Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

बाइक्स घेताना - भाग ४

बाइक्स घेताना - भाग ४

तंत्रजगत टवाळ कार्टा · Mon, 04/27/2015 - 09:50 · 💬 0

बाईक्स घेताना - भाग १
बाइक्स घेताना - भाग २
बाइक्स घेताना - भाग ३

...तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू...मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत...त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत

१३५ cc

"ना घर की ना घाट की" segment

१३५ cc च्या बाईक्स का बनवतात हे अजूनही मला समजलेले नै...

बाईकची पॉवर जवळजवळ १५० cc इतकीच (किंचित कमी...कधीकधी किंचित जास्त)
मायलेज जवळजवळ १५० cc इतकेच किंवा किंचित जास्त
दिसणे १५० cc समोर काही खास नाही (याला एक अपवाद आहे)
किंमत जवळजवळ १५० cc इतकीच किंवा किंचित कमी
तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च जवळपास १५० cc इतकाच
अतिरिक्त वैशिष्ट्ये...(additional features) - कैच नैत (याला एक अपवाद आहे)

पण असे असतानाही जर बाईक बनवणार्या कंपन्या १३५ cc च्या बाईक बनवत असतील तर नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी कारण असेलच...असो
मलातरी हे सगळे मुद्दे बघता १२५ cc पेक्षा जास्त इंजिन कपॅसीटीची बाईक घेताना १५० cc ऐवजी १३५ cc ची बाईक का घ्यावी याचे उत्तर कधीच नै मिळाले...कोणी सांगेल का इथेतरी?

अगदी काही वर्षांपर्यंत या segment मध्यॆ एकापेक्षा जास्त पर्याय होते...जसे

Bajaj Pulser 135- LS

pulser-135-ls

Bajaj Discover DTSi 135

discover-135

Hero Honda Achiever

achiever

पण बहुतेक सगळ्या कंपन्याना कमी होणारी विक्री जाणवली असावी कारण भारतातले बाईक मार्केट आता प्रगल्भ होत आहे (फक्त चोखंदळ निवडीबाबत...सुरक्षित चालवण्या बाबत आनंदच आहे सगळीकडे) त्यामुळे आता या segment मध्ये फक्त एकाच बाईक उपलब्ध आहे

http://bikeadvice.in/125cc-motorcycle-segment-india-shrinking/ या बातमी नुसार हेच १२५ cc बद्दल सुध्धा सुरु झाले आहे

Bajaj Pulser 135- LS

बजाजने पल्सार आणल्यापासून त्यात वेळोवेळी बरेच बदल करत होती...पण टेक्नोलॉजीकल मोठ्ठा बदल याच बाईक पासून केला...

Biggest USP - world's first bike with 4 valve DTSi engine

भारतात अजूनही 4 valve इंजिन असणार्या बाईक्स फक्त बजाजच बनवते...बहुतेक फक्त बजाजकडेच पेटंट असावे (याबाबत मलातरी नक्की माहिती नाही)

4 valve इंजिनाचे फायदे

इंधन ज्वलनातून जास्तीत जास्त उर्जा मिळवता येते
इंजिनाची कार्यक्षमता वाढते आणि मायलेज सुध्धा
कमी cc च्या इंजिनामधून जास्त पॉवर मिळवता येते

(अधिक माहितीसाठी कॉलिंग चिमणराव)

टेक्नोलॉजी मधल्या बदलाबरोबरच पल्सरची नट-क्रॅकर* :D इमेज बदलणेसुध्धा याच बाईकपासून सुरु झाले

बजाजच्या ट्रिपल स्पार्क प्लगवाल्या इंजिनांचे माहित नाही पण त्या आधीच्या बजाजच्या सगळ्या इंजिनांमध्ये या बाईकचे इंजिन सगळ्यात बेस्ट आहे
१३५ cc मधून १३.५ PS पॉवार मिळते जी काही १५० cc बाईकच्या पॉवरपेक्षा जास्त आहे (होंडा युनिकॉर्न, यामाहा SZ, बजाज Discover १५० DTSi, ई.)
speed आणि acceleration च्या बाबतीत सुध्धा वर लिहिलेल्या बाईक्सपेक्षा उजवी आहे आणि मायलेजसुध्धा ६० kmpl च्या आसपास मिळते
इंजिन ३० kmph इतक्या कमी स्पीडलासुध्धा ५ व्या गिअरमध्ये knocking करत नाही

लुक्सच्या बाबतीत बघावे तर काही first in class features आहेत...जसे

clip-on handlebars
split seats
DC circuit
5 step adjustable rear Nitrox shock absorber

ज्यांची उंची कमी आहे अथवा ज्यांना १५० cc च्या बाईक्स वजनदार वाटतात आणि पिकपसुध्धा हवाय, थोडे बरे मायलेज पण हवे पण १२५ cc किंवा त्यापेक्षा कमी cc च्या बाईक्स वरणभात टाईप वाटतात अश्या सर्व बाईकप्रेमींसाठी ही बाईक "आखुडशींगी बहुगुणी लाथा न मारणार्या दुभत्या गायीसारखी सर्वगुणसंपन्न" आहे...हि "विद्या बालन"

*ज्यांनी पल्सरचे सगळ्यात पहिले मॉडेल चालवले आहे त्यांना व्यवस्थित कळले असेल मला काय म्हणायचे आहे ;)

Disclaimer - या लेखातली सर्व मते माझी खाजगी मते आहेत

  • Log in or register to post comments
  • 43022 views
  • Log in or register to post comments
  • 43022 views

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा