वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने
१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत.
पुरोगामी महाराष्ट्रात १ जानेवारी १८४८ ला पहिली मुलींची शाळा काढली गेली त्याला दिडशेहून अधिक वर्षे होऊन गेली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुषतुलना हे पहिल स्त्रीवादी ग्रंथ लेखन इ.स. १८८२ साली करून सव्वाशेहुन अधिक वर्ष लोटून गेली.अद्याप महाराष्ट्राला स्त्री मुख्यंमंत्री मिळालेल्या नाहीत हाही भाग सोडून द्या सध्याच्या मंत्रिमंडळात ४० पैकी केवळ दोन महिला मंत्री आहेत आणि त्यांच्या कडे दिलेली खाती आहेत महिला व बालविकास आणि कुटूंब कल्याण. भारताला पहिल्या स्त्री राष्ट्रपती उपलब्ध करणार्र्या महाष्ट्रास महसूल अर्थ गृह सहकार मुख्यंमंत्री अशा खाती चालवण्यास सक्षम स्त्री राजकारणी का पुढे येऊ शकल्या नसाव्यात ? मुंबई दूर असेल तर सहकार चळवळ (साखर कारखाने) गावाच्या जवळच असते सध्याची सहकार चळवळीतील महिलांच्या सहभागाची स्थिती काय आहे ? महाराष्ट्रात विद्यापीठात किती महिला कुलगुरू होऊन गेल्या आणि सध्या किती आहेत याची आकडेवारी हवी आहे.
उद्देश महाराष्ट्रीय राजकारणातील स्त्रीयांच्या सहभागाची चर्चा करण्याचा नाही. उद्देश इ.स. १८८२ ते आता पर्यंत महाराष्ट्राने बरेच स्त्रीवादी विचारवंत दिले परंतु महाराष्ट्रातील स्त्रीवाद अजूनही अभिजन वर्गा पर्यंत मर्यादीत आहे का की बहुजन समाजा पर्यंत पोहोचतो आहे ? बहुजन समाजा पर्यंत पोहोचत असेल तर त्याच प्रभावी प्रतिबिंब आजच्या इ.स.२००० ते २०१४ या काळातील समाज आणि राजकारणातल्या सहभागातून पुरेस दिसत का ? सद्य स्थिती आणि आव्हाने कोणती ?
गेल्या १३ वर्षात ज्या बहुजन सामाजीक वैचारीक चळवळी आहेत त्यातील वैचारीक दृष्टीकोण स्त्री वादाच्या परिपेक्षातून कसे आहेत अथवा होते या परिपेक्षात स्त्रीवादाची स्त्रीचळवळींची सद्य स्थिती काय आणि आव्हाने कोणती ?
आज नवीन इलेक्ट्रॉनीक माध्यमे आणि इंटरनेटची माध्यमे मराठी संकेतस्थळे मराठी अनुदिनी मराठी संकेतस्थळे आणि अनुदिनी आणि त्यावरील चर्चा धागे या संदर्भाने बहुजन मराठी स्त्रीयांचा सहभाग स्त्रीवादाच्या परिपेक्षातून कुठे आहे.मराठी संकेतस्थळे आणि अनुदिनी आणि त्यावरील चर्चातून स्त्रीवादी दृष्टीकोण गेल्या १३ वर्षात व्यवस्थित पणे मांडला जातो आहे का सद्य स्थिती काय आहे आणि स्त्रीवादी विचारांसमोरील या नवीन क्षेत्रातील आव्हाने कोणती
इ.स. २००० ते २०१३ बहुजन आणि एकुण स्त्रीवादी साहीत्य आणि चळवळीचा आढावाही या चर्चेतून घेऊन हवा आहे.
या चर्चा धागा चालू करताना याची कल्पना देण्यास आवडेल कि मराठी विकिपीडिया चळवळीच्या कार्यात तसेच मराठी विकिपीडियावरील स्त्री अभ्यास आणि स्त्रीवाद या विषयावरील लेखनात पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रातील अभ्यासकांनी वेळोवेळी सहभाग नोंदवला आहे.
काळाच्या ओघात नेहमी प्रमाणे ह्या चर्चा धाग्यातील ज्ञानकोशास सुयोग्य भाग मराठी विकिपीडियावरील संबंधीत लेखांमध्ये घेतला जाऊ शकतो म्हणून या चर्चेतील आपला स्वतःचा सहभाग कॉपीराईट फ्री होत आहे असे गृहीत धरले जाईल.
चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.
🗣 चर्चा
(111)
प
पिलीयन रायडर
Fri, 01/24/2014 - 09:47
नवीन
जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं नसेल तर "सहसा..बाकी चर्चांमध्ये" वगैरे शब्द वापरता येतील ना.. इथे लिहीलं तर ते ह्याच चर्चे बद्दल लागु आहे असा समज होणे साहाजिक आहे.. (तसंही जर ते इथे लागु नाही तर इथे का लिहीलं आणि नक्की कुणाचा प्रतिसाद अस्थानी हा ही प्रश्न पडलाच.. पण असो.. )
आणि तुझ्याही प्रतिसादाबद्दल साधारण हेच विचार आहेत..
माझ्या कडुन तुला ह्या मुद्द्यावर शेवटचा प्रतिसाद..
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 01/24/2014 - 09:53
नवीन
जऽरा अभ्यास वाढवला तर असे समज कमी होतील.
धन्यवाद. :) अस्थानी भावनिक प्रतिसादांची सवय आहेच त्यामुळे पुनरेकवार नवल वाटले नाही.
मुद्दे संपले की त्रागा सुरू होतो याचे अजून एक उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद. :)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 01/24/2014 - 11:48
नवीन
खर म्हणजे धागाकर्त्यानी स्त्रीवाद आणि स्त्रीवाद विरोधक असा खेळ लावण्याकरता स्त्रीवाद खरे म्हणजे खेळ पण नाही आहे. हे आपल्या समाज आणि संस्कृती विषयक गंभीर प्रश्न आहेत ज्यात तुमच्या आमच्या कुटूंबातील घटकांचा सरळ संबंध आहे. स्त्री अभ्यासक स्त्रीवादी गेल्या दहा बारा वर्षात सांस्कृतिक सामाजिक मैदानावर होते का ? समालोचनात त्याची नोंद घेतली गेली का ? त्या समालोचनांच समीक्षण झाल का ? मैदानात असावयास होते पण नव्हते असे प्रसंग कोणते ? आजच्या काळात मैदानात पाय रोखून उभे रहाण्या करताची आव्हाने कोणती ? इत्यादी विषयांचा उहापोह आहे.
पण स्त्रीया मैदानावर आल्यातर अंपायर होतील कॅप्टन होतील आपल्याला बॅटींगचा चान्सच जाईल असा विचारकरून बरीच मंडळी शिरस्त्राण आणि सारी सुरक्षा कवच घालून दोन हातात दोन दोन दोन बॅटी घेऊन जोरदार तयारीने मैदानावर उतरत आहेत.एवढी तयारी करून आल्यावर मिपा भगिनी तुम्ही सांगितलेल्या भारतीय नियमानी साधे सरळ दोन चार चेंडूही टाकून मदतच करताहेत. तरी सुद्धा दुसर्या बाजूनी खुपच सोप्या सोप्या गोष्टीत झेल दिल्यावर त्या तरी काय करणार नाही का ? :)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 01/24/2014 - 11:11
नवीन
बॅटमन फक्त पुरूषच फलंदाजी करणार असा आग्रह धरल्या नंतर मिपा भगिनींना गोलंदाजी करण्या शिवाय दुसरा काही मार्ग आहे का ? मिपा भगिनी सांगताहेत आपण सगळे भारतीय आहोत पुरुष विरुद्ध स्त्री असा खेळ लावायचा नाही आहे. चमू बनवून खेळताना स्त्री पुरुष भेद करण्याची मुळीच गरज नाही तरीही पुरुषच भेद करण्याचा अट्टाहास करताहेत. पुरुष परदेशी कोच घेऊ नका म्हणाले तर महिला हो म्हणाल्या.खेळाचे नियम भारतीय पाहिजेत म्हटल तर त्याला हो म्हणाल्या. बॅट बॉल शब्द भारतीय नाहीत म्हणाले भारतीय भाषेत फळी चेंडू म्हणायला तयार झाल्या. उसळते चेंडू आणि गूगली चेंडू पण टाकत नाहीएत.साधे सरळ चेंडू टाकताहेत. तरीही झेल जाताहेत. झेल देणारे बॅटमन आणि दोषी मात्र झेल घेणारेच ? चीत भी मेरीच पट भी मेरीच हा कोणता निपक्ष व्यवहार (फेअर प्ले) झाला बॅटमन ? :) ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 01/24/2014 - 11:53
नवीन
त्यांनीही करावी गोलंदाजी वा फलंदाजी, आम्ही कोण बोलणारे.
बाकी उपमा आवडली-यद्यपि हुकलेली असली तरीही.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 01/24/2014 - 12:39
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
Fri, 01/24/2014 - 12:07
नवीन
या धाग्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. त्यातील ज्या थोड्या भागावर लिहिता येईल त्याचा प्रयत्न करते.
माहितगार यांच्या मूळ लेखातील 'सद्य स्थिती आणि आव्हाने कोणती' या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने या घटनेतून काही प्रमाणात मिळू शकते. ही घटना बंगाल मधील असली तरीसुद्धा महाराष्ट्रात देखील खेड्यापाड्यांमध्ये थोड्या बहुत प्रमाणात ही स्थिती आहे. यातील काही घटना कदाचित बाहेर येणार नाहीत. त्यामुळे आव्हानांचा विचार करता आधीच्या माझ्या प्रतिसादात आणि स्वप्नांची राणी, पिरा यांच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे सर्वप्रथम दैनंदिन जीवनातील व्यक्तीगत पातळीपासूनचे प्रश्न सोडविणे हे सगळ्यात मोठे आव्हान आहे. तिथून पुढे मग मराठी विकीपीडीया किंवा अनुदिनी यावर ही सगळी माहिती देण्यातून खरच कितपत बदल घडतील? बहुजन समाजातील अनेक स्त्रिया आज सुद्धा जर शिक्षणापासूनच वंचित आहेत, तर मग स्त्रीवाद वगैरे विषयावर मराठी अनुदिनी शतकांनी आल्या तरी नेमके काय हशील होणार? अर्थातच हा सुधारणेचा एक महत्वाचा भाग आहे (आपला हेतू नक्कीच चांगला आहे) पण तूर्तास याने अंतिम ध्येय साध्य कसे होईल असा प्रश्न पडतो. ज्या लोकांपर्यंत ही सगळी माध्यमे पोचतात, त्यांच्यापैकी प्रत्येकाने हे पुढे जाइल असा प्रयत्न करणे हे पण तेवढेच महत्वाचे आहे.
बाकी ऋषिकेश यांच्या सगळ्या प्रतिसादांशी सह्मत. इतक्या योग्य शब्दात ही भूमिका मांडल्यानंतर अजून याबाबत वेगळे फार काही लिहिण्यासारखे वाटत नाही.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 01/24/2014 - 12:36
नवीन
जे साधन आपल्या हातात आहे त्याचा जमला तेवढा सदुपयोग करावा एवढेच ध्येय. अर्थात मी मराठी संस्थळांचा आणि मराठी विकिपीडियाला दिल्या जाणार्या भेटींचा अभ्यास जेवढा केला त्या नुसार चेपु काही ऑनलाईन मराठी वृत्तपत्रे सोडली तर ग्रामीण आणि बहुजन वाचक इतर मराठी संस्थळांपेक्षा मराठी विकिपीडियाकडे अधिक आहे तो लिहितो कमी पण श्रोता निश्चित आहे.
जरासे विषयांतर :
साधारणतः वर्षाला ९ लाख मूल दहावी पास होतात दहावी झाल्या नंतर काहीन काही कारणाने किमान प्रमाणात यातील बहुतांशजणांना इंटरनेटला हाताळावेच लागते तुमच्या हातात सातबाराची कॉपी असेल तर बिएसएनएल कडून इंटरनेटचा खर्च मासिक दोन अडीचशे रुपयांवर नसावा म्हणजे शहरात ज्या इंटरनेट सर्वीसला हजार एक चा खर्च होतो तेच काम ग्रामीण भागात दोन अडीचशे रुपयात होते.अर्थात इंटरनेट हाताळणार्या इक्विपमेंट्सच्या किमती अजूनही ग्रामीण क्षेत्रा करता प्रोहीबिटीव्ह आहेत.जिथे सरकार खर्च करते तेथे इ॑विपमेंट्स वापरण्यापेक्षा पुन्हा मार्केट मध्ये विकली जाणे अशा समस्याही आहेत.तरीही जेवढी मंडळींकडे इंटरनेट आहे त्यातील अत्यंतकमी संख्याबळ मराठी संकेतस्थळांवर अथवा अनुदिनींवर येत असाव असा कयास आहे अर्थात हा एकुण मराठी संस्थळांनी विचार करावयाचा वेगळ्या चर्चेचा आणि मोठा प्रश्न आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 01/24/2014 - 14:42
नवीन
स्त्री पुरुष समानता म्हणजे पुरुष जे जे करतात ते ते आणि तेच्च करायला मिळावे इतका उथळ अर्थ नाहीये.. स्त्री आणि पुरूष वेगवेगळेच आहेत हे पहिल्यांदा मान्य करुन मगच ह्या विषयावर बोलल्या जाऊ शकते.
हे आणि असेच! यापुढे स्त्रीमुक्ती, तिचा अमूक एका कार्यक्षेत्रातील सहभाग या आणि अशाच गोष्तींचा उहापोह होताना वरील गोष्ट लक्षात घेऊन त्यापुढे चालू होणार असेल तरच काही संवाद होऊ शकेल (अगदी वादही चालेल), अन्यथा, साध्यासाध्या गोष्तींवर 'हा माझा हक्क हा तुझा हक्क' करण्याचे दिवस खरच (काहीजणींसाठी) संपलेत (तर काहीजणी अजूनही मरतायत).
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 03/03/2014 - 04:16
नवीन
८ मार्च हा "जागतिक महिला दिन" मराठी विकिपीडियावर लेखन करून सहभाग घ्यावा हे आवाहन.
*विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प
*विकिपीडिया:महिला प्रकल्प
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 03/04/2014 - 11:31
नवीन
प्रकल्प पानास वाचक वाढले आहेत लेखक/लेखिका/संपादक म्हणूनही पुढाकार घ्यावा अस नम्र आवाहन आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3