श्रीगणेश लेखमाला : प्रस्तावना
.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7No…) 76 79 77 83 repeat;
}
नमस्कार मंडळी!
सालाबादप्रमाणे श्रीगणरायाचे आगमन घरोघरी झाले आहे. काही जणांकडे पूजा-आरती आटोपूनही झाली असेल. बाकी सगळ्यांची धांदल गडबड सुरू असेल.
विघ्नहर्ता गजानन बुद्धिदाता मानला आहे. त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण मिपावर गेली ४ वर्षे सातत्याने बुद्धीला खाद्य पुरवणार्या उत्तमोत्तम लेखांनी सजलेली श्रीगणेश लेखमाला सादर करत आहोत. यंदाचे वर्ष या मालिकेचे पाचवे वर्ष. रसिक या वर्षीही अशाच उत्तमोत्तम लेखांची वाट पाहत असतील!
गेल्या वर्षी या लेखमालेसाठी 'करियर' हा विषय निवडला होता. ती लेखमाला वाचकांना खूप आवडली होती. या वर्षी तेच सूत्र पुढे चालवत आपला व्यवसाय/करियर सांभाळून जोपासलेला छंद किंवा छंदातून निर्माण झालेला व्यवसाय या विषयावर मिपा सदस्यांनी लिहिलेले उत्तमोत्तम लेख आणि काही जणांच्या मुलाखती आपल्याला वाचायला मिळतील.
छंद हा कोणाचा आयुष्यभराचा ध्यास होऊन बसतो आणि त्यासाठी कोणी आपला फुरसतीचा क्षण न् क्षण वेचतो. तर नंतर हीच फुरसत कशी तयार करता येते, याबद्दल आपण या वर्षीच्या श्रीगणेश लेखमालेमध्ये वाचणार आहोत. या मालिकेत काही भटक्यांची मनोगते आहेत. तसे मोडी आणि इतिहास प्रेमींचेही हे छंद कसे आयुष्याला व्यापणारे आहेत याबद्दलचे विचार आहेत. कोणी लेखक तर कोणी वाचक, कोणी निसर्गात रमलेले, तर कोणी नाना छंदांनी आयुष्य समृद्ध बनवणारे. काहींनी तर अगदी जगावेगळे छंद जोपासलेले आहेत. त्यांची ओळख येत्या काही दिवसातच आपल्याला होईल. तेव्हा त्याबद्दल जास्त काही लिहीत नाही.
सर्व वाचकांनी या 'छंदोपनिषदाचा' वाचनानंद जरूर घ्या, आयुष्य समृद्ध करणारा असा एखादा तरी छंद जरूर जोपासा. न जाणो, कधीतरी निव्वळ आनंद देणारा छंद आपल्या उपजीविकेचे साधन व्हायचा! व्यवसाय सांभाळून छंद हे छानच, पण छंद हाच व्यवसाय झाला तर क्या कहने! तसे झाले तर त्याच्यासारखा सुखी माणूस तोच!
सर्व लेखक-वाचकांना, मिपा सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना श्रीगणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!