[शतशब्दकथा स्पर्धा] वन नाईट इन द ट्रेन

रात्रीचे दोन वाजतायत. आता स्टेशन यायला हवं. कुणाला विचारणार? सगळे गाढ झोपलेत. ती दरवाज्यापाशी वाकून कुठे दिवे दिसतायत का पाहू लागली . इतक्यात मागे हालचाल जाणवली . कुणीतरी टोयलेटसाठी उठलं असावं. या आडगावी कोण उतरणार? काही वेळात हिरवा शर्ट घातलेला माणूस दरवाजा उघडून आत गेला. ती दरवाज्यात उभीच. थोडा वेळ गेला आणि पुन्हा दरवाजा उघडला. मगासचाच माणूस. काहीवेळ पसेजमध्ये थांबून आत गेला. आता कशाला आला असावा?
परत दरवाजा उघडला. पुन्हा तोच. आता मात्र ती घाबरली. ओरडावे का? ट्रेनच्या आवाजात कुणाला ऐकू जाईल? तिने डोळे मिटले. दरवाजावरची पकड घट्ट केली.
आणि मागून आवाज आला,
..
..
..
..
..
..
"एस्क्युज मी , आर यु प्लानिंग टू कमिट स्युसाइड?"