Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

क्लिक! (कथा)

क्लिक! (कथा)

तंत्रजगत जव्हेरगंज · गुरुवार, 06/16/2016 - 20:41 · 💬 0

तशी गरज नाही. पण आधी हे चॉकलेट खाल्लं तरी चालेल !

==========================================================

हे म्हणजे मोबाईल सारखंच आहे. टायमरचा नॉब आणि लाल बटन. पण आहे तरी काय?
मी नॉब फिरवला. जरासाच. नथिंग हॅपन्ड्.
मग लाल बटन दाबलं

क्लिक

पक्यानं आणि मी ती सुटकेस खोलायची जाम खटपट केली. मग तशीच घेऊन आलो खोलीवर. जिथं ड्रेनेजचं भोक उघडतं तिथंच आमची खोली. गढूळ पाण्याचे झरे वाहतात चोहीकडे. अर्थात गटारे.

दाराला कडी घालून आत बसलो. मांडीवर ब्याग घेतली. पकडीनं लॉक उचकाटलं. पण हे मटरेलंच वेगळं. तोडताबी येईना.
पक्या कोरी मारुन आडवा पडलेला. मातीचा कुड एका लाथीत ढासळला असता. सुटकेस उचलून व्यवस्थित ठेवली. मग झोपलो.

काय असेल आत? काहीही असो. माल मिळाल्याशी मतलब.

सकाळी जाग आली तेव्हा पक्या अगोदरच उठून खटपट करत बसला होता. सुटकेस जवळपास उघडलीच होती त्याने. कानशीनं घासली होती कडेनं. मग लॉकच्या बाजूनं कातरत सुटला होता.
मी म्हटलं, सर बाजूला, मी बघतो.
एका हातानं लॉक वाकवून फिरवलं. मग पिळलं. शेवटी तुटलंच.
सुटकेस उघडून आत बघतो तो काय, नुसती कापडं. बर्मुडे आणि लेंगे. छोटा बॉक्स दिसला, टाकला खिशात. खाली वायरी आणि लहानश्या ब्याटऱ्या. बरंच बारीक बारीक चिपळ्या टाईप मटरेल. त्याच्या खाली पुन्हा कापडं. ह्याट!
पक्या म्हणाला, "माणसं वळखायला शीक. वायरमेनची ब्याग आणलीय. ह्यात तर झ्याx काय नाय"

नाष्टा करायला आम्ही हॉटेलात गेलो. भजीपाव वगैरे हाणले. मग तसंच फिरत फिरत बसस्टँडवर आलो. आधीपण इथं एकदोन पाकीटं मस्त मारली होती. आता मोठा हात मारुन हे गाव सोडायचा विचार होता. पण काल माती खाल्यानं संभाळून राहावं लागणार होतं. पक्या सावज हेरत बाकड्यावर बसला होता. मी त्याच्या समोर बसून पाठीमागे लक्ष ठेऊन होतो. तेवढ्यात मला तो खिशातला बारीक बॉक्स आठवला. लगेच हातात घेऊन उघडला. सिगारेटच्या पाकीटाऐवढी वस्तू त्यात दिसली.

हे म्हणजे मोबाईल सारखंच आहे. टायमरचा नॉब आणि लाल बटन. पण आहे तरी काय?
मी नॉब फिरवला. जरासाच. नथिंग हॅपन्ड्.
मग लाल बटन दाबलं

क्लिक

पक्यानं आणि मी ती सुटकेस खोलायची जाम खटपट केली. मग तशीच घेऊन आलो खोलीवर. जिथं ड्रेनेजचं भोक उघडतं तिथंच आमची खोली. गढूळ पाण्याचे झरे वाहतात चोहीकडे. अर्थात गटारे.

दाराला कडी घालून आत बसलो..
.
.
.
सकाळी जाग आली तेव्हा...
.
.
.
नाष्टा करायला आम्ही हॉटेलात गेलो...
.
.

.
तेवढ्यात मला तो खिशातला बारीक बॉक्स आठवला. लगेच हातात घेऊन उघडला.
सिगारेटच्या पाकीटाऐवढी वस्तू त्यात होती.

हे म्हणजे मोबाईल सारखंच आहे. टायमरचा नॉब आणि लाल बटन. पण आहे तरी काय?
मी नॉब फिरवला. जरासाच. नथिंग हॅपन्ड्.
मग लाल बटन ??????

बापरे!!!!
नको दाबायला.
पुन्हा ती सुटकेस खोलायची खटपट करावी लागेल. आतापर्यंत हे चाळीसवेळा तरी झालं असेल.
फेकून द्यावं का हे?
भुताटकीच की!!
साल्या टकलूचा बेक्कार खेळ दिसतोय हा!
फेकतोच!
नाहीतर नको.

जरा विचार केला.
हुशारीने वापरायला हवे.
नॉबवर कंट्रोल हवे. योग्य टायमर सेट केला की झालं.

मग एक प्रयोग केला. नॉब व्यवस्थित सेट केला. पाच मिनटाचा. अन उठून पक्याला जोरदार कानफटात लावली.
"येडा झाला का बे?" म्हणून त्यानं चाकूच काढून दाखवला.
मग त्याच्या पेकाटात लाथ घातली. मग मात्र आऊट ऑफ कंट्रोल होत तो चालूनच आला. झटक्यात लाल बटन दाबलं.

क्लिक

मग एक प्रयोग केला. नॉब व्यवस्थित सेट केला. पाच मिनटाचा. अन उठून पक्याला???

ग्रेट!!!
हे घडतंय!

आता मोठा हात मारायला पायजे. मजा येईल. पण कुठे?
कुठे, कुठे?
बँकेत?
यस!

पक्याला म्हटलं "चल, बँकेत जावू. आज तिकडंच हात साफ करु."
"भंजाळला काय? रायफलवाला दारातच असतो"
च्यायला होकी.

क्लिक

"चल त्या केसाळ हवालदाराला धुऊन काढू"
"ख्खॉक..!"

क्लिक

"चल रंडीबाजारात जावू"
"च्यायला आत्ता? रोकडा काढ मग, जावू लगीच" श्या. नरकात जा.

क्लिक

"कंडक्टर?"
"आस्सं, बघू ट्राय मारुन"
येस. कंडक्टरंच. फायनली!

ऊसगावची येश्टी फलाट क्रमांक ३ वर उभी होती. लॉन्ग रुटची. पक्याला इशारा केला. तो मागे मागे येऊ लागला.
"ह्ये हातात काय हाय तुझ्या?" हातातल्या यंत्राकडं बघत तो म्हणाला.
"कुटं काय, हे व्हय, गेम हाय बारक्या पोरांची, टकलूच्या ब्यागेत सापडली"

डायवर न कंडक्टर मिसळ हाणत बसले होते. कँटींगमध्ये. आम्ही एक कटींग मागवत बाजूच्या टेबलावर बसलो. पैशाची ब्याग कंडक्टरच्या गळ्यात होती. आठ दहा हजार तरी सहज पडले असते. पण साला हे मशीन असुनसुध्दा असली भुरटी चोरी म्हणजे तलवारीनं लिंबू कापण्यासारखं होतं. हरकत नाही. ट्रायल तरी घेतली पायजेच ना.

बसला बसला न करंगळी वर करून पक्या मुतारीकडं निघून गेला. साल्याला वेळेची किंमत नाय. येश्टी लयीत लय १५ मिनटं थांबेल. दुसऱ्याबी येतील म्हणा, टेन्शन नाय.
तर तो कंडक्टरबी उठून मुतारीकडंच गेला. वाव.
गल्ल्यावर धा रुपय टाकून मी पण त्याच्या मागे निघालो.
मुतारीत पक्या, कंटक्टर न मी. बाकी कुणी नाही.
हीच वेळ आहे. चक्क मुतारीत!

"काय नाना, प्यायची का दारु?" पक्याला वाईट सवय. पण असो.
कंडक्टरनं रागानं त्याच्याकडं बघितलं.

"ओ नाना, पैल्या धारंची हाय, घ्या राव" च्यायला गोची. पक्या नेहमीचा मार्ग वापरत होता. चालंतय, त्यात काय.

"मुस्काड फोडल्यावर कळंल कारं? माज आलाय का?" कंडक्टरपण रगीलच होता. शेजारीच मी उभा होतो. पिशवीचा बंध जवळपास अर्धा कापून झाला होता. पण माझं लक्ष खिशातल्या मशीनकडं.
शेवटी कात्री त्याला टोचलीच. श्या.

तर मुतारीत मी उभा होतो. हातात पैशाची पिशवी होती. कंडक्टरचं मुडकं भिताडावर आपटून पक्यानं चाकू काढला होता. छ्या. आता हाफ मर्डर होणार तर. कदाचित फुलपण होऊ शकतो. हा म्हंजे लय मोठा बांबू.

मी नॉब ऍंडजस्ट केला.

क्लिक!

क्रमशः

  • Log in or register to post comments
  • 12898 views
  • Log in or register to post comments
  • 12898 views

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा