Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

मराठी भाषिकां साठी उपयुक्त Android Apps

मराठी भाषिकां साठी उपयुक्त Android Apps

तंत्रजगत साहना · गुरुवार, 03/31/2016 - 01:44 · 💬 0

मराठी भाषिक लोकांसाठी अनेक Android Apps उपलब्ध आहेत. त्यातील काही Apps ची हि ओळख. काही एप राहून गेली असल्यास कमेंट मध्ये टाका. ह्यातील कोणतीही app तुमच्या कडे आधीपासून आहेत तर जरूर सांगा.

१. DailyHunt [ इथे टिचकी द्या ]

भारतीय भाषां मधून बातम्या आणि पुस्तके उपलब्ध करून देणारे अतिशय चांगले एप आहे.

SS

गुण
- सर्व मराठी नियतकालिके उपलब्ध आहेत
- मराठीतून इंटरफेस उपलब्ध आहे
- अनेक मराठी पुस्तकें उपलब्ध आहेत (पैसे देवून)
- अपडेट होत राहते
- जास्त इंटरनेट लागत नाही

दुर्गुण:
- पुस्तकें फुकट नाहीत. इतर ठिकाणी फुकट मिळणारी पुस्तकें सुद्धा इथे ५-१० रुपयांना विकली जातात.
- वार्ता मिळत असल्या तरी अतिशय विस्कळीत स्वरूपाच्या आहेत. उदा मला फक्त "विज्ञान" ह्या विषयावरच्या बातम्या हव्या असल्या तरी त्या उपलब्ध होत नाहीत.
- व्ययक्तीकरण शून्य आहे. खूप आणि स्पॅम स्वरूपाच्या पुश मेसेजीस
- पुस्तकें इत्यादी फोन वरच उपलब्ध आहेत. Desktop वर आपण ती वाचू शकत नाही.

२. स्वर-चक्र मराठी कीबोर्ड [ इथे टिचकी द्या ]
IIT Bombay च्या Design School ने हे झकास App बनवले आहे. भारतीय भाषा आणि विशेषतः देवनागरी भाषासाठी हा कीबोर्ड फार चांगला आहे.
swarchakra

गुण
- हात बसल्यावर अतिशय उपयुक्त कीबोर्ड आहे
- जाहिराती नाहीत

दुर्गुण
- इतर कीबोर्ड प्रमाणे नसल्याने शिकण्यास थोडा वेळ लागतो.

३. कालनिर्णय दिनदर्शिका

सर्वांच्याच भिंतीवर कालनिर्णय असते. १ कोटी पेक्षां जास्त कालनिर्णय विकली जातात असे वाचले होते. कालनिर्णय App हे साधे सोपे app असून ज्या साठी आपण भिंतीवर कालनिर्णय लावता त्याच कारणासाठी हे app त्यांत उपयुक्त आहे.

kalnirnay

गुण
- सर्व माहिती सहज पाने मिळविता येते
- भितीवरील कालनिर्णय ज्या प्रमाणे वाचतो त्याच प्रमाणे हे सुद्धा वाचले जावू शकते

दुर्गुण
- UI थोडे जुनाट वाटते.
- अनेक सुविधा सहज गत्या दिल्या जावू शकत होत्या पण नाहीत. उदा भारतीय दिनांका प्रमाणे reminders.

४. मराठी कादंबरी [ इथे मिळवा ]

सदर app च्या निर्माणात (कान्तेंत निर्माण करून) मी सुद्धां थोडा हातभार लावलेला आहे. माहितीजालावरची प्रचंड माहिती इथे पुस्तक रूपांत आणि बातम्या रूपांत मिळते. इथे मिळणारी सर्व माहिती फुकट आहे. अशी अनेक पुस्तकें आहेत जी इतरत्र उपलब्ध नाहीत.

marathi books

गुण
- सुमारे ५०० मराठी पुस्तकें विनामुल्य उपलब्ध आहेत. ह्यांत सुमारे ५० पुस्तकें साने गुरुजी ह्यांची आहेत.
- UI इंटरफेस अतिशय चांगला असून developer मंडळी वारंवार चांगले बदल घडवून आणत असतात.
- सर्व इंटरफेस १००% मराठी मध्ये आहे.
- सर्व प्रमुख मराठी वृत्तपत्रे आणि ब्लोग्स (मिपा सुद्धा) विभागवार उपलब्ध आहे. आपण पाहिजे ते विभाग निवडून त्याच विभागातील बातम्या मिळवू शकता.
- पुस्तकें offline वापरासाठी उपलब्ध आहेत.
- भयकथा आणि गूढ कथांवर विशेष भर दिला आहे असे वाटते.
- कुणीही आपले लेख ह्या app वर तत्काळ प्रकाशित करू शकतो.
- ह्यांच्या फेसबुक पेजवर काहीही feedback टाकला तर हे लोक तत्काळ उत्तर देतात.
- धार्मिक पुस्तकांचा फार चांगला संचय आहे. तुकाराम गाठ पासून बहिणा बाई ह्यांचे अभंग पर्यंत सर्व काही उपलब्ध आहे.
- शिवाजी महाराज आणि मराठा इतिहासावरची फार छान पुस्तकें उपलब्ध आहेत.

दुर्गुण
- ह्यांच्या कडून आठवड्याला किमान १ मेल येतो.
- प्रसिद्ध पुस्तकें जसे ययाती, छावा इत्यादी इथे उपलब्ध नाहीत.
- सर्च फिचर थोडे चांगले व्हायला पाहिजे.
- Kindle प्रमाणे एका फोनवर उतरवून घेतलेली पुस्तकें आपल्या इतर फोन वर सिंक होत नाहीत.
- आपण एकाधे पुस्तक वाचत आहात आणि app restart केले तर पुना पेज १ वरून सुरुवात होते. असे नको असेल तर आपल्याला आधी बुकमार्क बटन दाबावे लागते. माझ्या मते बुकमार्क न करता सुद्धा पुस्तक प्रगती लक्षांत ठेवायला पाहिजे.
- वार्ता सेक्शन थोडे unfinished वाटते.

५. Saawn [इथे मिळवा]

मराठी गाणी ऐकायची असेल तर हे एप फार छान आहे. इथे सर्वच भारतीय भाषामधून आपण गाणी ऐकू शकता.

saavn

गुण
- बहुटेक मराठी गाणी उपलब्ध आहेत.
- इंटरफेस उच्च दर्जाचा आहे

दुर्गुण
- फ्री प्लान वर गाणी ऐकण्यासाठी इंटरनेट असणे आवश्यक आहे
- कंपनीचा फोकस सर्व भाषा असल्याने मराठी ला थोडा दुय्यम दर्जा दिला जातो
- फ्री प्लान मध्ये खूप जाहिराती असतात

उल्लेखनीय इतर
- साहित्य चिंतन ह्यांची Apps. थोडी स्पॅम स्वरुपाची app आणि अत्यंत जुनाट UI असल्याने मी इथे त्यांची चर्चा केली नाही. पण तुमच्याकडे Gingerbread फोन असेल तर कदाचित तुम्हाला हीच app चालतील.
- लोकमत इत्यादी वर्तमान पात्रांची App चांगली आहेत पण एका पेपर साथ अक्खे App टाकणे बरोबर वाटत नाही. DailyHunt किंवा कादंबरी App पुरेसे आहे.
- किमान १०० हजार downlods असलेलीच Apps इथे घेतली आहेत. आणखिन चांगली apps असेल तर जरूर कळवा

  • Log in or register to post comments
  • 11997 views
  • Log in or register to post comments
  • 11997 views

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा