Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

एक इंटर्व्ह्युचा दिवस

क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/09/2015 - 18:59
💬 111 प्रतिसाद
ऑक्टोबर २०१४ ची गोष्ट आहे, माझ्या कंपनीमधे ज्युनिअर इंजिनिअर (१ ते ३ वर्षं अनुभवी लोकांसाठी) लेव्हल साठी इंटर्व्यु होते. माझ्याही विभागासाठी ही भरती असल्यामुळे मी, माझे बॉस आणि एच.आर. असे इंटर्व्ह्यु घ्यायला बसलो होतो. ज्युनिअर लेव्हलची भरती असल्यानी पगाराची रेंज ठरलेली होती (१२,५०० ते १७,५०० रुपये). ६ उमेदवार आलेले होते. एकेकाची टेक्निकल मुलाखत वगैरे घेउन मग एच.आर. पगाराचा आकडा त्यांच्या आधीच्या सॅलरी स्लीप पाहुन आणि एकुण मुलाखतीवरुन "निगोशिएट" करत होती. ज्यांना जमत होतं त्यांना बाहेर बसायला सांगीतलेलं होतं. ३ र्‍या किंवा ४थ्या उमेदवाराच्या मुलाखतीचा हा एक लक्षात रहाणारा अनुभव. उमेदवार टेक्निकल प्रश्णांना अगदी चांगल्या प्रकारे उत्तरं देत होता. २ वर्षं ८ महिन्यांचा एका मध्यम पातळी वर्कशॉपमधल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर इथे मुलाखत द्यायला आलेला होता. आणि त्यानी स्वतः हात काळे केलेले आहेत शॉप फ्लोअर वर हे अगदी स्पष्ट दिसुन येत होतं. शिवाय डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग दोन्हीकडे मार्क्सही चांगले होते. एकुण मला आणि माझ्या बॉसला हा उमेदवार अगदी पसंत होता. आधीच्या वर्कशॉपमधे त्याला १४-१५ हजार पगार असेल. आमच्या एच.आर. नी काय करावं? ह्या लायक उमेदवाराला १२,५०० रुपयाची ऑफर दिली. त्या उमेदवारानी अगदी शांतपणे एच.आर. शी निगोशिएट करायला सुरुवात केली. त्याची अपेक्षा १८,००० रुपये होती. एच.आर. नी त्याला चक्क नाही म्हणुन उत्तर दिलं. आता ही गोष्ट आमच्या अधिकार क्षेत्रात येतं नसल्यानी आम्ही तेव्हा काहीही बोलु शकलो नाही. त्या उमेदवारानी दोन मिनिट बोलायची परवानगी मागीतली. तो जे दोन मिनिटात बोल्लाय ना ते शब्द आजही माझ्या डोक्यात अगदी व्यवस्थित आहेत. "सर आणि मॅडम, मी जवळजवळ तीन वर्षांच्या अनुभव असुनही फक्त १८,००० रुपये मागतोय. हे का? कारण मला ह्या नोकरीची आत्यंतिक गरज आहे. एवढ्या अनुभवावर मी योग्य संधीची वाट पाहिली तर मला कोणीही हसत हसत ३०,००० पगार देईल (खरी गोष्ट आहे). तुम्ही जो पगाराचा आकडा सांगताय ना, त्यापेक्षा १२ वी नंतर कॉल सेंटरला काम करणारी मुलं सुद्धा जास्त पैसे कमवतात. रिक्षा चालवली ना महिनाभर तरी जास्तं पैसे मिळतात. मुंबईमधे काही भिकारीसुद्धा भिक मागुन ह्यापेक्षा जास्त पैसे कमवतात. मी एक इंजिनिअर असुनही तुम्हाला मला द्यायला ५०० रुपये जड वाटतायतं. मी ओपन क्लास्मधुन वर्षाला ९५,००० रुपये एवढी फी भरुन इंजिनिअर झालोय, ते पण शैक्षणिक कर्ज काढुन, त्याचे हफ्ते जाउन तुम्ही देताय त्या पगारात घरी काय देउ? ४ वर्षाची जवळ जवळ ४ लाख रुपये फीचं तुमच्या तुटपुंज्या पगारामधे कधी ब्रेक-इव्हन होईल? मला ह्या कंपनीमधे आता दिलीत तरी नोकरी नको" बस्स एवढं बोलुन सरळ बाहेर निघुन गेला. तसं पहायला गेलं तर त्या मुलाची काहीचं चुक नाहिये ह्यात. भरम्साठ फिया भरुन इंजिनिअर होऊन सुद्धा किरकोळ पगाराच्या नोकर्‍या आणि रोज १२-१२, १४-१४ तास राबवुन घेणं हेचं माझ्या क्षेत्राचं आर्थिक गणित झालयं. स्वस्त ते मस्त अशीचं बहुतेक कंपन्यांची कॉस्ट कटिंगच्या नावाखाली पॉलिसी झालीये. ह्या भोसडीच्यांना दर वर्षीच्या ऑडीटमधे आम्ही ह्यावर्षी अमुक अमुक एवढे लाख वाचवले हे बोंबलुन सांगायला फार आनंद होतो. स्वतः ७-७ आकडी पगार ज्यांच्या जीवावर मिळतात ना त्यांचचं शोषणं होतय हे तर. बर एवढी कॉस्ट कटींग करुन सुद्धा त्यांना मिळायचं तेवढचं इन्क्रीमेंट कंपनी देते. ह्यात लायक उमेदवार मात्र भरडले जातायत. मला सांगायला खरचं मनापासुन वाईट वाटतय की माझ्या उमेदवारीच्या दिवसांमधे मीही ह्याला तोंड दिलयं. त्यावेळी मी उपेक्षित होतो आणि कदाचित आता जाणते-अजाणतेपणी उपेक्षा करणारा. *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: आज असाचं एक अनुभव ऐकला आणि एकदम ही गोष्ट आठवली आणि इथे लिहाविशी वाटली. विस्कळीत आहे, पण घ्या चालवुन.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 23819 views

💬 प्रतिसाद (111)
क
काळा पहाड गुरुवार, 02/12/2015 - 06:50 नवीन
ते दंबूक घेवून 'शांत' करतात. सत्कार मग चित्रगुप्त साहेब (मिपा वरले नव्हे, वरचे) करतात.
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या गुरुवार, 02/12/2015 - 10:43 नवीन
टका.. तुझा सत्कार करुन पायजे काय रे ? ;)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/12/2015 - 11:44 नवीन
नक्को....दंबूकवाल्यांपासून लांबच रहातो मी :)
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 02/12/2015 - 13:44 नवीन
त्यांची दंबूक लांब आहे. ते लांबूनच "सत्कार" करू शकतात. सांगावं काय?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/12/2015 - 15:02 नवीन
_/|\_
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/12/2015 - 15:03 नवीन
तुम्ही बघितली काय? :)
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 02/12/2015 - 15:19 नवीन
नाही. ते फक्त असे प्रश्न त्यांना विचारणार्‍यांचाच "सत्कार" करतात ता.क. समजा तुम्ही कधी तशी चूक केलीच आणि त्यांनी दंबूक काढायला हात लांब केला, की मग गडबडीने त्यांना आयुर्वेदावरचे प्रश्न विचारा. मग ते दंबूक ठेवून देतात आणि कडू काढा देतात.
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Fri, 02/13/2015 - 12:20 नवीन
टकाच्या निरागस प्रश्नात फारच गहन अर्थ लपलाय असे नमूद करतो.. ;) (बादवे, सगळेच डॉक दंबूक घेउन "शांतपणे" सत्कार करतात की काय अशी शंका आलीय मनात. )
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 02/13/2015 - 12:54 नवीन
नाय ब्बॉ...माझ्या निरागस मनाने विचारलेल्या निरागस प्रश्नात फक्त निरागसच अर्थ दडलेला होता...त्यात गहनपणा आणण्याचे सारे श्रेय तुम्हालाच :)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/11/2015 - 07:02 नवीन
तुमी खर्च साम्गितला म्हणून आश्चर्याने इचारला .. बाकी वैयक्तिक घुसण्यात असा काय इम्टरेस्ट नाय ..
  • Log in or register to post comments
र
राजे साहेब Tue, 02/10/2015 - 08:41 नवीन
सध्या इंजिनिअरला वाईत्ट दिवस आले अहेत, १०००००*४ =४००००० इत्की फी भरुन पन काय मिल्ते ६०००/- महिना देतात का तर म्हने मन्दी आहे हे स्व्था मात्र गलेलट्ट पगार घेतात कॅप्टन जॅक स्पॅरो यान्च्या कंपनीमधे उमेदवार जे बोल्ला ते तो सग्ल्या इंजिनिअरच्या वती ने बोल्ला, मी स्व्था पन खुप खस्ता खल्ल्या अजुन खातोच आहे, बर्याच थिकानी तर ओलख मागतात नसेल तर तुम्ह्ही लायक नही असेल तर तुम्ही;लायक ज्यानी मेह्नत घेत्ली इंजिनिअरिन्ग्ला त्य्नाचे पैसे आनी मेह्नत वाया, ज्या कूतुम्बाची परिस्तिथि नस्ते तरी पन ते मुलाला इंजिनिअर कर्तात का तर आप्ले दिवस बदल्तील पन त्याना कुथे माहीत अहे परिस्थिती, ३ मुर्ख मध्ये काय दाख्व्ले ते पन अपन बघ्तो वाच्तो आत्म्यहत्या केली मान्सिक खच्चिकरन झाल्यवर वेगले काय होनार, इंजिनिअरिन्ग होत होत नाकिनाऊ येतात सगल्यना वात्त इंजिनिअरिन्ग झाले आता चान्ग्ले दिवस्स येनार पन मग खरी रेस सुरु होते , जोब हवा CONSULTANCY ला भ्ररा पैसे ,काय हवा mnc की pvt ltd. दोघान्चे भाव वेग्ले नोकरी हव्वी ना अनि गरज्वन्त इंजिनिअरला अक्क्ल नस्ते. मी या आधी एका मोट्ह्या ****** ग्रोउप मधे होतो contract १ वर्श काध्ला एच आर सगळीकडे असेच आहो इंजिनिअरला आनी नोनइंजिनिअरला एकाच पार्द्यात मोजत् आहात अस्स अस्त तर मग इंजिनिअरिन्ग का ???? जिथे नोनइंजिनिअर ३०,००० काम्व्तो अनि इंजिनिअरला ८०००/- :( ज्यान्ची ओलक अहे ते ४००००/- घेत अहेत त्याना किती येते विचारा बर इंजिनिअरिन्ग कशी पास केली जाते सगल्या इंजिनिअरला महित आहे. अजुन बोललो तर जागा पुरनार नही आवरतो घेतो जाता जाता एकाच सान्गाव वाट्त आहे दुस्रे काही व्हा पन इंजिनिअर होउ नका काय व्हाय्चे ते वर्च्या थ्रेअद मधे अहेच: ;) खुप चुका आहेत पन साभालुन घ्यावे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/10/2015 - 08:53 नवीन
आतापर्यंत "मोकलाया... " पद्धत विडंबन कवितांमध्ये दिसत होती. आता ती प्रतिसादांमध्ये रुजू लागताना दिसत आहे ;) +D
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 02/10/2015 - 09:08 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/10/2015 - 09:45 नवीन
सग्ल्य एन्जिनीर लोकन्च्य मनत्ले बोल्लत...अज खुप दिवसन्ने मझ्यच मनतले कोनि बोलुन मन मोक्ले मोक्ले केल्यसर्खे वत्ले...एक एन्जिनीर एन्गिनीरिन्ग कस पुर्न कर्तो ते त्यलच महित...हि दुनिय गेलि तेल लवत
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 02/10/2015 - 10:22 नवीन
:)) इतकं असं टायपायला त्रास नाही होत?????????????
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/10/2015 - 10:30 नवीन
रजे सहेबन्सथि अज्पन उद्यपन पर्वपन कय्पन =))
  • Log in or register to post comments
र
राजे साहेब Tue, 02/10/2015 - 11:42 नवीन
काय करता टवाळ कार्टा दुस्रा पनिपत आहे बाकी आप्ला लोभ बघुन भरुन आल :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/10/2015 - 11:58 नवीन
थन्क योउ :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/11/2015 - 13:18 नवीन
त्रास तर होतोच म्हणा ! पण दुसर्‍याला हसवायचा परोपकारी स्वभाव गप्प बसू देत नाही त्याला काय करणार ? ;) :)
  • Log in or register to post comments
स
सविता००१ गुरुवार, 02/12/2015 - 05:33 नवीन
तसा टका आहेच परोपकारी... णो डाउट्ट ;)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/12/2015 - 06:37 नवीन
:) तसे नै हो...मिपा माझा स्ट्रेस बस्टर आहे :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 02/10/2015 - 11:53 नवीन
मलहि असच वत्ल....मिपकरन्कदे लक्श देउ नक हो, जर तवलखोर अहेत लोकं. पन बकि कहि म्हन, मल पन असे तन्कुन लै म्हन्जे लै म्हन्जे लय्च मज्य अलि.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/18/2015 - 05:31 नवीन
मित्रा वाक्या वाक्याशी सहमत. फक्त लिहित रहा, हळुहळु लेखन सुधारेल. दिवस बदलतात. नेटाने प्रयत्न कर.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Tue, 02/10/2015 - 10:04 नवीन
तुमचे दुखणे योग्य आहे , लाखो रुपायची फी भरुन इन्जिनीयर व्हायचे आणि नोकरी नाही ही भयावह परिस्थिती आहे हे मान्यच करायला हवे. त्याचाच परिणाम म्हणून निदान महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालये आता ओस पडू लागली आहेत. या सगळ्यात मुख्य मुद्दा आहे तो गुणवत्तेचा ! भारंभार लोक इन्जिनीयर होतात पण त्यापैकी किती लोक "खरे" इन्जिनीयर असतात ? मी एका प्रतिथयश महाविद्यालयात आटो मध्ये बी ई केलेल्या पोरा-पोरीच्या मुलाखती घेत होतो ... भयाण परिस्थिती होती ...एकाला विचारले की गाडीतल्या कोणत्या भागासंदर्भात मी तुम्हाला प्रश्न विचारु ? त्याने सांगितलेल्या विषयातील अगदी प्राथमिक जुजबी माहीती देखील त्याला नव्हती !! एच आर वाला इतका कंटाळला की त्याने शेवटी विचारले की सायकल चा पंक्चर कस काढतात हे साम्गता येईल का ? तेव्हा गुणव्त्तेची वानवा हे खरे दुखणे आहे ... एकदा आय टी हमालांची सद्दी संपली की इम्जिनीयर लोकांची अवस्था वकिलांसारखी होईल .. पैशाला पासरीभर ! अस्तु , तरीही अनुभवाच्या जोरावर हे नक्की म्हणू शकतो की Educational career has nothing to do with professional career ! जगात / नोकरीत यशस्वी होण्याची सूत्रे इंन्जिनीयरिन्गच काय आपल्या कोणत्याच अभ्यासक्रमात नाहीत ! ती आहेत आपल्या विजिगिषु वृत्तीमध्ये ! इन्जिनीयर चे शिक्षण घेतले म्हणजे त्याच व्यवसायात राहीले पाहीजे असे नव्हे ! सो डोन्ट लूज योउर हार्ट ! प्रयत्न करत राहा ....मार्ग सापडेल , उत्तम दिवस येतील. सर्वात महत्वाचे चांगुलपणावरची श्रद्धा सोडू नका ! कोणतेच दिवस कायम रहात नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 02/10/2015 - 10:16 नवीन
सायकल चा पंक्चर कस काढतात हे साम्गता येईल का
:-)) इंग्लिश मधून विचारलं का मराठीतून?
  • Log in or register to post comments
व
विटेकर Tue, 02/10/2015 - 10:33 नवीन
विन्ग्रजीत
  • Log in or register to post comments
र
राजे साहेब Tue, 02/10/2015 - 12:02 नवीन
विटेकर साहेब १००% अग्री मार्ग सापडेल,उत्तम दिवस येतील मन्हुन तर जगतो आहे :) लोभ असावा.
  • Log in or register to post comments
र
रुस्तम Tue, 02/10/2015 - 13:16 नवीन
कोणतेच दिवस कायम रहात नाहीत. बाडीस...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 02/10/2015 - 10:13 नवीन
http://mynoticeperiod.com/ या प्रकारा बद्दल काय वाटते? Looking for better job? In your notice period? Perfect! याच ओळींनी तुमचे साईटवर स्वागत होते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 02/10/2015 - 11:33 नवीन
एका टॉप ३ कंपनी,अधे जॉइन होताना १० वेळा हो मोजून १० वेळा कॉलवर घासाघीस केली आहे. फॅशन स्ट्रीट सारखा जमत नाही म्हणून सोडून दिल्यावर २ दिवसांनी पुन्हा एच आर ने कॉल केला होता .
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 02/10/2015 - 19:02 नवीन
का कोण जाणे.. मला माझ्या कंपनीने मला दिलेली ऑफर नेहमीच अपेक्षेपेक्षा मोठी वाटली आहे!! एकदा ऑन बोर्डिंग मध्ये एकांनी प्रश्न विचारला, "तुमच्यापैकी कुणाला आहे तो पगार चांगला वाटतोय?".. कुणीही हात वर केला नाही.. मी सोडुन!! इकडे मी हात वर केला, तिकडे सर बोलुन गेले की "ज्याला चांगला वाटत असेल तो गाढव आहे..!!"... आता समाधानी असण्यात काय चुक आहे? मुळात मी कामच इतकं निवांत करते की जे देतात तेच मला उपकार वाटत आहेत!!! बाकी एच.आरवाले काहिही कामाचे नाहीत हे सार्वत्रिक मत आणि त्रिकालाबाधित सत्य आहे..
  • Log in or register to post comments
न
निशदे Tue, 02/10/2015 - 23:13 नवीन
"" कुणीही हात वर केला नाही.. मी सोडुन!! इकडे मी हात वर केला, तिकडे सर बोलुन गेले की "ज्याला चांगला वाटत असेल तो गाढव आहे..!!"... आता समाधानी असण्यात काय चुक आहे? "" *LOL* माफ करा पण सगळ्या प्रतिसादात एकदम भाबडेपणा, समाधानी वृत्ती आणि झालेला पचका एकत्र आला त्यामुळे हसू आवरले नाही. "" आता समाधानी असण्यात काय चुक आहे? "" काहीही नाही.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Wed, 02/11/2015 - 05:36 नवीन
हा लेख वाचून मला माझ्या पहील्या नोकरीचा किस्सा आठवला स्थळ खाजगी डिप्लोमा कॉलेज पगार १९२० रुपये प्रति महीना खरी गोम पुढे. ओरीजनल डॉक्यमेंटस कॉलेजात जमा करायचे का तर तुम्ही वर्षभर नोकरी सोडू नये म्हणून. वेठबिगारी.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/11/2015 - 07:03 नवीन
ओरीजनल डॉक्यमेंटस जमा करायला बर्‍याच ठिकाणी सांगायचे पूर्वी ! पण नोकरी सोडताना फार त्रास होतो !
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Wed, 02/11/2015 - 12:33 नवीन
ते बेकायदेशीर आहे. तक्रार केलीत तर कंपनी आयुष्यातून (तिच्या) उठू शकते.. :)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/11/2015 - 12:40 नवीन
डॉक्युमेंट जमा केले आहेत या विषयी कुठेही लेखी उल्लेख नसतो ! त्यामुळे तक्रार करता येत नाही. ते डोक्युमेंट 'वसूल' करायला लागतात.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 02/11/2015 - 13:14 नवीन
बर्याच कंपन्या करतात हे...तक्रार कुठे करायची?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 02/11/2015 - 13:36 नवीन
मोदींकडे किंवा केजरीवालकडे.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Wed, 02/11/2015 - 15:35 नवीन
कल्पना होती म्हणूनच मी जमा केले नाही. दीड महीना काम केले. पंधरा दिवसांचा पगार मिळाला पण नंतरच्या महीन्याचा नाही दिला. शेवटी नोकरी सोडून दिली. त्यानंतर कोणी डॉक्युमेंटस मागितले नाही की मी दिले नाही.
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 02/12/2015 - 05:06 नवीन
काळ - नोव्हे १९८८ स्थळ - आमच्या कोलेजची केमिस्ट्री ल्याब वेळ - सकाळी १० मुलाखत घेणारे - एका प्रसिद्ध दुचाकी बनविणार्‍या कंपनीचे विभाग प्रमुख आणि एच आर प्रमुख , दोघेच ! मुलाखत देणारे - १६ मुले - २ मुली मेरिट प्रमाणे अस्मादिकांचा पहिला नंबर ! पूर्ण मराठीत संभाषण : प्रश्न : नांव काय ? मी : पूर्ण नाव सांगितले विभाग प्रमुख : (माझे गुण पत्रक न्याहाळीत ) तुला मार्क चांगले आहेत.. वर्गात पाचवा नंबर .. तुला सगळे येत असणारच ! मी : .. हो ( मनात .. च्यायला रात्रभर फुकट्च तयारी केली ) विभाग प्रमुख : क्क्ष्क्ष्क्ष्क् .. येथे नोकरी आहे .. येणार का ? की सहा महिन्यात पळून जाणार ? मी : नाही सर एच आर : आवाज मोठ्ठा आहे का तुमचा ? ओरडता येते का ? मी : नाही म्हणजे आहे तसा मोठ्ठा ... येईल ओरडता.. एच आर : ओरडा बघू अमुक अमुक( त्यांचे स्वतः चे नाव ) म्हणून मी: (मोठ्ठ्यांदा ) श्री अमुक अमुक एच आर : शिव्या देता येतात का ? मी : ... बावळटासारखे त्यांच्या तोंडाकडे पाहीले .. एच आर : घाबरू नका .. शिव्या द्यायला सांगणार नाही ...! मी : येतात शिव्या द्यायला ! एच आर : ठीक आहे ... निकाल कधी आहे ? निकाल लागला की कंपनीत येऊन अपोईन्ट्मेन्ट लेटर घेऊन जा . मी तसाच बावळटासारखा खुर्चीवर बसलो होतो !! ते दोघेही खुर्चीतून उभे राहीले... मी त्यानंतर उभा राहीलो , हात मिळवला ..थान्कु असे पुटपुटलो आणि बाहेर पडलो.. त्यानन्तर १५ दिवसांनी निकाल लागला , क्म्पनीत जाऊन पतर घेऊन आलो आणि पुढच्या एक तारखेला जोइन झालो .. या कंपनीत मी साडे सहा वर्षे यशस्वी नोकरी केली.. दोन प्रमोशन्स झाली माझी इथे ! कामगारांचे प्रचंड प्रोब्लेम होते . दोनवेळा कामगारांनी माझी प्रतिकात्मक अंतयात्रा काढली . एकदा तर आठदिवस ऐन दिवाळीत मला कंपनी सुरक्षा कर्मचार्‍याचे संरक्षण होते ...
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 02/12/2015 - 05:12 नवीन
जबरी. कंपनी आणि पात्रांचा अंदाज आला...
  • Log in or register to post comments
प
पेट थेरपी गुरुवार, 02/12/2015 - 06:27 नवीन
माझे एच आर समोर दिव्याच्या झोतात बिचकलेल्या प्राण्यासारखे होते. फायरिन्गचा धागाही चांगला आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/12/2015 - 07:39 नवीन
पुण्यातल्या एका कम्पनीने दिलेली ऑफर मी जोइनिंगच्या अगोदर दीड महिना असताना ईमेल पाठवून तुमच्या येथे जॉईन करु शकत नाही. अशी मेल पाठवली. एच आर ने मला हे माझे अनप्रोफेस्शनल वर्तणूक आहे. तुमचे नाव आम्ही काळ्या यादीत टाकू. तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला मिळेलच.( व्हॉट गोज आउट...कम्स इन) असल्या प्रकारचे उत्तर ईमेल वर दिले. धन्य ती कम्पनी..............
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/12/2015 - 15:52 नवीन
विटेकर साहेब अशा एच आर च्या माणसाला त्याचीच ई मेल पूर्ण सभ्यपणे मी त्या कंपनीच्या अध्यक्षाकडे पाठवून (आणी त्या एच आर वाल्याला त्याची कॉपी पाठवून) अद्दल घडवून दिली असती. वर त्या वरिष्ठाला आपला एच आर चा माणूस काय करीत आहे त्याची संपूर्ण कल्पना दिली असती. ई मेल तुमच्याकडे असते तेंव्हा तुम्ही शेर असता. अशी कागदी लढाई मी बरीच खेळलो आहे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 02/14/2015 - 04:19 नवीन
या चर्चेवरून, एचआर मुलाखतीतला बराचसा फोलपणा दाखवणारा हा विडिओ आठवला. https://www.youtube.com/watch?v=b56eAUCTLok
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sat, 02/14/2015 - 04:59 नवीन
आजच्या काळात एका अभियंत्याला एका महागड्या शहरात एवढासा पगार देणे म्हणजे केवळ शोषण. पुण्यासारख्या महागड्या शहरात पहिल्या नोकरीच्या वेळी जुजबी पगारात बस्तान बसवताना आर्थिक अग्निदिव्यातून गेलो असल्याने या लेखात मांडलेल्या भावनांना चांगलंच समजू शकतो. कुठलेही क्षेत्र घ्या भारतामध्ये अशी उदाहरणे न दिसणे म्हणजे अपवादच. माझ्या निरीक्षणानुसार याच्या पूर्णपणे विरुद्ध चित्र अमेरिकेत दिसते. मा तं क्षेत्रात नव्या अभियंत्याला जेवढा पगार मिळतो बरेचदा त्याच्या पाच सहा पट पगार त्याच्यापेक्षा दहा बारा वर्षांनी ज्येष्ठ असणार्‍या त्याच्या मॅनेजरला मिळतो . याउलट अमेरिकेत हेच प्रमाण केवळ दीडपट असते. म्हणजे अनुभवी लोकांना कमी पगार नसून नव्या लोकांना संतुलितपणे जगता येण्यासारखा पगार असे आहे. हा विषय येथे मांडल्यामुळे अनेक प्रतिसादकांनी विषयावर मोलाचे विचार व्यक्त केले आहेत. धागाकर्त्याला व प्रतिसादकांना अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 02/14/2015 - 05:01 नवीन
धन्यवाद :)... हेचं मांडायला आलो होतो. तुम्ही जास्तं चांगल्या शब्दात मांडलतं.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 02/25/2015 - 16:10 नवीन
भारत आणि आम्रविकेत थोडा फरक पण आहे. आपल्या इथे जेव्हा फ्रेशर जॉईन होतो, तेव्हा त्याला अगदी हाताला धरून सगळे शिकवावे लागते. सो ८+ १०+ म्हणजे अनुभव आणि स्किल् दोन्हीमध्ये मोठा फरक असतो. तिथे स्किलमध्ये तेव्हढा फरक नसतो, अनुभव मात्र असतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 02/25/2015 - 20:43 नवीन
माझा अनुभव (पहिली साडेतीन वर्षे भारतात, मग अमेरिकेत) मा. तं. क्षेत्रातील सर्विस कंपन्यांचा आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुरू असतानाच जरा तपशीलवार शिकवले गेले. तेवढे सोडल्यास केवळ नवे आहेत म्हणून काही कमी अपेक्षा वगैरे काही नव्हते. हेच चित्र मी इतरांबरोबरही पाहिले. बिलिंग रेट वगैरे तेवढाच होता जेवढा अनुभवी लोकांचा होता. अमेरिकेत फ्रेशर्सबरोबर काम करण्याचा फारसा अनुभव नाही. इथे एम एस केलेल्या अनेक भारतीय (अनुभवी) लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत माझ्या कंपनीसाठी. इथे एम एस केले आहे म्हणून काही खूप फरक पडला आहे असे काही दिसले नाही. या क्षेत्राची व्याप्ती खूपच मोठी असल्याने प्रत्येकाची निरीक्षणे वेगळी किंचित प्रसंगी परस्परविरोधी असू शकतात.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/26/2015 - 07:05 नवीन
इथे एम एस केलेल्या अनेक भारतीय (अनुभवी) लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत माझ्या कंपनीसाठी. इथे एम एस केले आहे म्हणून काही खूप फरक पडला आहे असे काही दिसले नाही.
आता एम एस सुध्धा भारतातल्या ईंजिनीअरींगच्या स्टाईलने करतात म्हणे...सगळ्याच ठिकाणी नाही पण बर्यापैकी ठिकाणी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 20 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 22 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 26 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा