Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

व्हेजिटेरियन ब्रेड स्टु

क
केडी
Fri, 10/13/2017 - 15:07

Vegetarian Stew

साहित्य

१ मोठा कांदा, चिरून
८ ते १० लसूण पाकळ्या, चिरून
५ ते ६ हिरव्या मिरच्या, चिरून
१ मोठा टोमॅटो, चिरून
१ मोठा बटाटा, मोठे तुकडे करून
२ छोटे गाजर, तुकडे करून
१ कप मुशरूम, चिरून
१ कप, शिमला मिरची, चिरून [असल्यास हिरवी, लाल आणि पिवळी वापरावी]
१ कप बेबीकॉर्न, उभे चिरून
१ मूठ पालक, चिरून
१/२ कप मटार
२ तमालपत्र
१/२ चमचा हळद
१५ ते २० काळेमिरे, जाडसर वाटून
१ चमचा तेल
२ चमचे बटर
मीठ चवीनुसार
७ ते ८ ब्रेड स्लाईस
३ ते ४ कप गरम पाणी
कोथिंबीर बारीक चिरून

कृती
स्टु हा शब्द फ्रेंच शब्द "estuier" ह्यावरून आलाय. त्याचा शब्दशः अर्थ, झाकून असा होतो. स्टु चे बरेच प्रकार असतात, आणि त्यात पाणी, मास, भाज्या आणि इतर मसाले एकाच भाड्यात झाकून एकत्र शिजवले जातात.

सध्या पाऊस सुरूच आहे, एखाद्या पावसाळी संध्याकाळी, हा गरमागरम स्टु अगदी चार चांद लावतो.

ब्रेड च्या स्लाईस चे तुकडे करून, ब्रेड भिजेल एवढ्या पाण्यात भिजत ठेवा. एका जाड बुडाच्या पातेल्यात, तेल आणि बटर गरम करून घ्या. त्यात लसूण, मिरच्या घालून त्या परतून घ्या.

Step1  Step2

ह्यात बारीक चिरलेला पालक घालून ते अजून थोडा वेळ परतून घ्या. ह्यात चिरलेला कांदा घालून तो थोडा वेळ परतून घ्या. कांदा थोडा परतून झाला कि त्यात टोमॅटो टाकून मिश्रण अजून थोडं परतून घ्या.

Step3  Step4

आता पातेल्यात इतर भाज्या घालून त्या परतून घ्या [बटाटे, गाजर, शिमला मिरची, बेबीकॉर्न, मटार].

Step5  Step6

भाज्या तेलावर, मंद आचेवर परतून झाल्या कि त्यात हळद टाकून मिश्रण ढवळून घ्या. . पातेल्यात ३ ते ४ कप गरम पाणी टाकून, त्यात तमालपत्र टाकून, गॅस बारीक करा. पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या.

Step7  Step8

ब्रेड च्या स्लाईसेस ची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्या. लागल्यास थोडं पाणी टाका.

Step9  Step10

भाज्या शिजत आल्या कि पातेल्यात हि ब्रेड ची पेस्ट टाकून, त्यात काळीमिरी पावडर टाकून मिश्रण ढवळून घ्या. अजून २ ते ५ मिनिटे झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या.

Step11  Step12

चवीनुसार मीठ टाकून, वरून चिरलेली कोथिंबीर पेरून गरमागरम स्टु, खायला घ्या! सोबत हवं तर फ्रेंच ब्रेड चे थोडे बटर मध्ये भाजलेले तुकडे घ्या!


  • Log in or register to post comments
  • 14800 views


वाचनखूण लावा
| 14800 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/13/2017 - 16:18 नवीन
थंडीची चाहूल लावणारी पाक-क्रुती.
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 10/13/2017 - 18:52 नवीन
आहा! खासच.. नक्की करुन बघेन.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 10/13/2017 - 19:17 नवीन
क्लास!
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 10/13/2017 - 20:03 नवीन
बादलीभर लाळ गळली! बादवे तो फ्रेंच ब्रेड कसा बनवायचा?
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 10/13/2017 - 21:39 नवीन
फोटू खूपच सुंदर आलाय. पाकृ आवडली पण फक्त ते ब्रेडचं प्रकरण करू शकणार नाही. दुसरा उपाय सांगा. उदा. दाटणासाठी आपल्याकडील भाज्यांना बेसन, तांदूळपिठी लावली जाते तसं काहीतरी.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sat, 10/14/2017 - 08:05 नवीन
कुळीथ पिठी किंवा नाचणी सत्व
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 10/13/2017 - 21:39 नवीन
दाटपणासाठी असं वाचावं.
  • Log in or register to post comments
क
केडी Sat, 10/14/2017 - 02:45 नवीन
खाली पिरा ह्यांनी नारळाचा वापर करून इष्टु बनवलाय, तसं तुम्ही ब्रेड ऐवजी नारळाचे दूध वापरून बघा, नाहीतर कॉर्नफ्लार किंवा तांदळाचे पीठ (१ ते २ चमचे) गरम पाण्यात घोळवून मग ते वापरून बघा
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 10/14/2017 - 00:21 नवीन
Image removed. आजच करुन पाहिली. मुलाला सर्दी खोकला झालाय. म्हणून पटकन गरम गरम करायला आणि पोटभर होईल अशी मस्त पाकृ. केव्हापासून करायची होती, पण कधी नीट रेसेपी पाहिलेली नसल्याने केली नव्हती. तुमचा धागा पाहून कॉन्फिडन्स आला. मी तेल खूप कमी घातलं, एक तमाल पत्र आणि दोन लवंगा घेतल्या. होत्या त्या सगळ्या भाज्या आणि दाटपणा येईल असं वाटलं म्हणून सालीसकट एका बटाट्याचे तुकडे घेतले. ह्यात अगदी थोडेसे पाणी घालून झाकण ठेवले. तोवर ओला नारळ + हाताशी होतीच म्हणून थोडी कोथिंबीर वाटून घेतली आणि भाज्यांवर घालून मिसळून घेतले. जर पाणी पाणी वाटले असते तर मी चमचाभर कॉर्न स्टार्च घालणार होते. पण भरपूर नारळ घातल्याने तसं काही झालं नाही. (मला खरं तर नारळाचे दूध वापरुन पहायचे होते. पण नव्हते हाताशी.) मी हे एक ब्रेड बटरवर खरपूस भाजून त्या सोबत खाल्ले. केवळ लवंग, तमालपत्र, मिरपूड आणि मीठ असल्याने भाज्यांची चव अगदी सुंदर लागत होती. एक झटपट पदार्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद! फोटो नेहमीप्रमाणेच कातील. गॅसवर डोकावून पातेल्यात बघतोय असं वाटतं.
  • Log in or register to post comments
क
केडी Sat, 10/14/2017 - 02:41 नवीन
वाह, पिरा, मस्त फोटो. तुम्ही बनवला तो केरळी पद्धतीचा इष्टु. ओला नारळ होता, मग नारळाचे दूध करायचे की गरम पाणी आणि नारळाचा चव मिक्सर मधून फिरवून, गाळून? कोकोनट बेस चे सगळेच पदार्थ मला प्रचंड आवडतात! तुमची पाकृ आणि फोटो देखील खूप छान.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 10/14/2017 - 06:04 नवीन
तो इथे फ्रोझन असतो हो. फार काही अर्थ नसतो त्याला. विचार केला मी एक क्षण, पण मग सरळ तसाच वापरला. आणि मला नारळाचा चव आवडतो (टेक्श्चर वाईज) म्हणून तसंच वापरलं.
कोकोनट बेस चे सगळेच पदार्थ मला प्रचंड आवडतात!
सेम पिंच!
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 10/14/2017 - 08:05 नवीन
सेम सेम.. कोकोनट बेस्ड पदार्थ म्हणजे भारी..!!!! एक प्रकारचा रिफ्रेशिंग टच असतो त्या डिशेसना. अ‍ॅटमॉस्फियर ६ - विमाननगर आणि सॅफ्रन - शास्त्री रोड येथे टॉम खा (हेच नांव का.?) हे सूप ट्राय करा. नक्की आवडेल. केडीची पाकृ मस्त आणि पिराचा प्रयत्नही कौतुकस्पद.
  • Log in or register to post comments
क
केडी Sat, 10/14/2017 - 10:07 नवीन
त्रिकाया मधलं लाकसा सूप पण छान आहे, ट्राय कर एकदा, मला आवडते ते.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 10/14/2017 - 16:20 नवीन
भौ.. आपण घेतले होते ते .. इसरलास..? सीफूड लाकसा सूप होते.
  • Log in or register to post comments
क
केडी Sun, 10/15/2017 - 04:06 नवीन
येस, विसरलो!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 10/15/2017 - 04:52 नवीन
छान झालाय स्ट्यू. फोटू आवडला.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 10/14/2017 - 14:00 नवीन
पाकृ आणि फोटो दोन्ही मस्त! पिराचा स्ट्यु ही छान! स्वाती
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 10/15/2017 - 15:12 नवीन
मस्तच पाककृती आणि फोटो पिरे... भन्नाट गं
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 10/15/2017 - 15:19 नवीन
अवियल च्या जवळ जाणारी आहे. अवियल पण वन डिश मील आहे. अगदीच वाटलं तर भात करतात त्याबरोबर.
  • Log in or register to post comments
स
स्पा Sun, 10/15/2017 - 17:38 नवीन
आम्हा ब्याचलरांना सहज करता येईल अशी एक प्रयत्न करून पाहिला १.Image removed. २.Image removed. ३.Image removed.
  • Log in or register to post comments
क
केडी Mon, 10/16/2017 - 05:38 नवीन
क्या बात है! मस्त, फोटो सुद्धा छान!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Sat, 10/21/2017 - 15:45 नवीन
हिवाळ्यात करून बघण्यात यील. निमित्त म्हणून सर्दी होण्याची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 48 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 56 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा