Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

एयर फ्रायर पाककृती - पिझ्झा क्रस्ट कृटॉन्स

क
केडी
Wed, 07/06/2016 - 03:54

Book traversal links for एयर फ्रायर पाककृती - पिझ्झा क्रस्ट कृटॉन्स

  • ‹ एयर फ्रायर पाककृती
  • Up
  • एयर फ्रायर पाककृती- मसाला मटार ›
step2 एयर फ्रायर पाककृती बद्दल माहितीचा दुवा इथे वाचा. ह्या लेखा पासून आपण काही एयर फ्रायर पाककृती बद्दल जाणून घेऊ. सुरुवात एका अगदी सोप्प्या पाककृतीने करतोय. पिझ्झा हल्ली घराघरात येऊन पोचलाय. मुलांना आणि मोठ्यांना आवडणारा हा पदार्थ हल्ली बर्थडे पार्टी पासून ते अगदी छोट्या मोठ्या ऑफिस मिटींग्स किंवा गेट टुगेदर ला हमखास दिसून येतो. बऱ्याच वेळेला मात्र डीप डिश, किंवा जाड क्रस्टचाच पिझ्झा मागवला जातो. ह्या पिझ्झाच्या बाहेरील जाड कडा मात्र खाल्ल्या जात नाहीत आणि वाया जातात. महागातला पिझ्झा असल्यामुळे, आणि मुख्य म्हणजे अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ह्याच कडांचा वापर करून आपण दोन अश्या अतिशय सोप्प्या पाककृती बनवू शकता. पिझ्झा सर्व्ह करण्या आधी ह्या बाजूच्या जाड कडा कापून घ्या. Step1 त्याचे छोटे तुकडे करून, त्यावर ऑलिव्ह तेलाचा स्प्रे मारून घ्या. ( आवडत असेल तर तूप किंवा बटर वापरलत तर अजून चव येईल). ४ ते ६ लसूण पाकळ्या बारीक किसून त्या तुकड्यांना लावून घ्या. पिझ्झा बरोबर आलेला मसाला, चिल्ली फ्लेक्स ची १ ते २ पाकिटे टाका. चव घेऊन वाटलं तर मीठ टाका. Step2 एयर फ्रायर १८० डिग्री ला ३ ते ४ मिनिटे प्रि-हिट करून घ्या. १० मिनिटांचा टायमर सेट करून तुकडे एयर फ्रायर मध्ये लावा. (मध्ये एकदा बास्केट हलवून घ्या). बाहेर काढून,हवा असल्यास चिज किसून पुन्हा एयर फ्रायर मध्ये २ ते ३ मिनिटे (चिज वितळे पर्येंत) लावा. बाहेर काढून चिझी गार्लिक ब्रेड बाईट्स म्हणून सर्व्ह करू शकता! सलाड किंवा सूप मध्ये घालायला कृटॉन्स करायचे असल्यास एयर फ्रायर मध्ये साधारण १५ ते २० मिनिटे ब्रेड चे तुकडे ठेवा. (चीज लावायचं नाहीये). ब्रेड एकदम कडक आणि कुरकुरीत व्हायला पाहिजे. बाहेर काढून थंड करून घ्या. हवाबंद डब्यात ठेवा. सूप किंवा सलाड मध्ये कृटॉन्स म्हणून वापरा!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7041 views

💬 प्रतिसाद
म
मुक्त विहारि Wed, 07/06/2016 - 08:15 नवीन
एयर फ्रायर घेतला तर नक्कीच करून बघीन.
  • Log in or register to post comments
क
केडी Fri, 07/08/2016 - 09:56 नवीन
एकदम सोप्पी पाकृ आहे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/06/2016 - 16:59 नवीन
टाकाऊतून टिकाऊ चे उत्तम उदाहरण.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 07/06/2016 - 17:26 नवीन
अरे वा! हा प्रकार बरा आहे. वाया गेलेलं पाहवत नाही पण सर्रास टाकाटाकी होते.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 07/08/2016 - 11:16 नवीन
फोटो पाहुन तोपासु.
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 07/08/2016 - 14:56 नवीन
म्हणजे अनेक लोक या कडा टाकून देतात ?!!
  • Log in or register to post comments
न
नमकिन Mon, 07/11/2016 - 17:10 नवीन
ओलिव तेल जास्त तापमानास वापरु नये असे सांगतात, तरी तुम्ही तेच वापरताय.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 25 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 37 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 41 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा