एक इंटर्व्ह्युचा दिवस
ऑक्टोबर २०१४ ची गोष्ट आहे, माझ्या कंपनीमधे ज्युनिअर इंजिनिअर (१ ते ३ वर्षं अनुभवी लोकांसाठी) लेव्हल साठी इंटर्व्यु होते. माझ्याही विभागासाठी ही भरती असल्यामुळे मी, माझे बॉस आणि एच.आर. असे इंटर्व्ह्यु घ्यायला बसलो होतो. ज्युनिअर लेव्हलची भरती असल्यानी पगाराची रेंज ठरलेली होती (१२,५०० ते १७,५०० रुपये). ६ उमेदवार आलेले होते. एकेकाची टेक्निकल मुलाखत वगैरे घेउन मग एच.आर. पगाराचा आकडा त्यांच्या आधीच्या सॅलरी स्लीप पाहुन आणि एकुण मुलाखतीवरुन "निगोशिएट" करत होती. ज्यांना जमत होतं त्यांना बाहेर बसायला सांगीतलेलं होतं.
३ र्या किंवा ४थ्या उमेदवाराच्या मुलाखतीचा हा एक लक्षात रहाणारा अनुभव.
उमेदवार टेक्निकल प्रश्णांना अगदी चांगल्या प्रकारे उत्तरं देत होता. २ वर्षं ८ महिन्यांचा एका मध्यम पातळी वर्कशॉपमधल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर इथे मुलाखत द्यायला आलेला होता. आणि त्यानी स्वतः हात काळे केलेले आहेत शॉप फ्लोअर वर हे अगदी स्पष्ट दिसुन येत होतं. शिवाय डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग दोन्हीकडे मार्क्सही चांगले होते. एकुण मला आणि माझ्या बॉसला हा उमेदवार अगदी पसंत होता.
आधीच्या वर्कशॉपमधे त्याला १४-१५ हजार पगार असेल. आमच्या एच.आर. नी काय करावं? ह्या लायक उमेदवाराला १२,५०० रुपयाची ऑफर दिली. त्या उमेदवारानी अगदी शांतपणे एच.आर. शी निगोशिएट करायला सुरुवात केली. त्याची अपेक्षा १८,००० रुपये होती. एच.आर. नी त्याला चक्क नाही म्हणुन उत्तर दिलं. आता ही गोष्ट आमच्या अधिकार क्षेत्रात येतं नसल्यानी आम्ही तेव्हा काहीही बोलु शकलो नाही.
त्या उमेदवारानी दोन मिनिट बोलायची परवानगी मागीतली. तो जे दोन मिनिटात बोल्लाय ना ते शब्द आजही माझ्या डोक्यात अगदी व्यवस्थित आहेत.
"सर आणि मॅडम, मी जवळजवळ तीन वर्षांच्या अनुभव असुनही फक्त १८,००० रुपये मागतोय. हे का? कारण मला ह्या नोकरीची आत्यंतिक गरज आहे. एवढ्या अनुभवावर मी योग्य संधीची वाट पाहिली तर मला कोणीही हसत हसत ३०,००० पगार देईल (खरी गोष्ट आहे). तुम्ही जो पगाराचा आकडा सांगताय ना, त्यापेक्षा १२ वी नंतर कॉल सेंटरला काम करणारी मुलं सुद्धा जास्त पैसे कमवतात. रिक्षा चालवली ना महिनाभर तरी जास्तं पैसे मिळतात. मुंबईमधे काही भिकारीसुद्धा भिक मागुन ह्यापेक्षा जास्त पैसे कमवतात. मी एक इंजिनिअर असुनही तुम्हाला मला द्यायला ५०० रुपये जड वाटतायतं.
मी ओपन क्लास्मधुन वर्षाला ९५,००० रुपये एवढी फी भरुन इंजिनिअर झालोय, ते पण शैक्षणिक कर्ज काढुन, त्याचे हफ्ते जाउन तुम्ही देताय त्या पगारात घरी काय देउ? ४ वर्षाची जवळ जवळ ४ लाख रुपये फीचं तुमच्या तुटपुंज्या पगारामधे कधी ब्रेक-इव्हन होईल? मला ह्या कंपनीमधे आता दिलीत तरी नोकरी नको" बस्स एवढं बोलुन सरळ बाहेर निघुन गेला.
तसं पहायला गेलं तर त्या मुलाची काहीचं चुक नाहिये ह्यात. भरम्साठ फिया भरुन इंजिनिअर होऊन सुद्धा किरकोळ पगाराच्या नोकर्या आणि रोज १२-१२, १४-१४ तास राबवुन घेणं हेचं माझ्या क्षेत्राचं आर्थिक गणित झालयं. स्वस्त ते मस्त अशीचं बहुतेक कंपन्यांची कॉस्ट कटिंगच्या नावाखाली पॉलिसी झालीये. ह्या भोसडीच्यांना दर वर्षीच्या ऑडीटमधे आम्ही ह्यावर्षी अमुक अमुक एवढे लाख वाचवले हे बोंबलुन सांगायला फार आनंद होतो. स्वतः ७-७ आकडी पगार ज्यांच्या जीवावर मिळतात ना त्यांचचं शोषणं होतय हे तर. बर एवढी कॉस्ट कटींग करुन सुद्धा त्यांना मिळायचं तेवढचं इन्क्रीमेंट कंपनी देते. ह्यात लायक उमेदवार मात्र भरडले जातायत. मला सांगायला खरचं मनापासुन वाईट वाटतय की माझ्या उमेदवारीच्या दिवसांमधे मीही ह्याला तोंड दिलयं. त्यावेळी मी उपेक्षित होतो आणि कदाचित आता जाणते-अजाणतेपणी उपेक्षा करणारा.
*unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz:
आज असाचं एक अनुभव ऐकला आणि एकदम ही गोष्ट आठवली आणि इथे लिहाविशी वाटली. विस्कळीत आहे, पण घ्या चालवुन.
💬 प्रतिसाद
(111)
प
पिनुराव
Mon, 02/09/2015 - 19:17
नवीन
हिच ती हुशारी HR लोकांची पण काय कामाची
??????
- Log in or register to post comments
ल
लंबूटांग
Mon, 02/09/2015 - 19:34
नवीन
मला स्वतःला ह्या कलेत सुधारणेला बराच वाव आहे पण २ वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सांगावासा वाटतो.
एका कंपनीत इंटरव्ह्यूला गेलो. २ भारतीयांनीच सुरू केलेली कंपनी. पहिल्यांदाच कंपनीच्या रिक्रूटरला सांगितले होते की मला क्ष डॉलर्स पगाराची अपेक्षा आहे. इंटरव्ह्यूचे चांगले ३-४ राऊंड झाले. स्टार्टअप सारखे कल्चर वगैरे वगैरे. मला कंपनी आणि काम आवडले होते. ऑफर आली माझ्या तेव्हाच्या पगाराच्या ६ हजार डॉलर जास्ती. मी सरळ नाही म्हणून सांगितले. मग संध्याकाळी सीटीओकडून इमेल. की काय झाले नाही का म्हणालास. लेट्स वर्क इट आउट. आणि बाकीचा नेहमीचाच सेल्स पिच की आमच्या कंपनीत काम करणे कसे छान आहे वगैरे वगैरे. मी परत सांगितले की बाबारे तुमच्या कंपनीचा महिन्याचा इंशुरन्सचा प्रिमीयम, घरापासून दूर असल्याने बाकीचे खर्च (बायकोला गाडी पार्क करायला लागणे इ. इ.) वगैरे विचारात घेता माझा तोटा होणार आहे आणि सद्ध्याच्या घटकेला तरी मला ते परवडणार नाही. त्याने मग मला सांगितले की I respect your line of thinking (even though I don't agree with it). इतकेच नाही तर मला एक excel sheetबनवायला सांगितली की कसा लॉस होणार आहे. मग मात्र माझी सटकली. मी त्याला उत्तर दिले की
I don't really agree with your offer being based competetively with my current salary either. पण ही घे excel sheet.
मग ती बघितल्यावर गाडी बोनस कसा जास्ती आहे आणि तो विचारात घेतला तर मग तुझी क्ष डॉलर्सची मागणी कशी पुरी होते आहे वगैरे वर घसरली. त्याला सांगितले की बाबारे तुझा बोनस आहे प्रॉफिट शेअरिंग. कंपनीचे सेल्स घसरले तर मला काहीच मिळणार नाहीये आणि दुसरे त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझी बिले आणि हफ्ते महिन्याला भरावे लागतात, वर्ष झाले की नाही. त्यामुळे परवडणारच नाही. असे बरेच back and forth email झाले पण एक छदामही वाढवायचे नाव नाही.
त्याला शेवटी सांगितले की बाबारे मी पहिलेच नाही म्हणालो होतो पण मला नोकरी आवडली होती आणि तू वर्क इट आउट म्हणालास म्हणून excel sheet ची आचरट मागणी entertain केली आणि email exchange मधे वेळ घालवला. आता तर नक्कीच नाही येणार तिथे काम करायला.
अर्थात तेव्हा मला स्थिर नोकरी होती म्हणून रुबाब दाखवता आला.
- Log in or register to post comments
उ
उपास
Mon, 02/09/2015 - 20:20
नवीन
सद्द्ध्या स्वतःच्या कंपनीसाठी रिकृट करताना उलट अनुभव येत आहेत..
एकाच वेळी तीन चार ऑफर्स घेउन निगोशिएट करण्याचा शुद्ध हावरटपणा.. कमी स्किल्स पण पगाराची अवास्तव मागणी आणि बरंच काही...
'गरजवंताला अक्कल नसते' हे अंतिम सत्य!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/10/2015 - 02:09
नवीन
हो असेही अनुभव येतात. पण तो मुलगा खरचं गरजु होता आणि मुख्य म्हणजे त्याला कामाचं कुठलही प्रशिक्षण त्याला द्यायला लागणार नव्हतं. जवळपास ३ वर्ष अनुभव असणार्या प्रोडक्शन इंजिनिअरला १२,५०० रुपये पगार ऑफर करणं हा नुसत्या त्या व्यक्तीचाच नाही तर त्या डीग्रीचा आणि जागेचाही अपमान आहे.
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Tue, 02/10/2015 - 04:06
नवीन
जर त्या जागेसाठी १७५०० पर्यंत रेंज होती तर तुम्ही HR ला तितके तरी द्यायला सांगू शकत नव्हता का ? कदाचित त्या उमेदवाराने ५०० रुपयांची adjustment केली असती. घेतल्यावर त्याला लगेच बढती देऊन पगार आणखी वाढवता आला असता. तसा हि त्याला अनुभव होताच. HR च्या आडमुठे पणामुळे चांगला उमेदवार जात असेल तर upper management level वर HR शी बोलायची सोय तुमच्या कंपनीत नाही का ? हा प्रकार तर फारच दुर्दैवी वाटतो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 02/10/2015 - 06:36
नवीन
मलाही जर आश्चर्य वाटते कि तुमच्या बॉसने तोंडही उघडले नाही. सरळ वरपर्यंत जायचे. याचा एक मोठा फायदा होतो कि तुमच्या हाताखालचे लोक तुमच्यावर पूर्ण भरवसा टाकतात आणि तुम्हाला अतिशय निष्ठावान साथीदार मिळतात.
कारण मी विभाग प्रमुख असताना एच आर ला फाट्यावर मारत असे.एकदा उमेदवार( एक्स रे टेक्निशियन) चांगला असताना एच आर पगारावर अडकला असताना सरळ उपाध्यक्ष( व्हाईस चेअरमन) कडे जाऊन पगार वाढवून घेतला होता. दुसर्यांदा एका मुलीला( मामोग्राफी) साठी घेताना एच आर वाली नखरे करीत होती. तिला मी शांतपणे सी इ ओ समोर सांगितले तुम्हाला हि उमेदवार नको असेल तर दुसरी उमेदवार तुम्ही आणायची. तोवर विभागातील काम बंद झाले तर होणार्या नुकसानाची जबाबदारी तुमची. अर्थात येथे स्त्री क्षकिरण तंत्रज्ञा मिळणे मुळात कठीण आहे हे सर्वाना माहितही होते. यानंतर मी असे पर्यंत एच आर विभागाकडून कोणताही त्रास झाला नाही. आणि मी असेपर्यंत २ वर्षे एकही तंत्रज्ञ सोडून गेला नव्हता.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/10/2015 - 11:24
नवीन
नाही हो. उत्पादन क्षेत्रामधलं वातावरणं बरचं वेगळं असतं. आधीचं एच.आर.च्या हातामधे बरेचं अधिकार असतात. वरपर्यंत जरी गेलं तरं एच.आर. कंपनीचे पैसे वाचवायचा प्रयत्न करत होती असं निगरगट्ट उत्तर मि़ळालं असतं. :(
- Log in or register to post comments
ज
जिन्क्स
Tue, 02/10/2015 - 12:53
नवीन
एकाच वेळी तीन चार ऑफर्स घेउन निगोशिएट करण्याचा शुद्ध हावरटपणा
ह्यात हावरटपणा कसला?
- Log in or register to post comments
र
रुस्तम
Tue, 02/10/2015 - 13:14
नवीन
ह्यात हावरटपणा कसला? +१
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/10/2015 - 14:30
नवीन
तीन-किंवा चार कंपन्या तुम्ही जॉईन व्हाल हे गृहित धरुन त्या पदाच्या मुलाखती बंद करतात. आणि तुम्ही त्यांना चांगल्या ऑफरच्या अपेक्षेने झुलवत ठेवता. पर्यायानी तुमच्या पेक्षा काही गुणांनी मागे असणार्या प्रत्येक कंपनीमधल्या दोन नंबरच्या उमेदवाराची संधी तुम्ही घालवताय. हे मला तरी चुकीचं वाटतं. बाकी हा प्रत्येकाचा दृष्टीकोन झाला.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Tue, 02/10/2015 - 18:08
नवीन
हा व्यवसाय आहे (its just business!). तुम्ही १७५०० च्या वर द्यायला तयार नाही आहात, एकाची अपेक्षा १८००० आहे पण कामपण हवय. मग एखादा उगीच बाणेदारपणा वगैरे करायच्या भानगडीत न पडता तुमची ऑफर घेतो आणि इतर ठिकाणी १८०००+ मिळवायचा प्रयत्न करतो. तुम्ही पण ४ जणांची मुलाखत घेवून, निगोशिएट करूनच ठरवलेत ना मग दुसर्या बाजूलापण तो अधिकार (निदान सध्याच्या परिस्थितीत तरी) आहे हे मान्य करा ना. दुसर्या उमेदवाराची संधी वगैरे तकलादू मुद्दे आहेत, तेव्हा जास्त उहापोह करत नाही (तसेही तो उमेदवार पण काही याच संधीवर थांबला नाहीये).
म्हणून तुमच्या दृष्टीकोनाबद्दल तुम्ही पुनर्विचार करुच नये असे काही नाही. दृष्टीकोन सुधारत राहिले तरच त्यांना अर्थ.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 02/11/2015 - 01:05
नवीन
ऑफर हातात असताना दुसरी चांगली ऑफर शोधणे वाईट नाही; पण एक ऑफर स्विकारुन (मराठीत ॲक्सेप्ट करुन) मग भलतीकडेच जाणे हे अनैतिक आहे.
- Log in or register to post comments
श
शेखर काळे
Wed, 02/11/2015 - 06:55
नवीन
ऑफर दिली याचा अर्थ कुठेही बांधले गेलो असा नाही. ऑफर याचा अर्थ् असा की तुम्ही मला आवडलात आणि पुढे आपण बोलू.
जोपर्यंत स्वीकारपत्रावर सही होत नाही - दोन्हीकडून - तोपर्यंत दुसरीकडे शोधणे चांगलेच. जिथे तुम्ही जाणार तिथे, त्या पगारावर २-३ वर्षे तरी काम करणारच ना ? मग कमी पगार का स्वीकारायचा ?
शिवाय, कंपनीही ऑफर परत घेऊ शकते - माझ्या माहितीत असे झालेले आहे.
स्वीकारपत्रावर सही केली तरीही नोकरीच्या पहिल्या दिवसापर्यंत तेही तुम्हाला नाकारू शकतात अन् तुम्हीही.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Wed, 02/11/2015 - 12:30
नवीन
अर्थात.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/10/2015 - 02:02
नवीन
ह्या एच.आर. लोकांच्या अनुभवा बद्दल न बोलणेच उत्तम.
मग ते कुठल्याही प्रांताचे का असेनात.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 02/12/2015 - 05:34
नवीन
+१
एच आर वाले 'शुद्ध हरामखोर' या कॅटेगेरीत येतात.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 02/10/2015 - 02:08
नवीन
अगदी खरंय !! एच आर कधी कधी नको तेवढा हस्तक्षेप करते. मी आणि माझा सहकारी एका प्रोजेक्ट्साठी एकदा मुलाखती घेत होतो. सपोर्ट प्रोजेक्ट होता. यात संभाषण चातुर्य आणी टेक्नीकल ज्ञान दोन्हीही आवश्यक होते. एक मुलगी संभाषणात खूप चांगली होती. तीला शिकायची तयारी आहे का विचारले आणी ज्युनीअर म्हणून सीलेक्ट केले. दुसरा एक मुलगा होता तो टेक्नीकली खूप स्ट्रोन्ग होता पण संभाषणकलेचे प्रशीक्षण द्यावे लागणार होते. त्याला टेक्नीकल लीड म्हणून सीलेक्ट केला.सीलेक्ट करताना मुलीला जुनीअर ईंजीनीअर म्हणून ठेवावे असा शेरा दीला पण एच आर ने त्या मुलीला सीनीअर ईंजीनीअर ग्रेड दीली व जो मुलगा होता त्याला जुनीअर ईंजीनीअर ग्रेड दीली.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/10/2015 - 02:23
नवीन
आमच्याकडे एच.आर. म्हणजे बेक्कार डोकेदुखी आहे. मी नुकतचं रिझाईन केलयं. साधी एक्झिट प्रोसिजर सुरु करायला आठवडा घालवला तिनी. २८ फेब्रुवारी=वाढदिवस कम स्वातंत्र्यदिन.. \m/
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Tue, 02/10/2015 - 04:16
नवीन
अभिनंदन. तुम्ही जे वर्णन करत आहात त्यावरून career करण्यालायक कंपनी दिसत नाही ती.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/10/2015 - 11:29
नवीन
असहमत.
मेकॅनिकल पॉवर ट्रान्स्मिशनमधे आशियामधे पहिली आणि ग्लोबल मार्केटमधे पहिल्या तीनमधे आहे. बाकी एच.आर. आणि सप्लाय चेन वाले छपरी आहेत हे खरं.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Tue, 02/10/2015 - 11:46
नवीन
ग्रीव्ह्ज, प्रिमीयम एनर्जी ट्रान्स्मिशन ?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/10/2015 - 12:05
नवीन
व्यनि करतो...
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Wed, 02/11/2015 - 04:16
नवीन
माझा रोख overall कंपनीकडे नव्हता. जिथे HR एवढा आडमुठेपणा करत असेल तिथे career growth ला (बढती, पगारवाढ वगैरे) अनेक अडचणी येऊ शकतात.एवढेच म्हणायचे होते.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/10/2015 - 02:24
नवीन
एक्झिट प्रोसिजर साठी कंपनी एम्प्लॉयमेंट फॉर्म पाठवला तिनी =))
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 02/10/2015 - 02:54
नवीन
एच.आर. वाले आणि दुसरे सेफ्टी वाले आणि तिसरे सिक्युरिटी वाले.
बादवे,
एका कंपनीतला माझा एक्सिट इंटरव्ह्यु मी बियर पिता-पिता दिला होता.रम्य त्या आठवणी...
- Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर
Tue, 02/10/2015 - 13:22
नवीन
कुठं हो ?? सी व्ही पाठवावा म्हणतो... एक्सिट इंटरव्ह्यु हे उशिरा वाचलं. :(
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Sun, 10/18/2015 - 07:05
नवीन
आयटी वाल्यांचे एवढे नशीब कुठे
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Tue, 02/10/2015 - 04:13
नवीन
हे असे कसे होऊ शकते? ज्या department मध्ये नोकरी आहे, त्या department च्या management च्या संमतीशिवाय HR कसे काय ग्रेड देऊ शकतात? की असे झले की HR आपण सांगू त्या ग्रेड वर अडून बसले आणि technical management ने हाती आलेल्या उमेदवारांना घालवण्यापेक्षा HR देईल त्या ग्रेडला संमती दिली ?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 02/10/2015 - 05:48
नवीन
एचार चे काही सान्गु शकत नाही. काहीही कारणे देतात. डीग्रीचे मार्क्स, दहावीचे मार्क्स अशी शुल्लक कारणे देतात. मार्कान्चा आणि टेक्निकल ज्ञानाचा आय्टीमधे तरी काही सबंध असतो असे मला वाटत नाही.
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 02/10/2015 - 07:13
नवीन
नसतोच !!
- Log in or register to post comments
ज
जेपी
Tue, 02/10/2015 - 05:33
नवीन
चांगलय...
- Log in or register to post comments
श
शित्रेउमेश
Tue, 02/10/2015 - 05:40
नवीन
माझा अनुभव पण जवळपास असाच आहे.
काही दिवसांपूर्वी मी एका प्रतिष्ठीत कंपनी मध्ये इंटरव्ह्यु दिला होता.. टेक्निकल राऊंड (आता त्याला 'टेक्निकल' म्हणायचे की आणखी काही हा मोठा प्रश्न आहे. कारण मी अकाउंटंट आहे) पास झालो. ज्या व्यक्तीने इंटरव्ह्यु घेतला, त्याने सांगितलं होता, एच. आर. ऑफर पाठवतील म्हणुन... तब्बल ३ आठवडे वाट बघितली.. एकच उत्तर मिळायचे.... एच. आर. प्रोसिजर चालु आहे....
मधल्या काळात मी दुसरा इंटरव्ह्यु पास झालो आणि नोकरी वर रुजू पण झालो.... एच. आर. ऑफर अजुन मिळतीये.. (महत्त्वाची गोष्ट... नोकरी कनफर्म झाल्याची बातमी मला दिली होती.. फक्त एच. आर. कडुन ऑफर यायला प्रोब्लेम झाला...)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 02/10/2015 - 06:42
नवीन
मला इंटरव्ह्यु या प्रकाराचा फारसा अनुभव नाही. मोजुन ४ इंटर्व्ह्युअ दिले ११ वर्षाच्या करियर मध्ये. त्यातले २च एच आर ने घेतले. सध्याच्या कंपनीत १० वर्षे झाली पण इथे मुलाखत फक्त माझ्या बॉसने घेतली होती. एच आर चा इंटर्व्ह्यु वगैरे असला काही फालतु प्रकार नव्हता. मात्र त्याच्या आधी एका कंपनीत गेलो होतो मुलाखतील. आम्हाला दोघांना सिलेक्ट केल्यावर एच आर च्या माणसाने भाजीवाल्याशी बार्गेनिंग करावे तसे बार्गेनिंग केले आमच्या दोघांशी. मी आधी एका ठिकाणी आर्टिकलशीप करत होतो तिथेच तात्पुरता जॉइन झालो होतो. ते मला ५००० रुपये द्यायचे कारण ती माझी तात्पुरती गरज भागवण्यासाठी त्यांनी केलेली व्यवस्था होती. त्यात मला सांभाळुन घ्यायचाच भाग जास्त होता. या एच आर ने ते बघुन सी एस च्या पोस्टसाठी मला ७५०० ची ऑफर दिली. माझे टाळकेच सटकले. पण मला त्यावेळेस नौकरीची गरज होती. म्हणुन मी गुर्हाळ चालु ठेवले. १५००० वर अडुन बसलो. शेवटी १२५०० वर तोडपाणी केले. सिलेक्ट झालेल्या दुसर्याला १८००० पगार हवा होता. तो १५००० वर अडुन बसला (त्याला एक वर्षाचा अनुभव होता. मल अगदीच ३-४ महिन्याचा ते सुद्धा फर्म मध्ये). त्या एका कारणासाठी तो रिजेक्ट झाला. त्याने १२००० मान्य केले असते तर कदाचित त्याला घेतले असते. गुणवत्ता वगैरे गेली तेल लावत. मी ती कंपनी जॉईन केल्यावर चौथ्या दिवशी सोडली. एच आर आणि एम डी नी माझी लय तासली. शेवटी त्या दुसर्या उमेदवाराला १५००० पेक्षा जास्त देउन जॉईन करुन घेतले त्यांनी.
एच आर चा रोल कुठल्याही कंपनीत लिमिटेड च हवा. त्यांनी वेगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावे. कुणाला पोस्ट कुठली द्यावी आणि पगार कितपत द्यायला पाहिजे याचे थोडेफार तरी स्वातंत्र्य टीमलाच हवे. एच आर ने वर्किंग टीम चे मत लक्षात घेउन गरज पडल्यास मॅनेजमेंटशी चर्चा करुन पगाराबाबत अंतिम निर्णय घ्यावा पण टीम हेड ला पुर्ण डावलुन त्याने परस्पर निर्णय घेणे योग्य नाही.
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Tue, 02/10/2015 - 10:52
नवीन
माझा पण एच आरचा अनुभव असाच. पण कधी-कधी एच.आर वाल्यांचा आडमुठेपणा सुद्धा आपल्या पथ्यावर पडतो...
२०११ मध्ये आमची जुनी कंपनी सद्ध्याच्या कंपनीने टेक ओव्हर केली. त्यावेळी ती जुनी कंपनी मेंबर असलेल्या फुग्रो गृपच्या दुसर्या एका कंपनीने मला चांगली ऑफर दिली म्हणुन तिथे जॉइन झालो. खरे तर पोर्टफोलिओ चेंज होत होता, पण मिळणारा पैसा चांगला होता, जुन्या कंपनीपेक्षा ३०% हाईक मिळत होती म्हणून स्वीकारला जॉब. त्यानंतर एक महिन्याने ज्या अमेरिकन कंपनीने आमची कंपनी टेक ओव्हर केली होती त्यांच्या एच.आर. कडून फोन आला, आहे तेच काम, तीच पोस्ट फक्त कामाचा एरीया वाढला होता. म्हणजे आधी फक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश होते माझ्याकडे. त्याच्याऐवजी पूर्ण भारत करावा लागणार होता. खरेतर आधीची पाच वर्षे मी तेच काम करत होतो. तरीसुद्धा टेक्नीकल इंटर्व्ह्यु घेतला गेला. त्यानंतर पुढच्या राऊंडला एच. आर. समोर बसलो. तर तो म्हणे तुम्हाला आधी जेवढा पगार मिळत होता तेवढाच मिळेल, होते त्याच स्केलवर पुढे कंटिन्यु केले जाईल. मी त्याला सांगितले की ," बाबारे, मला सद्ध्या ऑलरेडी त्यापेक्षा जास्त पगार मिळतोय. सद्ध्या या सर्व्हेीसेसची (ओम्नीस्टार डिफरेन्शिअल करेक्शनस) इन डेप्थ माहिती असलेला भारतात मी एकुलता एक इंजीनीअर आहे. मी फार काही मागत नाही पण सद्ध्या माझ्या नव्या कंपनीत जेवढे मिळतात तेवढेतरी (३०% हाईक) मिळायलाच हवी. अन्यथा मला स्वारस्य नाही."
"ते शक्य नाही" असे उत्तर एच.आर. कडून आले. मी धन्यवाद म्हणून बाहेर पडलो. त्यानंतर चार दिवसांनी नव्या कंपनीच्या भारतातील कंट्री मॅनेजरचा थेट फोन आला की तू ऑफर का नाकारलीस? मी स्पेशली एच.आर. ला तुझी शिफारस केली होती वगैरे... ही नवी कंपनी आणि आमची जुनी कंपनी प्रतिस्पर्धी असल्याने तो मला ओळखत होता बहुतेक. मी त्याला सांगितले की माझ्या अपेक्षा तुमच्या एच.आर. ला मान्य नाहीयेत.
त्यानंतर दुसर्या दिवशी मला परत एच. आर. चा फोन , इमेल पाठवलीय एक्सेलशीट चेक करा आणि कळवा. यावेळच्या एक्सेलशीट नुसार ४३% ची हाईक मिळाली होती. मी अजून थोडा आडमुटपणा करून ती ४५% पर्यंत वाढवून घेतली. :)
एक वर्षात भारतापुरते मर्यादित असलेले कार्यक्षेत्र नेपाळ, श्रीलंका, भुतान, बांग्लादेश असे विस्तारत जात आता त्यात मिडल एस्ट आणि युरोपचा काही भागही सामाविष्ट झालेला आहे. सुदैवाने आता रिपोर्टींग थेट कंपनीच्या ऑस्ट्रेलिया ऑफीसला असल्याने भारतीय मनोवृत्तीची झळ बसत नाही. वेळच्या वेळी योग्य प्रमाणात योग्य ते पर्क्स, इन्क्रीमेंट्स मिळत राहतात. एकंदरीत मज्जाय :)
- Log in or register to post comments
स
सविता००१
Tue, 02/10/2015 - 10:57
नवीन
हे तर मस्तच
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/10/2015 - 11:28
नवीन
सहमत. एच.आर. ची ताकद थेट परफॉर्मन्स रिव्ह्युशी निगडीत असल्यानी एच.आर. ला थेट नडता येतं नाही.
एच आर चा रोल फक्त आणि फक्त एंट्री आणि एक्झिट पुरताच रहायला पाहिजे. बाकीचं काम त्या त्या डिपार्टमेंटच्या मॅनेजर्सनी हाताळलं तर योग्य उमेदवाराला न्याय मिळायची टक्केवारी नक्की वाढेल.
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Tue, 02/10/2015 - 06:49
नवीन
२ किस्से आहेत असे लक्षात
. . पहिल्या वेळी इंटरव्यू देत होतो . २ राउंड क्लियर केले होते . टेक्निकल आणि एच आर एकत्र घेतील असं सांगितलं कंपनीने . म्हटलं ठीक आहे . . टेक्निकल घेणारा मला ओळखत होता . पण इतक्या डिटेल मध्ये प्रश्न होते कि उत्तर देई पर्यंत वाट लागत होती . . १०-१२ प्रश्न झाल्यावर त्याने एच आर ला सांगितलं . " He's is good enough for my requirement . we can hire him . . "
इंटरव्यू च्या आधी मला समजलं होतं कि पगार १२-१५ हजार या रेंज मध्ये असेल .
एच आर ने जो आकडा सांगितल्या त्यावरून डोकं फोडून घ्यायचं बाकी राहिलं होतं . . " we can offer you 6K for a start . and then raise it by 500 after 6 months.. "
नाही म्हणून बाहेर पडलो . .
दुसरे वेळेस . . मी इंटरव्यू घेत होतो . . समोर बसलेली व्यक्ती ३-४ वर्ष अनुभव घेऊन आली होती . . लिनक्स मध्ये बरीच पोचलेली होती बाई . मला असंच कोणी तरी हव होतं . . तास भर इंटरव्यू आणि मग पगार आणि Batch टायमिंग वर बोलून झाल्या नंतर एक आकडा फिक्स झाला . आणि तेवढ्यात डायरेक्टरच्या बायकोचा इंटरकॉम वर फोन . . "Send her to my cabin" . पाठवून दिलं . . मला वाटलं जनरल काही तरी चौकशी करेल . कारण जवळपास सगळं मी आणि एच आर नि बोलून घेतलं होतं . . फक्त ऑफर लेटर द्यायचं राहिलं होतं . .
पाच मिनिटांनी आलेली मुलगी बाहेर पडली . आणि आमच्या मेडम सांगत आल्या . . तिला नका घेऊ नोकरी वर . . तिने मला ओळखलं पण नाही . .
- Log in or register to post comments
स
सविता००१
Tue, 02/10/2015 - 07:00
नवीन
मीही अकाउंटंट च आहे. इंटर्व्ह्यू मस्त झाला. मग नेहमीप्रमाणे एच आर च्या ऑफर ची नाटकं. काही कळेना तेव्हा मी दुसर्या कंपनीला हो म्हणाले. आणि त्याच दिवशी दुपारी या एच आर चा फोन. मी सांगितलं की आता मी येउ शकत्त नाही, तर म्हणाला की तिकडे बाँड साईन केला नाहीये ना? मग आम्हाला उशीर झाला वगैरे काय म्हणताय? इतकी चांगली कंपनी तुम्हाला बोलावतेय वगैरे मग्रुरी. मग सरळच सांगितलं की तुमची कंपनी छान आहे म्हणूनच आले होते इन्टर्व्हू ला. आणि सिलेक्ट झाले ते मला येतय म्हणून. कं छान आहे म्हणून नाही. आणि आता तुम्हाला शब्दाची किंमत नसेल तरी मला आहे. मी त्या दुसर्या कं ला सांगितलं आहे हो म्हणून.मी येणार नाही. तरी त्याला काही वाटत नव्हतं आपलं चुकलंय. आपल्याकडून उशीर झालाय म्हणून.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 02/10/2015 - 07:03
नवीन
एच आर सगळीकडे असेच.
एका कम्पनीने बॅग्राउंड चेकिंग च्या नावाखाली माझ्या वडिलाना फोन करुन मी त्यांचाच मुलगा आहे का याची चौकशी केली होती. माझे वय चाळिशीच्या पलिकडचे माझ्या वडिलांचे वय सत्तरीपलिकडले आहे.
हे कसले ब्याग्राउम्ड चेकिंग विचारत त्या कम्पनीच्या एच आर कडे तक्रार केल्या नंतर ती त्यांची रेग्यूलर प्रोसेस आहे असे सांगितले गेले.
कप्पाळावर हात मारणे इतकेच बाकी होते
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Sat, 10/17/2015 - 19:40
नवीन
Capgemini असणार
- Log in or register to post comments
ट
टिनटिन
Tue, 02/10/2015 - 07:17
नवीन
कोणाला फायरिन्गचा अनुभव आहे का ? करण्याचा अथवा होण्याचा. अनुभव ऐकायला आवडेल.
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 02/10/2015 - 07:21
नवीन
स्वतंत्र धागा टाकतो लौकरच ...
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 02/10/2015 - 07:20
नवीन
हे शरू रांगणेकरांचे पुस्तक (वाचले नसल्यास किमान एकदा / असल्यास पुन्हा एकदा): वाचा *LOL*
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/10/2015 - 08:04
नवीन
आमच्या "कंपनी" ने असले काही बारगेनिंग ठेवलेच नाही हो!!! "क" तुमचा बेसिक अन "क्ष" तुमचा ग्रेड पे! ऑल इंडिया ट्रान्सफर ची तयारी हवी!! पटले तर बोला नाही तर रामराम!! सरळ सोट मामला!!!
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Tue, 02/10/2015 - 08:20
नवीन
मी एका नामंकित मल्टीपल आयुर्वेद क्लिनिक चालवणार्या कंपनीत मुलाखत दिली होती,बाबाने मला २२००० पगार ऑफर केला होता.त्यावेळी माझ्या गाडीचाच खर्च महिन्याकाठी ३० ते ३५००० च्या आसपास होता,त्यावेळी त्या बाबाला विचारले महाराज,एव्हडया कमी पगारात मी काय करु त्यावरुन महाराजांनी उत्तर दिले तुमची स्वतंत्र प्रॅक्टीस असली तरी,तुम्हाला कंपनी लेव्हलहा काम करण्याचा अनुभव नाही. मला खरच हसु आवरल नाही,आणी तेथेच वेड्यासारखा हसायला सुरुवात केली, आणी काही क्षणातच मुख्य मुलाखतकर्ता माझ्या हसण्यात सामिल झाला,ऑफर देणारा मात्र उठुन तेथुन निघुन गेला. परत काही असल्या फंदात पडलो नाही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 02/10/2015 - 08:58
नवीन
कोनती गाडी किती किमी चालवता ?
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Tue, 02/10/2015 - 15:51
नवीन
एव्हड वैयक्तिक घुसु नये. तुमच्या माहितीकरिता मी फक्त वैद्य नाही. बरेच रिकामे धंदे करतो,भेटायची इच्छा असेल तर येवुन भेटा,सत्कार करु की तुमचा.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 02/10/2015 - 16:31
नवीन
तेच म्हणतो मी. पेट्रोलचा माझा खर्चही महिन्याला दहा एक लाख तर होतच असेल. मी तर फारसे धंदे सुद्धा करत नाही.
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Tue, 02/10/2015 - 16:50
नवीन
त्यात गाडीचा हप्ता आणी डिझेल व मेंटेनन्स पण येतो.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 02/10/2015 - 17:38
नवीन
पाटीलसायेब ... तुम्ही दंबूक घेउन शांतपणे सत्कार कर्ता??? =))
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »