आस्तिक-नास्तिक, श्रद्धा-अंधश्रद्धा, इ इ इ मानवी संकल्पनांवर होणारे वादविवाद
प्रेरणा : अठ्ठावीस लक्ष रुपये, त्यात उद्धृत केलेले एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेले एक वाचकाचे पत्र, तत्सम विषयांवरचे इतर लेख व त्यांच्यावरची चर्चा.
वर लिहिलेल्या लेखातला सगळा प्रकार, धार्मिक अंधश्रद्धा नसून...
(अ) एका लोभी माणसाच्या लालचीचा (कमी वेळात पैसे अनेक पटींनी वाढवणे) फायदा घेऊन दुसर्या बेरकी माणसाने त्याला फसवले
किंवा
(आ) एका भ्रष्ट माणसाच्या मानसिक असुरक्षिततेचा फायदा घेऊन, भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती (हवाला मार्गे) कायदेशीर बनवून देतो, असे सांगून दुसर्या बेरकी माणसाने त्याला फसवले
असाच जास्त दिसतो.
याप्रकारे, असुरक्षित मनस्थिती असलेल्या एखाद्या भ्रष्ट नास्तिक माणसालाही दुसर्या एखाद्या चलाख आस्तिक/नास्तिक माणसाने फसवणे सहज शक्य आहे, नाही का? त्याचा धर्म अथवा श्रद्धा यांच्याशी ओढून ताणून संबंध लावल्यासारखेच दिसत आहे. धर्म किंवा श्रद्धा यांच्याबद्दल वेगवेगळी मते असणे योग्य आहे पण अयोग्य प्रकारे त्यांचे समर्थन अथव खंडन करणे नक्कीच निषिद्ध असते.
या लेखातला, लेखकाचा मूळ हेतू योग्य आहे असे जमेस धरूनही, लेखातच दिलेल्या मजकूरावरून त्या उदाहरणामध्ये...
(अ) त्या साधूला कोणी धर्ममार्तंड समजणे किंवा तसा दावा करणे,
(आ) फसलेली व्यक्ती धार्मिक व्यक्ती आहे आणि एक लखपती उद्योजक असून तिने केवळ अंधश्रद्धेने त्या साधूला पैसे दिले असे समजणे,
(इ) आणि त्या दोघांमधला व्यवहार केवळ धर्मिक/अंध-श्रद्धेवर अवलंबून झाला होता, असे समजणे
हे काही फार मोठ्या विचारशक्तीचे लक्षण आहे, असे म्हणणे धाडसाचे होईल, यात शंका नाही ! अशी बाळबोध गृहितके धरून पोलिस जर अश्या केसेस सोडवायला लागले तर 'कालचा गोंधळ बरा होता' अशी परिस्थिती निर्माण होईल ! मला वाटत नाही की तसे होईल !
***************
माणसात आणि (आपल्याला सर्वात जवळ असलेल्या चिंपॅझीसह) इतर सर्व प्राण्यांत एक फार महत्वाचा फरक आहे, तो म्हणजे... संकल्पना (किंवा साध्या शब्दांत आपल्या मनातली गोष्ट दुसर्याला पटेल अश्या प्रकारे) सांगण्याची पात्रता... याला साध्या इंग्लिशमध्ये "स्टोरी टेलिंग" असेही म्हणतात. माणसांचा विशेष समजल्या जाणार्या आस्तिक/नास्तिक, देव/धर्म/जात, राज्य/राष्ट्र/संस्था या सर्व संकल्पना आहेत आणि त्यांच्यासाठी निर्माण केलेले नियम, भौगिलिक सीमारेखा, ध्वज, राष्ट्र/संस्था यांच्या घटना (constitution)/ प्रघात/मिशन/व्हिजन/पॉलिसी/प्रोसिजर, इ इ इ सर्वच संकल्पना आहेत... हे सर्व इतर प्राण्यांमध्ये शक्य नाही, फक्त माणसांतच शक्य असते. त्याच स्टोरी टेलिंगच्या बळावर माणसे एकत्र आणता येतात आणि त्यांच्याकरवी काम करवून घेता येते, केले गेले, केले जात आहे आणि भविष्यातही केले जाईल. या संकल्पनांच्या अभावात माणूस आणि इतर प्राण्यांतला फरक खूपच कमी होईल. मुख्य म्हणजे, या संकल्पना वेळेबरोबर बदलत गेलेल्या आहेत... विकसित होत आहेत.
गंमत अशी आहे की, (वर्तमानपत्र किंवा मिपासारख्या इतर) माध्यमांत मानवी व्यवहारसंबंधी गंभीरपणे लेख लिहितानासुद्धा...
(अ) मानवी व्यवहारांसंबंधीचे (ह्युमन बिहेवियर) शास्त्रिय ज्ञान असणे आवश्यक असते
किंवा
(आ) सबळ पुरावे (केवळ आपल्याला "खरे वाटणारे" आणि म्हणून ठासून सांगितलेले ठोकाताळे नव्हे) आवश्यक असतात
आणि विशेषत:
(इ) जनमानसात रुजलेल्या बर्यावाईट समजूती दूर करताना त्यांच्या जागी भौतिक आणि मानसिक अश्या दोन्ही स्तरांवर परिणामकारक ठरणारा पर्याय देणे आवश्यक असते, कारण, संकल्पनेच्या अभावात माणसाची अवस्था एका असुरक्षित गोंधळलेल्या प्राण्याप्रमाणे होते
हे तथाकथित विचारवंत विसरतात आणि केवळ वादविवादाचे धनी होतात. म्हणजे त्याचा प्रयत्न फायदेशीर ठरण्याऐवजी उलटतो (counter productive होतो).
त्यातही, सर्वात महत्वाचे म्हणजे, अयोग्य समजूती दूर करताना, भावनेच्या भरात वाहून जात, बळेच ओढून ताणून सत्याचा विपर्यास करणारी उदाहरणे देण्याने, आपणच आपल्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे करत असतो आणि आपल्या विचारशक्तीबद्दल दुसर्यांच्या मनात प्रश्न निर्माण करत असतो (व ही कृती अत्यंत अशास्त्रिय असते) हे सहजपणे विसरले जाते.
आपल्याला शास्त्रिय आणि समतोल विचाराचा समजाणार्याने, प्रथम सर्व तथ्यांचे सर्व दिशांनी प्रामाणिकपणे विष्लेशण करून मगच त्यावरून निष्कर्ष काढणे अपेक्षित असते. प्रथम निष्कर्ष ठरवायचा आणि मग तथ्यांना त्याच्या दिशेने हवे तसे वाकवायचे हे निषिद्ध असते... तसे करण्याला फारतर सोईस्कर राजकारण म्हणता येईल, शास्त्रिय विचार नक्कीच नव्हे आणि समाजकारण तर नव्हेच नव्हे. पूर्णविराम.
***************
मी स्वतःला अज्ञेयवादी समजतो. मला स्वतःला यनावालांसारख्या समाजसुधारणेचे व्रत घेतले आहे असा दावा करणार्या व्यक्तींबद्दल बर्यापैकी आदर आहे आणि मी सुद्धा माझ्या वकुबाप्रमाणे ते जमेल तसे करतो. मात्र, तसे करताना, चुकीची उदाहरणे / ओढून-ताणून बनवलेल्या कथा / एखाद्या प्रसंगाचे स्वतःला सोईस्कर असे ओढून-ताणून बनविलेले विश्लेषण, इत्यादी कटाक्षाने टाळतो. कारण, तसे केल्याने, केवळ आस्तिकच काय पण अशिक्षित मंडळींनाही त्यांच्यातला विसंवाद सहजपणे समजतो. सर्वसामान्य लोक बर्यापैकी हुशार असतात, ते तो विसंवाद सांगतिलच असे नाही, किंवा सांगायला गेले तर त्यांना शास्त्रिय पद्धतिने प्रतिवाद करता येईलच असे नाही. पण, त्यामुळे आपल्याला शिकविण्याचा आव आणणारी व्यक्ती भोंदू आहे असा त्यांचा ठाम (व योग्य) ग्रह होत जातो आणि त्यांचे स्वतःचे (कदाचित चुकीचे) मत अधिक पक्के होत जाते.
हे सर्व समजून-उमजून मगच आपले म्हणणे योग्य रितीने मांडणार्या व्यक्तीच आपल्या प्रयत्नांत यशस्वी होतील. तसेही, चुकीच्या पद्धतीने केलेले शास्त्रिय कामाची अशास्त्रिय कामातच गणना केली जाईल. असे करण्याने, योग्य रितीने सामाजिक काम करणार्या इतर लोकांच्या कामावरही बोळा फिरविला जातो, ते वेगळेच.
मानवी संकल्पना आणि त्यांचे योग्य रितीने विष्लेशण करणारी शास्त्रे सद्या खूप विकसित झालेली आहेत आणि त्यांच्या कक्षा दिवसेदिवस विस्तारत आहेत. मानवी व सामाजिक व्यवहारांत आणि विकासात, मानसशास्त्र आणि मानवी संकल्पना यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांचा विचार न करता समाजाचा विकास करणे हे अंधारात दगड मारण्यापेक्षा फार वेगळे नाही. या वर्षाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार "behavioral economics" या विषयासंबंधिच्या संशोधनाबद्दल दिला गेला आहे, यावरून हे म्हणणे अधोरेखित व्हावे.
यासाठीच, आपल्या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी समाजसुधारणेचे व्रत घेतलेल्या व्यक्तींनी...
(अ) मानवी मानसशास्त्र आणि मानवाच्या वैचारिक विकासाच्या वाटचालीचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे
आणि
(आ) समाजसुधारणेच्या प्रयत्नांमध्ये वापरलेली साधने (उदाहरणे, इ) आणि विष्लेशणासाठी वापरलेली पद्धत, प्रामाणिक व शास्त्रिय असणे आवश्यक आहे
मानवी जीवनाचा विकास, मानसशास्त्र आणि मानवाच्या वैचारिक विकासाच्या वाटचालीवर मानली गेलेली अनेक संशोधनपर पुस्तके व असंख्य शोधनिबंध आहेत. त्यातील, सर्वसामान्यांसाठी कळायला तुलनेने सोपी, रोचक भाषाशैलीत लिहिलेली व मला आवडलेल्या काही पुस्तकांची/लेखकांची नावे खाली देत आहे...
The Third Chimpanzee : Jared Diamond
The God Delusion : Richard Dawkins
The Extended Phenotype : Richard Dawkins
Selfish Gene : Richard Dawkins
The Blind Watchmaker : Richard Dawkins
The Greatest Show On Earth : Richard Dawkins
Unweaving the rainbow : Richard Dawkins
Sapiens, A brief history of Humankind : Yuval Noah Harari
हा विषय वाचायला-समजायला आयुष्य पुरे पडणार नाही... मात्र, वरच्या पुस्तकांपासून चांगली सुरुवात करता येईल.
यातील काही लेखकांच्या व्हिडिओ क्लिप्स यु ट्युबवर उपलब्ध आहेत... त्या बघणे ज्ञानार्जन करण्यास उपयोगी तर आहेतच पण त्यांत "आपले मत जडजंबाळ शास्त्रिय भाषा न वापरता... आणि मुख्य म्हणजे आपला गर्व व दुसर्याबद्दलचा तिरस्कार यांचे हिडिस प्रदर्शन न करता... प्रभावी पद्धतीने कसे मांडावे" याचा वस्तूपाठही बघायला मिळेल.
म्हणजे तसे बघितले तर सगळ्या अभ्यासू, भारदस्त वजनदार वाटणार्या लेखाचे मर्म इतकेच की 'कोणाला थेट गाढव म्हणून नका, घुमवून फिरवून गोड शब्दात म्हणा'हा जावई शोध कोणत्या पुराव्यांवर लावला आहात ? हेच ठीक होईल की, तुम्ही तुमची मते सांगा आणि मी माझी सांगेन... मी जे काय लिहिले आहे ते स्पष्टपणे लिहिले आहे. तेव्हा, तुम्ही कल्पिलेल्या गोष्टी माझ्या नावावर खपविण्याचा प्रयत्न न केल्यास ते जास्त योग्य व शास्त्रिय होईल, नाही का ? किंबहुना, या लेखात, असे विपर्यास करणे ही शास्त्रिय पद्धत नाही, हेच सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे ! :)यातली एकही गोष्ट यनावाला करत नाहीत. यासाठीच मी त्यांच्या धाग्यावर प्रतिसाद द्ययला जात नाही. एक वर्षापूर्वी त्यांच्या धाग्यावर मी काही प्रश्न विचारले होते, पण अडचणीचे प्रश्न असले की ते सरळ दुर्लक्ष करतात त्यामुळे माझ्या दृष्टीने त्यांची विश्वासार्हता शून्य आहे. ते कदाचित मिपा आणि लोकसत्ता सारखेच समजत असावेत.Exactly. मी व इतर अनेकांनी त्यांना त्यांच्या पहिल्या धाग्यावर अनेक प्रश्न विचारले होते. त्यातील एकाचेही त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे मी त्यांच्या दुसऱ्या धाग्यावर एकही प्रतिसाद दिला नाही. जो माणूस पहिलीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला, त्याला दुसऱ्या यत्तेचे प्रश्न कसे विचारणार? गंमत अशी की दुसरा धागा श्रद्धा ठेवल्यामुळे नुकसान झाले असे सांगणारा आहे. त्यासाठी एका मटातील बातमीचा आधार घेतला आहे (बातमीची लिंक न देता) असे लिहिले आहे. त्यांनी स्वतः या घटनेची शहानिशा केलेली नाही. बातमीची सत्यासत्यता पडताळून न पाहता, मटात बातमी आली म्हणजे ही घटना सत्य असलीच पाहिजे ही श्रद्धा ठेवून (त्यांनी स्वत:च एका प्रतिसादात हे लिहिले आहे), श्रद्धा ठेवणे कसे चुकीचे आहे हे सांगणारा लेख पाडला आहे. मला अशा लोकांची कीव येते. स्वत:ला बुद्धिवादी, नास्तिक वगैरे समजणारे प्रत्यक्षात अत्यंत अंधश्रद्ध असतात हे मी अनेकदा अनुभवले आहे.म.टा. मधील बातमीवर यानावालाजीयांनी विश्वास ठेवला आणि लेख लिहिला... त्यांनी जो लेख लिहिला तो : बातमीची सत्यासत्यता पडताळून न पाहता," असे आपले मत आहे.हे मी बनविलेले मत नाही. त्यांनी लिहिलेला लेख वाचा. मूळ लेखात खालील वाक्य आहे. महाराष्ट्र टाइम्स सारख्या प्रतिष्ठित दैनिकात छापून आलेली ही सत्य घटना आहे. नंतर एका प्रतिसादात खालील वाक्ये आहेत. बातमी वाचल्यावर मला ती खरी वाटेना. २८ लक्ष रु.दिले ? असे कसे शक्य आहे? पण म.टा. सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने बातमी नांवानिशी प्रसिद्ध केली होती. त्यात पोलीस ठाणे तसेच तेथील अधिकारी यांची नांवे होती. त्यामुळेत्यामुळे बातमी खरी मानली.इथे त्यांच्या अंधश्रद्धेची दोन उदाहरणे दिसतात. पहिले उदाहरण म्हणजे मटामधील बातम्या खर्याच असतात ही एक अंधश्रद्धा आणि दुसरी अंधश्रद्धा म्हणजे एखादा २८ लक्ष रूपये देऊन फसू शकेल या बातमीची कोणतीही शहानिशा न करता त्यावर अंधविश्वास ठेवून त्यानिमित्ताने श्रद्धावंताना झोडपण्यासाठी पाडलेला लेख. वर्तमानपत्रे फक्त सत्यच छापतात यावर अडाणी माणूस सुद्धा डोळे झाकून विश्वास ठेवणार नाही. वर्तमानपत्रांनी खोट्या बातम्या छापणे किंवा बातम्या ट्विस्ट करून छापणे किंवा बातमीचा मथळा व आतील बातमी पूर्ण परस्परविरोधी असणे याची असंख्य उदाहरणे सापडतील. अशा परिस्थितीत स्वतःला बुद्धिवादी प्राध्यापक म्हणवून घेणार्याने या बातमीची शहानिशा न करता त्यावर अंधविश्वास ठेवला कारण असा विश्वास ठेवणे त्यांना सोयीचे होते. या बातमीतील मंदार वैद्य नामक व्यक्ती मध्यमवयीन व्यावसायिक आहे. नावावरून ब्राह्मण वाटतात. म्हणजेच सुशिक्षित असणार. व्यावसायिक असल्याने व्यवहारज्ञान व अनुभव चांगला असणार. व्यवसायात अनेकांशी संबंध येत असल्याने कोण कसे फसवितात याचाही दांडगा अनुभव असेल. २८ लक्ष रोख देण्याची क्षमता असल्याने सांपत्तिक स्थिती खूप चांगली असणार. असा सुशिक्षित, व्यावहारिक, अनुभवी, श्रीमंत माणूस पैशांचा पाऊस पडेल यावर विश्वास ठेवून कोणत्या तरी मांत्रिकाला २८ रूपये रोख देऊन फसेल यावर विश्वास ठेवणे अत्यंत अवघड आहे. पण बुद्धिवादी यनावालांनी मात्र या बातमीवर डोळे झाकून विश्वास ठेवला कारण तसा विश्वास ठेवणे त्यांना सोयीचे होते. माझा या बातमीवर अजिबात विश्वास बसलेला नाही. दुसर्या एका धाग्यात एका टोल नाक्यावर एका डॉक्टरांकडून ४० रूपये टोल घेण्याऐवजी ४ लाख रूपये टोल घेतल्याच्या बातमीची लिंक कोणीतरी दिली होती. त्याही बातमीवर मी विश्वास ठेवला नाही कारण एकंदरीत परिस्थितीवरून तसे होण्याची शक्यता दिसत नव्हती. या २८ लाख प्रकरणात सुद्धा कोणीतरी लिहिल्याप्रमाणे हा प्रकार मनी लाँडरिंग किंवा हवालाचा असावा किंवा असे काही घडलेच नसावे. परंतु बातमीची शहानिशा अजिबात न करता बातमी खरीच आहे या अंधविश्वासावर प्राध्यापक महोदयांनी श्रद्धावानांची अक्कल काढलेली आहे.पण इथे मत नोंदणी करणाऱ्या किती जणांनी प्रत्यक्षात बातमीची सत्यासत्यता पडताळून पहिली असावी. कितीजण श्री. मंदार यांच्या भेटीला गेले असावे? यात अर्थात माझा आणि तुमच्यासारख्या सर्वांचाच समावेश होऊ शकेल. मग या न्यायाने सर्व चर्चा (पक्षी आणि प्रतिपक्षी) विफल आहे.मी या बातमीची लिंक वेगवेगळ्या प्रकारे गुगलवर शोधायचा प्रयत्न केला. या बातमीविषयी मला कोणतीही लिंक सापडली नाही. अगदी मटाची सुद्धा नाही. इतर कोणाला सापडली असल्यास त्यांनी ती लिंक द्यावी. यनावालांनी सुद्धा बातमीची लिंक दिलेली नाही. असे काही घडले असेल का याविषयीच मला शंका आहे. मी वर्तमानपत्रातील बातम्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही.या तर्काने अगदी नजीकच्या भूतकाळातले किंवा प्राचीन आणि अतिप्राचीन गोष्टीवरची सर्व चर्चा निरर्थक होणार नाही का? उदा: औरंगजेबाने खरेच जिझिया कर लावला होता का? सत्यासत्याची पडताळणी करण्यास आपल्यापैकी कुणीच उपस्थित नव्हते...बरोबर. शेवटी कोठेतरी विश्वास ठेवावाच लागतो. मानवी जीवनात ९९.९९% प्रसंगात असा विश्वास ठेवला जातो. प्रत्येक गोष्टीची सत्यासत्यता पडताळणे अशक्य आहे. कोणावर विश्वास ठेवूनच पुढे जावे लागते. जर मटावाले सत्य छापतात असा यनावालांचा गाढ विश्वास असेल तर परमेश्वर आहे व त्याचा अनुभव घेता येतो असे अनेक संत, सत्पुरूष यांनी सांगितले आहे त्यावर विश्वास का ठेवू नये? मटावर डोळे झाकून विश्वास ठेवणारे बुद्धिवादी आणि संतांच्या सांगण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारे मात्र विचारशक्ती कुंठित झालेले! वा! खरं तर संतावर अंधविश्वास ठेवणे जास्त योग्य कारण ते निस्वार्थी असतात आणि ते तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत. याउलट मटासारखी वृत्तपत्रे हा व्यवसाय म्हणून करीत असतात व त्यांना तुमच्याकडून पैसे हवे असतात. अशांच्या सांगण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा मी कधीही निस्वार्थी संतांच्या सांगण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवीन. आपल्याला बुद्धीवादी, प्रत्येक गोष्ट पारखून घेणारे, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होत असेल तरच त्या गोष्टींवर विश्वास ठेवणार्या तथाकथित बुद्धीवादी मंडळींसाठी काही प्रश्न आहेत. - आपण ज्यांना आपले आईवडील मानतो ते केवळ विश्वासावरच का तेच आपले खरेखुरे जैविक जन्मदाते आहेत हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करून घेतल्यानंतरच मानतो? - आपण ज्यांना आपली मुलेबाळे मानतो त्या मुलांचा जैविक पिता (किंवा माता) आपणच आहोत हे केवळ विश्वासावरच मानतो का त्या मुलांचे आपणच खरेखुरे जैविक जन्मदाते आहोत हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करून घेतल्यानंतरच मानतो? म्हणजे आपण ज्यांना आपली मुलेबाळे मानतो त्यांचे जैविक जन्मदाते आपण नसण्याची सुद्धा शक्यता आहे ना? कदाचित जन्मानंतर दवाखान्यात मुलांची अदलाबदल झाली असेल किंवा अजून वेगळ्या कारणाने मुलांचा जन्म झाला असेल. (हा प्रश्न जरा ऑफेन्सिव्ह आहे, परंतु तो कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी नाही). - आपण समजा रक्त तपासणीसाठी एखाद्या डॉक्टरच्या प्रयोगशाळेत गेलो, तर आपले रक्त काढून घेईपर्यंतच आपण साक्षीदार असतो. नंतर संध्याकाळी रक्ततपासणीचा जो अहवाल डॉक्टर देतो तो आपण सत्य आहे या अंधविश्वासावरच पुढील उपचार घेतो. यात बर्याच शक्यता आहेत. कदाचित डॉक्टरने चुकीची टेस्ट घेतली असेल किंवा अहवालात चुकीचे आकडे छापले असतील किंवा चुकून दुसर्याच कोणाच्या रक्तावर टेस्ट करून ते आकडे आपल्या चाचणीच्या अहवालात दाखविले असतील किंवा डॉक्टरने रक्ताची चाचणी न करताच खोटा अहवाल दिला असेल . . . अशा अनेक शक्यता उद्भवू शकतात. आपण एकदा रक्त देऊन निघालो की थेट आपण अहवाल घ्यायला जातो. आपल्या दॄष्टीआड काय होते ते आपल्याला माहिती नसते. तरीसुद्धा आपण त्या अहवालावर विश्वास ठेवतो ही अंधश्रद्धा नाही का? जर संतांनी सांगितलेल्या देवावर विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धा आहे तर एखाद्या डॉक्टरने दिलेल्या अहवालावर विश्वास ठेवणे हीसुद्धा अंधश्रद्धाच आहे. किंबहुना संतांच्या सांगण्यावर श्रद्धा ठेवून देवभक्ती केल्याने तसा व्यावहारिक तोटा नाही, परंतु डॉक्टरचा अहवाल चुकला असेल तर प्रचंड नुकसान होऊ शकते. म्हणजेच ही अंधश्रद्धा श्रद्धाळूंच्या अंधश्रद्धेपेक्षा जास्त घातक आहे. देव, परमेश्वर, अध्यात्म इ. विश्वास ठेवणार्यांची अक्कल काढणारे आपल्या प्रत्यक्ष जीवनात त्यांच्याइतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त अंधश्रद्ध असतात हे पुन्हा एकदा सिद्ध होते. यनावाला प्राध्यापक आहेत म्हणे. त्यांच्या दोन धाग्यांवर त्यांना अनेकांनी अनेक प्रश्न विचारले. त्या एकाही प्रश्नाचे उत्तर न देता त्यांनी विचारणार्यांची अक्कल, संस्कृती काढली. हे महाशय जेव्हा वर्गात शिकवीत असतील तेव्हा शंका विचारणार्या विद्यार्थ्यांकंडे एकतर संपूर्ण दुर्लक्ष करीत असतील किंवा त्यांची अक्कल काढत असतील हे नक्की.जर यानावालाजी एखाद्या बातमीवर विश्वास ठेवून लिखाण करतात हे चूक तर प्रतिपक्षी देखील प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन सत्यासत्यता न जाणता यानावालाजींचे म्हणणे चूक असे मानतात हे म्हणजे एका चुकीवर दुसरी मोठी चूक आहे असे मला वाटायला लागले आहे.जीवनातील ९९.९९% प्रसंगात विश्वास ठेवावाच लागतो. त्याला श्रद्धाळू किंवा तथाकथित विचारवंत असे कोणीही अपवाद नाही. फरक एवढाच आहे की श्रद्धाळू हे परमेश्वर या संकल्पनेवर विश्वास ठेवून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतात तर तथाकथित विचारवंत स्वत: जीवनातील सर्व प्रसंगात अंधश्रद्धाळू असूनही स्वत: बुद्धीवादी आहोत या गैरसमजूतीत श्रद्धाळूंची अक्कल काढत असतात.आपल्यापैकी कुणीही 'शहानिशा केलेली नाही. ना तुम्ही ना मी. आणि यानावालाजीही असे म्हणत नाहीत की ते शहानिशा करण्यासाठी गेले होते.मी तेच म्हणतोय. यनावालांसारखे विचारवंत नास्तिक आणि आमच्यासारखे विचारशक्ती कुंठीत झालेले असे दोघेही जीवनातील ९९.९९% गोष्टींची शहानिशा न करता त्या खर्याच आहेत यावर श्रद्धा/विश्वास ठेवतात. त्यांच्यात आणि आमच्यात फरक नाही.पेक्षा पोलीस ठाण्यात नोंदी उपलब्ध असतात त्यामुळे त्या सत्याला वजन प्राप्त झाले. त्यामुळे यानावालाजी म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी ते सत्य मानले. आणि शेवटी विश्वास कुठेतरी ठेवावा लागतो असे आपलेही म्हणणे आहे. मग म.टा. वर विश्वास ठेवून बातमी लिहिली तर यामध्ये आक्षेप असण्याचे फारसे कारण दिसत नाही. त्यांचा म.टा. वर विश्वास आहे. कुणी इंडिअन एक्स्प्रेस / लोकसत्ता यावर विश्वास ठेवील कुणी आउट लुक / इंडिया टूडे वर विश्वास ठेवेल कुणी ऑर्गनायझर / पांचजन्य यावर विश्वास ठेवेल...मुळात ही घटना सत्य आहे का नाही हे यनावालांनी तपासले आहे काय? ते तपासले असेल तरच "सत्याला वजन प्राप्त झाले" या शब्दांना अर्थ प्राप्त होतो. या घटनेच्या पोलिस ठाण्यातील नोंदी त्यांनी स्वतः ठाण्यात जाऊन तपासल्या आहेत का? समजा तिथे नोंदी असल्या तरी त्या नोंदी खर्या आहेत याची त्यांना १००% खात्री आहे का? जर ते मटातील बातमी खरी आहे यावर कोणतीही शहानिशा न करता डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात तर संत परमेश्वरी स्वरूपाच्या अनुभवाचे ग्रंथातून वर्णन करतात त्यावर विश्वास ठेवण्याला का आक्षेप असावा? म्हणजे जे मटातील बातमीवर शहानिशा न करता डोळे झाकून विश्वास ठेवतात त्यांची विचारशक्ती जागृत आणि जे संतांच्या ग्रंथातील सांगण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात त्यांची विचारशक्ती कुंठीत झालेली अशी विभागणी आहे का? जसा कुणी इंडिअन एक्स्प्रेस / लोकसत्ता यावर विश्वास ठेवील कुणी आउट लुक / इंडिया टूडे वर विश्वास ठेवेल कुणी ऑर्गनायझर / पांचजन्य यावर विश्वास ठेवेल . . . तसाच कोणी भक्तिमार्गी संत ज्ञानेश्वरांवर विश्वास ठेवेल तर कोणी योगमार्गी परमहंस योगानंदांवर विश्वास ठेवेल तर कोणी ज्ञानमार्गी जे. कृष्णमूर्ती यांच्यावर विश्वास ठेवेल.या बातमीतील मंदार वैद्य नामक व्यक्ती मध्यमवयीन व्यावसायिक आहे. नावावरून ब्राह्मण वाटतात. म्हणजेच सुशिक्षित असणार....मी, म, टा, ची नमूद बातमी अंतरजालावर वाचली तसेच आपण सुचविल्यानुसार यानावालाजींचा लेख पुन्हा वाचला... त्यात कुठेही ब्राह्मण असा उल्लेख नाही. कदाचित हा जाती उल्लेख यानावालाजींच्या लेखात आहे असा सत्यापलाप आपणाकडून होत आहे का? किंवा आपण स्वत:च ही जाणीवपूर्वक माहिती दिली असे म्हटल्यास त्याचा लेखाशी काही संबंध आहे का?मी कोणताही सत्यापलाप केलेला नाही. मंदार वैद्य हे ब्राह्मण आहेत किंवा यनावालांनी तसे लिहिले आहे असे मी म्हटलेले नाही. ते नावावरून ब्राह्मण वाटतात असे मी लिहिले आहे. लेखाशी नसला तरी या तथाकथित घटनेशी याचा निश्चित संबंध आहे. ब्राह्मण मंडळी बहुतांशी सुशिक्षित असतात व ते देवऋषी, मांत्रिक, तांत्रिक इ. च्या क्वचितच नादाला लागतात. निदान माझ्या पाहण्यात असा ब्राह्मण नाही. त्यामुळे हे मंदार वैद्य पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा करणार्या मांत्रिकाच्या नादी लागतील यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. हे समजा या माणसाच्या नादाने फसले नसते तर कमी पैशात सोन्याची बिस्किटे देतो किंवा कमी किंमतीत डॉलर्स देतो किंवा नायजेरियन फ्रॉड अशा प्रकारच्या माणसांच्या नादाला लागून निश्चितच फसले असते कारण त्यांच्या फसवणुकीमागे आध्यात्मिक श्रद्धा नसून फक्त कमी पैशात किंवा कोणत्यातरी अतार्किक मार्गाने धन मिळविणे हा स्वार्थ आहे. अशा माणसाच्या फसवणुकीची कहाणी सांगून त्यानिमित्ताने श्रद्धावंतांना झोडपून काढणे या गोष्टीला आक्षेप आहे.पण बुद्धिवादी यनावालांनी मात्र या बातमीवर डोळे झाकून विश्वास ठेवला कारण तसा विश्वास ठेवणे त्यांना सोयीचे होते.होय. पण यानावालाजीनी कुठेही असे म्हटले नाही की त्यांची म.टा. वर श्रद्धा आहे. किंवा तुम्ही देखील म्हणत नाहीत. तो विश्वासच आहे. शिवाय एखाद्या अधिक कुतूहल असणाऱ्या व्यक्तीला याचा पडताळा घ्यावयाचा झाल्यास पोलीस ठाणे किंवा श्री. मंदार यांची भेट घेऊन खात्री करता येईल.श्रद्धा आणि विश्वास हे दोन्ही एकच आहेत. त्यासाठी उगाच शब्दच्छल करण्यात अर्थ नाही. मटात बातमी आली म्हणजे ती खरीच असली पाहिजे ही मनोवृत्ती आणि निस्वार्थी संत परमेश्वरी अनुभवाविषयी जे सांगतात ते खरेच असले पाहिजे, या दोन्हीतील पहिला प्रकार म्हणजे विश्वास आणि दुसरा म्हणजे श्रद्धा अशी विभागणी असते का? दोन्ही गोष्टींना श्रद्धा किंवा विश्वास असे काहीही म्हणता येईल कारण दोन्ही गोष्टी स्वतः पडताळून न पाहता त्या खर्या आहेत असे मानले आहे.आपण ज्यांना आपले आईवडील मानतो ते केवळ विश्वासावरच का तेच...हेच मला म्हणायचे आहे... श्रद्धा शब्दाऐवजी विश्वास शब्द आपण जो वापरात आहात तो मला योग्य वाटला. कारण श्रद्धा या अमूर्त कल्पना /संकल्पना यांच्याशी संबंधित आहेत तर विश्वास या मूर्त कल्पना आणि जिवंत माणसांशी संबंधित आहेत.श्रद्धा किंवा विश्वास हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. दोन्ही शब्द मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही कल्पना/संकल्पनेशी संबंधित आहेत.शिवाय आईवडील हे विश्वासानेच मानावे! एखाद्या अनाथ व्यक्तीला भावी जीवनात कळाले की त्याचे हे जैविक आई-वडील नाहीत तर काहीजण शोध घेतील तर काहीजण आहे त्याच पालकांना आईवडील मानतील. आपण ज्या महाकाव्यांना प्रमाण मानतो त्याची उदाहरणे घेऊ... महाभारतातील चित्रवीर्य-विचित्रवीर्य या नियोगातील संतती आहेत. खुद्द कर्ण हा जन्मदात्री-दाताकडे वाढला नाही. कर्णाने कुणाला आई-वडील मानले! भगवान श्रीकृष्णांचे पालन तर माता यशोदाने केले. जिथे चित्रवीर्य-विचित्रवीर्य पासून ते भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या पालकांना (ज्यांनी पालन केले ते पालक...)अव्हेरले नाही तेंव्हा आपल्यासारख्या पामरांची काय कथा! जैविक आई-वडील यांचा शोध घेणे हे महत्त्वाचे मला वाटत नाही त्यापेक्षा ज्याने आपला प्रतिपाळ केला ते पालक महत्त्वाचे. असा काही शोध घेणे बऱ्यापैकी क्षुल्लक आहे, असे माझे मत आहे. आता 'नकोशी' म्हणून नवजात स्त्री बालकाला टाकून दिलेल्या मुलींनी मोठे झाल्यावर काय करावयाचे!जर एखादे दांपत्य हेच आपले आईवडील आहेत हे शास्रीयदृष्ट्या सिद्ध न करता सुद्धा आपण तसे मानतो तर परमेश्वराचे अस्तित्व मानणे म्हणजे विचारशक्ती कुंठीत झाली असे कसे म्हणता येईल? दोन्हीकडे विश्वास/श्रद्धा आहे.तरीसुद्धा आपण त्या अहवालावर विश्वास ठेवतो ही अंधश्रद्धा नाही का?विश्वास ठेवून जाणीवपूर्वक किंवा अजाणते फसविल्या गेल्यास फारतर विश्वासघात झाला असे म्हणता येईल. अंधश्रद्धा झाली असे म्हणता येणार नाही.श्रद्धा म्हणजेच विश्वास व विश्वास म्हणजेच श्रद्धा.खरेतर संतांनी व्यक्ती आणि ईश्वर यामध्ये कुणीही मध्यस्थ मानू नका असेही सांगूनही अनेकजण धार्मिक विधी करण्यासाठी एखाद्या पुरोहिताला बोलावतात ना! संतांकडून प्रत्येकजण आपल्याला योग्य वाटले ते ते घेतोय.संतांनी नवविधा भक्ती सांगितली आहे. कर्मकांड हा त्यातलाच एक मार्ग आहे. योगमार्ग, भक्तीमार्ग, श्रवणभक्ती, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, वैदिक कर्मकांड अशा कोणत्याही प्रकारे ईश्वरापर्यंत जाता येते.अगदी खरे! म्हणूनच विश्वास असो की श्रद्धा यांची पडताळणी, चिकित्सा आवश्यकही बनते! श्री. आॅरोबिंदो देखील एकदा म्हणाले की "मी नास्तिक नाही किंवा श्रद्धाळू नाही. श्रद्धा असे काही नसते. याचे कारण मी ईश्वराला मानतो असे नसून ईश्वराला जाणतो. आणि जिथे जाणणे आहे तिथे ज्ञानप्राप्ती आहे. जिथे ज्ञानप्राप्ती आहे तिथे श्रद्धा असत नाही." त्यामुळे मला असे वाटते की श्री. आॅरोबिंदो यांनी देखील श्रद्धेची चिकित्सा करून ज्ञानप्राप्ती करून घेतली असणार.निश्चितच. श्रद्धावान माणूस संतांच्या सांगण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून त्या मार्गाने परमेश्वरी स्वरूपाचा अनुभव मिळविण्याचा प्रयत्न करतो. कदाचित एखाद्याला अनेक वर्षांच्या शोधानंतर वाटेल की परमेश्वर असे काही अस्तित्वातच नाही. परंतु त्याचा हा निष्कर्ष स्वतः शोध घेण्याचा प्रयत्न करून त्यामध्ये आलेल्या अनुभवांवर आधारील असेल. परंतु परमेश्वर असे काही अस्तित्वातच नाही असे स्वतःला नास्तिक समजणारे अगदी ठामपणे मानतात आणि तेसुद्धा शोध न घेता किंवा चिकित्सा न करता. चिकित्सा करून अपयश आल्यावर परमेश्वर असे काही नाही असे श्रद्धावानाने म्हटले तर ते योग्य ठरेल. परंतु स्वतः कोणत्याही प्रकारची चिकित्सा न करता किंवा शोध न घेता असे काही अस्तित्वातच नाही यावर ठाम अंधविश्वास ठेवणे व जे शोध घेत आहेत किंवा चिकित्सा करीत आहेत त्यांना झोडपून काढणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.कोणाची पात्रता, प्रामाणिकपणा, काय जमतं, नाही जमत - हे सर्व कोण ठरवणार? तुम्ही?याकरिता, काही मूलभूत मानदंड आहेत, त्या काही खूप गुप्त गोष्टी नाहीत आणि त्यातील बर्याच गोष्टी प्रामाणिकपण आणि समतोल विचारावर अवलंबून आहेत. जगभरातील समतोल विचार करणारे आणि समाजविकास करण्याची खरी आस असणारे त्यांचा उपयोग करतात. समाजसुधार करण्याच्या प्रयत्नांत (किंवा कोणत्याही चांगल्या कामात) स्वतःला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी त्यांचा आपण स्वतःहून प्रामाणिकपणे पूर्वग्रहविरहित अभ्यास व उपयोग करण्याची आवश्यकता असते. आपल्या प्रयत्नांत समतोल आणि प्रामाणिक राहण्यासाठी त्यांची मूलभूत मदत होते. (अ) असे काही असते किंवा (आ) असे काही करण्यानेच माझ्या कामाची प्रत सतत चांगली राहील यांची कल्पना, "मी म्हणतो तेच खरे असते. 'माझे म्हणणे का खरे आहे ?', हे विचारण्याचा हक्क इतर "बिच्यार्यांना" अजिबात नाही." अशी धारणा असणार्या स्वयंघोषित सुधारकांच्या/तज्ज्ञांच्या गावीही नसते, हीच तर खरी समस्या आहे. *************** अजून काही थोडे... "माझे म्हणणे का खरे/योग्य आहे ?", हे विचारण्याचा हक्क इतर सर्वांना आहे आणि माझ्या म्हणण्याचे शास्त्रिय पद्धतिने खंडन करण्याचा हक्कही इतरांना आहे... हा तर सर्व प्रकारच्या शास्त्रिय, सामाजिक व समतोल विचारांचा मूलभूत पाया आहे. यामुळेच, सर्व प्रकारच्या शास्त्रिय दाव्यांना इतर तज्ज्ञांच्या तपासणीतून जावे लागते. ही एक न टाळता येणारी प्रक्रिया आहे आणि शास्त्रिय जगतात तिला "पियर रिव्ह्यु" असे म्हणतात. हे केवळ उच्च शास्त्रिय संशोधनांतच नव्हे तर समाजसुधारणेसारख्या... मानवी जीवनावर प्रभाव टाकणार्या व इतर तितक्याच महत्वाच्या... बाबींत फार महत्वाचे आहे. अन्यथा, खरा समाजसुधारक, स्वतःची वैयक्तिक मते बर्यावाईट पद्धतीने दुसर्यांवर लादणारा स्वयंघोषित समाजसुधारक आणि तद्दन भोंदू व्यक्ती यांच्यात कसा फरक करणार ? आपल्या मतांची आणि ती बनवताना वापरलेल्या साधनशुचितेची खात्री असणारे अश्या तपासणीला घाबरत तर नाहीतच पण त्याला सतत तयार असतात... किंबहुना, त्या प्रक्रियेतून तावून सुलाखून निघणार्या विचार आणि संकल्पनांना विरोध करणे जास्त जास्त कठीण होत जाते व त्यांना बहुमान्यता मिळायला मदतच होते.मी तुमच्याइतका शिकलेला नाही. अनुभवीही नाही.खरे तर सदर विषयात निरक्षिरविवेक करायला फार शिक्षण लागत नाही... सर्वसामान्य शिक्षित-अशिक्षित माणूस तो आपल्या सारासारविवेकबुद्धीचा उपयोग करूनच करत असतो. यनावालातल्या लेखातल्या उदाहरणात "पैसे दुप्पट करून देतो" या दाव्याने उच्चशिक्षित उद्योजक फसतो पण तुमच्या आजूबाजूच्या सर्वसामान्य धार्मिक आणि अशिक्षित लोकांतले किती फसतील ?... क्वचितच एखादा. तोही धार्मिक मनःस्थितीमुळे नाही. माझ्या मते खरं तर धार्मिक लोक पक्के व्यापारी असतात... केवळ पाव ते सव्वा किलो पेढ्यांचा नवस बोलून परिक्षेतला पहिला वर्ग, उत्तम नोकरी, प्रमोशन, सुंदर बायको/नवरा, आणि काय काय मागत असतात ! :) जे देवाशीसुद्धा अफाट फायद्याचा व्यवहार करू इच्छितात अश्या मंडळीच्या हातून लाखोंनी पैसे सहजपणे दिले जातील ??? ("देवा तूझा आशिर्वाद हवा, बस. माझे यश मी कष्ट करून ओढून आणिन" असे म्हणणारा आस्तिक मला पहायचा आहे !) या फसवणूकीचे खरे कारण "लोकांचा धर्मभोळेपणा नसून पटकन विनाकष्ट पैसे मिळविण्याची लालच आहे, हे हुशारच नव्हे तर सर्वसामान्य माणसाची सारासाविवेकबुद्धी सांगेल". अशी लालच दाखवून फसवणूक मल्टी-लेव्हल-मार्केटिंग, शेअर मार्केटमध्ये पैसे दुपट करून देतो सांगणारे, चीट फंड वाले, इत्यादी अनेक चलाख बनेल लोक करतात आणि त्याला लोभी लोक बळी पडतात. त्या सगळ्यात आपण "लोभ" याच एका दुष्प्रवृत्तीला जबाबदार धरतो, नाही का ? त्याविरुद्ध, लेखातल्या उदाहरणात... (अ) केवळ त्यात एक "स्वघोषित बाबा" होता, हा मुद्दा वापरून उदाहरणाला सोईस्कर धार्मिक वळण देणे; (आ) तो बाबा एक हवाला ऑपरेटर होता हे सोईस्करपणे विसरणे; (इ) इतरांच्या धमक्यांना न घाबरता पैशांचा व्यवहार करण्याइतका हुशार/खमका असल्याशिवाय कोणी यशस्वी उद्योजक बनू शकत नाही हे विसरणे व अश्या माणसाला कपोलकल्पित धार्मिक कारणे देऊन धमकावले गेले हे तितकेसे पचनी पडणारे कारण नाही, हे विसरणे; (ई) ती दोन माणसे (बाबा व उद्योजक) आपले खरे उद्येश (फसवणूक, हवाला, इ) इत्यादी असफल झाल्याने, सत्य झाकण्यासाठी आणि एकमेकावर दोषारोप करण्यासाठी सत्याचा विपर्यास करू शकतात, हे सोईस्करपणे विसरणे; इ इ इ सारासारविवेकबुद्धी वापरल्याचे लक्षण नाही... जे सर्वसामान्य अशिक्षित माणसानेही केले असते. (* शिक्षव्यवस्थेबद्दलच्या एका दैनिकात प्रसिद्ध केलेल्या पत्रातही यनावालांनी पाश्चिमात्य देशांतिल वस्तूस्थितीशी विपरित "स्वयं-तर्कशास्त्र (प्रायव्हेट लॉजिक)" वापरून केलेले दावे आहेत. हे मी त्यांच्या लेखावरील प्रतिसादांत सप्रमाण विशद केले आहे. त्यामुळे त्याची इथे फक्त नोंद करत आहे.) साध्या मराठीत याला एकतर (अ) असमतोल लेखन व विष्लेशण किंवा (आ) चलाखी (पक्षी : सत्याचा विपर्यास करून आपले म्हणणे दुसर्याच्या गळी उतरवण्याचा प्रयास) यापैकी एक म्हणता येईल... कोणता पर्याय स्विकारायचा हे मी तुमच्यावर (आणि यदाकदाचित यनावालांनी हा प्रतिसाद वाचायची तसदी घेतली असेल तर त्यांच्यावर) सोपवित आहे. याविरुद्ध, त्यांच्या मूळ हेतूला पाठींबा असूनही माझी यनावालांबद्दल हीच तक्रार आहे की ते आपले मत मांडायला फार फार चुकीची उदाहरणे निवडतात आणि त्यांना ओढूनताणून आपल्या निष्कर्षांकडे नेण्याचा प्रयत्न करतात. समाजात त्यांच्या उपयोगाची (पक्षी : धार्मिक अंधश्रद्धेची) इतकी ढळढळीत उदाहरणे पडलेली आहेत की त्यांनी "बनवलेली उदाहरणे आणि विष्लेशणे" वापरायची अजिबात गरज नाही ! त्यांचे मत स्पष्ट करायला त्यांना राम-रहिम, आसाराम, इत्यादी अनेक कायद्याने सिद्ध झालेली उदाहरणे कशी दिसत नाहीत याचे सतत आश्चर्य वाटते. ही उदाहरणे घेऊन त्यांनी लेख लिहिले असते तर मिपावरच्या आणि इतरही अनेक आस्तिकांचा त्यांना पाठींबा मिळाला असता असे मला वाटते... कारण माझ्या माहितीतले बहुतेक आस्तिक भोंदूगिरीचा तिरस्कारच करतात.खरी समस्या आहे की यनावालांच्या तलवारीच्या धारेच्या हजारपट तेज धार जनतेत अंधश्रद्धा पसरवणार्यांची आहे. त्यांच्याविरुद्ध मात्र इतकं जनमत खवळलेलं कधीच दिसत नाही.?! :) कोणी धार्मिक/अंधश्रद्ध माणूस अधार्मिक/नास्तिक लोकांबद्दल सतत लेख लिहून त्यांची नालस्ती/विरोध करत आहे, असे उदाहरण नजरेत असल्यास दाखवावे ! धार्मिक/अंधश्रद्ध लोक त्यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना जरूर दिसतात... ती नास्तिकांच्या क्रियेला दिलेली प्रतिक्रिया होते ! "प्रतिक्रिया दिली नाही तर त्यात आपला विजय मानणे आणि दिली तर त्याला असहिष्णुता मानणे" हे आजकाल नास्तिक/सुधारक/उदारमतवादी/डावे/इत्यादींचे अढळ लक्षण बनले आहे !! त्यामुळेही, बर्याचदा प्रतिक्रिया आवश्यक ठरते. :) त्याविरुद्ध, नास्तिक/सुधारक/उदारमतवादी लोकांना "आमचे मत कित्त्ती बरोबर/ग्रेट" आणि "इतर किती मागासलेले/अविकसित/निर्बुद्ध/आकलनशक्ती नसलेले/इइइ" आहेत हे सांगताना पाहण्यासाठी फार संशोधन करावे लागणार नाही. वानगीदाखल यनावालांचे मिपावरचे लेख पहा. त्यांनीच त्यांच्या एका लेखावरील एका प्रतिसादात, ते लेख का लिहितात याचे कारण दिले आहे, ते सुद्धा पहा. राम-रहिम, आसाराम, इत्यादींवर कायद्याची कारवाई झाली तेव्हा सर्वसामान्य जनतेने न्यायालयाचे म्हणणे स्विकारले होते. राम-रहिमच्या अटकेनंतर झालेली हिंसा ही फसवणूक झालेल्या सर्वसामान्य श्रद्धाळूंनी केलेली नसून राम-रहिमच्या चलाखीच्या फायदा मिळणार्या गुंडांनी पैसे घेऊन केली होती असे दिसून आले आहे... म्हणजे ती कृती श्रद्धा-अंधश्रद्धेची नसून गुंडगिरीची होती. त्यानंतर, त्या अटकेमुळे कोणत्या श्रद्धाळूला फारसे दु:ख झाल्याचे दिसून आलेले नाही किंवा तो झालेल्या कारवाईबद्दल सतत कायद्याला दोष देत बसलेला दिसत नाही. त्याविरुद्ध, तथाकथित सुधारक/उदारमतवादी/निधर्मी लोक मात्र त्यांना न पटलेल्या (पक्षी : सोईचे नसलेल्या) अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांवर सतत ताशेरे मारताना दिसतात (उदा : जुडिशियल किलिंग, इ). इथेही त्यांचा "मी म्हणतो तेच्च खरे" हा आव दिसतो, नाही का ?ह्या जगात सगळ्यात जास्त मोठी समस्या काही असेल तर ती आहे ऑफेन्ड होणार्यांची. यनावालांनी श्रद्धावंतांना मूर्ख-गाढव म्हटल्याने सगळे दुखावतात. त्यांना तर्हे तर्हेचे प्रश्न विचारतात.ही काय समस्या आहे का ?! क्या कहना चाहते हो भाई ? ;) ही तर कोणत्याही बदलाची प्रक्रिया आहे. तुम्ही स्वतः पंखा/फ्रीज/मोबाईल/ इइइ काही नीट चौकशी केल्याशिवाय बदलले आहेत का ? तर मग स्वतःची मूळ विचारधारा बदलण्यापूर्वी तर्हेतर्हेचे प्रश्न न विचारणे आणि त्यांच्या संयुक्तिक उत्तरांची अपेक्षा न करने केवळ वेडगळपणाचे होईल, नाही का ? खरे तर, असे प्रश्न विचारले तर समाजसुधारकाने आनंद मानायला पाहिजे... कारण याचा अर्थ त्याला संवाद/वादविवाद करण्यायोग्य समजले गेले आहे, फाट्यावर मारण्यायोग्य नव्हे ! "सार्वजनिक मुक्त व्यापिठावर (उदा : मिसळपाव) प्रसिद्ध केलेले आपले लिखाण लोकांनी प्रश्न न विचारता आहे तसे स्विकारावे" असा आग्रह करणे कोणत्या मानसिकतेचे लक्षण होईल ???!!! :) किंबहुना, यनावाला (विशेषतः त्यांच्या विष्लेशणांत इतक्या तार्किक उणिवा दिसत असताना) किंवा इतर कोणावरही डोळे मिटून विश्वास ठेवणे ही एक तद्दन अंधश्रद्धाच होईल, नाही का ? शिवाय... "मी म्हणतो तेच्च बरोबर. मला प्रश्न विचारायची कोणाच्चिच लायकी नाही", हे तत्व इतिहासातल्या बर्याच जुलुमी एकाधिकारशहांनी यशस्वीपणे अंमलात आणले होते... ते तत्व आजच्या लोकशाही व्यवस्थेत बरोबर/आचरणयोग्य आहे असे समजायचे काय ?खोले प्रकरणच घ्या. (अशा अनेक करंट प्रकरणांची यादी शोधली तर मिळेल) तिथे सोवळे-ओवळे प्रकरणात किती शास्त्रीय चिकित्सा आणि पियर रिव्यु झालं? इतकं विज्ञान शिकलेली व्यक्ती अवैज्ञानिक आणि भेदकारक परंपरा पाळतात. तिथे मागणी होते का विचारांच्या चिकित्सेची? किती फरक पडतो? खोलेंना तर चार स्वयंपाक खाऊनदेखील कळलं नाही का हा 'आपल्या पद्धतीचा स्वयंपाक' नाही. इतक्या बेसिक लेवलवरही श्रद्धेची चिकित्सा फेल जाते.ही मूळ समस्या जाणून घेण्यात बर्याच जणांची चूक झाली आहे, तेव्हा तुम्ही असे काही लिहिले याचे आश्चर्य वाटले नाही ! माझ्या लेखात्च याबाबत उल्लेल्ख आहे. पण अजून जरा जास्त लिहिण्याची गरज आहे असे वाटते. माणून कितीही लहान-मोठा, शिक्षित-अशिक्षित, तज्ज्ञ-अडाणी असला तरी मुळात माणूसच असतो. त्याच्या मेंदूत परखड विचारशक्ती असते त्याबरोबरच भावनाही असते हे विसरून चालणार नाही. या भावना मानवी संकल्पनांवर आधारित असतात आणि तेथे दरवेळी (किंबहुना बर्याचदा) परखड विचार काम करतीलच असे नाही... याकरिताच मानवी जीवनात व्यावहारीक आणि भावनिक विचार/व्यवहार असे दोन मोठे भाग असतात. आपल्या प्रेमाच्या माणसासाठी त्या माणसाबद्दलच्या आपुलकीखातर (त्याला बरे वाटेल किंवा वाटले असते याकरिता) आपल्याला आवडत नसलेली एखादी कृती आपण करतो. उदा: स्वतःचा धार्मिक गोष्टींवर विश्वास नसलेल्या माणसाला त्याच्या अत्यंत प्रिय असलेल्या आईने जर "माझ्या मृत्युनंतर एखादे धार्मिक कार्य कर" असे सांगितले, तर तो ते स्वतःच्या आनंदाकरिता नाही पण आईबद्दलच्या प्रेमभावनेखातर करेलच बहुदा, नाही का ? भावना या अश्याच असतात ! असा माणूस शास्त्रज्ञ असला तर शास्त्रिय प्रयोगशाळेत प्रयोग करताना भावना बाजूला ठेवून केवळ आधुनिक शास्त्राधारावर अवलंबून काम करेल. त्याचबरोबर, एखादा निधर्मी माणुसही कसा भावनाशील असू शकेल याचे उदाहरण पाहू या. एक माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या सुधारकाने, "मी हिंदू मूर्तींवर मूत्रविसर्जन केले आहे." असे सांगितले होते. अश्या माणसाला त्याच्या प्रिय व्यक्तीच्या (उदा: आई, वडिल, इ) फोटोवर मूत्रविसर्जन कर असे म्हटले तर तो ते सहजपणे करेल का ? परखड तर्काने पाहिले तर दगडाची मूर्ती आणि कागदाचा फोटो या दोन्हीही भौतिकदृष्ट्या निर्जीव वस्तू आहेत आणि मूत्रविसर्जनाने त्या वस्तूंना तसा अर्थाअर्थी काहीच फरक पडणार नाही... फरक पडतो ज्याची भावना/संकल्पना त्या वस्तूशी निगडित आहे त्याला... आणि तो फरक मानवात नक्कीच पडतो, नाही का ? वर लेखात म्हटल्याप्रमाणे, संकल्पना ही मानवी मन/विचारशक्तीने निर्माण केलेली गोष्ट आहे, ती मानवी जीवनाचा अविभाज्य गोष्ट झालेली आहे आणि तिच्यामुळेच मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा झाला आहे. म्हणूनच, एखाद्या कुत्र्याला मूत्रविसर्जन करताना तेथे एखादे झाड आहे की एखादी मूर्ती आहे की त्याच्या श्वानमातात्यापित्यांचा फोटो पडलेला आहे, याने काही फरक पडत नाही. समाज अशा वैयक्तिक भावना असलेल्या अनेक माणसांनी बनलेला असतो. त्यातून पुढे सामाजिक मानदंड (हे योग्य/अयोग्य, बरोबर/चूक, आम्ही/आमच्यात असे करतात/करत नाहीत, इइइ) तयार होतात... आणि ते मानदंड बदलत्या कालाबरोबर बदतही जातात. तसेच, ते एकाच कालात सर्व जगभर एकसारखे नसतात (आजच्या घडीला देहदंड कायद्याने निषिद्ध असणारे देश आहेत आणि केवळ देहदंड मानणारेच नव्हे तर भर चौकात मान छाटणारे देशही आहेत... आणि ते सगळे संयुक्त राष्ट्रसंघात मांडीला मांडी लावून बसत आहेत.) सामाजिक सुधार करताना प्रथम समाजातील माणसांच्या वैयक्तिक भावना समजून घेणे आणि मग त्यांचा सामाजिक मानदंडांवरच्या प्रभावाचा अभ्यास करणे, आवश्यक असते. अश्या रितीने प्रश्न नीट समजावून घेतल्यावरच त्याचे उत्तर (कोणता सामाजिक बदल आवश्यक आहे आणि तो कसा केल्यास सुलभपणे होईल) शोधता येते. आता तुम्ही अगोदर विचारलेला प्रश्न की सर्व समाजसुधारकांना हे कसे जमेल. त्यांनी ते जमवायलाच पाहिजे. असे बघा, आपण पहिलीच्या वर्गावर शिकविणार्या शिक्षकालाही एक ठारविक पात्रता हवी असा आग्रह धरतो, त्याने विद्यार्थ्यांना अंदाजपंचे, अतार्किक, अशास्त्रिय गोष्टी ठोकून शिकवाव्या असे म्हणत नाही. मग समाजाचे प्रबोधन करताना (ज्यांमुळे अनेक जीवनाचे सद्य आणि भविष्यातले हित/अहित होणार असते) सुधारकाने आपली मते, त्यांची तार्किकता आणि आपली साधनशुचिता यांची परखड खात्री करून घेणे जरूरीचे नाही असे म्हणणे योग्य होईल का ? या समाजात तुम्ही-मी, आपल्या पुढच्या-मागच्या पिढ्या असे सर्वच येतो... यांच्या जीवनाशी कोणीही स्वमतावर आधारीत खेळ करावा असे तुम्हाला वाटते काय ? म्हणूनच, ज्यांना साधनशुचिता पाळून केलेल्या तर्कावर आपले काम करता येत नाही, त्यांनी स्वतःचे मत स्वत:कडे ठेऊन निदान समाजात दांभिक (अतार्किक, साधनशुचितेविना केलेले) दावे करणे समाजाच्या दृष्टीने धोक्याचे आहे... याकरिताच, समाजशिक्षण हे येरागबाळ्याचे काम नोहे. स्वयंघोषित, स्वमग्न समाजसुधारक हे इतर अभ्यासू, साधनशुचिता पाळून प्रामाणिकपणे समाजसुधाराचे काम करणार्यांच्या कामावर बोळा फिरवितात. त्यांचे चलाख विरोधक स्वयंघोषित सुधारकांचे उदाहरण देऊन त्यांचे काम अधिकाधिक कठीण करतात. अतीउत्साही स्वयंघोषीत सुधारक, प्रश्नाची उकल न करताच "स्वत:ला" काय योग्य "वाटते (कारण त्याला तार्किक पार्श्वभूमी असली पाहिजेच अशी गरज त्यांना वाटत नाही" (पक्षी : उत्तर) ते ठरवतात. मग ते उत्तर जबरदस्तीने दुसर्यांवर लादू पाहतात. कोणी प्रश्न विचारले की त्यांना तो अपमान वाटतो आणि प्रश्नकर्त्याचा अपमान करणे / त्याच्याबद्दल अपशब्द वापरणे / त्याची चेष्टा करणे / त्याचे अवडंबर करून स्वतःला बळी असल्याचा कांगावा करणे / इत्यादी सुरू होते. उच्चशिक्षित असलेले सुधारक आपल्या शिक्षणाने मिळालेल्या ज्ञानाचा या शेवटच्या कार्यपद्धतीसाठी पुरेपूर उपयोग करताना सर्व माध्यमांत सतत दिसते. असो. एकमेकात मिसळलेले अनेक प्रश्न तुमच्या प्रतिसादात असल्याने त्यांची उत्तरेही जराशी तशीच झाली आहेत. तरीही, त्यांचा मूळ गाभा तुमच्या नक्कीच ध्यानात येईल. फक्त, पूर्वग्रह बाजूला ठेवून, मुद्दे केवळ तर्काच्या तराजून तोलावे, इतकेच सांगेन.तुम्ही कट्टर उजवे दिसता.=)) =)) =)) या विनोदासाठी अनेक धन्यवाद ! गंभीर वादविवादातही विनोदाला स्थान हवेच... त्याची वातावरण हलके व्हायला मदत होते ! :) ;) आपल्याशी सहमत नसणार्यांना असे एकदम विरुद्ध गटात ढकलण्याचा (हे टोक किंवा ते टोक) प्रकार दिसला की, "दोन्ही बाजूंचे ऐकून त्यांचा समतोलपणे विचार करणारा मध्यममार्ग शक्य असतो" हा विचार कळणे काहींना किती अशक्य असते याची खात्री पटते. बघा, शेवटी मानवी मनाचाच हा एक प्रकार ! :) असो. तुमच्या नजरेतून सुटले असले तरी, मी कोणत्या विचाराचा आहे हे मी अगोदरच स्पष्टपणे लिहिले आहे. माझे मत आणि वैचारिक वर्णपटावरील स्थान ठरवायला मी समर्थ आहे... तुम्ही तुमचे मत व वर्णपटावरचे स्थान ठरवा. मात्र, मला तुमच्या कल्पनेतली लेबले लावण्याचा जावईशोध न लावलेला बरा... तसे करणे अगतिकतेचे लक्षण समजले जाते ! :) आता उरलेल्या प्रतिसादाबद्दल... मी माझ्या लिखाणात वारंवार "मानवी व्यवहारात सारासारविवेक वापरणे फार जरूर आहे" हे लिहिले आहे, हे तुमच्या नजरेआड झाले याचे आश्चर्य वाटले नाही. :) तसे नसते तर तुमच्या मनातले वरचे प्रश्न आणि निष्कर्ष आले नसते ! असो. तेच तेच परत परत लिहिण्यात मला रस नाही. तरी दोन महत्वाच्या गोष्टी सांगणे आवश्यक वाटते आहे... १. (अ) या जगातल्या सर्वांना योग्य मार्गावर आणण्याचा मक्ता घेऊन मी जन्माला आलो आहे आणि (आ) भल्या-बुर्या मार्गांनी ते मी केलेच पाहिजे असा माझा ग्रह अजिबात नाही. त्याचबरोबर, (इ) दुसरा माझ्याशी सहमत होत नाही किंवा मला दुसर्याचा योग्य प्रतिवाद सुचत नाही, या कारणाने त्याच्याबद्दल तिरस्कारपूर्ण, तिरके अथवा अप-शब्द वापरणे म्हणजे "आपल्या हाती आपली पत कमी करणे" असे मी समजतो. हे जग वैविध्याने भरलेले आहे आणि जोपर्यंत दुसर्याला जाच होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला आपले वैविध्य जपायचा अधिकार आहे असे माझे मत आहे. वैविध्य संपलेले एकसूरी जग फारच रुक्ष, एकरंगी करडे आणि जाचक होईल, नाही का ? एकच एक विचारसरणी ही कम्युनिस्ट आणि एकेरी धार्मिक गटांचा खास आवडता विचार आहे. मी तर लोकशाही विचारसरणीचा खंदा पुरस्कर्ता आहे. २. म्हणूनच, तुम्हाला मी लिहिलेले आवडले/पटले/पचले नसले तरी, काहीही करून तुमचे मतपरिवर्तन करण्याच्या फंदात मी पडणार नाही. कारण, "दुसर्याच्या हक्कांवर गदा न येता स्वतःचे वेगळे मत असण्याच्या लोकशाही हक्काबद्दल मला नेहमीच आदर असेल". आणि तुम्ही वेगळे मत ठेवले म्हणून (मी तुमच्या मताशी सहमत नसलो तरी) तुमच्याबद्दल कुठलेही वैयक्तिक शेरे मारणे मला योग्य वाटणार नाही. तेव्हा. तुमची मते कळविल्याबद्दल, धन्यवाद !