सोबत...
सदर कथा स्पर्धेसाठी नाही. माझी स्पर्धेतली कथा दुसर्या कुणाच्या आधीच उपलब्ध असलेल्या कल्पनेवर आधारित आहे असे लक्षात आल्याने, पूर्ण 'ओरिजिनल' कथा देऊ शकलो नाही याची एक कलाकार म्हणून खंत लागून राहीली. त्यावर उपाय म्हणून ही कथा देत आहे. वाचकांना आवडेल अशी आशा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
जेवण झाल्यावर त्याने त्या कळकट्ट, घाणेरड्या लॉजच्या, भयंकर वास मारणार्या खोलीतल्या पलंगावर ताणून दिली.
जेवणाचे पैसे घ्यायला आलेला नोकर अंमळ रेंगाळला...
त्याने विचारले, "काय पाहिजे अजून...टीप?"
"मला काही नको साहेब... तुम्हाला काही लागेल काय आणखी...?"
"नाही. जेवण झाले. आता झोपतो. बास."
"झोपण्यासाठीच... सोबत पाहिजे का? तुमच्या आवडीची मिळेल, एकापेक्षा एक."
तो काय बोलतो हे लक्षात येताच त्याच्या अंगावरून सर्र्कन काटा आला... त्याने त्यास हाकलून लावले.
रात्रभर तो तळमळत कुशीवर कुशी बदलत होता. एका फोनची वाट बघत.
सकाळी तो फोन वाजला...
"सगळे गेलेत. आता चार दिवस आपण दोघेच. तू लवकर ये."
ह्याने ताबडतोब आवरले. आज सहा महिन्यांनी उपवास सुटणार होता.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -