Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

गविकाकाचा सल्ला.

म
मन
Fri, 01/10/2014 - 09:56
🗣 194 प्रतिसाद
पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात. त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला. तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल. एक टेम्प्लेट केस येथे देत आहे. प्रश्न: काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत. मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं. तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं. तीही जाता येता माझ्याशी बोलते. मी तसं अजून तिच्यापाशी बोललो नाहिये. पण मी सुरुवात कशी करु याविषयी कृपया सल्ला देणे. माझे अभ्यासाचेही नुकसान होत आहे. एक विद्यार्थी. . . गविकाकांचे उत्तरः श्री. रा.रा. विद्यार्थी, नमस्कार. गहन आहे प्रश्न.. पण करतो प्रयत्न. तुम्ही दहावीत आहात. एका शैक्षणिक वर्षास एक मानवी वर्ष या प्रमाणात तुमचे आजपावेतोचे शिक्षण झाले आहे असे मी गृहीत धरतो. म्हणजेच आपण अंदाजे १४ वर्षाचे आहात. तुम्ही उल्लेख केलेली "ती" ऑफिसात जाताना तुम्हाला निरोप घेण्यासदृश हावभाव आणि अविर्भाव करते. बालकामगार गुन्ह्याचे या बाबतीत उल्लंघन झालेले नसून "ती" नोकरी करण्याच्या कायदेशीर वयाची आहे असंही मी गृहीत धरतो. शिवाय ती ऑफिसात कामावर जाते, (बांधकामावर नव्हे) असं उल्लेखावरुन दिसत असल्याने तर्कदृष्ट्या ती किमान डिग्रीपर्यंत शिकली असावी. तस्मात तिचे वय वीस वर्षांच्या वर आहे असेही मी गृहीत धरतो. याचाच अर्थ ती तुमच्यापेक्षा किमान सहा वर्षांनी मोठी आहे. तसे असण्यास काही हरकत नाही. तसे असल्यास ती आवडण्यासही काही हरकत नाही. पण जग हरकतींपेक्षा शक्यतांवर चालत असते हा एक मोठा दु:खद नियम आहे. त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते. त्यामुळे तुमच्या भावनांशी पूर्णपणे सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने आपण खुद्द हपीसात जाण्याच्या वयापर्यंत कळ काढून त्या वेळी तत्कालीन दहावीतल्या "तीं"ना "हाय" करावेत असे सुचवून पाहतो. तोसवर आपल्या भावनांचे दमन करण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टींना अनैसर्गिक समजू नका इतकेच सांगतो. बाकी दहावीत असल्याने तुम्हांस अधिक स्पष्टीकरण नकोच अशी आशा. आपला का?का?. गवि. . . . ता.क.: वाचकांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारावेत. दर आठवड्याला किंवा गविकाकांचे जेवण उत्तम झाले असल्यास केव्हाही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील. द.ही.: फाजील प्रश्नांना प्रश्नकर्त्याचे दुर्दैव समजले जाईल. --मनोबा व गविकाका

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 32757 views

🗣 चर्चा (194)
म
मुक्त विहारि Fri, 01/10/2014 - 11:48 नवीन
असे माझे मत आहे. अर्थात बरेच जण अति विचार कर्रुन आणि मुद्दाम आपला आणि इतरांचा वेळ खर्च करतात, तो भाग निराळा. आणि आजकाल असे बरेच जण ह्या दोन-चार महिन्यांत प्रकट झाले आहेत. वरील उप-प्रतिसाद हा "मी_आहे_ना" ह्यांनाच आहे...
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Fri, 01/10/2014 - 11:38 नवीन
गविकाका एका दिवसात किति धाग्यांवर प्रतिसाद द्यावे?
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 01/10/2014 - 11:49 नवीन
ताईचा सल्ला
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 01/10/2014 - 11:55 नवीन
गविकाका, खालील गाड्यांपैकी एक गाडी घ्यायची ठरवली आहे.कुठची घ्यावी(फक्त डिझेल मॉडेल) १)मारुती स्विफ्ट-VDI 2)फियाट पुन्टो- MJD-Dynamic 3)टोयोटा एटियॉस लिव्हा ४)फोक्स्वॅगन पोलो महिन्याला जास्तीत जास्त १०००कि.मी.,वापर दररोज. कृपया सल्ला द्यावा.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/10/2014 - 12:27 नवीन
श्रीयुत चिरोटा, आपला प्रश्न समजला. आपण आधीच उत्तम संक्षिप्त यादी बनवली आहे. यामुळे आता काम अत्यंत सोपे आहे. निर्दिष्ट चार वाहनांपैकी चौथ्या क्रमांकाचे फोक्सवॅगन पोलो हे वाहन या यादीतले सर्वाधिक खरेदीयोग्य वाहन आहे असे मत देत आहे. जर्मन इंजिनियरिंगची तुलना बाकीच्यांशी होऊ शकत नाही. किंवा तुलनाच होऊ शकते आणि फोक्सवॅगन / स्कोडा या प्रॉडक्ट लाईनच्या मोटारी श्रेष्ठ ठरतात. शुभेच्छा. गविकाका
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 01/10/2014 - 12:25 नवीन
ग्रँड आय १० घ्या
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/10/2014 - 12:26 नवीन
गविकाका पाशवी शक्तींना वेसण कशी घालावी?
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 01/10/2014 - 12:30 नवीन
यॉर्कर?????????
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/10/2014 - 12:37 नवीन
रा. बॅटमॅन, पाशवी शक्ती हा शब्द आपण "स्त्री"जमातीला उद्देशून वापरला आहात हे गृहीत धरतो. हेच का गृहीत धरतो याचं कारण म्हणजे वेड पांघरणे जमत नसणे या स्वरुपाचे आहे. सल्ला असा की पाशवी शक्ती हा दुरित शब्द आधी आपल्या शब्दकोषातून काढून टाका. डीलीट करता न आल्यास हाईड तरी करा. शिवाय कोणत्याही प्रकारची वेसण घालण्याची कोणतीही इच्छा मनात बाळगू नका. वेसण घालणारे आपण कोण? अशा दृष्टीने स्वतःकडे पहा. वरील सर्व मुद्दे स्त्रीशक्तीच्या समोर पुन्हापुन्हा बोलून मांडत रहा. त्यामुळे तुमच्याविषयीचे सर्व समज दूर होऊन काही काळात ऑपॉप त्यांना वेसण घातल्याप्रमाणे सर्व फायदे तुम्हाला मिळतील. फार जास्त वेसण बसल्यास विवाहाची जबाबदारीही आपणाकडे चालून येऊ शकते. एकूण ध्येय साध्य करण्याकडे वाटचाल असणे महत्वाचे. प्रत्येक वेळी संघर्ष किंवा क्रांती हाच उपाय नव्हे. आपला सौम्य गविकाका
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/10/2014 - 12:43 नवीन
पाशवींचे पाशवीपण जावो अशा अर्थी विचारतो होतो हो ;) त्या पाशवीपणाला वेसण कशी घालावी ;) तरी, सल्ल्याबद्दल धन्यवाद हेवेसांनल. आपला (सौम्यरौद्रकरुणविनोदबीभत्समिश्रित) बट्टाचार्य.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/10/2014 - 12:48 नवीन
वेसण घालायचा प्रयत्न केल्यास शिंगे रोखून अंगावर येण्याची शक्यता अमर्याद प्रमाणात आहे. त्यापेक्षा प्रेमाने पेंड सरकी खायला घालावी. जे आजपर्यंत कोणालाही जमलं नाही त्याची स्वप्ने कृपया बघू नयेत.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/10/2014 - 12:52 नवीन
हॅ हॅ हॅ. वाटलंच कोणीतरी प्रतिनिधी मध्ये येणारच. प्रत्यक्षापेक्षा जाल भयंकर या नात्याने सर्व पाशवी शक्ती जालावर अजूनच जास्त नखरे करतात असे दिसते आहे. तस्मात प्रतिपादनास तितपतच महत्त्व दिलेले आहे.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 01/10/2014 - 17:51 नवीन
प्रत्यक्षापेक्षा जाल भयंकर!! =))
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/10/2014 - 20:05 नवीन
गविकाकांनी सांगितलं तेच सांगितलं बाबा तुला. तरी पटेना. लग्न झाल्यावर तुझं कसं व्हायचं लै काळजी लागून राहिलीय. तू आपला संकटांचा नाश करणारं मारुती स्तोत्र न चुकता म्हणत जा.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/10/2014 - 20:21 नवीन
काय सारखं लावलंय हो मारुतीस्तोत्र आँ? हनुमद्गुग्गुळवटी देऊ का ;) =))
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 01/11/2014 - 16:09 नवीन
लग्न झाल्यावर तुझं कसं व्हायचं लै काळजी लागून राहिलीय.
मला तर याच्या बायकोचं कसं व्हायचं याची जास्त काळजी लागून र्‍हायलीय.....Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 01/11/2014 - 16:10 नवीन
चलो अच्छा है. कुणाला आमची तर कुणाला आमच्या होणार्‍या बायकोची चिंता लागलीये. तस्मात काळजी ब्यालन्स्ड झाली हे उत्तम झालं ;)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 01/11/2014 - 16:57 नवीन
लग्न झालं नाय सासवा आधीच तय्यार.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 01/11/2014 - 17:00 नवीन
बघा की ओ. काय बाका प्रसङ्ग तो.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 01/12/2014 - 07:27 नवीन
तुला सांगतो ब्याट्या , आपल्या बघण्याचे, ठरल्याचे, झाल्याचे अन सुखात चालाल्याचे इथे अज्याबात सांगायचे नाही, दाखवायचे नाही अन कळु तर बिलकुल द्यायचे नै. ;-) .................. हितचिन्तक अभ्या
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 01/12/2014 - 07:39 नवीन
अन सुखात चालाल्याचे
हाच गैरसमज असतो :(
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 01/12/2014 - 07:50 नवीन
म्हणुनच ;-)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 01/12/2014 - 07:58 नवीन
अंह... जितका वेळ आपल्याला वाटते की आपण सुखात आहोत...तो पर्यंत "तीचे" "नवर्याला ताटाखालचे मांजर कसे बनवावे" याचे ट्रेनिंग चालु असते
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 01/12/2014 - 07:42 नवीन
अच्छा! म्हंजे मनमें लड्डू फुटरैले तर! :D
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 01/12/2014 - 08:07 नवीन
अर्थातच ;) त्यात काय शंकाच नाय !!!!! त्यात सुद्धा कुणाला कळू द्यायचे नाही हे तर तुला ठाऊक असेलच =))
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Fri, 01/10/2014 - 19:56 नवीन
केल्यास शिंगे रोखून अंगावर येण्याची शक्यता अमर्याद
शिंगे आमच्याकडेही आहेत... याल अंगावर तर घेऊ शिंगावर!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/10/2014 - 20:26 नवीन
याल अंगावर तर घेऊ शिंगावर!
आहूऽऽऽ!!!!!!!!!!!!!!!! (त्रिशतस्पार्टनप्रेमी) बॅटोनायडस.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/10/2014 - 12:39 नवीन
"पाशवी शक्तींना वेसण कशी घालावी?" आता खूद्द तुम्हालाच असा प्रश्र्न पडला म्हणजे कमाल झाली. बहुदा "डु आय.डी" जास्त प्रबळ झालेल्या दिसत आहेत. पण चिंता नसावी, जी़व़ऩ भा़ऊंचा़ ले़ख़ वाचले आ़णि़ त्या़व़ऱ प्रति़सा़द़ दिले की अशा पाशवी शक्ती पळून जातात, असे अनूमान आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/10/2014 - 12:46 नवीन
जीवनरंगी मिठाई खाल्ली की नथूगुग्गुळवटीच काय, पशूगुग्गुळवटीसकट सर्व वट्या खाणार्‍यांचा बन्दोबस्त पक्का हे बाकी खरं!!! अन पुल म्हणाले त्याप्रमाणे पेढा बनवण्यापेक्षा हलवायाची मैतरकी अधिक गोडीची. हलवाई इथे मिपावरच असल्याने टेण्षण इल्ले. धन्यवाद सल्ल्याबद्दल!!!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/10/2014 - 12:52 नवीन
तुमचे पंख आमच्या कडे वळू नयेत, ह्याचाच आम्ही प्रयत्न करतो. (तुमच्या पंखाच्या नुसत्या दर्शनाने बर्‍याच जणांची धोतरे सुटली आहेत.) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/10/2014 - 12:55 नवीन
हाहाहा =)) पण काका, आम्ही आपले गुणी पुतणे आहोत. तेव्हा कृपादृष्टी असू द्यावी. ( गुणांमध्ये आलोकनाथ आणि गटणे या दोघांना चीतपट करणारा) बट्टमण्ण.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/10/2014 - 13:01 नवीन
मी पण हेच म्हणणार होतो. तो वामन परवडला, निदान स्वर्ग तरी मिळतो. तुम्ही १/२ वाक्यातच आस्मान दाखवता. असो.... भले भले साक्षी आहेत (क्रुपया "सा" ह्या अक्षराच्या कान्हा/मात्रा ह्यांची तोडमोड करू नये आणि अनुस्वार तर बिलकूल देवू नये.मी "साक्षी"च म्हणालो आहे.)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/10/2014 - 13:44 नवीन
भले भले साक्षी आहेत (क्रुपया "सा" ह्या अक्षराच्या कान्हा/मात्रा ह्यांची तोडमोड करू नये आणि अनुस्वार तर बिलकूल देवू नये.मी "साक्षी"च म्हणालो आहे.)
कान्ह्याची मोडतोड करणे कंस, जरासंध, पूतनामावशी वगैरे जबराट मंडळींनाही जमले नाही. आम्ही किस झाड के वटवाघूळ?
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Fri, 01/10/2014 - 12:29 नवीन
हे असले धागे बरे सं.पा मंड्ळ उडवित नाहकाय? आणि आमचा "३१ डिसेंबरचा आंमंत्रणाचा" मात्र प्रकाशीत करण्यागजोगा वाटाला नाही हे कारण देवुन उडविला होता. का हो व गविकाका काय कारण होते आता तरी सांगाल काय?
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 01/10/2014 - 12:33 नवीन
त्यांनी आधीच सांगितलंय ना प्रश्न हे उत्तर मिळण्याच्या अपेक्षेने विचारलेले असावेत, पेचात टाकून उत्तरदात्याची उत्तरपूजा बांधण्यासाठी नव्हे. तुमचा प्रश्न दुसर्‍या क्याट्यागरीतला आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/10/2014 - 12:42 नवीन
म्हणजे उत्तम सरासरी आहे. व्वा!! बढि़या है!!!!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/10/2014 - 12:54 नवीन
फास्टेस्ट १००...
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 01/10/2014 - 13:01 नवीन
टेन्शन च्या टेन्शन मुळे टेन्शन चा प्रॉब्लेम कसा सोडवावा?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Fri, 01/10/2014 - 13:14 नवीन
लोकांना संपादक का व्हावसं वाटतं?
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/10/2014 - 16:54 नवीन
सुखाचा जीव दु:खात घालावासा वाटतो तेव्हा "येरे कुत्र्या आणि चाव मला" अशा भावविभोर अवस्थेत लोक संपादक व्हायला तयार होतात.
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Sat, 01/11/2014 - 10:07 नवीन
कोणाला कुत्रा म्हणताय ते तरी स्पष्ट करा... माफी सुधा मागा जर स्त्रियाँ कडे बोट जात असेल तर.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 01/11/2014 - 10:12 नवीन
परत स्त्रिया? तुम्हाला एकतर स्त्रिया फार आवडतात किंवा अजिबात आवडत नाहीत! नेमका काय प्रकार आहे? बाकी तुमचे विंग्रजीवरचे प्रभुत्व बघता तुम्हाला मराठी म्हणी वैग्रे माहिती असण्याची शक्यता फार कमी दिसते! म्हणून सांगते की "आ बैल मुझे मार" या अर्थाची ती मराठी म्हण आहे. एखादे म्हणींचे पुस्तक वाचलेत तर त्यात सापडेल.
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Sat, 01/11/2014 - 10:29 नवीन
एकदाच उत्तर देतो मला विविध स्त्रियाँ बद्दल प्रेम आदर ममत्व भीती तिरस्कार व कामेच्छा/वासना आशा व्यक्ती स्थिति परत्वे विविध भावभावना आहेत. आपलाही मराठीचा अभ्यास कमी दिसतो अन्यथा ध चा मा केला तर काय घडते हे माहीत असता बैलाचा कुत्रा करून आता ती घोडचुक पोलिटिकली करेक्ट करायचा या प्रतिसादातुन प्रयत्न केला नसता हे लक्षात ठेवा. टिप: हां उप प्रतिसाद सार्वजनिकआहे म्हणजेच मुद्दाम गहन विचार करून फक्त पैसा यांना मर्यादित ठेवलेला नाही हे सुज्ञास वेगळे ....
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 01/11/2014 - 10:32 नवीन

"आ बैल मुझे मार" या अर्थाची ती मराठी म्हण आहे

  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 01/10/2014 - 14:35 नवीन
गविकाकांच्या सल्ल्यावर मारकुटेकाकांचा हल्ला कसा थांबवावा?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/10/2014 - 15:04 नवीन
@ मारकुटेकाकांचा हल्ला कसा थांबवावा? >>> Image removed. संपादकांनी कात्री घेऊन रात्री ऑपरेशन करावे, << पक्षी >> हल्लेरूपी 'गळवं' काढून टाकावीत! :D
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 01/10/2014 - 16:01 नवीन
हळवे न होता गळवे काढून टाकावीत
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 01/11/2014 - 05:15 नवीन
हळूच (अल्गद न कळत) काढावीत म्हंजे काढणार्याला दु:ख नाही आनि ईतरांना मन्स्ताप नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 01/10/2014 - 15:02 नवीन
शतकी धागे कशे काढावे ?
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 01/10/2014 - 15:05 नवीन
हाहाहा मस्त बॅटींग केलीये गविकाकांनी :) गविकाका गविकाका "डायरी लिहीण्याचे फायदे व तोटे" विषद कराल का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 15 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 17 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा