पहिलेवहिले मराठी चावटसाहित्य संमेलन पुण्यात संपन्न
पहिले अखिल वैश्विक मराठी चावटसाहित्य संमेलन कालच पुणे येथे संपन्न झाले त्याचा वृत्तांत...
मराठी साहित्यविश्वात संमेलनांची वानवा नाही. नेहमीच्या साध्या साहित्यसंमेलनाबरोबरच कुठे विद्रोही साहित्य संमेलन, कुठे स्त्रीसाहित्य संमेलन, कुठे विद्रोही स्त्रीसाहित्य संमेलन, मुस्लिम साहित्यिक संमेलन, कविसंमेलन, नाट्यसंमेलन, झालंच तर वैदर्भी, कोकणी, खानदेशी अशा प्रादेशिक फ्लेवरची संमेलने, खेरिजकरून विविध साहित्यजत्रा, उरूस, यांचा रतीब सर्वकाळ चालू असतो. मात्र सध्या बहराला येत असलेला परंतु आजवर दुर्लक्षित असलेला एक नव-साहित्यप्रकार, जो की चावटसाहित्य, त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक चावटसाहित्य संमेलन भरवावे, असा विचार या क्षेत्रातील काही अग्रणींच्या मनात आला, आणि मग मराठी सारस्वताच्या प्रथेप्रमाणे चावटसाहित्य संमेलन कमिटीची स्थापना, निधिसंकलन, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुका, प्रचार, वादविवाद, आरोप-प्रत्यारोपांची राळ या सर्व पायर्या पार करत एकदाचे हे संमेलन मराठी संस्कृतीचे आणि अस्मितेचे केंद्रस्थान आणि महाराष्ट्रातील सर्व नव-चळवळींचे उगमस्थान, जे की पुण्यग्राम, येथे घेण्याचे ठरले.
संमेलनाची सुरुवात हिंदी चित्रपटसॄष्टीच्या आजच्या आघाडीच्या तारका सनी लिओनी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर संमेलनाचे शीर्षकगीत 'फू बाई फू, फुगडी फू, चला चावटसाक्षर बनू' या गीताचे समूहगान करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली.
'चावटपणाः एक इतिहास' या भाषणात श्री. अभ्या अभ्यंकर ('वहिनी, ऑर्किड आणि मी' या आत्मचरित्रवजा इ-कादंबरीचे लेखक) यांनी चावटसाहित्याचा आजवरचा इतिहास उलगडून दाखवला. 'स्थूलमानाने चावटसाहित्याचा इतिहास हा तीन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे' ते म्हणाले. 'पहिला टप्पा म्हणजे प्रागैतिहास. या टप्प्यात चावटसाहित्य बाल्यावस्थेत होते. या काळातील बहुतांश साहित्यनिर्मिती ही सार्वजनिक स्वच्छतालयांच्या भिंती, पुलांखालच्या जागा, इत्यादि ठिकाणी झाली. ही सर्व साहित्यनिर्मिती करणारे लेखक अनामिक होते. तसेच या टप्प्यातले बरेचसे लिखाण हे चित्रमय स्वरुपात केले जात असे. जरी या टप्प्यातले साहित्य फारसे दखल घेण्याजोगे नसले, तरी चावटसाहित्यनिर्मितीचा पाया या कालखंडाने रचला, हे आपण विसरता कामा नये'
यानंतर आला तो कागदी टप्पा. काही अभ्यासक याला 'पिवळ्या वेष्टनाचा टप्पा' असेही म्हणतात. या काळातील साहित्यनिर्मिती ही कागदी पुस्तकांवर होत असे. मात्र, तत्कालीन समाजाचे मत या साहित्याबद्दल प्रतिकूल असल्यामुळे या काळातले साहित्य फार उंची गाठू शकले नाही. तसेच या साहित्याची आवड जोपासणे या काळात वाचकांनाही कठीण होते. प्रतिकूल वातावरणामुळे असे साहित्य हे त्या काळात लपून-छपून साठवावे व वाचावे लागे. यामुळे साहजिकच सामान्य वाचकाच्या व्यासंगावर मर्यादा येत.
गेल्या शतकाअखेर मात्र चावटसाहित्यात क्रांतिकारक बदल घडून आला. महाजालाची निर्मिती, माहिती तंत्रज्ञानातील क्रांती आणि ज्ञानविस्फोटामुळे जीवनाच्या सर्व अंगाप्रमाणे या क्षेत्रातही उलथापालथ झाली. चावटसाहित्याची निर्मिती, विपणन, साठवण आणि वाचन या सर्व प्रक्रिया अतिसुलभ आणि व्यक्तिगत झाल्या. केवळ या साहित्याला वाहिलेल्या संस्थळांची निर्मिती या काळात झाली. परिणामी चावटसाहित्यानेही सांधे बदलले आणि उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होऊ लागली. ताज्या दमाचे अनेक युवा-लेखक या क्षेत्रात उतरले. आज या बदलाची गोड फळे आपण सर्व चाखत असून चावटसाहित्याचा भविष्यकाल निश्चितच उज्ज्वल आहे' असे म्हणून त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात भाषण संपवले.
यानंतर लोकप्रिय चावटकथाकथनकार श्री. पप्पू गोळे यांनी आपली लेटेस्ट कथा 'बंद लिफ्टमध्ये एक रात्र' चे अभिवाचन केले. रसिकांकडून या कथेला उत्कॄष्ट प्रतिसाद लाभला. कथेतील अनेक रोमांचकारक प्रसंगांच्या वेळी श्रोत्यांनी शिट्ट्या वाजवून दाद दिली. टाळ्यांच्या गजरात श्री. गोळे यांनी कथा संपवली.
चावटलेखक आणि चावटवाचक यांच्या प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम यानंतर झाला. यामध्ये श्रोत्यांनी चावटसाहित्याकडून त्यांना असलेल्या अपेक्षा लेखकांपर्यंत पोहोचविल्या. चावटसाहित्याच्या एक पुणेस्थित गाढ्या अभ्यासक सौ. वनिता पिसाळ-लेले यांनी स्त्रियांसाठी उत्तम प्रकारचे साहित्य निर्माण होत नसल्याची खंत मांडली. 'आपल्यासारख्या अनेक स्त्रियांना नवरा आणि मुलांना अनुक्रमे कामावर आणि शाळेत पाठवून दिल्यावर दुपारच्या शांत वेळी चावटसाहित्याचा आनंद घ्यावयास आवडते, परंतु बहुतेक साहित्य हे पुरुषांनी पुरुषांच्या नजरेतून पुरुषांसाठी लिहिलेले असते, स्त्रियांना आवडेल अशा साहित्याची आंतरजालावरही वानवाच आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली. तोच धागा पुढे खेचून श्री. संज्या गावडे ('लेलेबाईंची ट्युशन' या गाजलेल्या कथेचे लेखक) यांनी स्त्रियांनी या क्षेत्रात येण्याची आवश्यकता विषद केली. आजमितीस चावटसाहित्य पुरुषप्रधान आहे हे खरेच, परंतु त्यावर तोड म्हणजे स्त्रीलेखिकांनी चावटसाहित्यनिर्मितीत उतरून अधिकाधिक चांगल्या दर्जाचे स्त्रियाभिमुख साहित्य निर्माण करणे, हीच आहे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. यानंतर बेंद्रे नावाचे एक गृहस्थ लाजत लाजत उठले व 'आजचे चावटसाहित्य केवळ स्त्रीपुरुषांमधल्या नातेसंबंधांभोवती फिरते आहे' अशी लाडिक तक्रार त्यांनी शर्टाच्या टोकाशी बोटांनी चाळा करत करत मांडली. उदाहरणार्थ म्हणजे केवळ पुरुष पात्रे असलेल्या चावटकथा देखिल काही वाचकांना वाचायला आवडतील, असे म्हणून ते मुरका मारून खाली बसले.
सरतेशेवटी अध्यक्षीय भाषणात श्री. बंटी दातार यांनी 'नव्या लाटा नि नव्या वाटा' या भाषणात चावटलेखकांना नवनवी क्षितिजे धुंडाळायला उद्युक्त केले.
'आज चावटसाहित्य चाकोरीबद्द झाले आहे की काय, अशी शंका येते. त्याच त्याच वहिनी, त्याच त्या इंग्लिशच्या मॅडम, त्याच त्या कामवाल्या काकू यातच आज चावटकथा अडकली आहे. चावटसाहित्यिकांनी त्याच त्या साच्यात अडकून न पडता आपल्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचे वारू मोकळे सोडावेत. इतिहासलेखन, नाट्यलेखन, प्रवासवर्णन, विज्ञानकथा अशा अनेक वाङ्मयप्रकारांचे चावटीकरण करण्यासाठी मैदान मोकळे असताना चावटलेखकांनी आपल्या लेखनाचा परीघ इतका मर्यादित का ठेवला आहे, याचे मला आश्चर्य वाटते' असे ते म्हणाले. यापुढेही ते बरेच काही बोलणार होते. मात्र त्याचवेळी सभागॄहात काही गलबला झाला व साधारण पन्नाशीचे, बुटकेले कुणी गृहस्थ अचानक स्टेजवर आले आणि 'बंड्या, भडव्या, इथे हे धंदे करत बसला आहेस? गाढवा, दहावीचे वर्ष आहे ना यंदा?' असे म्हणून अध्यक्षांचा कान धरून त्यांना खेचत घेऊन गेले. या प्रकारामुळे गांगरलेल्या आयोजकांनी घाईघाईनेच संमेलन आवरते घेतले. अजूनही चावटसाहित्यिकांना खुद्द त्यांच्या निकटवर्तियांमध्येही प्रतिष्ठा कशी नाही, याची दबक्या आवाजात चर्चा करत श्रोते पांगले.
💬 प्रतिसाद
(113)
व
वेल्लाभट
गुरुवार, 02/05/2015 - 06:26
नवीन
सॉलिडच चावट म्हणजे!
- Log in or register to post comments
म
मितान
गुरुवार, 02/05/2015 - 06:37
नवीन
शेवटचा परिच्छेद वाचून खपल्या गेले आहे :))
संपादकांचा उत्साहही निरीक्षण करून ते निरीक्षण नंतर केव्हातरी वापरण्यायोग्य ;)
- Log in or register to post comments
अ
अजया
गुरुवार, 02/05/2015 - 08:17
नवीन
=))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 02/05/2015 - 07:16
नवीन
;)
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 02/05/2015 - 07:26
नवीन
चावट संमेलन! चावट संमेलन! मग मला तिथे गेलेच पाहिजे! - तरूण अर्क! ;) :P
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 02/05/2015 - 07:26
नवीन
न मान्सून के बादलोंसे
ना गहरी गडगडाहटोंसे
ना वैचारिक धागोंसे..
हाय ये मॉरल पुलीस क्या जाने..
की शगुफ्त है मासूमियत
चंद मासूम चावटोंसे..
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 02/05/2015 - 07:28
नवीन
=))
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 02/05/2015 - 07:30
नवीन
पुण्यात का?
बरं बरं.
- Log in or register to post comments
र
रुस्तम
गुरुवार, 02/05/2015 - 07:39
नवीन
=D
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 02/05/2015 - 07:50
नवीन
कामाला बाई पाहिजे.
अंगावर पडेल ते काम करण्याची तयारी हवी. रात्री थांबण्याची तयारी हवी.
दाबून पगार मिळेल. पूर्वानुभावाचा आग्रह नाही.
संपर्क: बाबूराव दांडेकर (चावट प्रकाषण, रती-मदन नगर, कोंडके पेठ, मालगाव )
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 02/05/2015 - 08:02
नवीन
धागा कोळ्याच्या जाळ्याच्या सिंगल धाग्यावर लटकतो आहे. नजाकत ठेवली तर सुंदर चमचमती नक्षी पूर्ण होईल.. नाहीतर केरसुणीच्या टोकाला लटकणारा जळमटाचा बोळा..
:)
- Log in or register to post comments
च
चिगो
गुरुवार, 02/05/2015 - 09:57
नवीन
क्या बात.. क्या बात..
धागा जमलाय.. शेवटचा परीच्छेद तुफान.. =))
- Log in or register to post comments
च
चिमिचांगा
गुरुवार, 02/05/2015 - 13:13
नवीन
असेच म्हणतो. क्या बात!
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/05/2015 - 10:00
नवीन
जबरी! :)
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 02/05/2015 - 10:05
नवीन
*LOL*
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/05/2015 - 10:08
नवीन
चावटकथासंमेलनात सूर्यावहिनींचा उल्लेख न करणे म्हणजे क्रांत्यांच्या इतिहासात मार्क्सचे नाव न घेण्यापैकी आहे. या अनुल्लेखाचा निषेध असो.
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 02/05/2015 - 10:14
नवीन
सूर्यावहिनी की सविताभाभी? की एकच दोन्ही?
शाळाकॉलेजचे दिवस आता अनेक दशकांनी मागे पडल्याने नीट आठवत नाही.
व्हिडीओ कॅसेट्स आणि डीव्हीडी .. काहीतरी फरक पडला असणारच.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/05/2015 - 10:19
नवीन
छ्या:! सगळी हवाच घालवलीत राव तुम्ही. :(
डिस्कव्हरीचा आनंद कसा हळुवार इ. खुलत जाण्यातून मिळावा ते नै ;)
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 02/05/2015 - 10:21
नवीन
डिस्कव्हरी चॅनेलवर पण असलं दाखवतात हल्ली? हाय रे देवा.
तुका म्हणे भोग सरे..
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/05/2015 - 10:27
नवीन
"हाय रे देवा. काय म्हंटोयस?" असं वाटलं एकदम.
- Log in or register to post comments
च
चिगो
गुरुवार, 02/05/2015 - 11:30
नवीन
हेच च्यामारी.. कोण ही सूर्यावहिनी?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/05/2015 - 11:31
नवीन
प्रश्नातच दडले उत्तर.
म्हटले अंमळ द्राविडी प्राणायाम करावा, समजेल पब्लिकला. पण नै. :( गौप्यस्फोटच केला राव गविंनी एकदम.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 02/05/2015 - 11:38
नवीन
अर्रे काय हे दिवस (का रात्री??) आले :(...सुर्यावहिनींना नाही ओळखत म्हणजे कम्माल झाली...
- Log in or register to post comments
क
कहर
गुरुवार, 02/05/2015 - 12:17
नवीन
"सूर्या वाहिनी " ???
काही ऐतिहासिक भौगोलिक संदर्भ मिळू शकेल का ? *unknw* *DONT_KNOW*
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/05/2015 - 12:21
नवीन
वाहिनी नाही, वहिनी.
वहिनी/वयनी/वैनी/वैणी पैकी जे लागंन ते घ्या.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 02/05/2015 - 12:33
नवीन
तीच ती...सोन्याची भावली =))
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/05/2015 - 12:34
नवीन
आँ?
कहीं आपका मतलब वो पुढारी के भरारी पुरवणीमे आये हुवे सुवर्णसुंदरी कथा से तो नै ;)
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 02/05/2015 - 13:11
नवीन
ते कार्टं सूर्याला आंग्लरुप करुन त्याच्या ईकारान्त स्त्रीलिंगी नामाबद्दल बोलतंय बहुधा!! 'जगत्सर्वं कांस्यमयं, सुवर्णकन्याहं' हे दोन भावांनी हातभार लावलेलं कौटुंबिक गीत आठवा बरं!!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 02/05/2015 - 13:20
नवीन
'जगत्सर्वं कांस्यमयं, सुवर्णकन्याहं' >> हेच्च हेच्च पण कांस्य ब्रोब्र आहे का?
=))
आज मी धन्य झालो
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/05/2015 - 13:32
नवीन
हा हा हा ;)
अर्र अर्र अर्र ते होय!!!!!!!!!!!!!
च्यामारी मग मीच क्षमा मागतो. माझ्या डोक्यात ती गुर्जरदेशवासिनी सूर्यावहिनी होती. हिला कोणी वहिनी म्हणत नै ओ. 'ताई' म्हणतात. ;)
- Log in or register to post comments
क
कहर
गुरुवार, 02/05/2015 - 12:51
नवीन
युरेका युरेका *secret*
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 02/05/2015 - 10:47
नवीन
हाफ शेंच्युरी निमीत्त धागाकर्ते श्री.चिमीचांगा आणी दोन संपादकांचा सत्कार कुठलाही चावटपणा न करता ,करण्अत येत आहे.
शुभेच्छुक-जेपी आणी चावट कार्यकर्ते मंडळ
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 02/05/2015 - 11:12
नवीन
जेपी आणी चावट कार्यकर्ते मंडळ
क्रुपया दोन्ही समानार्थी शब्दांपैकी कुठलातरी एकच ठेवावा (फ्लेक्सचा खर्च आवाक्यात राहील)
चिट(कव)णीस
चा.का.म.
नाक्यासमोर.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 02/05/2015 - 11:36
नवीन
संमेलनाचा वृतांत वाचला. पण अनेक गोष्टी राहून गेल्या. उदा. विमानात हवाईसुंदरीचा हात पकडणारे पुढारी स्वागताध्यक्ष होते. तसेच अशा जिव्हाळ्याच्या साहित्य विषयांच्या संशोधनासाठी तसेच त्याच्या विविध भाषातील भाषांतरा साठी सरकार तर्फे शिष्यवृती देण्याची मागणी करणारा ठराव मंजूर होणे.तसेच चावटाचार्य क के सप्रे यांचे नाव पुढील संमेलानाच्या महाद्वारास देणेचा ठराव. शिवाय चावट पुस्तकांची दिडी, मस्त स्वस्त चावटिका संग्रह हा चारोळी स्पेशालिस्ट इंद्र शिखर भोगले यांची पुस्तके सवलतीत मिळण्याचा ष्टॉल ई ई चे फोटो राहिलेच की. पुढचे साहित्य संमेलन " बेळगावी " भरण्याचे ठरले हा मुद्दा का वगळला राव ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/05/2015 - 11:41
नवीन
संस्कृत वाङ्मयातील चावटिका आणि सद्यकालीन मराठी दोनोळिका- एक तौलनिक अभ्यास;
प्राचीन मराठी चावटलेख- गधेगाळीय पुरावे;
प्राचीन परंपरेचे अवशेष- मराठीतील काही विशिष्ट क्रियापदे;
सातवाहनकालीन शिव्या;
एक अप्रकाशित प्राचीन शिवीपट;
इ.इ. राहिले काय हो?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 02/05/2015 - 11:44
नवीन
हो ना राव.
इतके प्रगल्भ चावट साहित्य प्राचीन काळात असूनही लेखात त्याचा किंचितही उल्लेख नसल्याने जोरदार निषेध.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/05/2015 - 11:47
नवीन
नायतर काय भेंडी.
चौरपंचाशिका, अमरुशतकम्, गीतगोविंद व इतर अनेक काव्ये या रसाने भरून एकदम ठसठसलेली आहेत.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 02/05/2015 - 11:51
नवीन
अगदी अगदी.
मात्र आमची गाथासत्तसई मात्र विसरलास. :-/
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/05/2015 - 11:55
नवीन
अर्र अर्र स्वारी!!!! हालाची गाहासत्तसई तर वाचकांचा बुरा हाल करून सोडते एकदम. ;)
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 02/05/2015 - 12:16
नवीन
गाहासत्तसईवरची चर्चा विद्रोही चावटसाहित्य संमेलनात असणार आहे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/05/2015 - 12:22
नवीन
पारंपरिक संस्कृत चावटसाहित्याचे नियम तोडून प्राकृत भाषेत सर्वसामान्यांचे चावट जीवन वर्णन करणारा हा आद्य विद्रोही चावटग्रंथ.
- Log in or register to post comments
च
चिमिचांगा
गुरुवार, 02/05/2015 - 13:19
नवीन
अहो पुढच्या संमेलनांसाठी काही विषय नकोत का?
बाकी तुमचा या विषयाचा व्यासंग पाहून पुढच्या वेळी आमंत्रित वक्ते म्हणून तुम्हाला बोलवण्यासाठी नियोजन समितीला कळवलं आहे. याल ना? सुर्यावहिनींना आणलंत तर उत्तमच.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
गुरुवार, 02/05/2015 - 13:21
नवीन
इतरपण बर्याच आहेत की. किस किस को ले के जावोगे बॅटमॅण..?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/05/2015 - 13:33
नवीन
एक सूर्यावहिनी काफी है.
आणि हो, मी म्हणतोय ती ही सातासमुद्रापारवाली नव्हे तर गुर्जरदेशनिवासिनी आहे. ;)
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 02/05/2015 - 12:19
नवीन
भुलभुलैया मधल्या मॉन्जुलिकाचं मेल व्हर्जन असल्यासारखं वाट्टंय!!
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
गुरुवार, 02/05/2015 - 13:13
नवीन
मकाले आणि तत्सम इतर उच्च प्रतिभावंतांचा विसर पडला होता की माहितीच नव्हती असा प्रश्न पडलाय. ( अन्यथा या साहित्य संमेलनस बालसाहित्य संमेलन म्हणावे लागेल असे सखेद नमून करतो.. )
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 02/05/2015 - 13:21
नवीन
हे मकाले काय आहे?
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
गुरुवार, 02/05/2015 - 13:22
नवीन
अर्रे ये "मकाले" (मराठे कथालेखक) को नही जानता ?? सायबर कॅफे आणि सविताच्या कथा इथे मिपावर पण प्रसिद्ध आहेत की. तुमी मिसल्या काय त्या ? ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 02/05/2015 - 13:26
नवीन
जरा व्यनीमधून प्रकाश पाडता काय :(
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 02/05/2015 - 13:41
नवीन
मला वाटतं मकाले नसून मकले म्हणायचं असावं.
तुम्हाला माहीत नाहीत मकले? मग केबलचे फटके खायला तयार रहा.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »