Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने

म
माहितगार
Sat, 01/18/2014 - 07:22
🗣 111 प्रतिसाद
१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात १ जानेवारी १८४८ ला पहिली मुलींची शाळा काढली गेली त्याला दिडशेहून अधिक वर्षे होऊन गेली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुषतुलना हे पहिल स्त्रीवादी ग्रंथ लेखन इ.स. १८८२ साली करून सव्वाशेहुन अधिक वर्ष लोटून गेली.अद्याप महाराष्ट्राला स्त्री मुख्यंमंत्री मिळालेल्या नाहीत हाही भाग सोडून द्या सध्याच्या मंत्रिमंडळात ४० पैकी केवळ दोन महिला मंत्री आहेत आणि त्यांच्या कडे दिलेली खाती आहेत महिला व बालविकास आणि कुटूंब कल्याण. भारताला पहिल्या स्त्री राष्ट्रपती उपलब्ध करणार्‍र्‍या महाष्ट्रास महसूल अर्थ गृह सहकार मुख्यंमंत्री अशा खाती चालवण्यास सक्षम स्त्री राजकारणी का पुढे येऊ शकल्या नसाव्यात ? मुंबई दूर असेल तर सहकार चळवळ (साखर कारखाने) गावाच्या जवळच असते सध्याची सहकार चळवळीतील महिलांच्या सहभागाची स्थिती काय आहे ? महाराष्ट्रात विद्यापीठात किती महिला कुलगुरू होऊन गेल्या आणि सध्या किती आहेत याची आकडेवारी हवी आहे. उद्देश महाराष्ट्रीय राजकारणातील स्त्रीयांच्या सहभागाची चर्चा करण्याचा नाही. उद्देश इ.स. १८८२ ते आता पर्यंत महाराष्ट्राने बरेच स्त्रीवादी विचारवंत दिले परंतु महाराष्ट्रातील स्त्रीवाद अजूनही अभिजन वर्गा पर्यंत मर्यादीत आहे का की बहुजन समाजा पर्यंत पोहोचतो आहे ? बहुजन समाजा पर्यंत पोहोचत असेल तर त्याच प्रभावी प्रतिबिंब आजच्या इ.स.२००० ते २०१४ या काळातील समाज आणि राजकारणातल्या सहभागातून पुरेस दिसत का ? सद्य स्थिती आणि आव्हाने कोणती ? गेल्या १३ वर्षात ज्या बहुजन सामाजीक वैचारीक चळवळी आहेत त्यातील वैचारीक दृष्टीकोण स्त्री वादाच्या परिपेक्षातून कसे आहेत अथवा होते या परिपेक्षात स्त्रीवादाची स्त्रीचळवळींची सद्य स्थिती काय आणि आव्हाने कोणती ? आज नवीन इलेक्ट्रॉनीक माध्यमे आणि इंटरनेटची माध्यमे मराठी संकेतस्थळे मराठी अनुदिनी मराठी संकेतस्थळे आणि अनुदिनी आणि त्यावरील चर्चा धागे या संदर्भाने बहुजन मराठी स्त्रीयांचा सहभाग स्त्रीवादाच्या परिपेक्षातून कुठे आहे.मराठी संकेतस्थळे आणि अनुदिनी आणि त्यावरील चर्चातून स्त्रीवादी दृष्टीकोण गेल्या १३ वर्षात व्यवस्थित पणे मांडला जातो आहे का सद्य स्थिती काय आहे आणि स्त्रीवादी विचारांसमोरील या नवीन क्षेत्रातील आव्हाने कोणती इ.स. २००० ते २०१३ बहुजन आणि एकुण स्त्रीवादी साहीत्य आणि चळवळीचा आढावाही या चर्चेतून घेऊन हवा आहे. या चर्चा धागा चालू करताना याची कल्पना देण्यास आवडेल कि मराठी विकिपीडिया चळवळीच्या कार्यात तसेच मराठी विकिपीडियावरील स्त्री अभ्यास आणि स्त्रीवाद या विषयावरील लेखनात पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रातील अभ्यासकांनी वेळोवेळी सहभाग नोंदवला आहे. काळाच्या ओघात नेहमी प्रमाणे ह्या चर्चा धाग्यातील ज्ञानकोशास सुयोग्य भाग मराठी विकिपीडियावरील संबंधीत लेखांमध्ये घेतला जाऊ शकतो म्हणून या चर्चेतील आपला स्वतःचा सहभाग कॉपीराईट फ्री होत आहे असे गृहीत धरले जाईल. चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 71767 views

🗣 चर्चा (111)
म
माहितगार Sat, 01/18/2014 - 07:51 नवीन
वरील उतार्‍यात दुवे द्यावयाचे राहिले ते खालील प्रमाणे *महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ *ताराबाई शिंदे *सावित्रीबाई_फुले *क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र *स्त्री अभ्यास *स्त्रीवाद *विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प *विकिपीडिया:महिला
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Sat, 01/18/2014 - 08:05 नवीन
बहुजन समाजाला अभिजनांना अभिप्रेत असलेला आणि अभिजनांमधे कमालिचा लोकप्रिय असलेला (मीभाजीकरतेतुपोळ्ञाकरकिंवावाईसवर्साकिंवामीस्वयंपाककेलातुभांडीघासछाप )स्त्रीवाद आवश्यक आहे का याबाबत संभ्रम आहे. एकंदर युरोपामिरेकेत असलेला स्त्रीवाद भारतात रुजणार नाही हे नक्की. बाकी काही करता येत नाही अथवा होत नाही म्हणून स्त्रीवादी झालेल्या विचारवंतांचे विचार रोचक असतील आणि ह्या धाग्यावर त्यांचे प्रतिपादन करमणूक करेल हे नक्की.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 01/18/2014 - 08:11 नवीन
बाकी मिपाकरांचे विचार येऊ द्यात वाचण्यास नोंड घेण्यास उत्सुक आहे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 01/18/2014 - 08:12 नवीन
वरील वाक्यात नोंद घेण्यास उत्सुक आहे असे वाचावे
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Sat, 01/18/2014 - 08:13 नवीन
तुम्ही सुचवल्याप्रमाणे वाचले. भापो.
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Sat, 01/18/2014 - 08:24 नवीन
यावरून जगातील इतर देश धडा का बरे घेत नसावेत ?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 01/18/2014 - 08:35 नवीन
चर्चा प्रस्ताव आवडला. उत्तम चर्चा होऊ शकते. पण्..पण..पण.. मुळ मुद्दा न भरकटता तो ह्याच प्रस्तावावर रहावा आणि परत एकदा "स्त्री वि. पुरुष" असा "नेहमीचाच यशस्वी" मुद्दा येऊ नये ही इच्छा.. बाकी मुळ प्रस्तावावर सविस्तर प्रतिसाद सविस्तर विचार करुन देईन.. धन्यवाद
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 01/18/2014 - 10:23 नवीन
स्त्री पुरुष वाद न आणता पिराबैनी केलेली सविस्तर चर्चा वाचण्यास उत्सुक आहे. लवकर येउ द्या :)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 01/18/2014 - 10:27 नवीन
आणि अभ्या ह्यांनी अकारण वाकड्यात न शिरता दिलेले प्रतिसाद सुद्धा आवडतीलच.. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 01/18/2014 - 10:32 नवीन
आम्ही फ़क्त ब्यानर लावतो. प्रत्यक्षात पण आणि मिपावर पण. ते ही सरळ. :) असो.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 01/18/2014 - 11:05 नवीन
पिरा, अभ्या. शांत व्हा बरं! आशं भांडाचं नाय. आम्ही आहोत की भांडाभांडी करायला. ;)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 01/18/2014 - 11:14 नवीन
अच्छा म्हणजे घुमुन फिरुन परत हा ही धागा अध्यात्मावर येणार म्हणायचा!!! ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 01/18/2014 - 11:46 नवीन
जुनी खोड नि जुनी खोडं! काय करता? ;) तुमच्या तरुण रक्ताकडून तरी भांडणाव्यतिरिक्त वेगळ्या अपेक्षा होत्या. हा हन्त हन्त! धागा काय, प्रतिसाद काय, तू तरी मुद्दा धरुन आहेस काय गं झाशीची राणी? आँ?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 01/18/2014 - 11:50 नवीन
हाच तो दुटप्पीपणा... मी मुद्द्याला धरुनच होते.. सुरुवात अभ्यानी केली.. त्याला बोल जा..
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 01/18/2014 - 13:17 नवीन
झालं! पण अभ्या ढ आहे. त्याला सांगून कळत नाही. तू हुशार आहेस ना? (अभ्या, गप्प बस. मला तोंडघशी पाडू नको आधीच्च सांगायलोय ;) )
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 01/24/2014 - 08:25 नवीन
इतका "विंटरेस्टिंग" (सं)वाद मध्येच तोडला मह्णून समस्तांचा सौम्य णिषेद ! बाकी या धाग्यातील विषयात आम्हाला एवढेसेच कळत असल्याने आमचा एवढासाच प्रतिसाद ! कृपया (सं)वाद चालू ठेवावा ही विणंती !
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 01/18/2014 - 10:43 नवीन
बघा पहिली काडी पडली =))
  • Log in or register to post comments
श
श्रीनिवास टिळक Sat, 01/18/2014 - 12:18 नवीन
मा.र.कुटे: ...एकंदर युरोपामिरेकेत असलेला स्त्रीवाद भारतात रुजणार नाही हे नक्की. सहमत. आवश्यक आहे देश काळ सापेक्ष स्त्री पुरुष संवाद.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 01/18/2014 - 12:51 नवीन
स्त्री अभ्यास अभ्यासकांनी दिलेली स्त्री अभ्यासाची व्याख्या (भागवत, विद्युत २००९) खालील प्रमाणे : स्त्री अभ्यास ही एक नव्याने घडत असलेली, आंतरशाखीय स्वरूपाचा आशय विकसित करू पाहणारी अशी ज्ञान शाखा आहे. स्त्री अभ्यास हे आंतर विद्याशाखीय विद्यापीठीय क्षेत्र आहे ज्यात स्त्री-वादी दृष्टीकोनातून समाजाचा राजकीय, आर्थिक, सामाजिक इतिहासाचा बहुसांस्कृतिक अभ्यास केला जातो' आणि ज्यात लिंगभाव, वर्ण, वर्ग, जात, लैंगिकता आणि इतर सामाजिक विषमतांची स्त्रीवादी चिकित्सा केली जाते. अगदी सुरवातीच्या काळापासून भारतीय स्त्रीवादाची आखणी करताना भारतीय संस्कृती लक्षात घेतली गेली होती असे दिसते . भारतीय_स्त्रीवाद या लेखाच मराठी विकिपीडियावर अद्याप व्यवस्थीत लेखन झालेल नाही पण इंग्रजी विकिपीडियावर Feminism_in_India हा दुवा अभ्यासता येऊ शकेल.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 01/18/2014 - 13:08 नवीन
Feminism is a collection of movements and ideologies aimed at defining, establishing, and defending equal political, economic, and social rights for women.[1][2] This includes seeking to establish equal opportunities for women in education and employment. A feminist advocates or supports the rights and equality of women.[3] -इंग्लिश विकिपीडियावरील व्याख्या
  • Log in or register to post comments
A
Atul Thakur Sat, 01/18/2014 - 15:39 नवीन
म्हणजे निदान मला तरी संभ्रमित पाडणारा प्रकार वाटतो. समाजशास्त्रातुन एमए करत असताना ज्या मुली स्त्रीवादी होत्या त्या बहुतेक आर्थिक दृष्ट्या उच्चभ्रु वर्गातील होत्या. बाहेरील सर्वसामान्य स्त्रीबद्दल तर सोडाच पण वर्गातल्या साधारण मुलिंबद्दलदेखिल त्यांना फारशी कणव होती असे वाटले नाही. यात कुठेतरी मी जनरलायझेशन करतो आहे असे वाटण्याची शक्यता आहे. किंवा एका विशिष्ठ वर्गाबद्दल मला आकस आहे असा देखिल समज होण्याची शक्यता आहे. पण तसे काहीही नाही. तुम्ही शैक्षणिक वर्तुळामध्ये पाहाल तर बरेचदा फेमिनीझम आणि डायसपोरा या दोन विषयांकडे हैक्लास मुलिंची गर्दी आढळेल. या विषयांमधले साहित्य हे समजण्यास तसे सोपे नसते. जुडीथ बटलर प्रभुतिंचा अभ्यास करावा लागतो. अभ्यासाला असणारे बहुतेक विचारवंत हे पाश्चात्य असतात. आपल्या भारतीय स्त्रीयांनी केलेल्या कामाचा फारसा उल्लेख नसतो असे मला वाटते. मी स्वतः हा विषय घेतला नव्हता मात्र इतर वेळी यावर धुमशान चर्चा चालत असत. त्यावेळी आपल्याकडील नावं फारशी ऐकु येत नसत. ब्लॅक स्त्रीयांच्या समस्या आणि त्यांच्याशी निगडीत पुस्तकांची खडानखडा माहिती असलेल्यांना दलित स्त्रीबद्दल फारशी माहिती नसे आणि खरं सांगायचं तर त्यांना त्यात रस देखिल नसावा असं देखिल वाटतं.. एवढं पुरे. या विषयावर बोलताना माझी लेखणी खुप कडवट होते.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 01/18/2014 - 16:49 नवीन
असेच आमचेही निरीक्षण आहे. पुरुषी व्यवस्थेला विरोध हे स्त्रीवादाचे यूएसपी होते, आहे आणि राहील. पण या भानगडीत एक वर्गवाद शिरला आहे. कारण या चळवळीत उच्च सामाजिक स्तरावरील स्त्रियांचाच प्रामुख्याने सहभाग राहिलेला आहे, जे की ओब्व्हियस आहे. कारण जागृती इ.इ. शक्यतोवर उच्च वर्गातच होऊन ट्रिकल डाऊन होते. बरेचसे रिफॉर्मर हे उच्च वर्गात जन्माला आलेले होते. पण कष्टकरी वर्गाचे प्रश्न बर्‍याचदा वेगळे असतात. ते विशिष्ट चौकटीत वाढलेल्यांना कळणे अशक्य आहे. त्यासाठी त्या समाजभागाचा अभ्यास पाहिजे. स्त्रीवाद्यांचा बर्‍याचदा क्लेम असतो, की आधी स्त्रीला घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. पण हे वाक्य तथाकथित उच्च वर्गातल्या स्त्रियांबद्दलच खरे होते. बाकी बर्‍याच जातींमधील स्त्रिया कामासाठी बाहेर जातच होत्या. ब्राह्मण किंवा अन्य काही जातीतल्या स्त्रिया बाहेर पडल्या तेव्हा त्यांचे कौतुक झाले- जे ठीक आहे, पण समाजातील लै मोठ्या वर्गातल्या बायकांना त्याचे कौतुक नव्हते-कारण त्यांच्यासाठी तो रोजच्या जिण्याचा भाग होता. त्यांचे प्रश्न वेगळे होते-डोमेस्टिक व्हायोलन्स रिलेटेड जास्त. बाकी स्त्रीवादी साहित्यात युरोपआम्रिकेतीलच नावे येतात कारण त्यांची चौकट आपण आहे तशी स्वीकारली आहे. सिमॉन दि बोव्हारचे सेकंड सेक्स नामक पुस्तक यावरील बायबल मानले जाते मात्र जुडिथ बटलरचा थेसिस तिच्यापेक्षा पुढचा आहे. युरोपआम्रिकेच्या एक पिढी मागे असतो आपण हे यावरूनही सिद्ध होते. सिमॉन दि बोव्हारच्याही पुढे स्त्रीवाद आहे हेच अजून भारतातील विचारवंतांच्या पुरेसे पचनी पडलेले नाहीये. आणि स्त्रीवाद ही एक अभ्यासचौकट आहे. ती तशीच्या तशी सर्व समाजांना लागू होत नाही. भारतीय परिप्रेक्ष्यात नक्की काय बरोबर, काय चूक हेही पाहिले पाहिजे आणि तदनुरूप त्याची मांडणी केली पाहिजे. स्त्री म्हणून असलेल्या समस्यांमध्ये काहीएक समानता असली तरी स्पेसिफिक स्थलकालसापेक्ष फरक इतके असतात की ते एकच एक मॉडेल लागत नाही. पण इतकी अक्कल कुणाला असल्याचे सध्या दिसत नाही. त्यामुळे अर्धवट शिजवलेली युरोपियन डिश भारतीय समाजाच्या नरड्यात ओतण्याचा आटोकाट प्रयत्न विचारवंत करीत असतात. हे झाले विचारवंतांच्या संशोधनपर मांडणीबद्दल. बाकी यांच्या हुच्चभ्रू तुच्छतावादी अ‍ॅटिट्यूडबद्दल बोलावे तितके थोडेच. पुस्तकांतून ज्यांचे गोडवे गातात त्यांचा प्रत्यक्ष सहवास यांना नको असतो. अँड्रे बीटेल नामक समाजशास्त्रज्ञाचे हे लैच मार्मिक निरीक्षण आहे. (बादवे हे साहेब गोरे असले तरी बॉर्न अँड ब्रॉट अप इन इंडिया आहेत. सबब त्यांची मते स्वीकारार्ह असावयास अडचण नाही.)वाचले तेव्हाच फुटलो, म्हटलं क्या बात बोली है. बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है. असो. सध्या इतकेच.
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Sun, 01/19/2014 - 06:30 नवीन
>>सिमॉन दि बोव्हारच्याही पुढे स्त्रीवाद आहे हेच अजून भारतातील विचारवंतांच्या पुरेसे पचनी पडलेले नाहीये. सहमत आहे. इतकेच नव्हे तर भारतीय परिप्रेक्ष्यात सिमॉन कुचकामी आहे हे सुद्धा अनेकांना कळतच नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 01/19/2014 - 07:20 नवीन
..बाकी स्त्रीवादी साहित्यात युरोपआम्रिकेतीलच नावे येतात कारण त्यांची चौकट आपण आहे तशी स्वीकारली आहे. सिमॉन दि बोव्हारचे सेकंड सेक्स नामक पुस्तक यावरील बायबल मानले जाते मात्र जुडिथ बटलरचा थेसिस तिच्यापेक्षा पुढचा आहे. युरोपआम्रिकेच्या एक पिढी मागे असतो आपण हे यावरूनही सिद्ध होते. सिमॉन दि बोव्हारच्याही पुढे स्त्रीवाद आहे हेच अजून भारतातील विचारवंतांच्या पुरेसे पचनी पडलेले नाहीये. चोप्य पस्ते ;) हे सगळ्याच व्यवहारात चालणारे नाणे आहे (दुर्दैवाने) :( स्वतंत्र विचार करणारे जगात नेहमीच फार कमी संख्येने असतात... ती सुभाषितानी आहे ना, वक्ता दशसहस्रेशु... वेग्रे वेग्रे. मुख्य म्हणजे पाश्चिमात्य शिक्का असलेल्या मालाचा पटकन उठाव होतो आणि किंमतही भरपूर मिळते :)
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Fri, 01/24/2014 - 01:11 नवीन
परत एकदा वाल्गुदेया अप्रतिम प्रतिसाद..! खरेतर या एका प्रतिसादासाठी वाचनखुण साठवण्यात येत आहे.. __/\__
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/22/2014 - 16:24 नवीन
समाजशास्त्रातुन एमए करत असताना ज्या मुली स्त्रीवादी होत्या त्या बहुतेक आर्थिक दृष्ट्या उच्चभ्रु वर्गातील होत्या. बाहेरील सर्वसामान्य स्त्रीबद्दल तर सोडाच पण वर्गातल्या साधारण मुलिंबद्दलदेखिल त्यांना फारशी कणव होती असे वाटले नाही.
हे बऱ्यापैकी विनोदी वाटलं. वस्तुस्थिती म्हणून. माझ्या अभ्यासविषयात (खगोलशास्त्र) फार मुली, स्त्रिया दिसत नाहीत. आजही नाहीत आणि पाश्चात्य देशांतही नाहीत. या संशोधकांमधला बहुतांश तरुण वर्ग (चाळीशी आणि कमी वयाचे) लिंगसमानतावादी, (क्वचित कोणी पुरुष स्त्रियांवर अन्याय झाला, होतो म्हणून किंचित उजवं माप देणारे) जातपात न मानणारा आणि उदारमतवादी दिसतो. माझ्यासारख्या मुली-बायकांच्या तोंडावर "तुम्ही शिक्षित घरांमधल्या मुली शिकता आणि काही करता यात काय नवल" असं तोंडावर बोलून चर्चा होतात. पोटापाण्याचा विषय नसल्यामुळे वाचन फार खोल नसतं कोणाचंच, पण देशोदेशीच्या (म्हणजे यूके, यूएस) वर्तमानपत्रांमधून स्त्रीविषयक पुरवण्यांमधे काय छापून येतं याबद्दल चर्चा होते. ठराविक महत्त्वाची पुस्तकं वाचली जातात आणि त्यावर चहापाण्यासोबत चर्चाही होते. समाजशास्त्र शिकणारे लोक, विज्ञान शिकणाऱ्यांपेक्षा संकुचित विचारांचे दिसणं, फार विनोदी वाटलं. कदाचित भारतात, भौतिकशास्त्रात असणारा बंगाली लोकांचा प्रादुर्भाव, त्यांच्याकडे असणारी डावी विचारसरणी, यांचा प्रभाव पडत असेल काय? (माझा अभ्यासविषय नाही, त्यामुळे माझ्याकडे उत्तर नाही. प्रश्न पडला तो मांडला.) हे बहुतेकसे लोक मध्यमवर्गीय म्हणावेत असे ... आता बहुदा उच्चमध्यमवर्गीय. दुसऱ्या बाजूला, माझ्या बरोबर एमेस्सीला असणारे लोक आठवले. बहुतांश लोक नोकरीसाठी काहीतरी शिकायचं म्हणून शिकत होते. त्यांना विषय समजून घेण्याचं काही पडलेलं नव्हतं. पुढे चित्र पालटलं. याचा विचार करता, आता वस्तुस्थिती विनोदी वाटत नाही, दोन्हीत consistency दिसते आहे.
  • Log in or register to post comments
A
Atul Thakur गुरुवार, 01/23/2014 - 01:06 नवीन
कोण कुणापेक्षा संकुचित आहे माहित नाही. मात्र वस्तुस्थीती मला आढळली ती मांडली. भारतीय विद्यापीठातील स्त्रीवादी शिक्षण हाच एक मोठा विनोद आहे हे वाक्य कुणाला झोंबल्यास इलाज नाही. तेथे चालणार्‍या मुख्य चर्चा या लैगिक स्वातंत्र्य आणि हवे ते कपडे घालण्याची मोकळीक या दोन मुद्द्यांपुरत्याच सिमीत असतात. जणु काही तेच स्त्रीयांचे मुख्य प्रश्न असावेत. त्यावर मात्र हिरीरिने चर्चा चालते. आता त्यात समलिंगी लोकांचा प्रश्न शिरला आहे. त्यावर धुमशान चर्चा चालतात. मात्र दलित स्त्रीयांबद्दल ब्र ही नाही. खैरलांजी प्रकरणाबद्दल तर फारशी माहितीदेखिल नसावी असे वाटले.
  • Log in or register to post comments
A
Atul Thakur Sat, 01/18/2014 - 17:03 नवीन
बॅटमॅन यांच्या प्रतिसादातील प्रत्येक शब्दाशी सहमत. सुरेख मांडलेत राव :)
  • Log in or register to post comments
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर Sat, 01/18/2014 - 17:09 नवीन
बॅटमॅनच्या प्रतिसादाशी सहमत
  • Log in or register to post comments
उ
उद्दाम Sun, 01/19/2014 - 07:49 नवीन
द्विभार्याप्रतिबंध्क कायदा, ४९८-ए, पोटगी कायदा हे आधी नष्ट करा. मग बोलू निवांत.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/19/2014 - 12:33 नवीन
आता पर्यंत प्रतिसाद नोंदवलेल्या बर्‍याच सदस्यांनी पाश्चात्य स्त्रीवादी भूमीका भारतास कशी गैरलागू हे सांगितले. वस्तुतः प्रस्ताव मांडताना पाश्चात्य स्त्रीवादी भूमीका फारशी विचारात घेतली नव्हती.तरीपण विषय चर्चेस आला आहे तेव्हा आपल्या मतानुसार भारतीय स्त्रीवादाची व्याख्या काय असावी ? चर्चा प्रस्तावाच्या अनुषंगाने अजून बर्‍याच विषयांचा उहापोह होणे बाकी आहे असे वाटते त्या दृष्टीने पिरा आणि इतर मिपा सदस्यांच्या प्रतिसादांची प्रतीक्षा असेल. प्रतिसादातून विवीधांगी प्रकट होणार्‍या दृष्टीकोन व्यक्त करण्या बद्दल सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद .
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Sun, 01/19/2014 - 12:53 नवीन
हे एक न्हवे तर दोन समान अर्थी शब्दाचे कोंबो आहे. सर्वप्रथम हा शब्द बदला स्त्रियांची परिस्थिति आपाप बदलेल
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/19/2014 - 13:10 नवीन
:) नाही इथे 'वाद' या शब्दाची अर्थछटा वेगळी आहे. इथे वाद शब्दाचा अर्थ ism असा असल्यामुळे समानार्थी नाही ! तुम्ही ज्या अर्थाने घेताय त्या अर्थाने अद्यापतरी या धाग्यावरतरी स्त्रीवाद कुठे आढळला नाही उलट पक्षी तर नाही ना अशी शंका येईल अशी स्थिती आहे. :)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/19/2014 - 13:11 नवीन
हवे तर स्त्रीसमता हा शब्द वापरा
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Sun, 01/19/2014 - 13:20 नवीन
स्त्री समता न्हवे हो तर फक्त समानता वाद इतुकेच पुरेसे आहे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/19/2014 - 13:30 नवीन
महिला सहमत आहेत का ?
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 01/19/2014 - 15:47 नवीन
बरोबर आहे. 'समानता मिळवण्यासाठी वाद' असं आहे खरं तर.
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Sun, 01/19/2014 - 16:01 नवीन
कसलाच वाद आम्ही नाकारालाच नाही त्यामुळे योग्य वादसंवादाचा आभाव हेच आमच्या नापसंती व्यक्त करायचे मुख्य कारण आहे. आय रिस्पेक्ट विमन अलोट.
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Sun, 01/19/2014 - 13:19 नवीन
यावर विधान केलेले नाही तर या धाग्यावर "स्त्रीवाद" या संबंधी विधान केले आहे हे स्पष्ट नमूद करतो ज्यामुळे पक्षी उलट सुलट होणार नाहित असे वाटते. स्त्रिवादामधे ism या अर्थानेच वाद हा शब्द घेण्यात आला आह हिच घोडुचुकआहे असे मी विधान केले आहे म्हणुनच स्त्रिवाद हा शब्द बदलला तरच स्त्रियांच्या परिस्स्थितित आपोआप्प सुधारणा होइल असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/19/2014 - 13:22 नवीन
विनोदम्हणून ठिक पण.... आपल्या प्रतिक्रीयेत भारतीय पुरुषांच्या मनातील स्त्रीप्रतिमेचा साचेबंदपणा (स्टिरीओटाईप) नाही ना ?... आणि मराठी संकेतस्थळावरील चर्चातून स्त्रीप्रतिमेचा साचेबंदपणा (स्टिरीओटाईप) बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात मराठी महिला काही भूमिका बजावतात का ? सध्या कशा प्रकारची भूमिका पार पाडत आहेत ? असा या धागा चर्चेतील एक विषय आहे या कडे या निमीत्ताने लक्ष वेधावे असे वाटते
  • Log in or register to post comments
च
चिन्मय खंडागळे Sun, 01/19/2014 - 14:51 नवीन
स्त्रीवादविषयक धाग्यात ९०% प्रतिसाद पुर्षांचाच का आहे? जिन्हे नाझ है स्त्रीवादपे वो लोग कहां है?
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 01/19/2014 - 15:16 नवीन
निव्वळ शब्दांमुळे गोंधळ उडण्यापेक्षा एकूण घराबाहेरील क्षेत्रात, विशेषतः राजकारण, इंटरनेट इ. क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या विषयावर तुम्हाला मते हवी आहेत असे गृहीत धरते. त्यातही महाराष्ट्रात स्त्रियांची दर पुरुषामागे असणारी संख्या इतर काही राज्यांपेक्षा बरी असली तरी महाराष्ट्र स्त्री-समता या गोष्टीबाबत फार प्रगत आहे असे वाटत नाही. सर्व भारताचं सरासरी चित्रच महाराष्ट्रात दिसेल. अगदी आगरकर, सावित्रीबाई फुले आणि कर्वे असे लोक महाराष्ट्रात होऊन गेले तरीही. सर्वप्रथम राजकारणाबद्दल बोलायचं तर राजकारण आणि गुन्हेगारी या क्षेत्रांची सरमिसळ पाहता भारतीय स्त्रियांच्या सर्वसामान्य जडणघडणीमुळे त्या या क्षेत्रात अधिक संख्येने येतील ही शक्यता कमी वाटते. त्यातून महिला आरक्षण विधेयक कसे संमत होणार नाही हेच बहुतेक राजकीय पक्ष पाहतात हा अलिकडचाच अनुभव आहे. खर्‍या अर्थाने स्त्री सबलीकरण कितीजणांना हवे आहे ही शंकाच आहे. सिनेमा आणि मालिकांमधे दाखवल्या जाणार्‍या भरमसाट दागिने घातलेल्या गृहलक्ष्म्याच बर्‍याच जणांना हव्या आहेत असंच चित्र उभं रहातंय. लोकांना तेच पहावंसं वाटत नसतं तर वेगळ्या स्वरूपात स्त्रिया दाखवल्या गेल्या असत्या. शिक्षण नोकर्‍या इ. क्षेत्रात करियर करणे भारतीय महिलांना अवघड जातेच. त्यामागे बरीच कारणे आहेत. लहान वयात होणारी लग्नं आणि त्यापाठोपाठ येणार्‍या कौटुंबिक जबाबदार्‍या यातून करियर करणे फार कठीण आहे. त्यातून मार्ग काढून काही करणार्‍या महिलांना समान शैक्षणिक दर्जा असणार्‍या पुरुषापेक्षा कमी समजले जाते ही आजही वस्तुस्थिती आहे. स्त्री कर्मचार्‍यांना बाळंतपणाच्या रजा द्याव्या लागतात, मुलांसाठी त्या रजा घेत रहातात त्यामुळे शक्यतो स्रिया या निम्न दर्जाच्या कर्मचारी म्हणून सहसा ठेवण्याकडे बर्‍याच आस्थापनांचा कल असतो. इंटरनेट आणि मराठी संकेतस्थळे, अनुदिनी यातील लेखक वाचकांची विभागणी शहरी आणि ग्रामीण अशी कोणी करू शकले तर या गोष्टी किती लोकांपर्यंत पोचल्या आहेत हे कळून येईल. ग्रामीण भागात यांचा फार प्रसार झालेला नसावा. त्यातही स्त्रियांची संख्या किती असेल याचा आपण फक्त तर्कच करू शकतो. एकूण सदस्यांमधे १० ते २०% एवढ्याच स्त्रिया प्रत्यक्ष सहभागी होत असाव्यात. मिपावर अनाहिता विभाग उपलब्ध करून दिल्यानंतर महिला सदस्यांची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. एरवी यातील बर्‍याच जणी फक्त वाचनमात्र सदस्या होत्या. काहीजणी तर सदस्याही नव्हत्या. ग्रामीण भागातील स्त्रीवादाबद्दल खूप काही लिहिता येईल. ग्रामीण भागात स्त्रियांना अजिबात स्वातंत्र्य नाही असा सर्वसाधारण समज असला तरी मी १९७०-८० च्या दशकांत एका दळणवळणाचे कोणतेही साधन नसलेल्या खेड्यात राहिले आहे. कोकणातले खेडे असल्याने बहुतेक घरातील पुरुषमंडळी उपजीविकेसाठी मुंबईला नोकर्‍या करत तर शेती, गुरेढोरे, मुले यांची जबाबदारी घरातल्या स्त्रिया उचलत. पत्र हे एकमेव साधन असल्याने या बाबतीत सर्व निर्णय स्वतंत्रपणे या महिलाच घेत असत. परंतु ग्रामपंचायतीची निवडणूक वगैरे कोणी महिलेने आपणहून कधी लढवल्याचे पाहिले नाही. मात्र गिरण्या बंद झाल्यावर काही प्रमाणात पुरुषवर्ग गावाकडे परतले आणि माझाही त्या गावाशी गेल्या वर्षात संपर्क राहिलेला नाही. त्यामुळे सध्या काय परिस्थिती आहे हे मी सांगू शकणार नाही. त्याशिवाय घाटावरच्या गावांतून यापेक्षा वेगळी परिस्थिती असेल तर तेही मला माहिती नाही. मात्र कोकणात एकूण शिक्षणाचे प्रमाण घाटापेक्षा जास्त असावे, त्यामुळे स्त्रियांची परिस्थिती तुलनेत नक्कीच अधिक चांगली असणार. शिक्षण, प्रत्येक स्त्रीमागे जन्म दिलेल्या मुलांचे प्रमाण आणि स्त्री-पुरुष दर हजारी संख्या याबद्दल व्यवस्थित माहिती गोळा केली तर या गोष्टींचा स्त्री-वाद, स्त्री-समता किंवा स्त्री सबलीकरण याच्याशी थेट संबंध असल्याचे दिसून येईल. पाश्चात्य स्त्री स्वातंत्राच्या चळवळीची पार्श्वभूमी आणि भारतातील स्त्रियांची शेकडो वर्षांची परिस्थिती यात फारसे साम्य नाही त्यामुळे त्यांची तत्त्वे इथे सरसकट लागू करता येणार नाहीत. बेसिक्स तीच राहिली तरी त्यांची अंमलबजावणी वेगळ्या तर्‍हेने करावी लागेल. पूर्वीसारखे स्त्री -समतावादी स्त्रियांवर आता एक ठराविक छाप जरी राहिला नसला तरी स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून पाहणे किती जणांना (त्यात स्त्रिया स्वतःही आल्या) जमेल त्यावर स्त्रीवादाचे यशापयश अवलंबून राहील.
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Sun, 01/19/2014 - 16:05 नवीन
लिहलय.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/19/2014 - 16:21 नवीन
स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून पाहणे किती जणांना (त्यात स्त्रिया स्वतःही आल्या) जमेल त्यावर स्त्रीवादाचे यशापयश अवलंबून राहील.
(भारतीय) स्त्रीवादी परिपेक्षातून "(भारतीय) स्त्रीकडे एक (भारतीय) व्यक्ती म्हणून पाहणे" हि किमान स्वरूपी अपेक्षा म्हणून पहाता येईल ? पुन्हा पुन्हा भारतीय भारतीय शब्द वाचन कठीण होईल म्हणून स्त्रीवादी परिपेक्षातून स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून पाहणे" हि किमान स्वरूपी अपेक्षा म्हणून पहाता येईल ? असे लिहितो आणि या किमान अपेक्षेसहीत मराठी स्त्रीवादाच गेल्या दहा बारा वर्षातील सार्वजनीक व्यासपिठांवरील यशापयश काय ? अगदी या किमान अपेक्षेबाबतही स्त्रीया स्वतःही सार्वजनिक व्यासपिठावर असलेल्या स्त्रीयाही अलिप्त/मुकप्रेक्षक असतात असे वाटते का ? सार्वजनिक व्यसपिठावरील स्त्रीच्या साचेबंद प्रतिमा स्त्रीयांना स्वतःस का दिसत नाहीत ? दिसून खट्कत नाहीत? गांभीर्य जाणवत नाही ? नेमक काय होत ? गेल्या दहा बारा वर्षात महाराष्ट्रातील सार्वजनिक व्यसपिठावरील जे विषय आले त्यात स्त्रीच्या साचेबंद प्रतिमा कुठे येते आहेत याचा जाणीवपुर्वक अभ्यास स्त्री अभ्यासकांनी केला आहे का? आपल्या प्रतिसादावर पुढे जाणारी चर्चा वाचनीय असेलच. प्रतिसादा करता धन्यवाद
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 01/22/2014 - 14:56 नवीन
या प्रतिसादाबद्दल टाळ्या! खूप आवडला हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
श
श्रीनिवास टिळक Tue, 01/21/2014 - 05:05 नवीन
या विषयावर काही वर्षांपूर्वी मी अमेरिकेत एक शोध निबंध लिहिला/वाचला होता. त्याचा मराठी सारांश पुढे देत आहे. भारतीय स्त्रीवादाचे लक्ष्य केवळ स्त्री शक्ती किंवा स्त्रीची पुरुषाशी बरोबरी किंवा पुरुषावर वर्चस्व गाजवणे हे नसावे. स्त्री पुरुष संवादाचे अंतिम ध्येय लिङ्गोत्तर समाज आणि विश्व हे असावे जे स्त्री पुरुष शारीरिक आणि मानसिक भेदांच्या पलीकडे जाणारे आहे. मात्र त्याकडे जाणारा मार्ग प्रथम लिंग सापेक्ष आणि नंतर लिंग निरपेक्ष या दोन वाटेत लागणाऱ्या अवस्थांमधून काढावा लागेल.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 01/21/2014 - 05:55 नवीन
>> स्त्री पुरुष संवादाचे अंतिम ध्येय लिङ्गोत्तर समाज आणि विश्व हे असावे जे स्त्री पुरुष शारीरिक आणि मानसिक भेदांच्या पलीकडे जाणारे आहे.<< लिंगोत्तर आणि लिंगनिरपेक्ष यात नेमका काय फरक आपल्याला अभिप्रेत आहे? मला अशा चर्चा वाचल्या कि सर्वेपि सुखिनः संतु सर्वे संतु निरामय: सारखा भाबडा आशावाद वाटतो. पण अशा आशावादावर चळवळींची वाटचाल पुढे सरकते हे ही तितकच खर! चालत रहा हम होंगे कामियाब एक दिन ही पुरोगामी चळवळींची गाणी देखील अशीच नैराश्य येवु नये म्हणुन घेतलेली खबरदारी आहे असो स्त्रीवादी चळवळीच्या अनेक छटा आहेत हे मात्र सर्वांनाच मान्य होण्यात अडचण नसावी
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 01/21/2014 - 06:00 नवीन
'पुरोगामी महाराष्ट्र' शब्द चळवळी / मिडिया / विचारवंत यांनी वापरुन वापरुन फारच गुळगुळीत झाला आहे. मला तर हा शब्द दाभोलकरांच्या हत्येनंतर वापरावासाच वाटत नाही. तसे चळवळींनी बरेच शब्द गुळगुळीत केले आहेत. असो
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 01/21/2014 - 06:37 नवीन
>>गुळगुळीत झाला आहे. मला तर हा शब्द दाभोलकरांच्या हत्येनंतर वापरावासाच वाटत नाही. या भावना समजता येतात. एकतर टिकेची सुरवात कौतुकाने आणि शेवट नाही तुमच्यात या पेक्षा अधिक चांगल करण्याची क्षमता आहे या सँडविच थेरपिने केलेली बरी पडते. त्या शिवाय आडनाव वाल्या धाग्यात मी एक मुद्दा मांडला आहे कि तुम्ही अमुक तमुक कुटूंबातले तरिही अस करण शोभता का ? या मुद्द्यावर जाता येत तस एकदा पुरोगामी म्हणून मग 'पुरोगामी तरीही ?' म्हणण्यात पुरोगामी राहण्या करताचा दबाब टाकता येतो.आणि पुरोगामित्वावर शंका घेतली जाणार म्हटल्यावर दबाव बळकट होण्यास मदतच होते. प्रतिसादा करता धन्यवाद
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 01/21/2014 - 06:27 नवीन
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर केवळ स्त्रीवादच नाही तर एकूणच 'सामाजिक प्रश्नां'वर विचार करून त्यावर काम करणार्‍या समाजसेवकांची प्रचंड कमतरता आहे. राजकीय सोयीचे सामाजिक प्रश्न सोडवल्यासारखे करून निवडणूका लढवण्यातच सगळे धन्यता मानत आले आहेत. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात कोणत्या 'सामाजिक' प्रश्नावर अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन झाले आहे ते आठवावे. झालेली सर्व आंदोलने ही राजकीय स्वरूपाची आहेत. बाबा आमटे, बंग दांपत्य किंवा इतरही अनेकांनी उत्तम सामाजिक कार्य केलेच. मात्र ते कार्य स्थानिकच राहिले, त्याचे रुपांतर सामाजिक बदलात वा चळवळीत ते करू शकलेले नाहित. बहुजनांचा विकास घ्या, नाहितर कौंटुंबिक वा इतरही बलात्कार घ्या, भ्रुणहत्या घ्या किंवा हुंडाबळी घ्या हे सारे सामाजिक प्रश्न आहेत. यावर उत्तरे ही समाजाने शोधायची आहेत. या सुधारणांच्या इन्फोर्समेंटसाठी पुरक म्हणून कायदे, सरकार यांची मदत हवीच मात्र त्यांनी बदल घडवावेत ही अपेक्षा अगदीच पळपुटी वाटते. या प्रश्नांवर निव्वळ कायदेशीर उपाय हा इलाज असु शकत नाही. या पार्ध्वभूमीवर महिला स्वायत्तता अथवा स्त्रीमुक्ती कडे बघायला हवे. मुळात महाराष्ट्रात बहुजन वर्गातील बहुसंख्य स्त्रिया हा कित्येक वर्षे 'कमावत्या' आहेत. पाश्चात्यांच्या आगमनापूर्वीपासून त्या स्वतः मिळकत करत आहेत. मात्र त्या मिळकतीचा लाभ म्हणा किंवा खर्च करण्याची अनुमती म्हणा त्यांना नाही. अभिजन वर्गातील चित्र त्याहूनही बिकट होते. तिथे अर्थार्जनाची व खर्च करण्याची दोन्हीची अनुमती नव्हती. अभिजन वर्गातील स्त्रिया जेव्हा बाहेर पडल्या तेव्हाही त्या फार सामाजिक दबावामुळे अथवा घरातील पुरूषांना भुमिका पटल्याने नव्हे तर नव्या आर्थिक गरजांपूढे पर्याय न राहिल्याने. तरीही घर सांभाळायची जबाबदारी पुरूषांवर आली नाहीच. ती बाईकडे तशीच राहिली. (नेमका घाईत आहे, प्रतिसादाचे स्वरूप अगदीच मुक्तकासारखे झाले आहे. पुन्हा वेळ मिळाला की उर्वरीत प्रतिसाद टंकतो) (क्रमशः)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा