दलच्या कल्पना परक्या वाटू लागतात आणि मग आपण दुसर्याच कुणाचं तरी आयुष्य जगतो आहोत ही भावना वारंवार सतावते. तर मग ज्या प्रकारे आपण मित्रांना कॉल करून चौकशी करतो, खबरबात ठेवतो... त्याच प्रकारे एक कॉल आजच स्वतःला करा. मनाशी संवाद साधा. कुठे काय साचलंय ते बघा... मन मोकळे होऊ द्या... आकाश आपोआप निरभ्र होईल. अर्धवट वाचलेल्या पुस्तकातला तो बुकमार्क अजूनही तुमची वाट बघत आहे. फक्त एक कॉल करायचा अवकाश आहे. करताय ना मग एक कॉल... स्वतःला? आपला, आदि जोशी
💬 प्रतिसाद
(27)
M
mayu4u
Wed, 11/01/2017 - 13:28
नवीन
रोज संध्याकाळी बिल्डिंगीच्या खाली अंडीवाला येतो, तसं रेग्युलर्ली अंडी घेऊन या!
छान लिहिलंय हे वे सां न ल.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Wed, 11/01/2017 - 13:28
नवीन
नमनालाच तेल ...आय मीन अंड ओकेच घतलंय !
पुढील अंड्याच्या प्रतिक्षेत !
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Wed, 11/01/2017 - 13:58
नवीन
वाचनीय अंडे!
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 11/01/2017 - 14:50
नवीन
अंडं घालताना काही त्रास झाला नाही ना?
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Wed, 11/01/2017 - 15:10
नवीन
अंडेवाले जोशी यांचे / लेखन आवडले . सावर रे सारखे आवर रे असे एखादे गाणे आठवु लागले .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 11/01/2017 - 15:17
नवीन
"दवणीय" म्हणजे काय?
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
गुरुवार, 11/02/2017 - 05:13
नवीन
दवणीय - सामान्यबुद्धीशी प्रतारणा करत आशाळभूतपणे आशावादी दृष्टीकोन ठेवत केलेले गोड गोड लेखन.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/02/2017 - 17:12
नवीन
म्हणजे लांगूलचालन असलेले लेखन
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 11/02/2017 - 20:43
नवीन
नाही हो श्रीगुरुजी. दवणीय अंडी घालण्यासाठी कोणाच्याही दाढ्या कुरवाळायची गरज नाही.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
र
रामपुरी
Wed, 11/01/2017 - 15:34
नवीन
जमलंय :-)
पु अं प्र
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 11/01/2017 - 16:29
नवीन
अंडीपिल्ली काढणारं लिखाण!!!
पंख्याना ऑमलेट रूपाने चटके बसल्यास अंडीवाला जिम्मेदार नाही
हलिम मुलाणी
अवकाळी अंड्यांचे हंगामी निरिक्षण समिती बदली सदस्य
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Wed, 11/01/2017 - 16:57
नवीन
पहिले अंडे आवडले..! :)
संडे हो या मंडे.. रोज दे दो अंडे.
- Log in or register to post comments
अ
अभिदेश
Wed, 11/01/2017 - 18:11
नवीन
पण बेतानेच घाला जरा अंडी . नाहीतर तुम्हाला अंडी घालण्याचा त्रास आणि आम्हाला अपचन व्हायचे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 11/01/2017 - 18:29
नवीन
दवणीयच आहे..
तेव्हढे सोडल्यास बाकी मस्त.
पुढच्या वेळेस आम्लेट करूनच द्या, जरा खुसखुशीत
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 11/01/2017 - 23:38
नवीन
अंडं आवडलं. कोंबडी कधी कापताय?
-गा.पै.
- Log in or register to post comments
ग
गंम्बा
गुरुवार, 11/02/2017 - 07:24
नवीन
अंड आवडले पण
दवणीय हे बिरुद प्राप्त करण्यासाठी अजुन बराच गोडगोड पणा , १-२ कवितेच्या ओळी आणि थोडेफार पूर्वीच्या काळी पैसा नव्हता पण आनंद होता अश्या प्रकारचे स्मरणरंजन घालणे जरुरीचे आहे.
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
गुरुवार, 11/02/2017 - 07:29
नवीन
लेखमाला आहे. अजूब बर्याच गोष्टी मांडल्या जातील. :)
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
गुरुवार, 11/02/2017 - 11:22
नवीन
येवुद्या लवकर...
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 11/02/2017 - 07:33
नवीन
जीवनाभिमुख करणारा सकारात्मक लेख.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 11/02/2017 - 12:49
नवीन
बाब्बो....रडू आले
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 11/02/2017 - 14:27
नवीन
अरे वा खुंटामंत्र्यांना कार्पियोमधुन उतरुन ल्ह्यायचा वेळ झाला म्हणायचा. आवडेश. पुढची अंडी पटापट येउ देत.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 11/02/2017 - 15:50
नवीन
असे काळजाला हात घालणारे लिखाण खूप पूर्वी वाचायला मिळायचे. हल्ली सगळा भावनाशून्य कोरडा मामला. पैशाच्या पाठीमागे धावणाऱ्या मंडळीला वेक अप कॉल म्हणायचा हा! स्वतः ला कॉल करायचा खूप प्रयत्न केला ओ, सतत रॉंग नंबर लागतोय, काय करू? पुढच्या धड्याच्या प्रतीक्षेत आहे!
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Fri, 11/03/2017 - 01:11
नवीन
अहो पै तै तुमचा रॉंग नंबर तरी लागतोय मला तर हा नंबर अस्तित्वात नाही असेच सांगतेय ती बया किती वेळापासून....
मी अस्तित्वात आहे कि नाही?
भंजाळलोय.
बाकी या निमित्ताने मिपा वर डेली सोप ऑपेरा सारख्या सिरिअल्स सुरु झाल्या वाटते. कोणी फोटो स्टेटस टाकतोय तर कोणी डालनीय अंडे.
हरी ओम.
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Fri, 11/03/2017 - 01:36
नवीन
हाय ला अॅड़या तू पुन्हा लिहिता झालास हेच आमच्यासाठी दवणीय आहे.
मग सध्या मुक्काम कुठं ?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 11/03/2017 - 03:38
नवीन
दवणगेरेला,
अंडी झाली की डोसे.
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Fri, 11/03/2017 - 09:14
नवीन
पहिले अंडे भारी आहे. दवणेना देताय का, धाग्याची लिंक ? ;-)
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Sun, 11/05/2017 - 08:35
नवीन
अॅड्या, अंड्याच्या अनेक प्रकारांची वाट पाहत आहे. येऊदेत ऑमलेट, हाफफ्राय, सनी साइड अप, भुर्जी, बैदा करी आणि अजून अनेक.. :)
तू पुन्हा लिहिता झालास.. हे छानच! :)
स्वाती
- Log in or register to post comments