शतशब्दकथा स्पर्धेचा पहिल्या फेरीचा संपूर्ण निकाल जाहीर करताना आनंद होत आहे.
सर्वप्रथम आयोजकांनी परीक्षणासंबंधी विचारणा केल्यावर काहीसं दडपण आलं होतं. कारण मी आधी बऱ्याच शतशब्दकथा लिहिल्या असल्या तरी परीक्षणाचं काम आव्हानात्मक आणि नवीनच होतं.
पण अन्य परीक्षक सोबत असणार- त्यामुळे बराच आधार वाटला. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आणि वेल्लाभट हे अन्य दोघे परीक्षक आहेत. बाकी मिपाच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी व्हायला आपल्याला सर्वांनाच आवडतं!
निवडीचे निकष:
शतशब्दकथा या नावातच स्पष्ट होत असल्याने १०० शब्द हा निकष तर होताच, पण त्याशिवाय खालील मुद्दे विचारात घेतले गेले:
१. शुद्धलेखन
२. विषय
३. मांडणी
४. संपूर्णता
५. सार
सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने तीन नवे स्पर्धक निवडण्याचे ठरले.
याशिवाय सीक्वल (उत्तरार्ध) लिहायचा या तयारीने आधीच ओढून ताणून धागेदोरे आणले नाहीत ना? याचाही विचार केला गेला. या प्रकारात एक मर्यादा येते, ती म्हणजे किस्सा आणि पूर्ण गोष्ट वेगळे करणे थोडे कठीण आहे. किंबहुना कथा दिली तरी ती निव्वळ कथाबीज वाटेल इतकी लहान होते.
तरीही वरील निकष मुख्यत: ग्राह्य धरून सर्व परीक्षकांच्या मते प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी समान मते पडल्याने व तिसरा स्पर्धक थोडासाच मागे असल्याने आयोजकांशी चर्चा करून या तिघांनाही विजेते म्हणून घोषित करत आहोत .
सृजनचौर्य: निमिष सोनार
येक रुपाया: चांदणे संदीप
थोडक्यात वाचलो!: बहुगुणी
पहिल्या फेरीचा संपूर्ण निकाल:
वाचकांची मते आणि परीक्षकांची निवड, यानुसार अनुक्रमे खालील सहा स्पर्धक पुढील फेरीत दाखल झाले आहेत. त्यांनी उत्तरार्ध (अर्थातच १०० शब्दांत ) दिलेल्या वेळेत, म्हणजे ३० ऑगस्ट पर्यंत प्रकाशित करावा . शीर्षकात 'अंतिम फेरी' असा उल्लेख करावा.
मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)
मधुरा देशपांडे (कथा: निकाल)
प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)
निमिष सोनार (कथा: सृजनचौर्य)
चांदणे संदीप (कथा: येक रुपाया)
बहुगुणी (कथा: थोडक्यात वाचलो!)
या निमित्ताने नवीन लेखक लिहीते व्हावेत हा स्पर्धेचा मूळ उद्देश सफल झाला असेच म्हणावे लागेल. सर्वांचा सहभाग उत्साह वाढवणारा आहे. आपल्या काही सूचना असल्यास अवश्य सांगाव्यात.
सर्व स्पर्धक लेखक - वाचक आणि प्रतिसादक यांचे खूप खूप आभार ! पुढच्या टप्प्यासाठी शुभेच्छा !!
आता वाट पाहूयात दुसऱ्या भागातील उत्तरार्ध कथांची ……