दुष्काळ आणी पॅकेजः काही किस्से १
Book traversal links for दुष्काळ आणी पॅकेजः काही किस्से १
प्रसंग १-
वेळः २ महिण्यापुर्वीची.
स्थळ:एका बँक मॅनेजरची केबिन.(मॅनेजर रिटायमेंटला वर्ष कमी असताना नागपुरातुन थेट बदली होऊन लातुरात आलेला)
ग्राहक-आत येउ का सायेब
मॅ- या
ग्रा- सायेब आपल्याला ते हे पीक कर्ज पायजे.
...मॅनेजर कागदपत्र पाह्तो.
मॅ- किती कर्ज पाहिजे ?
ग्रा- द्या कि एक लाख काय.
मॅ- एक लाख !! काय करणार एवढ कर्ज घेउन ? फेडण होणार आहे का ?
ग्रा- सायेब आता तुमच्या पासुन काय लपवायच,एका लाखापेकी ३६,००० ची म्हस घ्याची. १४,००० चा कडबा घ्याचा.
आन राहीलेला पन्नास तुमच्या बँकेत यफडी करु. काय !!
मॅ- आहो पण हे परवडणार आहे का तुम्हाला.पिककर्ज वर्षभरात फेडाव लागेल ७% व्याजासहित कळतय का ?
ग्रा- ते कळतय ओ आपल्याला. आता तुमास्नी कळत नसेल तर सांगतो.
आता ३६,००० ची म्हस घेतली.म्हस २०० दिवस रोज ५ लिटर दुध देते. दुधाचा भाव ४० रु.लिटर.
मंजे रोजचे २०० रु.झाले. २०० दिवसाच उत्पन्न ४०,००० झाल,
नंतर म्हस गाभण राहील,तीला रेडकु झाल तर ईकुन टाकायच ५,००० ला.मंजे वर्सभरात म्हसन ४५,००० दिल कमवुन.
आता तुमच्या बँकेतील यफडी केलेल्या पयशाच बोलु.बँक ९ % याज दिल.मंजे ५०,००० ला ४,५०० याज मिळल. बाजपता करा ठोक हिसोब,काय!!!
मॅ- आता ते पण तुमीच सांगा.
ग्रा-सायेब म्हसीन ४५,००० दिले.बँकेच्या यफडी ने ५४,५०० दिले टोटल झाली कि ९९,५०० काय.
वरुन म्ह्स बि राहिली कि घरात बोनस म्हनुन,काय!!
मॅनेजर - पण तुम्हाला व्याज भराव लागेल कि पिककर्जावर ७,००० त्याच काय?
ग्रा- ह्यां... नियमीत कर्ज फेड केली तर सरकार निम्म याज भरतय की.. आणी..
मॅ- आणी काय आता ?
ग्रा- आणी दुस्काळ जाहीर झाला तर याज बी माफ व्हईल.आन प्यॅकेज आल तर संमद कर्ज बी माफ व्हईल. काय!!!!!
मॅ-*shok*
==========================================================================
प्रसंग २-
स्थळ-तलाठी कार्यालय
वेळ-पंधरा दिवसापुर्वीची..
शेतकरी-मालक नुस्कान लय जास्त झालय आन तुमी पंचनामा लय कमी केलाय जरा वाढवा की पिकवीम्याची रोक्कम ?
तलाठी-अरे धोंडीबा,मी काय करणार सरकारी निकषात ६०००/- मिळतील तुला. सरकार ठरवल ते घ्याच.
शेतकरी- तेच म्हणतो आहे..सरकार काय बांधावर येऊन बघणार हाय का किती नुस्कान झाल ते,तुमीच आमच सरकार
बघा काय तरी करा..जरा चार पयशे सुटु द्या गरीबाला.
तलाठी- हम्म.. हे बघ आता मी काय सांगतो ते आईक.. तुझ्या पीकाच्या नुकसानीचा पंचनामा मी बदलुन देतो.
६,०००/- च्या जागी १०,०००/- करतो पण ८,०००/- तुझे आणी २,०००/- माझे. पटतय का बोल ?
शेतकरी- मालक २ मंजे जास्त झाल जरा कमी करा..
तलाठी-हे बघ धोंडीबा, हे पीकविम्याची रक्कम आहे. पुढे दुष्काळ जाहीर झाला तर आणखीन मदत मिळेल.
त्या पॅकेज मधे करु कमी जास्ती.....
.
.
.शेतकरी गपचुप १०,०००/- पंचनामा घेऊन बाहेर पडतो.
============================================================================
प्रसंग ३-
स्थळ - आमचा नेहमीचा कट्टा.
वेळ - विधानसभेत ४ दिवसापुर्वि दुष्काळावर चर्चा चालु होती तो दिवस.
एक- देवा काय वाटत...यावेळेस कितीच पॅकेज जाहीर व्हईल ?
दुसरा- आर सरकारी तिजोरित खडखडाट हाय म्हन..काय जास्त अपेक्षा नाय ठेवाच्या आपण..सोयाबीनं माती खाल्ली यंदा.
तिसरा- आर चांगल पाच धा हाजार कोटीच जाहीर व्हायला पायजे..म्या तर लाईट बिल भरला नाय आजुन
यावर्सीच..च्या आयला....दणकुन पॅकेज नाय मीळाल तर आपुन हाय आन हे सरकार हाय बघुन घ्यु..
=============================================================================
( लेखाद्वारे कुणाच्या भावना दुखावायचा हेतु नाही..गावपातळीवर परिस्थीति भिषण आहे..)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseमदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseमदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseआत्महत्येचे उदात्तीकरण थांबविले पाहिजे. सिर सलामत तो पगडी पचास हे बिंबविले गेले पाहिजे. आणि आत्महत्येची धमकी देऊन कोणी काही कार्यभाग साधायचा प्रयत्न केला तर त्याचा उदोउदो सुद्धा करणे बंद केले पाहिजे.१००% सत्य ! मात्र हे होणे जरा कठीण आहे... कारण त्यावरच काही जणांचा ब्रेड-बटर (आणि जाम सुद्धा) अवलंबून आहे :(