गविकाकाचा सल्ला.
पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात.
त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला.
तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल.
एक टेम्प्लेट केस येथे देत आहे.
प्रश्न:
काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत.
मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं.
तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं. तीही जाता येता माझ्याशी बोलते. मी तसं अजून तिच्यापाशी बोललो नाहिये. पण मी सुरुवात कशी करु याविषयी कृपया सल्ला देणे. माझे अभ्यासाचेही नुकसान होत आहे.
एक विद्यार्थी.
.
.
गविकाकांचे उत्तरः
श्री. रा.रा. विद्यार्थी, नमस्कार.
गहन आहे प्रश्न.. पण करतो प्रयत्न.
तुम्ही दहावीत आहात. एका शैक्षणिक वर्षास एक मानवी वर्ष या प्रमाणात तुमचे आजपावेतोचे शिक्षण झाले आहे असे मी गृहीत धरतो. म्हणजेच आपण अंदाजे १४ वर्षाचे आहात.
तुम्ही उल्लेख केलेली "ती" ऑफिसात जाताना तुम्हाला निरोप घेण्यासदृश हावभाव आणि अविर्भाव करते. बालकामगार गुन्ह्याचे या बाबतीत उल्लंघन झालेले नसून "ती" नोकरी करण्याच्या कायदेशीर वयाची आहे असंही मी गृहीत धरतो. शिवाय ती ऑफिसात कामावर जाते, (बांधकामावर नव्हे) असं उल्लेखावरुन दिसत असल्याने तर्कदृष्ट्या ती किमान डिग्रीपर्यंत शिकली असावी. तस्मात तिचे वय वीस वर्षांच्या वर आहे असेही मी गृहीत धरतो.
याचाच अर्थ ती तुमच्यापेक्षा किमान सहा वर्षांनी मोठी आहे. तसे असण्यास काही हरकत नाही. तसे असल्यास ती आवडण्यासही काही हरकत नाही. पण जग हरकतींपेक्षा शक्यतांवर चालत असते हा एक मोठा दु:खद नियम आहे. त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते. त्यामुळे तुमच्या भावनांशी पूर्णपणे सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने आपण खुद्द हपीसात जाण्याच्या वयापर्यंत कळ काढून त्या वेळी तत्कालीन दहावीतल्या "तीं"ना "हाय" करावेत असे सुचवून पाहतो.
तोसवर आपल्या भावनांचे दमन करण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टींना अनैसर्गिक समजू नका इतकेच सांगतो. बाकी दहावीत असल्याने तुम्हांस अधिक स्पष्टीकरण नकोच अशी आशा.
आपला का?का?.
गवि.
.
.
.
ता.क.:
वाचकांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारावेत. दर आठवड्याला किंवा गविकाकांचे जेवण उत्तम झाले असल्यास केव्हाही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील.
द.ही.:
फाजील प्रश्नांना प्रश्नकर्त्याचे दुर्दैव समजले जाईल.
--मनोबा व गविकाका
🗣 चर्चा
(194)
न
नाखु
Fri, 01/10/2014 - 10:39
नवीन
प्रश्न तुमचा उत्तर राजा गोसावींचे या सदराची आठवण झाली.
आता आमचा प्रश्नः
धर्म्/विज्ञान,जात्-पात,राजकारण,पुरोगामी/प्रतीगामी,निवासी/अनिवासी यावरील बिनबुडाचे वाद या पल्याड ही काही जग आहे हे जालीय (स्वयंभू)विचारवंताना *new_russian* \m/ \M/ कधी कळेल (आणि पचनी पडेल)*blush* :-[ :[ ;'> ;-. :blush:
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 01/10/2014 - 10:41
नवीन
>>विचारवंताना
आपणास व च्या जागी 'ज' वापरायचा होता का?
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 01/10/2014 - 10:52
नवीन
आलटून्/पालटून(१) वापरण्याची प्रथा(२) आहे बुवा(३)...
तळटीपा:
१.आलटून्/पालटून म्हणजे तुमची बाजू कुठली "धागा कर्त्याची की विरोधी पक्षाची" त्यानुसार सोईस्कर.
२.प्रथा म्हणजे परंपरा नव्हे "परंपरा" म्हटले की तुम्ही रूढीवादी अगदी बुरसट्लेल्या विचारांचे गणले जाल.
३ सदर माहीती "जुण्या आणि जाणत्या" मिपाकराने नाव न सांगण्याचे अटीवर दिली आहे तेव्हा ईत्यलम.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 01/10/2014 - 14:31
नवीन
तुम्ही "कितवी" बाजू आहात?
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Fri, 01/10/2014 - 10:55
नवीन
जिचारजंत म्हणायचे आहे काय ? ( हा परश्न गविकाकांला नाही आहे)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 01/10/2014 - 10:40
नवीन
गविकाका..
अर्धवट सोडलेले "वाड्यात.." कधी पुर्ण करणार?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 01/10/2014 - 10:41
नवीन
+११११
केळ्याचं काय झालं?
- Log in or register to post comments
म
मारकुटे
Fri, 01/10/2014 - 10:52
नवीन
शिकरण केलं
- Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा
Fri, 01/10/2014 - 10:40
नवीन
स्त्री अन पुरुष यात श्रेष्ठ कोण ?
- Log in or register to post comments
ग
गवि
Fri, 01/10/2014 - 10:49
नवीन
माननीय बर्फाळलांडगा,
सदर धागा हा प्रश्न विचारुन उत्तरे मिळवण्यासाठी आहे. प्रश्न विचारुन पेच निर्माण करण्यासाठी नाही. तेव्हा प्रश्न विचारण्यामागे उत्तर मिळवण्याचा उद्देश असावा, उत्तरकर्त्याची उत्तरपूजा बांधण्याचा उद्देश नसावा.
स्त्रीपुरुष एकसमान आहेत असं म्हणून पाहतो.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 01/10/2014 - 10:51
नवीन
=))
- Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा
Fri, 01/10/2014 - 11:04
नवीन
:)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 01/10/2014 - 10:43
नवीन
आवडला.
- Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा
Fri, 01/10/2014 - 10:46
नवीन
सदर कवा सुरु व्हनार ?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 01/10/2014 - 11:02
नवीन
जीवन भाऊ हे फार उत्तुंग व्यक्तीमत्व आहे.त्यामुळे त्यांनी स्वतःचा ब्लॉग पण काढला आहे.
आपण तिथे जावून त्यांना हवे ते विचारू शकता.
त्यांच्या ब्लॉगचा पत्ता देत आहे.
http://agakke.blogspot.in/2013/04/jay-maharastra.html
- Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा
Fri, 01/10/2014 - 11:10
नवीन
व्हेन इट कम्स टु जीवन भाऊ ओन्ली मुवी फर्स्ट..
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 01/10/2014 - 11:20
नवीन
ह्या अशा जीवनरंगी लेखांच्या बाबतीत आम्ही फर्स्टच आहोत आणि असणार.
त्याचे काय आहे, मुद्दाम गहन विचार कर्रुन पाडलेल्या बिन-केशरी आणि घट्ट पाकातल्या लेखांपेक्षा (प्रतिसादांपेक्षा) हे बरेच नाही का?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 01/10/2014 - 18:15
नवीन
जीवनभौ च्या बोल्गवर खालील ब्रीद वाक्य आढळले.
"मी मराठी मानुस माला नहीं कोणाची भीती ....जय महाराष्ट्र"
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 01/10/2014 - 18:23
नवीन
मला तर जलपर्णीबरोबर साक्षात भाऊंचं दर्शन झालं!

- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 01/10/2014 - 18:28
नवीन
आता हेच चित्र पी.सी. वर लावतो.
बघू आता आम़च्या़ लि़खा़णा़त़ का़ही़ फ़ऱक़ प़ड़तो़ का़ ते...
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 01/10/2014 - 19:48
नवीन
भाऊ!!!!!!!!!!! _/\_
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 01/11/2014 - 05:08
नवीन
एक टीप टाका "कुणी तरी अशी आम्हाला गंमत सांगेल काय? या टोपीखाली दडलयं काय?
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 01/10/2014 - 10:53
नवीन
गविकाका,
उलाला उलाला... हे गाणे पाहुन माइंड "डर्टी" झाल्यास काय करावे ? ;)
- Log in or register to post comments
म
मारकुटे
Fri, 01/10/2014 - 10:53
नवीन
गविकाका संपादक होण्यासाठी काय करावे लागते?
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 01/10/2014 - 11:01
नवीन
न उडणारे प्रतिसाद द्या. मग ऑपॉप संपादक कसं व्हायचं ते कळेल.
- Log in or register to post comments
म
मारकुटे
Fri, 01/10/2014 - 11:03
नवीन
तेच तर विचारले आधी. त्याचे धड कुणी उत्तर देत नाही. याचाच अर्थ न उडणारे प्रतिसाद कसे द्यायचे कुणालाच माहित नाही. याचाच अर्थ आताचे संपादक त्या निकषानुसार संपादक झालेले नाहीत. म्हणूनच वरचा प्रश्न विचारला.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 01/10/2014 - 11:04
नवीन
दिला पाय शेपटीवर.... :)
- Log in or register to post comments
म
मारकुटे
Fri, 01/10/2014 - 11:10
नवीन
अरे तुमची शेपुट होती का ती? आयमायस्वारी
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 01/10/2014 - 11:11
नवीन
नाय नाय
- Log in or register to post comments
ग
गवि
Fri, 01/10/2014 - 11:08
नवीन
संपादक न होणे हा आपल्या आयुष्यातला तातडीचा आणि गहन प्रश्न आहे का? बाकीचे प्रश्न पाहता तसं वाटत नाही.
- Log in or register to post comments
म
मारकुटे
Fri, 01/10/2014 - 11:09
नवीन
असु शकतो ना?
- Log in or register to post comments
स
सुहास..
Fri, 01/10/2014 - 16:23
नवीन
आलात का घुबडाच्या घरातुन बाहेर सल्लाकाका !! छान
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 01/10/2014 - 10:56
नवीन
जीवन भौंचा साल्ला
बर्फाळलांडगा - Fri, 10/01/2014 - 15:16नवीन
सदर कवा सुरु व्हनार ?
हा साल्ला कोण???
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 01/10/2014 - 10:57
नवीन
पैसा हा गवि काकांचा ड्यु आय डी आहे का? ;)
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 01/10/2014 - 10:59
नवीन
हा प्रश्न आहे की विधान?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 01/10/2014 - 11:04
नवीन
९२.४५ % विधान नि ७.५५% (झाले का १००?) प्रश्न!
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 01/10/2014 - 11:07
नवीन
प्यारे१ हा पण माझाच आयडी आहे. ;)
- Log in or register to post comments
म
मारकुटे
Fri, 01/10/2014 - 11:08
नवीन
खुलाशाबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 01/10/2014 - 10:59
नवीन
फाश्टेश्ट ५०??
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Fri, 01/10/2014 - 11:01
नवीन
यांच्याकडील टंचनिकांची संख्या वाढलेली दिसतेय.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 01/10/2014 - 11:20
नवीन
कोणाच्याही डोक्यावर मिरे वाटण्याची स्टँडर्ड ऑपरेटिङ्ग प्रोसिजर काय ?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 01/10/2014 - 11:25
नवीन
कारण बराच गहन विचार आणि मुद्दाम वेळ खर्च कर्रून पण इथे बर्याच जणांना ते जमत पण नाही.
ह्यासाठी बहूदा नावीक होवून , चीनच्या समुद्रात बर्फाच्या रंगाच्या प्राण्याची सोबत घेत टंकत असावेत.
वरील उप-प्रतिसाद सूड यांनाच आहे. हे वेगळे सांगायला नकोच.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 01/10/2014 - 12:27
नवीन
तेही खरंच मुविकाका. आता गविकाका काय म्हणतात ते बघू.
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 01/10/2014 - 17:43
नवीन
संपादक व्हावे.
त्यांच्याही डोक्यावर मिरे वाटायचे असतील तर सामनामध्ये सदरलेखन करावे.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 01/10/2014 - 17:46
नवीन
हा प्रश्न प्रत्यक्ष सूडला पडावा? :)
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 01/10/2014 - 11:21
नवीन
गविकाका
आपले लाडके नसलेल्यांचा धागा,त्यांची रनिंग कॉमेंट्री डोक्यात जात असेल तर इस्त्री शक्तीची जाज्वल्य पावर दाखवुन भरकटवावा का?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 01/10/2014 - 11:40
नवीन
'पॉवरबाज इस्त्री'
खिक्क्क!
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 01/10/2014 - 17:49
नवीन
त्यात विचारायचय काय? ;)
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 01/11/2014 - 04:21
नवीन
प्रत्येक्ष संपादकांचा पाठिंबा!!जय हो,जय हो ,बाबाजी!!
- Log in or register to post comments
म
मी_आहे_ना
Fri, 01/10/2014 - 11:32
नवीन
मिपा ही विचारांचे आदान-प्रदान करण्याचे माध्यम आहे की विचार प्रसूती केंद्र
;)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »