Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पहिलेवहिले मराठी चावटसाहित्य संमेलन पुण्यात संपन्न

च
चिमिचांगा
Wed, 02/04/2015 - 18:21
💬 113 प्रतिसाद
पहिले अखिल वैश्विक मराठी चावटसाहित्य संमेलन कालच पुणे येथे संपन्न झाले त्याचा वृत्तांत... मराठी साहित्यविश्वात संमेलनांची वानवा नाही. नेहमीच्या साध्या साहित्यसंमेलनाबरोबरच कुठे विद्रोही साहित्य संमेलन, कुठे स्त्रीसाहित्य संमेलन, कुठे विद्रोही स्त्रीसाहित्य संमेलन, मुस्लिम साहित्यिक संमेलन, कविसंमेलन, नाट्यसंमेलन, झालंच तर वैदर्भी, कोकणी, खानदेशी अशा प्रादेशिक फ्लेवरची संमेलने, खेरिजकरून विविध साहित्यजत्रा, उरूस, यांचा रतीब सर्वकाळ चालू असतो. मात्र सध्या बहराला येत असलेला परंतु आजवर दुर्लक्षित असलेला एक नव-साहित्यप्रकार, जो की चावटसाहित्य, त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक चावटसाहित्य संमेलन भरवावे, असा विचार या क्षेत्रातील काही अग्रणींच्या मनात आला, आणि मग मराठी सारस्वताच्या प्रथेप्रमाणे चावटसाहित्य संमेलन कमिटीची स्थापना, निधिसंकलन, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुका, प्रचार, वादविवाद, आरोप-प्रत्यारोपांची राळ या सर्व पायर्‍या पार करत एकदाचे हे संमेलन मराठी संस्कृतीचे आणि अस्मितेचे केंद्रस्थान आणि महाराष्ट्रातील सर्व नव-चळवळींचे उगमस्थान, जे की पुण्यग्राम, येथे घेण्याचे ठरले. संमेलनाची सुरुवात हिंदी चित्रपटसॄष्टीच्या आजच्या आघाडीच्या तारका सनी लिओनी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर संमेलनाचे शीर्षकगीत 'फू बाई फू, फुगडी फू, चला चावटसाक्षर बनू' या गीताचे समूहगान करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. 'चावटपणाः एक इतिहास' या भाषणात श्री. अभ्या अभ्यंकर ('वहिनी, ऑर्किड आणि मी' या आत्मचरित्रवजा इ-कादंबरीचे लेखक) यांनी चावटसाहित्याचा आजवरचा इतिहास उलगडून दाखवला. 'स्थूलमानाने चावटसाहित्याचा इतिहास हा तीन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे' ते म्हणाले. 'पहिला टप्पा म्हणजे प्रागैतिहास. या टप्प्यात चावटसाहित्य बाल्यावस्थेत होते. या काळातील बहुतांश साहित्यनिर्मिती ही सार्वजनिक स्वच्छतालयांच्या भिंती, पुलांखालच्या जागा, इत्यादि ठिकाणी झाली. ही सर्व साहित्यनिर्मिती करणारे लेखक अनामिक होते. तसेच या टप्प्यातले बरेचसे लिखाण हे चित्रमय स्वरुपात केले जात असे. जरी या टप्प्यातले साहित्य फारसे दखल घेण्याजोगे नसले, तरी चावटसाहित्यनिर्मितीचा पाया या कालखंडाने रचला, हे आपण विसरता कामा नये' यानंतर आला तो कागदी टप्पा. काही अभ्यासक याला 'पिवळ्या वेष्टनाचा टप्पा' असेही म्हणतात. या काळातील साहित्यनिर्मिती ही कागदी पुस्तकांवर होत असे. मात्र, तत्कालीन समाजाचे मत या साहित्याबद्दल प्रतिकूल असल्यामुळे या काळातले साहित्य फार उंची गाठू शकले नाही. तसेच या साहित्याची आवड जोपासणे या काळात वाचकांनाही कठीण होते. प्रतिकूल वातावरणामुळे असे साहित्य हे त्या काळात लपून-छपून साठवावे व वाचावे लागे. यामुळे साहजिकच सामान्य वाचकाच्या व्यासंगावर मर्यादा येत. गेल्या शतकाअखेर मात्र चावटसाहित्यात क्रांतिकारक बदल घडून आला. महाजालाची निर्मिती, माहिती तंत्रज्ञानातील क्रांती आणि ज्ञानविस्फोटामुळे जीवनाच्या सर्व अंगाप्रमाणे या क्षेत्रातही उलथापालथ झाली. चावटसाहित्याची निर्मिती, विपणन, साठवण आणि वाचन या सर्व प्रक्रिया अतिसुलभ आणि व्यक्तिगत झाल्या. केवळ या साहित्याला वाहिलेल्या संस्थळांची निर्मिती या काळात झाली. परिणामी चावटसाहित्यानेही सांधे बदलले आणि उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होऊ लागली. ताज्या दमाचे अनेक युवा-लेखक या क्षेत्रात उतरले. आज या बदलाची गोड फळे आपण सर्व चाखत असून चावटसाहित्याचा भविष्यकाल निश्चितच उज्ज्वल आहे' असे म्हणून त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात भाषण संपवले. यानंतर लोकप्रिय चावटकथाकथनकार श्री. पप्पू गोळे यांनी आपली लेटेस्ट कथा 'बंद लिफ्टमध्ये एक रात्र' चे अभिवाचन केले. रसिकांकडून या कथेला उत्कॄष्ट प्रतिसाद लाभला. कथेतील अनेक रोमांचकारक प्रसंगांच्या वेळी श्रोत्यांनी शिट्ट्या वाजवून दाद दिली. टाळ्यांच्या गजरात श्री. गोळे यांनी कथा संपवली. चावटलेखक आणि चावटवाचक यांच्या प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम यानंतर झाला. यामध्ये श्रोत्यांनी चावटसाहित्याकडून त्यांना असलेल्या अपेक्षा लेखकांपर्यंत पोहोचविल्या. चावटसाहित्याच्या एक पुणेस्थित गाढ्या अभ्यासक सौ. वनिता पिसाळ-लेले यांनी स्त्रियांसाठी उत्तम प्रकारचे साहित्य निर्माण होत नसल्याची खंत मांडली. 'आपल्यासारख्या अनेक स्त्रियांना नवरा आणि मुलांना अनुक्रमे कामावर आणि शाळेत पाठवून दिल्यावर दुपारच्या शांत वेळी चावटसाहित्याचा आनंद घ्यावयास आवडते, परंतु बहुतेक साहित्य हे पुरुषांनी पुरुषांच्या नजरेतून पुरुषांसाठी लिहिलेले असते, स्त्रियांना आवडेल अशा साहित्याची आंतरजालावरही वानवाच आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली. तोच धागा पुढे खेचून श्री. संज्या गावडे ('लेलेबाईंची ट्युशन' या गाजलेल्या कथेचे लेखक) यांनी स्त्रियांनी या क्षेत्रात येण्याची आवश्यकता विषद केली. आजमितीस चावटसाहित्य पुरुषप्रधान आहे हे खरेच, परंतु त्यावर तोड म्हणजे स्त्रीलेखिकांनी चावटसाहित्यनिर्मितीत उतरून अधिकाधिक चांगल्या दर्जाचे स्त्रियाभिमुख साहित्य निर्माण करणे, हीच आहे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. यानंतर बेंद्रे नावाचे एक गृहस्थ लाजत लाजत उठले व 'आजचे चावटसाहित्य केवळ स्त्रीपुरुषांमधल्या नातेसंबंधांभोवती फिरते आहे' अशी लाडिक तक्रार त्यांनी शर्टाच्या टोकाशी बोटांनी चाळा करत करत मांडली. उदाहरणार्थ म्हणजे केवळ पुरुष पात्रे असलेल्या चावटकथा देखिल काही वाचकांना वाचायला आवडतील, असे म्हणून ते मुरका मारून खाली बसले. सरतेशेवटी अध्यक्षीय भाषणात श्री. बंटी दातार यांनी 'नव्या लाटा नि नव्या वाटा' या भाषणात चावटलेखकांना नवनवी क्षितिजे धुंडाळायला उद्युक्त केले. 'आज चावटसाहित्य चाकोरीबद्द झाले आहे की काय, अशी शंका येते. त्याच त्याच वहिनी, त्याच त्या इंग्लिशच्या मॅडम, त्याच त्या कामवाल्या काकू यातच आज चावटकथा अडकली आहे. चावटसाहित्यिकांनी त्याच त्या साच्यात अडकून न पडता आपल्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचे वारू मोकळे सोडावेत. इतिहासलेखन, नाट्यलेखन, प्रवासवर्णन, विज्ञानकथा अशा अनेक वाङ्मयप्रकारांचे चावटीकरण करण्यासाठी मैदान मोकळे असताना चावटलेखकांनी आपल्या लेखनाचा परीघ इतका मर्यादित का ठेवला आहे, याचे मला आश्चर्य वाटते' असे ते म्हणाले. यापुढेही ते बरेच काही बोलणार होते. मात्र त्याचवेळी सभागॄहात काही गलबला झाला व साधारण पन्नाशीचे, बुटकेले कुणी गृहस्थ अचानक स्टेजवर आले आणि 'बंड्या, भडव्या, इथे हे धंदे करत बसला आहेस? गाढवा, दहावीचे वर्ष आहे ना यंदा?' असे म्हणून अध्यक्षांचा कान धरून त्यांना खेचत घेऊन गेले. या प्रकारामुळे गांगरलेल्या आयोजकांनी घाईघाईनेच संमेलन आवरते घेतले. अजूनही चावटसाहित्यिकांना खुद्द त्यांच्या निकटवर्तियांमध्येही प्रतिष्ठा कशी नाही, याची दबक्या आवाजात चर्चा करत श्रोते पांगले.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 23563 views

💬 प्रतिसाद (113)
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/04/2015 - 18:50 नवीन
अफाट हानलाया! :-D ... :-D ... :-D @श्री. संज्या गावडे ('लेलेबाईंची ट्युशन' =))))) या गाजलेल्या कथेचे लेखक) >>> =))))) वारल्या गेलो आहे! =)))))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/05/2015 - 07:16 नवीन
श्री. संज्या गावडे हे म्हणजे तेच का??? ;)
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Wed, 02/04/2015 - 19:00 नवीन
आपल्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचे वारू मोकळे सोडावेत. खच्चून अणुमोदण. :))
  • Log in or register to post comments
न
निमिष ध. Wed, 02/04/2015 - 19:01 नवीन
लई बेकार लिवलय पघा. आजून यात ग्रामीण कथा नाही आल्या की. त्यो पन भाग घ्या *new_russian*
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 02/04/2015 - 19:03 नवीन
गिर्रेबाज, उन्नत लेखन आवडले. तुमची प्रतिभा या लेखात चांगलीच ताठर झाली आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 02/04/2015 - 21:14 नवीन
राकट व रासवटपणाने टंच भरलेला प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/05/2015 - 06:21 नवीन
@राकट व रासवटपणाने टंच भरलेला प्रतिसाद.>> स्व'परिप्रेक्षित भावंनांनि भरंलेला ऊंsssssचं अंतर्नाद!
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 02/05/2015 - 03:19 नवीन
=)) तुमच्या प्रतिसादाबद्दल बॅट्याशी सहमत =))
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 02/05/2015 - 04:03 नवीन
प्रथेप्रमाणे या संमेलनाचे प्रायोजक कोण होते??
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 02/05/2015 - 06:46 नवीन
हैदोस
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/05/2015 - 07:53 नवीन
आणि सूर्यावहिनींना विसरलात की काय हो ;)
  • Log in or register to post comments
य
यसवायजी गुरुवार, 02/05/2015 - 13:53 नवीन
सविता फोर्जीन्ग पब्लिक लिमिटेड.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/05/2015 - 13:55 नवीन
क्रियापद बदललं काय हो ते ;)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/05/2015 - 17:59 नवीन
=))
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त Fri, 02/06/2015 - 07:22 नवीन
फ+ओर्जी+न्ग असा विग्रह आहे हो. :lol:
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 02/06/2015 - 08:15 नवीन
एकदम **भंजक ;) =))
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 02/05/2015 - 13:55 नवीन
जुन्या काळात चंद्रलोकी वावर असायचा का कोणाचा ?? :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/05/2015 - 17:59 नवीन
म्हन्जे???
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त Fri, 02/06/2015 - 07:27 नवीन
इब्लीस आणि रंभा किती हैदोस घालायचे हे तर विसरला नाहीत ना!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/05/2015 - 07:16 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Wed, 02/04/2015 - 19:10 नवीन
हाय २०० तरी कुटं जात न्हाईत बगा.. टकाटक कार्यकर्त्यांना १००० चा ही वाव आहे (फक्त संमंचेच भ्या है, त्या बंड्याच्या पप्पांसारखे कान धरून धागा घेऊन जौ नये म्हंजे झालं)
  • Log in or register to post comments
च
चिमिचांगा Wed, 02/04/2015 - 20:08 नवीन
संपादकांना घाबरून फारफार माइल्ड वृत्तांत लिहिला आहे. तरी प्रतिसादांत काहींच्या प्रतिभेला पंख फुटलेले दिसत आहेतच! *shok*
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 02/04/2015 - 19:29 नवीन
भयाण खल्लास मेघविव्हळ तेजस्वी हलकट दिलखेचक लेख आणि वृत्तांत!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 02/04/2015 - 21:12 नवीन
उचक..उचाक...आपलं मचाक वृत्तांत =)) =)) =)) आर्य विदाविव्हल, विदाश्रमी आणि भंजनप्रेमी मंडळाचे कार्यकर्ते. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/05/2015 - 01:59 नवीन
=)) वृत्तांत आवडला. फोटो टाकायला पाहिजे होते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 02/05/2015 - 03:07 नवीन
.हो. सविस्तर फोटोसहित येऊदे. ..माझे येणे शक्य झाले नाही कारण संमेलनासाठी परफ्यूम लावून निघणार तेवढ्यात सर्व्हेवाली संजनाभाभी दारात आली. ..तिला तहान लागलीय असं ती म्हणाली.. सर्व्हे फॉर्म सोफ्यावर बसून भरु असं म्हणताना तिच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसली. ..मग तिला पाण्याचा ग्लास देताना चुकून तिच्या रसरशीत लालचुटुक ओठांचा स्पर्श माझ्या राकट बोटांना झाला..आणि...थोडक्यात काय तर संमेलनात येणं राहून गेलं. ..तेव्हा फोटो टाकावेत. ..प्रा डॉ सर..तुमचे जाणे का क्यान्सल झाले?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/05/2015 - 03:27 नवीन
आणि... =))))) थोडक्यात काय तर संमेलनात येणं राहून गेलं. ..तेव्हा फोटो टाकावेत. >> :-D @..प्रा डॉ सर..तुमचे जाणे का क्यान्सल झाले? >> अश्लील प्रश्न! :-D
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/05/2015 - 03:50 नवीन
चावट साहित्य संमेलनाचा मी विशेष साहित्यिक म्हणुन निमंत्रित होतो. चावटपणाबद्द्ल मोकळेपणानं सार्वजनिक ठिकाणी फारसं बोलल्या जात नाही, प्रत्येक व्यक्ती आपआपल्या गृप मधे बोलतात पण सार्वजनिक ठिकाणी असं काही बोललं की काही लोकांना फेफरं येतात, तेव्हा त्याच्यावर मी अभ्यास करत होतो काही नोट्स काढत होतो की अचानक सुंदर तरुणी दारात पोहोचली. नजरेत भरावी अशी गच्च आणि टच्च होती. ’भारतातील स्त्री-पुरुषांचा संसार सुखाची न होण्याची कारणं’ या विषयावर म्हणे ती संशोधन करत होती त्यातल्या त्यात घिसाडघाईने ’घेतल्या जाणा-या चुंबनावर’ तिचा टॉपीक अडकला. आणि मग ती या विषयावर जी सुरु झाली की विचारु नका. आणि तिने सविस्तर विषयाची मांडणी केली इतकी की तिला मला लवकर निरोप द्यावा लागला. मला तिच्याशी खुप बोलायचं होतं पण, मी बोललो नाही. तीला मायबोलीवरच्या ’चुंबन’ नावाच्या कवितेची लिंक दिली आणि अंगावर चादर घेऊन पहिलं वाहिलं चुंबन आठवत झोपून राहीलो. आणि माझा चावटसाहित्य संमेलनाचा प्रवास सुरु न होता जाग्यावरच संपला. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/05/2015 - 05:06 नवीन
@प्रत्येक व्यक्ती आपआपल्या गृप मधे बोलतात पण सार्वजनिक ठिकाणी असं काही बोललं की काही लोकांना फेफरं येतात>> =))))) खच्चून हानली! :-D @आणि माझा चावटसाहित्य संमेलनाचा प्रवास सुरु न होता जाग्यावरच संपला. >> :-D योग्य जागी संपलं वाक्य! ;-)
  • Log in or register to post comments
य
योगी९०० गुरुवार, 02/05/2015 - 09:36 नवीन
..मग तिला पाण्याचा ग्लास देताना चुकून तिच्या रसरशीत लालचुटुक ओठांचा स्पर्श माझ्या राकट बोटांना झाला..आणि...थोडक्यात काय तर संमेलनात येणं राहून गेलं. घरी आलेल्या प्रत्येकाला/प्रत्येकीला पाण्याचा ग्लास त्यांच्या ओठापर्यत नेऊन देता?? म्ह्णजे खर्‍या अर्थाने पाणी पाजता असे दिसते. म्ह्णजे यामुळे तुमचे बर्‍याच ठिकाणी जाणं राहत असावं.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 02/05/2015 - 09:41 नवीन
"चुकून" असं म्हटलंय ना?
  • Log in or register to post comments
य
योगी९०० गुरुवार, 02/05/2015 - 09:58 नवीन
पण ओठापर्यंत गेलाच कशाला...चुकून एवढी मोठ्ठी वाट पकडलीत?
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 02/06/2015 - 13:07 नवीन
इ बबो !!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त गुरुवार, 02/05/2015 - 15:24 नवीन
आधी कबूल करूनही संमेलनस्थळी का आले नाहीत हे विचारायला गविंना चार पाच वेळा फोन केला.... दर वेळी "आय अॅम कमिंग" एवढंच म्हणून फोन बंद करायचे.. :wink: गवि कृ.ह.घे.
  • Log in or register to post comments
च
चिमिचांगा गुरुवार, 02/05/2015 - 16:57 नवीन
_/\_ *lol*
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 02/05/2015 - 17:10 नवीन
एकाच वाक्यात मारलेला टोला आवडला. =))
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 02/05/2015 - 17:15 नवीन
टोला नै म्हणायचं. दणका म्हणायचं =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/05/2015 - 17:58 नवीन
अगदी अगदी+++१११ :-D .. :-D .. :-D
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/05/2015 - 18:07 नवीन
"मी भीडस्त हाय" म्हंता आनि मंग हे असं लिवता. काय म्हनावं तुमाला ?! *unknw*
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त गुरुवार, 02/05/2015 - 19:21 नवीन
कॉलेजात असताना .... सगळ्या होस्टेलमेट्सच्या गाद्या उचकून उचकून मिळवलेल्या ज्ञानाचा परिणाम आहे सरजी हा.... मस्तराम,Nancy Friday यांनी काय काय कष्ट घेतले आमच्या ज्ञानवर्धनासाठी....
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 02/06/2015 - 06:53 नवीन
अगागागागागा =)) =)) =)) 'अमुक कम तमुक' अशा नावांचाही नव्याने उलगडा झाला =))
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 02/06/2015 - 06:55 नवीन
चार पाच वेळा फोन केला.... दर वेळी "आय अॅम कमिंग" एवढंच म्हणून फोन बंद करायचे..
वयानुसार नेमकं फार आठवत नाही आता पण चार पाच वेळा म्हटलं मी असं ? वॉव..!! ;)
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त Fri, 02/06/2015 - 07:12 नवीन
उडायच्या शिक्षणाची बाकायदा डिग्री घेतलीयेत महाराज तुम्ही.... चार पाच काय...... एकसठ बासठ सुद्धा चालून जावेत राजेहो.... :wink:
  • Log in or register to post comments
व
वैभव जाधव Sun, 02/08/2015 - 06:13 नवीन
अयायायायायायाया. भीडस्तराव, .............हितले दादा कोंडके तुम्ही.
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 02/05/2015 - 02:30 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 02/05/2015 - 04:09 नवीन
पुरुषांनी पुरुषांसाठी काढलेला १००० रतिसाद आपलं ते हे प्रतिसादासाठी हपापणारा धागा. आणि हे पहिलेच संमेलन असावे ज्याला सरकारी अनुदानाची गरज पडली नसावी. +))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/05/2015 - 07:17 नवीन
रतिसाद >> =))
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 02/05/2015 - 05:10 नवीन
चांगलाय, मस्तंय, लेख !!! आणि प्रतिक्रियापण गरमागरम....
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 02/05/2015 - 05:25 नवीन
शेवटच्या पॅरावरून चावटसाहित्यिकांचे साहित्यिक वय व आवाका स्पष्ट व्हावा. बाकी, काही संपादकसुद्धा चावटसंमेलनेच्छुक असल्याचे लक्षात आल्यावर तुमच्या चावटप्रतिभेचा वारु नक्कीच मोकाट सुटणार यात शंका नाही !
  • Log in or register to post comments
क
कहर गुरुवार, 02/05/2015 - 06:23 नवीन
आता मात्र 'कहर' झाला *good* *THUMBS%%_%%UP* *lol* *LOL*
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा