Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आडनाव रिटायर करावे काय?

च
चिन्मय खंडागळे
Sun, 01/19/2014 - 18:34
🗣 76 प्रतिसाद
'जात नाही ती जात' हे वाक्य क्लिशे होण्याइतकं वापरलं गेलं आहे तरी त्यातलं सत्य कमी होत नाही. किंबहुना अशी वाक्यं क्लिशे होण्यामागे ती नको तितकी खरी असतात, हेच खरं कारण असतं. याचा अर्थ आपण जातिनिर्मूलन करण्याचा प्रयत्नच सोडून द्यावा असा नाही, पण जातीपाती आपल्या समाजात एवढ्या घट्ट चिकटून राहण्यासाठी जे कॅटॅलिस्ट आहेत, त्यांच्यापैकी जमतील तेवढे हळूहळू बाजूला काढणं करता येऊ शकतं. आपल्या समाजाची एक खासियत सांगता येईल की, आडनावावरून जात ओळखण्यात आपण सर्व तरबेज असतो. कुणीही नवी व्यक्ती भेटली की, तिच्या आडनावावरून, आपल्या डोक्यात तयार असलेल्या आडनावांच्या एन्सायक्लोपीडियातून आपण पटकन त्याची जात हुडकतो आणि काही गुणवैशिष्ट्यं त्या व्यक्तिला बहाल करून टाकतो. मग ते स्टिरिओटाईप्स घालवण्याची जबाबदारी त्या व्यक्तिची. आडनाव ही संकल्पना आपल्याकडे केव्हा आली, हे मला माहीत नाही. कदाचित परकीय आक्रमणांनंतर आली असावी. पौराणिक वाङ्मयातल्या कुठल्याही व्यक्तिरेखेला आडनाव असलेलं पाहिलं नाही. प्रि-इस्लामिक भारतातल्या कुठल्या ऐतिहासिक व्यक्तिचं आडनाव ऐकलेलं आठवत नाही. शिवकालात प्रत्येक व्यक्तिचा उल्लेख व्यवस्थित आडनावासहित केलेला आढळतो. अर्थात माझं इतिहासाचं ज्ञान अति तोकडं असल्यामुळे याविषयी फारसं काही ज्ञान मला पाजळता येणार नाही, जाणकार अधिक प्रकाश पाडू शकतील. एखाद्या व्यक्तिची किंमत जेव्हा 'तो' कोण आहे, यापेक्षा 'तो कोणत्या कुळातला आहे' यावर अवलंबून होती, त्या काळात आडनाव ही संकल्पना महत्वाची होती हे खरं. आजच्या काळात 'आडनाव' या संकल्पनेपासून फायद्यांपेक्षा तोटेच जास्त होत असावेत का? भारतात सर्वत्र आडनाव ही संकल्पना वापरली जात नाही, याची मला जाणीव आहे. दक्षिण भारतात आडनाव वापरत नाहीत. भारताबाहेर पाहिलं तर काही समाजात आडनाव हे व्यक्तिच्या नावाच्याही आधी येतं. (उदा. कोरिया, चीन इत्यादि आशियायी देश) तर कुठे नुसती तीन नावं पुरत नाहीत म्हणून महंमद अमुक बिन् तमुक बिन् फलाणुद्दिन असं आज्या-पणज्याचंही नाव येतं. एकंदरीत नाव, मधलं नाव, आणि आडनाव हे केवळ व्यक्तिला आयडेंटिफाय करणारे प्लेसहोल्डर्स आहेत आणि ते कसेही वापरलेले चालतात. आपण आपल्या समाजापुरता विचार करू. समजा आडनाव ही कन्सेप्टच बाद करून टाकली तर? किंवा त्याऐवजी काही दुसरा पर्याय वापरला तर? दुसरा कुठला पर्याय, याचा विचार करण्याआधी 'हे सगळं कशासाठी? आडनावात इतकं वाईट काय आहे?' हा प्रश्न सर्वात आधी येईलच. आडनावांचा सर्वात मोठा तोटा म्हणजे वर दिल्याप्रमाणे, आडनावावरून होणारं डिस्क्रिमिनेशन, हा आहे. आता वैयक्तिक पातळीवर कदाचित हा काही मोठासा विषय नाही, पण सामाजिक दृष्ट्या याचे तोटे अनेक आहेत. निवडणूकीत कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं, हे बरेच लोक त्याच्या आडनावावरून ठरवतात. एखाद्या कंपनीत एखाद्या पदासाठी पन्नास-साठ अर्ज आले, तर त्यातले कोणते शॉर्ट-लिस्ट करायचे हे ठरवणार्‍याचं लक्ष अर्जदाराच्या आडनावाकडे जात नसेलच, असं आपण म्हणू शकत नाही. अर्थात आडनाव गेल्याने एका दिवसात जातीभेद गायब होतील, असं समजणं मूर्खपणा ठरेल, पण जातीपाती प्रपोगेट करायला आडनाव या संकल्पनेची मदत होते, हे निर्विवाद आहे. जातिनिर्मूलनाकडे हळूहळू का होईना, आपण सरकत जात आहोत. त्याच्या आड येणारं हे आडनाव बादच का करून टाकू नये? काही लोक म्हणतील, आमचं आडनाव आम्हाला प्रिय आहे, ते बाद करणारे तुम्ही कोण टिक्कोजीराव? आणि, या मुद्द्यात तथ्य आहे. बर्‍याच लोकांना आपलं आडनाव आणि त्याच्याबरोबर मोफत येणारी ग्लोरी प्रिय असते. 'निंबाळकरांचं रक्त आहे म्हणावं!'... 'महाराजांच्या वेळपासूनची हिस्ट्री आहे'...'पुरंदरच्या लढाईत...' वगैरे वाक्यं म्हणत पूजेत ठेवलेली गंजकी तलवार आणून दाखवली जाते. हे करताना आपण सांगली नगरपालिकेच्या मूषकनिर्मूलन विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी आहोत हे आठवायची गरज नसते. अग्निहोत्री असल्याचा अभिमान बाळगणार्‍याच्या घरात चारमिनारखेरीज कुठला अग्नि पेटत नसेल, आणि 'धर्माधिकारी' म्हणवून घेणारा धर्माचरण करत असेलच, असं नाही. पण तरीही आपलं आडनाव टाकून द्यायची कोणावर जबरदस्ती नाही, म्हणून वरच्या प्रस्तावात थोडासा बदल करतो. *सरकारी पातळीवर* आडनाव बाद करून टाकावे. आडनाव ही गोष्ट धर्म, कुलाचार, कुलदैवत, गोत्र, प्रवर यांप्रमाणे वैयक्तिक असावी. अधिकृत सरकारी कामकाजात कुठेही आडनावाची गरज पडू नये. बरं मग आडनावाला पर्याय काय? एक म्हणजे काही पर्याय असण्याचीच गरज नाही. वर म्हटल्याप्रमाणे फक्त आपलं नाव आणि वडिलांचं नाव वापरता येईल (दाक्षिणात्यांसारखं) किंवा, आणि माझ्या मते आडनाव गाळण्याचा सर्वात चांगला फायदा, म्हणजे आडनावाऐवजी आईचे (प्रथम) नाव वापरता येईल. पासपोर्ट, रेशनकार्डवर आडनावाऐवजी आईचं नाव आलं तर काय बिघडेल? सध्या आईच्या नावाला कुठे काही स्थान नसतं. स्त्री नवर्‍याकडे जाते तीच आपलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव टाकून. म्हणजेच जणू आपलं पूर्वीचं सर्व अस्तित्व पुसून टाकून. ज्या काळात स्त्री ही 'मालमत्ता' होती त्या काळासाठी हे सुसंगतच आहे, पण आता?... पेपरात कधी बातमी येते 'दिपक बाबुराव पारधी याचे दैदिप्यमान यश. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपल्या समाजातील पहिला डॉक्टर' वगैरे. दिपकबरोबर पिताश्रींचंही नाव झळकतं. मग भले बाबुरावसाहेब अक्खा टायम दारू टाकून पडत असतील आणि संसाराचा सगळा गाडा पार्वतीबाईने चार ठिकाणी घरकाम करून ओढला असेल. पण तिच्या नावाची, तिच्या अस्तित्वाची कुठेही नोंद नाही. मग? आडनावाऐवजी आईचं नाव वापरणं सध्याच्या काळाशी जास्त सुसंगत ठरेल काय?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 14970 views

🗣 चर्चा (76)
आ
आनन्दा Sun, 01/19/2014 - 18:42 नवीन
ह्म्म..
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 01/19/2014 - 19:14 नवीन
आडनाव सोडून देउन, आई वडील दोघांचे नाव लावलं तर जास्त चांगलं... किंवा सगळीच उपनामे सोडून देउन फक्त स्वतःचे नाव वापरलं तर अजून उत्तम.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 01/19/2014 - 20:19 नवीन
काह्ही उपेग व्हायचा नै माऊ! उदा. समोर बसलेल्या जमावापैकी दहा रेवत्या असल्या तर कोणाबद्दल कोण काय बोलतय हे समजणार नाही (त्याच्या फायद्याबद्दल आत्ता नको बोलायला). मग तुम्ही म्हणाल की गावाची नावं लावा. मग मी रेवती पुणे असे सांगितले की चर्चा धडाडून पेटतील. ;) आणखी मज्जा. शेवटी आडनावावर यायलाच लागणार. ;)
  • Log in or register to post comments
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर Sun, 01/19/2014 - 19:15 नवीन
छान उत्तम विचार आहेत. पुलेशु
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Mon, 01/20/2014 - 14:15 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sun, 01/19/2014 - 19:17 नवीन
तुमचं खंडागळे हे आडनांव खंडाळा घाटात टाकून येऊन मग लेख लिहायला हवा हो ;) लेख आवडला.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Mon, 01/20/2014 - 06:40 नवीन
तेच म्हंतो म्या. निदाम मिपावर आयडी घेताना बिन्-आडनावाचा घ्यायचा की. ओ खंडागळे साहेब, बदला ऐडी
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 01/20/2014 - 10:19 नवीन
यांचं म्हणजे आपण हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला अशी गत आहे. आधी आयडी बदला म्हणाव स्वत:चा!!
  • Log in or register to post comments
च
चिन्मय खंडागळे Mon, 01/20/2014 - 13:22 नवीन
तुमच्या प्रश्नामागचा टोन हीन असला तरी प्रश्न चांगला आहे. आडनाव नको म्हणून सांगणार्‍याने आयडीत स्वतः आडनाव का लावावं? एक म्हणजे, मी आधी बिनआडनावाचाच आयडी काढला होता. पण तो अ‍ॅप्रुव झाला नाही :( आडनाव नसेल तर बहुधा मालकांना डुप्लिकेट आयडी वाटत असावा ;) दुसरं म्हणजे या गोष्टी व्यक्तिगत पातळीवर कोणी करायच्या ठरवल्या तरी जोपर्यंत अधिकृत पातळीवरून त्याला मान्यता मिळत नाही तोवर त्याला काही अर्थ राहत नाही, मग तुम्ही तुमचं आडनाव खंडाळ्याच्या घाटात फेकून या नाहीतर पन्हाळ्याच्या कोटात. मी पासपोर्टच्या अर्जात माझ्या आडनावाच्या जागी माझ्या आईचं नाव टाकून अर्ज केला तर मला फ्रॉड समजून आत टाकायचाच चान्स जास्त आहे.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 01/20/2014 - 13:25 नवीन
>>मी पासपोर्टच्या अर्जात माझ्या आडनावाच्या जागी माझ्या आईचं नाव टाकून अर्ज केला तर मला फ्रॉड समजून आत टाकायचाच चान्स जास्त आहे. यातच तुमच्या लेखाचं उत्तर आहे असं नाही वाटत का?
  • Log in or register to post comments
च
चिन्मय खंडागळे Mon, 01/20/2014 - 13:35 नवीन
>>>>मी पासपोर्टच्या अर्जात माझ्या आडनावाच्या जागी माझ्या आईचं नाव टाकून अर्ज केला तर मला फ्रॉड समजून आत टाकायचाच चान्स जास्त आहे. >>यातच तुमच्या लेखाचं उत्तर आहे असं नाही वाटत का? अर्थातच! मी पासपोर्टच्या अर्जात माझ्या आडनावाच्या जागी माझ्या आईचं नाव टाकून अर्ज केला तरी जोवर सरकारी पातळीवर त्याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत मला फ्रॉड समजून आत टाकायचाच चान्स जास्त आहे.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Mon, 01/20/2014 - 14:22 नवीन
जोवर सरकारी पातळीवर त्याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत म्हणजे नक्की कशाला मान्यता मिळत नाही? कारण आडनाव बदलायला मान्यता आहे एवढं नक्की. त्यासाठी काही नियम आहेत का? (आईचे नाव नसावे इ.) जाताजाता - माझ्या एका मित्राने आडनाव बदलून घेतले होते. कारण काही सांगायला तयार नव्हता. दोन्ही आडनावे एकाच जातीची होती.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Mon, 01/20/2014 - 14:44 नवीन
माझ्या आयडी मध्ये माझे उपनाम दर्शवलेले नाही. तशीच अजुन भरपूर उदाहरणे मिपावर देता येतील.
  • Log in or register to post comments
न
नेहा_ग Sun, 01/19/2014 - 19:24 नवीन
चांगला विचार आहे
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 01/19/2014 - 19:45 नवीन
सुनीती सुलभा रघुनाथ (सुनीती सु.र.) ; संजय मंगला गोपाळ (संजय मंगो) अशी काही नावं चटकन आठवली. (माझा अभ्यास नाही, काही लोकांच्या बोलण्यातून आलेलं) कर्नाटक, तामिळनाडू मध्ये वेगळा प्रकार असतो. (कधी गावाचं नाव तर कधी जातीचं नाव, कधी वडलांचं नाव असं वेगवेगळं असतं) यु पी वाले सुद्धा वडलांचं नाव न लावता फक्त नाम उपनाम (आडनाव) लावतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/19/2014 - 19:48 नवीन
मला पटला.... पण भारतीय संविधानाला हे मंजूर होईल का?
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sun, 01/19/2014 - 20:01 नवीन
शी! कसला घाण विचार आहे तुमचा. धोंडा पडो तुमच्या लक्षणाला. १) सर्व प्रथम भावी पंतप्रधानाचे आडनाव जाईल.मग आमची जनता कोणाला निवडून आणणार मग? कारण जनतेला नेहरू किंवा गांधी या शिवाय दुसरे आडनाव दिसतही नाही आणि चालत हि नाही. मनमोहन सिंगांनी सांगीतल्याप्रमाणे होणार "भारताचे काही खरे दिसत नाही हो" २) जनतेला आरक्षण कसे मिळेल हो? मग सर्व लोक म्हणतील मी BC/OBC! आणि मग राजकीय लाभ उठवण्याच्या सर्व प्रयत्नावर पाणी फिरेल हो! 3) एक गठ्ठा मतांवर डोळा लावून बसलेले सर्व राजकारणी बाजूला फेकले जातील.आणि मग नवीन लोकांना विकासाची संधी मिळालेली चालेल तुम्हाला? आपला मिपास्नेही :आयुर्हीत
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 01/19/2014 - 20:14 नवीन
लेख पटला. अंमलबजावणी कशी होणार.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sun, 01/19/2014 - 20:17 नवीन
कुणीही नवी व्यक्ती भेटली की, तिच्या आडनावावरून, आपल्या डोक्यात तयार असलेल्या आडनावांच्या एन्सायक्लोपीडियातून आपण पटकन त्याची जात हुडकतो आणि काही गुणवैशिष्ट्यं त्या व्यक्तिला बहाल करून टाकतो.
उदा: चिन्मय खंडागळे, मराठा, ९६ कुळी (चुभुद्याघ्या), खंडागळ्यांचं रक्त, पंचवीस एकर बागायती जमीन, मुख्य व्यवसाय शेती, पेट्रोल पंप, साखर कारखाना, बियाण्यांची सोल एजन्सी वगैरे, उप व्यवसाय आयटी, प्रेमाचे विषय - तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, बुलेट, स्कॉर्पीओ वगैरे वगैरे...
  • Log in or register to post comments
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर Mon, 01/20/2014 - 02:32 नवीन
स्कॉर्पीयो गेली राव ,आता ही लोकं डस्टर ईकोस्पोर्ट वगैरे वापरायला लागलीत.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 01/20/2014 - 04:24 नवीन
"हि लोकं?" आपण सर्व एकच "लोकं" आहोत असा माझा समज आहे.
  • Log in or register to post comments
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर Mon, 01/20/2014 - 05:06 नवीन
dont change the locus of discussion
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Mon, 01/20/2014 - 07:28 नवीन
locus नाही हो फोकस focus. आधी स्पेलिंगा लिवायला शिका की न्यिउट्रल गिअर वाले.
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Mon, 01/20/2014 - 08:48 नवीन
नाय हो. त्येन्ला त्यांच दुस्र नावं locust म्हनायच आसंल. कायबाय ल्हिवून आप्ल्याक्डं सग्ळ लक्ष ओडून घ्याची त्येंची न्हेमिचि सवय हायच की.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 01/20/2014 - 17:47 नवीन
सुरवात तर तुम्हीच केलीत न फ़िलोसोफ़ेर साहेब
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Sun, 01/19/2014 - 20:20 नवीन
लेख एकदम पटला. आमचे एक स्नेही त्यान्च्या आडनावामुळे आणि त्या अनुशन्गाने होणार्या जातीय भेदभावामुळे ईतके त्रस्त झाले होते की त्यानी ते बदलुन घेतले.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 01/19/2014 - 22:46 नवीन
आडनाव रद्द करणे हा मूर्खपणा आहे. बीहार मध्ये जयप्रकाशानी आडनाव टाकुन द्यायला साम्गितल्यामुळे बरेचजण स्वतःच्या नावपुढे कुमार लावु लागले. त्यामुळे विनय कुमार , विवेक कुमार अशा नावाम्ची बरीच संख्या वाढली. त्यामुळे व्यक्ती ओळखणे कठीण जावु लागलय. या उत्तरभारतीय लोकांचा अजुन एक विचित्रपणा म्हणजे विश्वनाथप्रताप असे नाव असेल तर ते त्याची आद्याक्षरे वी पी अशी करतात. एखाद्याचे नाव जर प्रेमकुमार रघुनाथ शर्मा असे असेल तर ते त्याचे नाव "पी के शर्मा:" असे करतात. महाराष्ष्ट्र , गुजरात मध्ये हेच नाव पी आर शर्मा असे केले जाते.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 01/20/2014 - 00:34 नवीन
पण भारतात ज्या राज्यांमध्ये आडनांवं लावली जात नाहीत किंवा जिथे असलेली आडनांवं टाकून दिली गेली, तिथली जातीयता नक्की नाहिशी झालीये का? हो, नाहीतर उगाच ष्टांपपेपरचा भुर्दंड!!!!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 01/20/2014 - 07:47 नवीन
डांबिस हे खानदानाचं नाव का जात का आणखी काही? -हलकाफुलकापणपि-डांअसल्यानंघाबरट मोड ;)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 01/21/2014 - 06:15 नवीन
दोन्ही!! :) पण आता तुम्हाला ते खुपत असल्याने "येलोनॉटी" हे आम्हाला मुक्तसुनीताने दिलेले आणि आडनांव नसलेले नांव आम्ही धारण करायच्या विचारात आहोत!!!! :) पण एक प्रश्न सिरियसली. ज्यांना आपली आडनांवं अडचणीची वाटतात त्यांनी ती खुशाल बदलावीत, कोणाची काहीही हरकत असू नये. पण ज्यांना आपल्या आडनांवाबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही त्यांनी आपली आडनांवं का बदलायची/ गाळायची?
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 01/20/2014 - 11:20 नवीन
पि.डां.शी सहमत. बाकी तुमचे गाव कुठले? या निरुपद्रवी वाटणार्‍या प्रश्नामागेही जात असु शकते (संदर्भ-आमचा बाप आणि आम्ही-नरेंद्र जाधव)
  • Log in or register to post comments
च
चिन्मय खंडागळे Mon, 01/20/2014 - 13:26 नवीन
मी धाग्यात लिहिलेलं पुनः लिहितो. आडनाव टाकून जाती एका दिवसात गायब होणार नाहीत. पण आडनावामुळे जात प्रपोगेट होते, हे खरं की नाही?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/21/2014 - 05:40 नवीन
एकदम मान्य. आमच्या एका वर्गमित्राने अनुसूचित जातीच्या आरक्षणातून एम बी बी एस ला प्रवेश घेतला. त्यानंतर शल्यशास्त्रात द्विपदवी(एम एस)ला प्रवेश सुद्धा आरक्षणातून घेतला. एम एस झाल्यावर व्यवसाय सुरु केला तर त्यांच्याच जातीचे लोक त्याच्याकडे येईनात. "हा आपल्यापैकीच आहे याच्या कडे ऑपरेशन नको. किती येतंय काय माहिती?" असे बोल त्याने स्वतः आम्हाला सांगितले. शेवटी एक दिवस त्याने शपथपत्र बनवून महाराष्ट्र शासन राजपत्र (ग्याझेट) मध्ये आपले आडनाव बदलून एक उच्च जातीय ब्राम्हणांचे आडनाव लावून घेतले.(दोन्ही आडनावे मुद्दामच लिहिली नाहीत.) आपल्या रुग्णालयाचे नाव सुद्धा बदलले. आता त्याचा व्यवसाय सुरळीत चालला आहे.
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Tue, 01/21/2014 - 05:50 नवीन
कठीण आहे. म्हणजे जातीयता तथाकथित उच्चवर्णीय कमीच पाळतात आणि हे लोकच जास्त पाळतात असे दिसते. सहज अवांतरः आम्ही लहान असताना आम्ही ज्या डॉक्टरांकडे जायचो त्यांचं नाव कदम होतं. आम्ही फार लहान असल्याने ते कॅटेगरीमधले होते की नाही विचारलं नाही पण आजूबाजूच्यांकडुन ऐकलं त्यावरुन ते दलित असावेत. आमच्या कॉलनीत कॉस्मॉपॉलिटन वस्ती होती. का पासून क पर्यंत आणि गु पासून आ(साम) पर्यंत सगळ्या प्रांतातले लोक होते. अनेक ब्राह्मणही होते. त्या डॉक्टरांची ख्याती अशी की आमच्या शेजारच्याच इमारतीतले जोशी आडनावाचे एक आजोबा म्हणायचे "कदमाचे औषध खिशात असले की अर्धे बरे वाटते" - आणि माझ्या घरच्यांचेही असेच मत होते. तेव्हा एका उर्दू म्हणीनुसार "खुदी को कर बुलंद इतना" याप्रमाणे स्वतःचे कर्तॄत्व सिद्ध केले की लोक जातीचा विचार करत नाहीत.
  • Log in or register to post comments
इ
इच्चक Wed, 02/05/2014 - 06:57 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 01/20/2014 - 04:10 नवीन

आयला धन्या , हे बाकी मस्त शालजोडीतले हाणलेस की.

  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/20/2014 - 04:21 नवीन
आडनाव असूनही ते न लावणारे भारताचे दोन पंतप्रधान कोण? (आणि हो, त्यांची - ते न लावणारी - आडनावे कोणती?) पहिल्या तीन बरोबर उत्तरकर्त्यांना माझ्यातर्फे मामलेदारची मिसळ!! :)
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Mon, 01/20/2014 - 04:41 नवीन
चरणसिंह(ग)आणि विश्वनाथ प्रताप सिंह?? एक अंदाज!!
  • Log in or register to post comments
ह
हंस Mon, 01/20/2014 - 04:57 नवीन
H. D. Devegauda, Chandrashekhar.
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Mon, 01/20/2014 - 05:26 नवीन
इंग्लंड अमेरीकेत काय परिस्थिती आहे? नाही म्हणजे काय तिथे जे असतं तेच योग्य असतं आणि भारतासारख्या देशातलं तुच्छ, टाकाऊ, ब्राह्मणी काव्याने पोखरलेलं बगैरे असतं ना म्हणून विचारलं. तिथं जे असेल ते करु हं. !
  • Log in or register to post comments
स
सचीन Mon, 01/20/2014 - 07:29 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Mon, 01/20/2014 - 08:52 नवीन
म्हंजे इट्लीबराबर आता इंग्लंडआमेरिकेचिबि भाटगिरि कर्नार कायवो? धंदा लय वाडवायचा पोग्राम दिसतुया जनु. ;)
  • Log in or register to post comments
ए
एम.जी. Mon, 01/20/2014 - 07:16 नवीन
जातीभेद हा डोक्यातून काढायला हवा. आडनावे बदलून काही होणार नाही. फक्त पहिल्या भेटीत जात कळणार नाही इतकेच. डोक्यात असेल तर मग आडून जातीची चौकशी केली जाईलच... आपल्याकडे आडनावांवरूनच कशाला, दिसण्यावरूनही आडाखे बांधले जातात. एखादी व्यक्ती "क्ष" आडनावाची असली तरीही " वाटत नाही" असले मतप्रदर्शन कुजबुजत का होईना, केले जातेच. नाहीतर मग सरळ नंबरच द्या..
  • Log in or register to post comments
क
क्रेझी Mon, 01/20/2014 - 07:40 नवीन
शाळेत असतांना आमच्या एका मॅडमनी आम्हांला 'आडनाव विचारायचं नाही' ही सवय लावली त्यामुळे आजतागायत मला कोणाचं आडनाव विचारायची सवय नाही आणि जरी कुठून कळालं तरी लक्षात राहत नाही. स्वतःचं लक्षात राहतं कारण ब-याच ठिकाणी लिहावं लागलं/तं!
  • Log in or register to post comments
च
चिन्मय खंडागळे Tue, 01/21/2014 - 00:54 नवीन
तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये होता का? आमच्या नेमस्त मराठी शाळेत आडनावच वापरायची पद्धत होती. अर्ध्या चड्डीतले पाचवीतले मित्रही एकमेकांना आडनावाने पुकारत हे आता खूप चमत्कारिक वाटतं.
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Tue, 01/21/2014 - 05:34 नवीन
मी माझं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव हे तीनही अत्यंत अभिमानाने लावतो. यातलं काहीही काढावं असं मला अजिबात वाटत नाही.
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Mon, 01/20/2014 - 07:44 नवीन
अगदी बरोबर आहे. पण मग त्याच न्यायाने नाव तरी कशाला हवे? म्हणजे पहा, चिन्मय म्हणजे हिंदू, महंमद म्हणने मुस्लिम, जॉन म्हणजे ख्रिस्चन अशी वर्गवारी पण करता येतेच की. त्यापेक्षा सगळ्या नागरीकांना नंबर द्यायचा. ज्या शहरातले/गावातला जन्म असेल तिथला पिनकोड शेवटी जोडायचा (आडनावासारखा :P ) :D
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 01/20/2014 - 07:48 नवीन
अब्दुल नारायण डिसुझा कसं वाटतं?
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Mon, 01/20/2014 - 07:54 नवीन
लई झ्याक. पण शेवटी आडनाव डिसोझा म्हणजे तो ख्रिस्चन हे ओळखता येतंच की :D
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 01/20/2014 - 08:14 नवीन
बबलू डेव्हिड खरात, जॉन प्रभाकर नाईक, आशिष जोसेफ हे खरंच नाव असलेल्या व्यक्तीला २००२-०३ मध्ये मी भेटलोय. क्षीरसागर, देशमुख, इनामदार ही आडनावं मुस्लिमांच्यामध्ये आहेत. बाकी माणसातली आतली वृत्ती काहीही केलं तरी लपणार नाही. रंगावरुन, जन्मावरुन, शारिरीक क्षमतांवरुन, गुणांवरुन, दिसण्यावरुन कशावरुन तरी माणूस 'आपपरभाव' (मराठीत डिस्क्रिमिनेशन?) करतोच्च.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा