Winter Photography २०१४ - कवडी पाट - भाग १
Previous Albums
सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १
सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग २
कवडी पाट फोटोग्राफी - भाग १
दिनांक - ०८ डिसेंबर २०१४
स्थळ - कवडी पाट ( लोणी-काळभोर टोल नाक्याजवळ, पुणे )
अंतर - चिंचवडवरून येरवडा-मार्गे किमान ३२ किमी.
जवळची खुण - पुण्याकडून जाताना सोलापूर हायवेवर हडपसर पासून पुढे जावे. लोणी काळभोर टोलनाक्यानंतर डाव्या बाजूला 'मनाली' रिसॉर्ट लागते. तिथेच कवडी पाट असा बोर्ड आहे. १.५ किमी आत जावे लागते.
सुचना - 'कवडी पाट' ला पाटाच्या शेजारी दलदल आहे जरी जमीन दिसत असली तरी माती खुप मऊ आहे.तेव्हा पाण्याशेजारी फिरताना जरा जपून!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मिपाकरांनो,
बर्याच दिवसांनी धागा टाकतोय. नांदेडीअन यांनी यापुर्वी टाकलेल्या धाग्यामूळे 'कवडी पाट' ला जायची इच्छा झाली त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांनी काढलेले फोटो पाहूनच 'कवडी पाट' ला जायचे निश्चित केले होते. ०६ तारखेलाच मी 'चौकटराजे' ना सांगून ठेवले होते की आपण रविवारी किंवा सोमवारी जायचे आहे. त्यांची स्विकृती मिळालीच कारण फोटोग्राफी मी त्यांच्याकडूनच शिकलो असल्याने त्यांनी अशी नवीन ठिकाणी फोटोग्राफी करण्याची संधी नाकारली असती तरच नवल वाटले असते. मी 'वल्ली' ना सुद्धा विचारले परंतू त्यांचे हापीस असल्या कारणाने ते येऊ शकले नाहीत. मी मात्र रविवारी OT करून सोमवारी रजा घेतली जेणेकरून रविवारची गर्दी मिळणार नाही.
ठरल्याप्रमाणे मी व चौकटराजे सकाळी ५ ला चिंचवडवरून निघालो. थंडी खुप असल्याकारणाने 'माझ्या' सारखा हेल्मेटसक्तीच्या ठाम विरोधात असणारा माणूसदेखील हेल्मेट घालून निघाला हे नवल. *biggrin* चौकटराजेनी पण हेल्मेट घेतले होते ज्यामूळे कवडी ला पोचेपर्यंत तब्बल ३०-३५ वेळा चौकटराजेनी मला गाडीवरच ठो-दे-ठो (Head bumps) केले. *lol* माझी बाइक Yamaha FZ-16 आहे ज्यावर मागे बसणार्या माणसाला थोडा त्रास होतो. बहूतेक चौकटराजे म्हणूनच मला ठो देत असावेत असा पुसटसा विचारही मला एकदा येऊन गेला. *biggrin*
लोणी-काळभोर च्या टोलनाक्यानंतर डाव्या बाजूला एक चहाची टपरी आहे तिथे आम्ही चहा घेतला. तो चहा पिताना मिळालेला आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. *smile* तिथून लगेच पुढे 'मनाली रिसॉर्ट' नंतर लगेच डाव्या बाजूल कवडी पाट कडील वाटचाल सुरू केली. आत जाईपर्यंत वाटतही नव्हते की एव्हडी छान जागा असेल. परंतू तिथे पोहचल्यावर इतक्या लांब आल्याचे चीज झाल्याचे समाधान मिळाले.
साधारण ६.३० ला आम्ही कवडी पाट ला पोचलो. मी व चौकटराजे नी फोटोग्राफी सुरू केली. सुरवातीला सुर्य उगवला नसल्याकारणाने आम्ही उगवत्या सुर्याच्या प्रकाशाचे फोटोच काढणे पसंत केले.
फोटो क्र. 1 - सुर्योदय

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/100
ISO - ISO-80
Camera Mode - Manual
फोटो क्र. 2 - सुर्योदय

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1600
ISO - ISO-100
Camera Mode - Manual
फोटो क्र. 3 - सुर्योदय

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-80
Camera Mode - Manual
तेव्हड्यात सुर्योदयाचा Warm लाईट जाणवला. चौकटराजेनी पुढे चलूया अशी खूण केली.
फोटो क्र. 4 - चौकटराजे

Camera - Mobile Camera
Shutter Speed - 1/170
ISO - ISO-80
Camera Mode - Manual
तिथून पुढे गेल्यावर आम्हाला एक बदक दिसले. बदके खुप प्रकारची होती परंतु खुपच कमी बदके आमच्या कॅमेर्याच्या रेंज मध्ये होती. बाकीची खुपच लांब असल्याकारणाने आम्हाला त्यांचे फोटोज मिळाले नाहीत.
फोटो क्र. 5 - Ruddy Shelduck किंवा ब्राह्मणी बदक

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-800
Camera Mode - Manual
फोटो क्र. 6 - Ruddy Shelduck किंवा ब्राह्मणी बदक

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-320
Camera Mode - Manual
फोटो क्र. 7 - Ruddy Shelduck किंवा ब्राह्मणी बदक

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-100
Camera Mode - Manual
फोटो क्र. 8 - Spot-billed Duck किंवा प्लवा बदक/धनवर

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-100
Camera Mode - Manual
फोटो क्र. 9 - Common Sandpiper किंवा तुतारी

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-400
Camera Mode - Manual
फोटो क्र. 10 - Common Sandpiper किंवा तुतारी

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-320
Camera Mode - Manual
फोटो क्र. 11 - Common Sandpiper किंवा तुतारी

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-1200
Camera Mode - Manual
फोटो काढणे सुरू असतानाच चौकटराजेनी हाक मारली. त्यांना खंड्या पक्षी दिसला होता. त्याचा फोटो.
फोटो क्र. 12 - White Throated Kingfisher किंवा खंड्या

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-320
Camera Mode - Manual
चौकटराजे पुलावर उभे राहून मी काढत असलेल्या बदकांचे फोटो काढत होते. तेव्हा मलाही त्यांचा फोटो घ्यावासा वाटला. कारण कुठल्याही फोटोग्राफरला त्याचा स्वत:चा फोटो ( तेही फोटो काढत असताना) आवडतोच तोही फोटो काढण्यात बिझी असताना.
फोटो क्र. 13 - चौकटराजे फोटो काढण्यात Busy असताना.

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/20
ISO - ISO-80
Camera Mode - Manual
फोटो क्र. 14 - Indian pond heron किंवा भुरा बगळा

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/100
ISO - ISO-200
Camera Mode - Manual
हळूहळू ऊन वाढायला लागले होते. साधारण ८.४५ वाजले होते. आता घरी जाताना गर्दी नक्कीच मिळणार अशी कल्पना होती आणि मलाही दुपारी एका कामाला जायचे असल्या कारणाने आम्ही हळूहळू परतीला लागलो. येताना वाटेत चौकटराजेना एक Green Bee Eater दिसला. त्याचे फोटो.
फोटो क्र. 15 - Green Bee Eater किंवा रानपोपट

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/200
ISO - ISO-100
Camera Mode - Manual
फोटो क्र. 16 - Green Bee Eater किंवा रानपोपट

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/200
ISO - ISO-80
Camera Mode - Manual
फोटो क्र. 17 - Green Bee Eater किंवा रानपोपट

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/200
ISO - ISO-80
Camera Mode - Manual
फोटो क्र. 18 - Green Bee Eater किंवा रानपोपटाचा Cropped फोटो

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/200
ISO - ISO-100
Camera Mode - Manual
तिथून आम्ही घरी जायला निघालो. वाटेत एखाद्या हॉटेलमध्ये थांबून पोटपूजा करायची असे ठरले. त्याप्रमाणे पुण्याकडे जाताना लोणी-काळभोर टोल नाका संपल्यावर साधारण ५ मिनिटांवर ’जोशी वडेवाले’ वर थांबलो. पहिल्यांदाच आम्ही वडा-सांबार सोबत पाव आणि मिसळीतला सॅंपल अशी डिश पाहिली. शक्यतो वडा-सांबार सोबत गोड चटणी आणि सांबार असते. परंतू येथे पाव आणि मिसळी सोबतचे सॅंपल होते.
फोटो क्र. 19 - वडा-सांबार

Camera - Mobile Camera
Shutter Speed - 1/33
ISO - ISO-1/157
Camera Mode - Normal
वडा-सांबार खाणे सुरू असतानाच चौकटराजेनी विचारले की 'रामदरा' ठिकाण येथून जवळच आहे. जाऊया का ? अंतर फक्त ९-१० किमी होते. मग खादाडी झाल्यावर आम्ही परत कवडी पाट कडे निघालो. कारण कवडी वरून सरळ पुढे गेल्यावर हे ठिकाण आहे. कवडी वरून साधारण ८ किमी पुढे गेल्यावर एक नदीवरील फ्लायओव्हर आहे. तिथून उजवीकडे वळल्यावर सरळ साधारण २-४ किमी जावे लागते. तिथेच हे शांत ठिकाण आहे. वेळेअभावी जास्त फोटोज वगॆरे काढले नाहीत. आणि तसही तिथे नैसर्गिक पक्षी कमी लव्ह बर्ड्स जास्त होते फक्त चौकटराजांचा एक फोटो काढला.
फोटो क्र. 20 - चौकटराजे

Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/400
ISO - ISO-80
Camera Mode - Manual
रामदर्यावरून साधारण १०.३० वाजता चिंचवडकडे निघालो. कवडी पाट एव्हडे आवडलेय की अजून एक ट्रिप नक्कीच करणारे.
- - - समाप्त - - -