Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

चितळेंपेक्षाही जास्त माजोरडे दुकान!

M
mayu4u
Tue, 10/17/2017 - 13:56
💬 92 प्रतिसाद
शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? कालपर्यंत मी सुद्धा अशी काही कल्पना केली नव्हती... पण सत्य हे कल्पनेपेक्षाही विचित्र असते, याचा फर्स्ट ह्यांड अनुभव घेतला मी! =============================================================================== कार्यालयीन कामानिमित्त गेल्या आठवड्यात बंगलोरास आलेलो, आणि वीकेंड मैसुरच्या कार्यालयात घालवून, धनत्रयोदशीच्या संध्याकाळीच घरवापसी करणार होतो. हा मैसुर म्हणजे महिषासुराचा धाकटा भाऊ आणि बकासुराचा चुलत भाऊ असावा असं उगीच वाटत रहातं. असो. तर, दिवाळीच्या आधीच्या वीकांताला मी घरात नसल्याने सौ तुफान चिडलेली... “वर्षभर घरात पसारा कर आणि साफसफाईच्या वेळेला बरोबर पसार हो! पसाभर हातभार लाऊ नकोस कामांना... घर माझं एकटीच आहे का?” इत्यादी इत्यादी... त्यामुळे दिवाली को मनानेसे पैले घरवाली को मनाना था! तस्मात् “मैसुरास रेशमी साड्या चांगल्या मिळतात, तिथून तुझ्यासाठी काही छानश्या साड्या आणतो” असं सांगून मांडवली केली. कबूल करून बसलो खरा; पण कपडे खरेदी, ती सुद्धा बायकांची, हा एक प्रचंड वैतागवाणा प्रकार आहे, हे समस्त पुरुषवर्ग मान्य करेल. या विषयावर पु लं नी एव्हढ खुमासदार लिहिलेलं असतानाही बायका आपापल्या नवऱ्यांना कापड खरेदीस का ओढून नेतात हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे दिलेला शब्द कसा पाळावा हा यक्षप्रश्न होताच. एकदा वाटलेलं, की तसही माझे शब्द हिंस्र असल्याने नाही पाळला तर? पण सौ दुर्गावतार धारण करतील, या भीतीने मनाचा हिय्या करून कापड खरेदी उरकायची ठरवली. सर्वात पहिला अडथळा आला दुकान निवडण्यात. रांगेत ३५-४० साड्यांची दुकानं, आणि प्रत्येक दुकानात मैसूरच्या “अस्सल आणि सर्वोत्तम” रेशमी साड्या मिळणार. योग्य दुकानाचा शोध ईश्वराच्या शोधाईतकाच कठीण वाटू लागला. मग निमूट कार्यालयातल्या भगिनी समाजाला शरण गेलो, आणि म्हणालो, “बायांनो, एखादं बरंसं दुकान सुचवा!” त्यांनी आपापसांत काहीतरी अगम्य बडबड केली आणि एक भगिनी मला म्हणाली, “गो टू कर्नाटका सारी सेंटर!” दुसरीने स्वत:च्या फोन वरून उबर सुद्धा बोलावली. आणि मी शुंभासारखा आपल्या पायांनी त्या गाडीत बसून वधस्तंभाकडे चाललेल्या वसंतसेनाघातकी चारुदत्तासारखा निघालो पण! कर्नाटका सारी सेंटर! स्वर्ण महाल हे नाव धारण करणाऱ्या, आणि सशाच्या टाळूला गंडस्थल म्हणण्याचा गटणेपणा करणाऱ्या एका चारमजली कळकट्ट इमारतीत हे दुकान आहे. न्यूटनचं नाव घेऊन आत शिरलो. तळमजल्यावर चारास एक या गुणोत्तरात काही विक्रेत्या ग्राहकांकडे दुर्लक्ष करत होत्या. त्यातल्या एकीसमोरच्या घोळक्यात भर टाकत मी म्हणालो, “सिल्क सारीज दिखाइये!” “रेंजा?” “फुल रेंज इन रोमिंग” खिशातून फोन काढत मी उद्गारलो, आणि मग माझी ट्यूब पेटली! आधल्या रात्री सौंशी बोलून मातोश्री आणि शत्रुपक्षाच्या पुढारी स्त्री साठी (पहा: नारायण) साडी; आणि सौंसाठी ड्रेस मटेरियल असा बेत नक्की झालेला. पण किती रुपड्या खर्च करायच्या ही महत्वाची तहाची कलमं राहून गेलेली. आली की नाही पंचाईत! आणि त्यात ती मद्रकन्या कंटाळवाण्या चेहऱ्यानं माझ्याकडे रोखून बघत होती. “फाईव थाउजंड?” मी, भीतभीत. “पिलावूल्कंडी तेरेपारम्पील उषा!” “???” नक्की काय म्हणायचंय हिला? मी किंमत खूप कमी सांगितली का? साड्यांच्या किमती किती असतात? इकडे कुणी हिंदी बोलतच नाही का? अशा प्रश्नांच्या वावटळीत चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन मी उभा. आमचा हा आध्यात्मिक पातळीवरचा संवाद पाहून तिसरीच एक दुर्मुखसुंदरी मला म्हणाली, “सर, सेकंड फ्लोअरा यू गो.” “इंग्लीश हम शरमिंदा है, तेरे कातील...” असं काहीतरी पुटपुटत पावनखिंडीसारख्या त्या अरुंद जिन्यावरून चढून दुसऱ्या मजल्यावर पोचलो, आणि.... तिथं उफाळलेली गर्दी पाहून फेफरं यायचं बाकी राहिलं. शुष्क दिना आधी मदिरेच्या दुकानासमोर पण एवढी गर्दी नसते राव... खरेदी करणारी एक अनाहिता, तिला सोबत करणाऱ्या दोन बायका आणि अशा तीन टोळ्यांना सांभाळायला एक विक्रेती या प्रमाणात त्या वीस बाय वीस च्या दालनात तीन-चारशे बायका कलकलाट करत होत्या. फुल कुंभमेळा लागलेला. आल्यापावली मागे वळावं असा विचार करत असतानाच मागून आलेल्या लोंढ्याने मला आत ढकलून दिलं, आणि अभिमन्यू सारखा मी त्या चक्रमव्यूहात एकाकी लढू लागलो. क्षणभर वाटलं, एवढ्या गर्दीत घुसून खरेदी केल्याने सौ खूष होईल. पुराव्याने शाबीत करण्यासाठी एखादा फोटो घेऊन ठेवावा. पण खिशातून फोन काढायचा प्रयत्न केला आणि त्या भानगडीत डझनभर बायकांच्या निरनिराळ्या अवयवांना स्पर्श झाला. मग डंकर्क च्या यशस्वी माघारी सारखी ती मोहीम मी रद्द केली.. मुंबईच्या लोकलचा अनुभव असल्याने मागच्या लोंढ्याचा फायदा घेऊन एका कौंटरजवळ पोचलो. आणि चक्क त्या विक्रेतीला हिंदी येत होतं. चटकन तिने २ साड्या दाखवल्या. त्यातली पहिली पसंत केली आणि त्याच डिझाईन मध्ये आणखी रंग मागितले. प्रत्युत्तरादाखल तिने समोर टाकलेली पहिलीच साडी उचलली. ठरवलेल्यापैकी दोन जिन्नस दोन मिनिटात घेतले! “जितं! जितं!!” अशी आरोळी ठोकली मी! “ये दो सारीज पॅक कर दिजीये. और मुझे ड्रेस मटेरिअल दिखाईये.” मी, ऐटीत. “नै सर. पैले इसका बिलिंग होना.” “नहीं, मै सारा बिलिंग साथमे करुंगा.” “नै सर. पैले इसका बिलिंग होना.” तिची रेकॉर्ड एकाच ठिकाणी अडकलेली. “ठीक है!” आलीया भोगासी... म्हणत मी त्या गर्दीतून वाट काढत तिच्या मागून बिलिंग कौंटर पाशी गेलो. तिथही झुंबड उडालेली होतीच. त्या गोंधळात थोडा वेळ गेल्यावर माझा नंबर लागला. त्या हिंदी बोलणाऱ्या विक्रेतीने तिच्या हातातल्या साड्या बिल बनवणाऱ्या हेडमास्तराकडे दिल्या. मी निमूट कार्ड काढून त्याच्या हातात दिल आणि काही सहस्र रुपयांचा चुराडा करून घेतला. नाकावर घसरलेल्या चष्म्याच्या वरून माझ्याकडे बघत त्या बुवाने कार्ड आणि बिल माझ्या हातात दिलं. मी साड्यांच्या प्रतीक्षेत उभा. “हो गया.” हेडमास्तरबुवा. “लेकीन मेरी सारीज?” मी “वो नीचे फर्स्ट फ्लोर से लेनेका.” डिसमिस! च्यायला! ही आणखीच भानगड! इथंच माझ्या हातात साड्या देऊन टाकल्या असत्या तर काय बिघडणार होतं? तरी बरं, खाली उतरता उतरता साड्या घेऊन जायचं होतं. वरून येणाऱ्या बायकांना चुकवत, मास्टर अफझुलखानच्या पाठीवरच्या तोफेसारख्या (पहा: असा मी असामी) त्या जड लॅपटॉप बॅगेला सांभाळत आणखी वर जाणं म्हणजे शिक्षाच झाली असती. “थँक्यू!” म्हणून मी खाली जायला निघालो, आणि आठवलं! सौंसाठीची खरेदी शिल्लक आहे... पोटात एक छोटासा गोळा आला! “सर, ड्रेस मटेरियल चाहिये” अजीजीने मी हेडमास्तरबुवाला म्हणालो. “थर्ड फ्लोर.” जेवणाची वेळ झालेली. आतापर्यंत माझा उत्साह पार संपलेला. दोन मिनिटात खरेदी संपवल्याचं भारी फिलिंग केव्हाच उडून गेलेलं. पोटातला छोटासा गोळा आता भुकेचं रूप घेऊन दंगा करत होता. नाईलाजाने, टाचा घासत घासत मी अजून एक मजला चढून गेलो. इथं गर्दी जरा कमी होती. विरार ट्रेन मधून बांद्रा ट्रेन मध्ये आल्यासारखं वाटलं. पण इथं सौंसाठीची खरेदी करायची होती. त्यामुळे एका कानाला फोन लाऊन तिच्याशी बोलायचं. सॉरी, तिचं बोलण ऐकायचं. आणि ते विक्रेतीला सांगायचं. दुसऱ्या फोन वरून ती दाखवेल त्या कापडाचे फोटो काढून सौंना पाठवायचे. मग पुन्हा “यात फ्युश्या कलर आहे का बघ, लेमन ग्रीन ऐवजी ओशन ग्रीन किंवा बॉटल ग्रीन आहे का विचार, या पॅटर्न मध्ये जडावाचं काही माग...” असे हल्ले परतवायचे. अशी सगळी सव्यापसव्य करून चार कापडं नक्की केली. “आईये सर, बिलिंग करते है.” त्राणच गेलं माझ्या पायातलं. पुन्हा मघाच्यासारखे सगळे उद्योग करून बिल बनवलं. फक्त इथं हेडमास्तरबुवा ऐवजी मुख्याध्यापिका बाई होत्या. बिल माझ्या हाती देऊन “फर्स्ट फ्लोर” असं म्हणत तिने मोबाईलमध्ये डोकं खुपसलं. “मॅडम, ये ड्रेस मटेरियल इधरही मेरेको क्यू नही देते?” हमारे बगीचे मै पैदा हुवा फुलदणाणा च्या शैलीत मी. “नै सर, आपको फर्स्ट फ्लोर से ही लेना होगा!” मुख्याध्यापिका “लेकीन ऐसा क्यू? इधर ही देंगे तो आपका भी टाइम बचेगा और हमारा भी.” आता वैताग बोलायला लागलेला. “नै सर, हमारा प्रोसेस है, आपको फर्स्ट फ्लोर से ही लेना होगा” प्रोसेस? उद्या सांगाल आमची डेव्हलपमेंट, टेस्टिंग आणि क्यूए टीम आहे. “ये कैसा प्रोसेस है? इसमे आपका भी टाइम जाता है और हमारा भी!” मी चिकाटीने माझा मुद्दा लाऊन धरलेला. “सर आप इधर आर्ग्यू करनेसे फर्स्ट फ्लोर जायेंगे तो आपका भी टैम बचेगा और हमारा भी!” इनस्विंगिंग यॉर्कर. क्लीन बोल्ड. जमिनीवर पडलेला माझा चेहरा उचलून घेत मी फर्स्ट फ्लोर कडे. पहिल्या मजल्यावर पॅकिंग कौंटरकडे सगळे ग्राहक आपापले जिन्नस घ्यायला जमा झालेले. रांग लावल्याने आम्हा भारतीयांच्या राष्ट्रवादावर गदा येते. त्यामुळे तिथं मारामारी चालू होती. मुसंडी मारून त्या गर्दीत घुसलो. कौंटर पल्याड दोन अण्णा लोकांकडून बिल घेऊन जिन्नस शोधून आणून देत होते. आणखी एकजण येणारे जिन्नस तपासत होता. एकजण खुर्चीवर नुसता बसून होता. मी हातातली दोन बिल त्याच्यासमोर सरकवली. अवाक्षर न बोलता त्यान दुसऱ्या दोघांकडे बोट दाखवलं. आता माझ्यात वाद घालायचं देखील त्राण उरलं नव्हतं. मी निमूटपणे माझ्यावर कृपादृष्टी पडायची वाट बघू लागलो. एवढ्यात माझ्या नंतर आलेल्या एका सुंदरी कडून त्या दादाने बिल घेतलं. आणि माझ्यात वाद घालायचा नवा उत्साह संचारला. “मै पैले आया, पैले मेरा बिल ले लो.” “आपका दो बिल है. दुसरा आदमी आपका बिल लेगा. मै सिर्फ एक बिल देखता है.” “और किसिका दो से जादा बिल होगा तो?” मलाही कंडू कमी नाही. त्यानं खुर्चीवर बसलेल्याकडे बोट दाखवलं. प्रोसेस! मग मी तो दो बिल वाला मोकळा व्हायची वाट बघत निमूट उभा राहिलो. यथावकाश माझा नंबर लागला. माझे सगळे जिन्नस माझ्या ताब्यात आले. दो बिल वाल्याने मला “येक्ष्ट्रा ब्याग्ज” पण दिल्या. आणि जखमेवर मीठ चोळायला मला म्हणाला, “सर! प्लीज व्हिजीट अगेन!” =============================================================================== घरी आल्यावर साडी बघून मातोश्रींनी साडी बघून अपेक्षेप्रमाणे संतोष व्यक्त केला. सौंनी, तिच्या मातोश्रीन्साठीची साडी बघून (अपेक्षेप्रमाणे) असंतोष व्यक्त केला. “तुझा चॉईस अगदी बंडल आहे!” इति सौ. “ते पाच वर्षांपूर्वीच सिद्ध झालंय!” विजयी स्वरात मी. पण हा टोमणा कळायला एक किमान बौद्धिक कुवत लागत असल्याने, माझा बाउन्सर तिच्या डोक्यावरून वाईड! =============================================================================== दीपावलीच्या शुभेच्छा!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 18404 views

💬 प्रतिसाद (92)
प
पगला गजोधर Tue, 10/17/2017 - 14:11 नवीन
टी आर पी घेण्यासाठी पुण्याला किंवा चितळे वैगरे यांना नावं ठेवणाऱ्यांची किंवा येते !! चितळे आणि माज अशी सुरवात करून लेखात पुढे अकलेच्या घोड्याला घोडे लावलेत ... पण शीर्षक व लेखातला संधर्भ गवसला नाही ...
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Tue, 10/17/2017 - 14:23 नवीन
पण बाकी मजकुर मजेशीर आहे.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 10/17/2017 - 16:14 नवीन
सगळ्याचेच संदर्भ गवसले पाहिजेत असं कुठे आहे...?
  • Log in or register to post comments
ध
धडपड्या Tue, 10/17/2017 - 16:33 नवीन
दिवाळी फराळ जास्त झालेला दिसतोय... जुलाब काय थांबायचं नाव घेईनात...
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 10/18/2017 - 07:57 नवीन
आणि शरीराच्या डॉक्टरांसोबत मनाच्या डॉक्टरांना पण दाखवा, म्हणजे जरा आनंदी रहाल. बरे होण्यासाठी शुभेच्छा! गेट वेल सून!
  • Log in or register to post comments
R
Rahul D गुरुवार, 10/19/2017 - 19:24 नवीन
  • Log in or register to post comments
M
mayu4u Tue, 10/17/2017 - 16:59 नवीन
येऊ द्या... र च्या क ने, तो शब्द "संदर्भ" असा आहे.
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Wed, 10/18/2017 - 02:10 नवीन
रच्याकने हा शब्द काय आहे.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Wed, 10/18/2017 - 18:53 नवीन
रस्त्या च्या कडे ने
  • Log in or register to post comments
फ
फास्टरफेणे Tue, 10/17/2017 - 17:30 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
सरल मान Tue, 10/17/2017 - 14:15 नवीन
लय झ्याक लिवलय...
  • Log in or register to post comments
ड
डॉ श्रीहास Tue, 10/17/2017 - 14:23 नवीन
सौ नी वाचलय का ?
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 10/17/2017 - 16:15 नवीन
+११
  • Log in or register to post comments
ध
धडपड्या Tue, 10/17/2017 - 16:31 नवीन
येवढा मोट्टा लेख टायपायला हात, आणि जोक मारायला डोकं शाबूत आहे, म्हणजे अजून (नेहमीप्रमाणेच) वाचलेला नसावा...
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 10/18/2017 - 08:01 नवीन
माय डियर डॉक्टर!
  • Log in or register to post comments
स
स्थितप्रज्ञ Tue, 10/17/2017 - 14:27 नवीन
अंगावर काटा येणार अनुभव
  • Log in or register to post comments
द
देशपांडेमामा Tue, 10/17/2017 - 14:36 नवीन
डॉकच्या प्रश्नाला +१ देश
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 10/17/2017 - 15:21 नवीन
चितळेंच्या बाकरवडीसारखा , खुसखुसीत लेख ! ;-)
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Tue, 10/17/2017 - 15:40 नवीन
“सर! प्लीज राईट अगेन!”
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 10/17/2017 - 15:41 नवीन
खासकरून
पण हा टोमणा कळायला एक किमान बौद्धिक कुवत लागत असल्याने, माझा बाउन्सर तिच्या डोक्यावरून वाईड!
ही मुक्ताफळे वाचल्यावर हा प्रश्न खास पडला(च)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 10/17/2017 - 15:53 नवीन
चितळे माजोरडे कधीच वाटले नाहीत, त्यांच्या दुकानातील कर्मचारी वर्गही हसतमुख, शिवाय तत्पर असतो. उद्धटपणा त्यांच्या दुकानांत कधीच अनुभवाला आला नाही. आता त्यांच्या वेळा पाळण्याला (दुपारी १ ते ४ दुकान बंद) ह्याला माजोरडेपणा म्हणत असाल तर मग असोच.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 10/17/2017 - 16:35 नवीन
सहमत. आणि दुपारी १ ते ४ दुकान बंंद ठेवण्याची त्यांंची परंंपरा त्यांंनी हल्लीच मोडीत काढलीय. विनाकारण चितळ्यांंची बदनामी केलीय लेखात.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 10/18/2017 - 09:55 नवीन
मी दुपारी 1वाजून 2 मिनिटांनी चितळ्यांच्या उघड्या दुकानात जाऊन तोंड फोडून घेऊन आलोय
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 10/18/2017 - 10:33 नवीन
तिथला उद्धट नोकरवर्ग आणि मख्ख चेहर्‍याचे बिलिंगवाले यांना वैतागून तेथे बरीच वर्षे गेलो नव्हतो पण औंधचे मीठा'ज सोडले तर कुठेही चितळ्यांच्या मिठाईच्या जवळपास जाणारी चव मिळाली नाही. म्हणून नाईलाजाने का होईना परत चितळ्यांच्या दुकानात जाणे सुरू केले आहे. अर्थात पर्याय मिळाला की चितळ्यांना टाटा करणार यात शंका नाही. याचा चितळ्यांना काहीच फरक पडणार नाही हे ही माहिती आहे. मालकाचा धंदा डुबला तरच आपली नोकरी जाईल याची नोकरवर्गाला खात्री आहे आणि धंदा काय पुढची १० वर्षे डुबत नाही त्यामुळे गिर्‍हाईकासारखी क्षुद्र गोष्ट सांभाळणे चितळ्यांना आणि नोकरांना गरजेचे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 10/18/2017 - 10:43 नवीन
चितळ्यांच्या मिठाईच्या जवळपास जाणारी चव मिळाली नाही चितळेंची कुठली मिठाई नेमकी नाव सांगाल का ? म्हणजे बाकरवडीचे कौतुक समजु शकतो पण मिठाई चे ही ? हाय कमब्ख्त तुने असो
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 10/18/2017 - 10:56 नवीन
काजूची कोणतीही मिठाई.. चितळेंकडे काजूची चव लागते तसे इतर ठिकाणी काजूसोबत साखरेची थोडी थोडी चव लागते. काजू+आणखी फ्लेवर असतील तर ते समसमान चवीचे चितळ्यांकडेच मिळते. इतर ठिकाणी दोन घटकातला बॅलन्स बिघडलेला असतो. बाकरवडीला पर्याय नाहीच..! हाय कमब्ख्त तुने.. - म्हणजे आणखी कुठे चांगली मिठाई मिळते सांगताय का..?
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 10/18/2017 - 11:31 नवीन
काजूची कोणतीही मिठाई.. चितळेंकडे काजूची चव लागते तसे इतर ठिकाणी काजूसोबत साखरेची थोडी थोडी चव लागते. काजू+आणखी फ्लेवर असतील तर ते समसमान चवीचे चितळ्यांकडेच मिळते. इतर ठिकाणी दोन घटकातला बॅलन्स बिघडलेला असतो. तुम्ही काजु चा उल्लेख केलात म्हणुन केवळ एकच नाव सुचवतो ( अनेकांपैकी ) पण तुम्ही फार चोखंदळ खव्वये दिसता म्हणुन एकच तुम्ही या आयुष्यात एकदा तरी जळगाव ( उत्तर महाराष्ट्रातील खान्देश जळगाव ) या शहरातील एक विख्यात दुकान आहे. महालक्ष्मी स्वीटस म्हणुन तुम्ही कधी जळगावला गेलात वा कोणी मित्र गेल्यास त्याला आवर्जुन महालक्ष्मी स्वीट स ची काउ कतली आणायला सांगा त्यात चार फ्लेवर आहेत एक स्ट्रॉबेरी एक मँगो एक चॉकलेट आणि हे फ्लेवर ची भानगड आवडत नसल्यास क्लासिक पांढरी काजु कतली ( पण मी आग्रहाने तुम्हास फ्लेवर ही टेस्ट करा असे म्म्हणेन ) माझा दावा आहे इतकी शुद्धत्तम इतकी अचुक इतकी दर्जेदार काजु कतली तुम्हास कुठेठेच मिळणार नाही दावा है एक बार जरुर आजमाइम्गा मुझे याद करोगे http://www.mahalaxmifoods.com/category/Sweets
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 10/18/2017 - 11:48 नवीन
अरे व्वा.. नवीन ठिकाण कळाले.. लै लै धन्यवाद. जळगांव, भुसावळ भागात एकदा फक्त भरीत खाण्यासाठी जायचे आहे. इरसाल बुवा नामक एका मिपाकराने वर्णन करून करून जळजळ करवली आहे. आणखी माहिती (शक्यतो एखादा वेगळा धागा काढून) जरूर द्या..!
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 10/18/2017 - 11:56 नवीन
इरसाल बुवा नामक एका दुष्ट मिपाकराने.. महत्वाचा शब्द राहिला.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 10/19/2017 - 08:21 नवीन
इरसाल बुवा नामक एका दुष्ट मिपाकराने मला पदवि मिळुन प्रमाणपत्र काय मिळालं नाहि अजुन.......पगडिसहित पाहिजे :-)
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 10/18/2017 - 13:34 नवीन
आए हाए एक तीर जिगर के आर पार निकल गया अहो हे जे दुकान आहे ना महालक्ष्मी स्वीट्स त्या दुकानापासुन त्याच रोडवर अगदी जवळ एक बी. जे. मार्केट आहे त्या मार्केटात " कृष्णा भरीत सेंटर " नावाचे एक अगदी तसे साधेसे हॉटेल आहे. मात्र इथेच तुम्हाला एकदम ऑथेंटीक खान्देशी वांग्याचे जबरदस्त टेस्टी भरीत मिळेल. या दुकानात दोन तीन च आयटेम मिळतात एक वांग्याचे भरीत एक शेव भाजी व अजुन काही तरी आणि हो भरीत कळणाच्या भाकरी बरोबर ठेचा बरोबर ट्राय करा. मी इथे अगोदर भरीत वर ताव मारतो व मग महालक्ष्मी त जाऊन मिठाई घेतो. एका रोडवर दोन्ही काम होतात.
  • Log in or register to post comments
स
स्थितप्रज्ञ Fri, 10/20/2017 - 12:49 नवीन
जळगावला जाऊन भरताबरोबरच १. चटणी भाकरी (पंढरपुरी डाळीपासून बनवलेली यथेच्छ तेल ओतलेली हिरवी फारशी तिखट नसलेली पातळ चटणी असते. तेल भरपूर असले तरी त्रास होत नाही. एकदा ट्राय करायला काय हरकत आहे?) (भाकरी बाजरीची असते शक्यतो). २. शेव भाजी आणि भाकरी. ३. कचोरी (तिकडच्या कचोरीला MP टच असतो). हे पदार्थ पण अवश्य ट्राय करा. आणि हो, ते कचोरी सोडून बाकीचे पदार्थ कोणाच्या घरी खायला मिळाले तरच त्याची अस्सल चव मिळेल. हाटेलात खाल्ली तर हैद्राबादेत जाऊन कामत मध्ये बिर्याणी खाल्ल्यावर जी मजा येते तीच इथेही येईल. त.टी.: मला हैद्राबादेत कामतवाल्यांनी बिर्याणी म्हणून पिवळ्या रंगाचा पुलाव दिला होता तेव्हापासून बावर्ची सोडून कुठेही बिर्याणी खायची हिम्मत झाली नाही.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 10/20/2017 - 17:29 नवीन
गिर्‍हाईकासारखी क्षुद्र गोष्ट सांभाळणे चितळ्यांना आणि नोकरांना गरजेचे वाटत नाही
याला आमच्या मुंबईत माजोरडेपणा म्हणतात. कर्नाटका सारी सेंटर मध्ये पण साधारण असाच अनुभव आला. असो, लैच विस्कटून लिहिलो.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sun, 10/22/2017 - 08:31 नवीन
गिर्‍हाईकासारखी क्षुद्र गोष्ट सांभाळणे चितळ्यांना आणि नोकरांना गरजेचे वाटत नाही
गिर्‍हाईक लाचार असल्यासार्खे दाखवत असतील तर ते तसे वागणारच . आपण पैसे देउन वस्तु घेत असु तर अशी लाचारी का दाखवावी ?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 10/17/2017 - 16:06 नवीन
सर.. तुमच्या सौंची बौद्धिक कुवत सुद्धा ५ वर्षांपूर्वीच सिद्ध झाली आहे, नाही का?! (आता ह्यातून चांगला अर्थ काढायचा की वाईट हे तुम्ही ठरवा. सौ. विन - विन मध्येच आहेत.. नेहमीच असतात..) बाकी लेख चांगला आहे.
  • Log in or register to post comments
फ
फास्टरफेणे Tue, 10/17/2017 - 17:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 10/18/2017 - 08:00 नवीन
सौ. विन - विन मध्येच आहेत.. नेहमीच असतात..
बेशर्त सहमत! ती स्पोर्ट आहे म्हणूनच मी तिच्यावर जोक मारून पण सहीसलामत आहे :) मला सहन केल्याबद्दल तिला जीवनगौरव पुरस्कार द्यायलाच हवा!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 10/17/2017 - 16:16 नवीन
मस्त खुसखुसीत लेख ! खूप हसलो. अजून लिहा असेच.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 10/17/2017 - 16:18 नवीन
निर्विष विनोदाचे अधिक प्रयत्न करा. पुलेशु.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Tue, 10/17/2017 - 16:49 नवीन
एकदम खुसखुशीत पण तुमच्या बायकोला तुमचे टोमणे bouncer जात असतिल तर तुम्ही फारच सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहात...
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 10/17/2017 - 16:55 नवीन
मस्त लिहिलंय! वर्णन अचूक जमलंय?
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 10/17/2017 - 17:59 नवीन
आणि लेखाचा ताळमेळ लागत नाही, प्रपंच करावा"नेट"का , जरी स्वभाव भटका, उगी चटका धरू नये उठाठेवी चा!!! मुवि संपादित बाबा संतवचने प्रकरण : संसारातील सार आणि भुसार पृष्ठ ५६ नितवाचक नाखु स्वगत : मुवि कुठे गायब झाले आहेत?
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Tue, 10/17/2017 - 19:46 नवीन
चितळे सोडल्यास बाकी मस्त जमलंय. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 10/17/2017 - 22:09 नवीन
मलाही शीर्षक व लेखनाचा संबंध समजला नाही. लेखन खुसखुशीत होता होता राहिले.
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Tue, 10/17/2017 - 22:21 नवीन
लेखन मस्तच जमलंय. खुदुखुदू हसून मजा आली. पण काही गोष्टी खटकल्या. चितळे आणि या दुकानामध्ये काहीच विशेष साम्य वाटलं नाही त्यामुळे शीर्षक अस का दिल हा प्रश्न पडला. आणि विनोदी करायचं म्हणून बायकोवर मारलेले ताशेरे काही ठिकाणी पटले नाही. उदा. “तुझा चॉईस अगदी बंडल आहे!” इति सौ. “ते पाच वर्षांपूर्वीच सिद्ध झालंय!” विजयी स्वरात मी. पण हा टोमणा कळायला एक किमान बौद्धिक कुवत लागत असल्याने, माझा बाउन्सर तिच्या डोक्यावरून वाईड! असे शेरे तर सर्रास गमतीने मारले जातात घरात. इतके कि ते कळू नयेत असं होणंच शक्य नाही.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 10/18/2017 - 08:08 नवीन
बायकोवर मारलेले ताशेरे काही ठिकाणी पटले नाही.
जोक होता, सिरियसली घेऊ नका. वर म्हटल्याप्रमाणे, ती स्पोर्ट आहे; आणि त्यामुळे मी तिचा आदर करतो. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 10/18/2017 - 08:32 नवीन
खि खि खि
  • Log in or register to post comments
प
पिंट्याराव Wed, 10/18/2017 - 09:07 नवीन
लेख छानच आहे, पण शिर्षक वाचून वाटलं की, ही चितळेंची जाहिरात वगैरे आहे की काय? ज्यांना चितळे माहिती आहेत त्यांच्यासाठी लेखात चितळेंविषयी दोन शब्द जरी ओतले असते तरी सार्थक झालं असतं शिर्षकाचं. अन ज्यांना चितळे माहिती नाहीत त्यांना पूर्ण लेख वाचूनही हे शिर्षकात उल्लेखिलेले चितळे कोण? ते कसे काय माजोरडे? हे जाणून घेण्याची जिज्ञासा पूर्ण होत नाही. एकंदरीत शिर्षकाचं प्रयोजन कळलं नाहीय.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 10/18/2017 - 09:17 नवीन
असे लोक असतात?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 10/18/2017 - 09:43 नवीन
हो! काही लोकं पुण्याबाहेरही रहातात.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा