Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

राजकीय चेटकीशोध अर्थात पॉलीटीकल विच हंटींग

व
विकास
गुरुवार, 12/26/2013 - 21:43
🗣 147 प्रतिसाद
​आज मोदींच्या विरोधात पुन्हा चालू केला गेलेला खटला झकीया जाफरी आणि त्यांच्या बोलवित्या धनी मोदी विरोधक टिस्टा सेटलवाड (आणि पार्टी) परत एकदा हरल्या... अर्थात त्यांनी परत जाहीर केले आहे की आम्ही हा लढा चालूच ठेवू. जे झकीया जाफरींच्या बरोबर वैयक्तीक आयुष्यात झाले ते दुर्दैवी होते, अक्षम्य कृत्य होते. पण त्यांच्या आणि तशाच इतरांच्या भावनांशी खेळ करत जे काही टिस्टा सेटलवाड आणि त्यांच्या समाजवादी/डाव्या/स्युडोसेक्यूलर्सनी गेले १०+ वर्षे चालवले ते त्याहूनही अक्षम्य आहे असे वाटते. यात मोदी बरोबर का चूक, आदर्श का अजून काही हे माझ्या दृष्टीने अत्यंत मामूली आहे. पण त्यांच्या (टीस्टा आणि पार्टीच्या) ह्या द्वेष आणि भडक विचार-प्रचाराने समाजात दुफळी माजत गेली हे कटू सत्य आहे. मात्र, कोर्टाने आज स्पष्ट केले आहे, याला genocide/pogram वगैरे म्हणणे बरोबर ठरणार नाही, जे शब्द सातत्याने या स्युडोसेक्यूलर्सनी वापरले आहेत... याला इंग्रजीत शब्द प्रयोग केला जातो: पॉलीटीकल विचहंटीग. कुणालाही चेटकी आहे असा समज करण्याचा प्रयत्न... अंधश्रद्धेतील भूताखेताइतकेच किंबहूना त्याहूनही अधिक भिषण असे हे कृत्य आहे. दुर्दैव असे की त्याला अनेक चांगले, बुद्धीवादी त्यांच्यातील बौद्धीक अहंकाराने, कुठेतरी डावेपणाचे आकर्षण (अथवा डावी प्रवृत्ती) आणि धार्मिकतेस असलेला एकंदरीत विरोध यातून असा अप्रामाणिकपणा घडतो... या विचहंटींगचा त्रास केवळ मोदी-भाजपा-संघ इतकाच मर्यादीत नव्हता. मोदींना व्हिसा नाकारा म्हणून आरडाओरड करत भारतीयांमधील फूट अमेरीकेस स्पष्टपणे दाखवणार्‍यांना एक समजले नाही की आता तो आत्मविश्वास अमेरीका इतरत्रही वापरू शकते. आज खोब्रागडेंच्या बाबतीत जे काही झाले आहे ती केवळ पुढची पायरी आहे. मोदींचा व्हिसा आणि खोब्रागडे याच्या मधे अजून एक घटना घडली होती. अमेरीकन नागरीक असलेल्या, गोल्डमन सॅक्सच्या उपाध्यक्ष, गुगल फाउंडेशनच्या ग्लोबल डेव्हलपमेंट इनिशिएटीव्हच्या प्रमुख असलेल्या सोनल शहांना नव्याने अध्यक्ष झालेल्या ओबामांना चांगले पद देऊन कॅबिनेट मधे घेयचे होते. पण परत या मोदी विरोधक डाव्या समाजवाद्यांनी हल्लाबोल केला. ओबामाने पूर्ण माघार घेतली नाही, पण सोनल शहांवर अन्याय होयचा तो झालाच. त्यांचा अपराध काय होता? तर त्या विश्व हिंदू परीषद ऑफ अमेरीका या अमेरीकन कायद्यानुसार आजही अधिकृत नोंदणी असलेल्या संस्थेत, त्या त्यावेळेस तरूण कार्यकर्ती म्हणून काम करत होत्या आणि त्यावेळेस, म्हणजे गुजरातच्या २००१ च्या भूज भूकंपाच्या वेळेस त्यांनी अमेरीकेत मदतनिधी गोळा केला होता आणि तेथे सेवाभावी संस्थांना पाठवला होता.... मला गंमत वाटते, हे डावे कम्युनिस्ट समाजवादी स्वतः मात्र अमेरीकेत राहतात! त्या व्यतिरीक्त ज्या गोष्टी आता खोट्या ठरल्या आहेत, त्या खर्‍याच आहे असे खोट्या आचारांनी दाखवून ते अनेक ठिकाणी छापून ठेवले आहे. त्यावर टिपिकल डाव्या पद्धतीने पुस्तके, पेपर्स, रीपोर्ट्स तयार केले गेले आहेत आणि तुमच्या-माझ्या सारख्या मध्यमवर्गीय बुद्धीवाद्यांचे ब्रेनवॉशिंग करायला वापरले गेले आहेत.
_______________

अधिक माहीती:

या निमित्ताने किती गोष्टी गेल्या दहा वर्षात मोदी विरोधात केल्या गेल्या हे बघण्यासारखे आहे...
  1. सर्व प्रथम दंगल झाली तेंव्हा मोदी हे सत्तेत येऊन केवळ दोनच महीने झाले होते.
  2. दंगल चालू होताच त्यांनी या संदर्भातील नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, गुजरात सीमेलगतच्या सर्व राज्यांना (महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान) या राज्यांना कायदासुव्यवस्थेसाठी मदत मागितली होती. काँग्रेसच्या राज्यांनी - महाराष्ट्र (मुख्यमंत्री विलासराव देशमुख) राजस्थान आणि मध्यप्रदेश (मुख्यमंत्री दिग्विजय सिंग) यांनी मदत देण्याचे नाकारले अथवा टाळले. दुरूस्ती: फक्त महाराष्ट्र सरकारने (विलासराव देशमुख, मुख्यमंत्री) राज्यसुरक्षादलाच्या दोन तुकड्या मदतीसाठी पाठवल्या होत्या.
  3. गोध्रा मध्ये २७ फेब्रुवारी २००२ ला गाडी जाळण्यात आली, दुसर्‍या दिवशी धार्मिक दंगलीस सुरवात झाली. त्याच दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारीस गुलबर्ग सोसायटी हिंसाचार घडला. परीस्थिती राज्यसरकारच्या हाताबाहेर जात आहे, हे पाहून त्याच दिवशी केंद्राकडे लष्करी मदतीसाठी मदत मागितली गेली. पण अहमदाबदेत स्थानिक लष्करी तळ नसल्याने, सर्व पूर्ण होऊन लष्कर तैनात होईस्तोवर एक मार्च म्हणजे पुढचा दिवस लागला.
  4. एसआयटी स्थापण्याआधी शहा-नानावटी आयोग नेमण्यात आला आणि त्यातले निष्कर्ष हे काँग्रेस आणि टिस्टा सेटलवाड पार्टीस पटले नाहीत कारण तो आयोग भाजपाच्या राजवटीने स्थापला होता.
  5. मग लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्रीपद मिळताच - सुप्रिम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली अजून एक आयोग स्थापला. त्या आयोगाने रेल्वेमधे घातपात नसून अपघात झाला असे जाहीर केले. (नानावटी कमिशनने उलट सांगितले होते). त्याला, त्यात वाचलेल्या एका अपघात/घातपात ग्रस्त व्यक्तीने गुजरात हायकोर्टाने आव्हान दिले. लालूच्या अख्त्यारीतील रेल्वे मंत्रालयाने, "असे आव्हान देण्याचा हक्क त्या व्यक्तीस नाही," म्हणून याचना केली, जी कोर्टाने फेटाळली आणि पुढे जाऊन, "संपूर्ण बॅनर्जी आयोगच बेकायदेशीर आहे," असा निष्कर्ष काढला. युपिएच्या केंद्रसरकारने त्याला सुप्रिम कोर्टात आव्हान दिले नाही, याचा अर्थ त्यांना हा निर्णय मान्य होता. त्यामुळे हा अधिकृतपणे संसदेच्या पटलावर ठेवलाच गेला नाही/ ठेवू शकले नाहीत. तरी या संदर्भात राहून राहून आश्चर्य वाटते की आपण एका पोटेन्शिअली बेकायदेशीर आयोगावर काम करत आहोत हे एका सुप्रिम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशाला कळले देखील नाही? का दुर्लक्ष केले?
  6. त्यानंतर २००९ मध्ये सुप्रिम कोर्टाने स्वतंत्ररीत्या एसआयटी स्थापली. त्यांच्या निष्कर्षानुसार मोदींचा यात कट नव्हता हा भाग तर होताच पण टिस्टा सेटलवाड यांनी "cooking up macabre tales of killings" केले असा निष्कर्ष काढला.
  7. या सर्व काळात आणि नंतर ही दंगल पूर्ण आटोक्यात आणे पर्यंत अक्षम्य हिंसाचार झाला. पण त्याला मग तितकेच किंबहूना त्याहूनही अधिक अक्षम्य रंग लावले गेले. भडकपणा टाळण्यासाठी ते येथे लिहीत नाही... पण सुप्रिम कोर्टाने स्थापलेल्या स्पेशल इन्व्हेस्स्टीगेशन टिम (एसआयटी) ने छाननी केल्यावर त्यात काही तथ्य आढळले नाही. ते धादांत खोटे आरोप होते असा एस आय टी चा निष्कर्ष झाला.
  8. एसआयटी साठी अजून एक कारण होते ते म्हणजे आय पी एस ऑफिसर संजीव भट्ट यांचे विधान की दंगल मोदींच्या आदेशाने झाली. पण चौकशी करताना लक्षात काय आले? दंगलींच्या संदर्भातील त्या बैठकींना स्वतः भट्ट उपस्थितच नव्हते आणि हवे ते काम / जबाबदारी न मिळाल्याने ते मोदी सरकारवर नाराज (disgruntled employee) आहेत/होते.
  9. अजून एक नीचांकः मोदींच्या नावावर सर्वप्रथम टाईम्स ऑफ इंडीयाने आणि नंतर तमाम वृत्तपत्रांनी, ते "‘every action has an equal and opposite reaction’ - “Har kriya ki pratikriya hoti hai” असे म्हणाल्याचे प्रसिद्ध केले आणि त्यांच्यावर तुटून पडले. मात्र एसआयटीच्या म्हणण्याप्रमाणे ते तसे बोललेच नव्हते, त्यांचे मूळ म्हणणे, " "Every action causing an equal and opposite reaction. I don't want action, neither do I want any reaction." हे अर्धवट तोडून त्याचा गैरवापर केला गेला. कोणी केला अर्थातच परत टिस्टा सेटलवाड आणि पार्टीने.
  10. (टिव्हीवर ऐकल्याप्रमाणे) मोदी हे एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांनी स्वतःस चौकशीसाठी हवाली (submit) केले होते. एस आय टी समोर ते स्वतः (वकील नाही) ९ तास बसून प्रश्नांना सामोरे गेले. असे कुठल्याच दंगलींच्या संदर्भात कधी झालेले नाही. ना मुख्यमंत्री ना पंजाब दंगलीच्या वेळेस पंतप्रधान राजीव गांधी....
असो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 44099 views

🗣 चर्चा (147)
प
प्यारे१ गुरुवार, 12/26/2013 - 21:58 नवीन
तुम्ही भाजप, मोदी समर्थक असल्यानं तुमचं म्हणणं खरं आहे की नाही हे समजून घेण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खटखटवू. आमचा लढा सुरु राहीलच. - 'लेफ्ट' हॅण्डर स-माजवादी प्यारे
  • Log in or register to post comments
स
सिद्धार्थ ४ गुरुवार, 12/26/2013 - 21:59 नवीन
झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतल्याना जागे कसे करणार? वक्तिश मला मोदी पंतप्रधान झालेले बघायला आवडेल (पण पूर्ण बहुमत मिळूनच)
  • Log in or register to post comments
र
रामपुरी गुरुवार, 12/26/2013 - 21:59 नवीन
आश्चर्य आहे. "टिस्टा सेटलवाड आणि पार्टी" मधील काही पार्ट्या इथे पण पाट्या टाकत असतात. आगाऊ शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 12/26/2013 - 22:14 नवीन
उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालय कुठलिही याचिका केवळ अर्ज केला गेला आहे म्हणून दाखल करून घेत नसते. त्यात प्राथमिक पातळीवर तथ्य असल्यासच दाखल करून घेतली जाते. अंतिम निकाल लागण्यापर्यंत अनेक घटक महत्वाची भूमिका पार पाडतात. वादी व प्रतिवादी उपलब्ध साक्षी पुराव्यांच्या आधारे काय सिद्ध करू शकतात यावर न्यायालयाचा निकाल ठरतो. या प्रकरणावर मी येथे पूर्वी लिहिले आहे; त्याची पुनरावृत्ती टाळतो. या धाग्यावर आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला गेला होता की या सर्व (प्रस्तुत धाग्यात उल्लेखलेल्या) प्रकारांचा (मतांच्या ध्रुवीकरणाद्वारे) राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी झाला किंबहूना अजूनही होत आहे; असे असल्यास बळी गेल्याचा आव आणणे पटत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 12/26/2013 - 22:23 नवीन
मोदिंचं कितीही वकिलपत्र तुम्ही घेतलं तरिही त्यांची डाळ शिजणार नाहि. इथे मिपावर देखील अनेक मोदिभक्त आहेत जे सार्कास्टिकली काँग्रेसला पाठिंबा दाखवतात पण अ‍ॅक्च्युली मोदिंचा प्रचार करतात. येत्या निवडणुकीत राहुलजींची यंग ब्रिगेड मोदिंना धुळ चाटायला लावेल यात शंका नाहि. धागा अत्यंत बाळबोध वाटला. कोर्ट वगैरे सर्व मॅनेज केलय मोदिंनी. टिस्टाबाईंसारख्या सत्यासाठि झटणार्‍या व्यक्तिंना असल्या न्यायालयीन पुराव्यांची गरज नसते. त्या स्वयंभू सत्य आहेत. काय तर म्हणे मोदि स्वतः आयोगाला सामोरे गेले... राजीव गांधींकडे तेव्हढेच उद्योग होते काय आयोगाला सामोरे जायला? आता लालूजी देखील जेलच्या बाहेर आले आहेत. धर्मांध शक्तींना रोखण्याचा विडा उचलला आहे त्यांनी. भूतपूर्व रेलमंत्री म्हणुन खरं तर त्यांच्याच अध्यक्षतेखाली आयोग नेमायला हवा होता.. म्हणजे सत्य समोर आले असते. असो. भारतीय मतदार सूज्ञ आहेत.. आणि मिपाकर देखील.
  • Log in or register to post comments
म
मनिम्याऊ Fri, 12/27/2013 - 10:28 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 12/30/2013 - 12:25 नवीन
सहमत यासाठि तिस्तांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत आणि मिपाकर त्यांना न्याय देतील.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Fri, 12/27/2013 - 02:40 नवीन
मोदींचा पंतप्रधानपदाकडे जाणार्‍या वाटेतला एक मोठा अडसर दूर झाला. अजून बरेच अडथळे आहेत. आणि दूरची मजल आहे. पण अकारण फासिस्ट, हिटलर, वंशच्छेदी वगैरे शेलक्या विशेषणाने ह्या कर्तबगार माणसाची केली जाणारी निंदानालस्ती थांबावी अशी अपेक्षा. काँग्रेसने ब्राह्मणांच्या, शिखांच्या डूख धरुन कत्तली केल्या पण त्या कुणाला फार खटकल्या नाहीत. काँग्रेसवर कुणी हिटलरगिरी, जेनोसाईड (वंशच्छेद) वगैरे आरोप करत नाहीत. मात्र मुस्लिमांविरुद्ध कुणी काही केले असा संशय आला तरी त्याविरुद्ध रान उठवुन माणूस आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला जातो. हे दुटप्पी धोरण का हे मला न उलगडलेले कोडे आहे. बघू या इथले नेहमीचे काँग्रेसी ह्या घटनेची कशी प्रतिक्रिया देतात ते. मोदी, गुजराथमधील दंगली आणि त्याविरुद्ध केलेल्या कारवायांची, तपासाची, खटल्यांची जंत्री मुद्देसूदपणे प्रसिद्ध केल्याबद्दल विकासरावांचे आभार.
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Fri, 12/27/2013 - 02:54 नवीन
विचारवंतांच काय म्हणणं आहे या विषयावर ?
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 12/27/2013 - 04:16 नवीन
स्$$$$$$$$$$$$$$$$चीन........
  • Log in or register to post comments
म
मिनेश Fri, 12/27/2013 - 05:56 नवीन
लेख आवडला....धन्यवाद...
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 12/27/2013 - 06:07 नवीन
तिस्ता सेटलवाड मुझफ्फरनगर मधील जाटांच्या कत्तलीबद्दल काय करत आहेत आता?
  • Log in or register to post comments
स
सचीन Fri, 12/27/2013 - 09:34 नवीन
सर्व त्यांनीच करायचे म्हणजे "दे रे हरी खाटल्यावरी"अशी प्रवृत्ती झाली
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Fri, 12/27/2013 - 12:12 नवीन
मंग तुमी करा की राव.. तुमच्यासारखे पुरोगामी-ओरिगामी सामाजिक जाण असलेले लोक हिते रतीब घालण्यापेक्षा त्या लोकांना मदत करतील तर बरं.. नाय का ?
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 12/30/2013 - 23:20 नवीन
सबरंग हे टिस्ता सेटलवाडचे पब्लीकेशन. दंगलग्रस्तांसाठी जमा केलेले पैसे त्यांना मिळायच्या ऐवजी तेथे आणि तिस्ताच्या बाकी संघटनेत आणि पगारात जात होते अशी तक्रार आहे. त्यात तथ्य आहे का माहीत नाही. पण वार्षिक पेपर्स फाईल न केल्या मुळे Ministry of Corporate Affairs कडून तुर्तास चौकशी करणे चालू झाले आहे

Ministry of Corporate Affairs taking legal action against Teesta Setalvad's company by dharma next

  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 12/27/2013 - 06:31 नवीन
अभिनंदन, विकासराव. मोदींचा मी समर्थक नाही. पण त्यांनी केलेले चांगले काम हे चांगलेच म्हणायला हवे. त्यांच्यातल्या गुणांचा उपयोग या देशाला होत असेल तर तो करुन घेतला पाहिजे. इंदिराजींवरही अनेक आरोप केले गेले. ते कधी सिद्ध झाले नाहीत. त्यांच्यातल्या धडाडीचा देशाला उपयोग झाला. निपक्षपातीपणे विचार करता येणे हे बहुसंख्य भारतीयांना कोणीतरी शिकवणे जरुरी आहे.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 12/27/2013 - 07:16 नवीन
मला एक कळत नाही जातीय / धार्मिक दंगली काय फक्त गुजरातेत झाल्या काय? महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश इथल्या दंगलींचे काय? काश्मीरमधुन विस्थापित झालेल्या लाखाहुन अधिक काश्मीर पंडितांचे काय? त्यांची जी पद्धतशीरपणे हकालपट्टी झाली, दहशत माजवली गेली ती गुजरातपेक्षा खुपच भयानक होती. इथे नक्की कुठल्या गोष्टीचा विपर्यास केला जातो आहे ते कळत नाही. "मुस्लिमांना वेचुन मारा " अशी जोपर्यंत मोदींनी आज्ञा केली नसेल तोवर ते कसे काय दोषी ठरतात? यापेक्षा जहाल भाषेत वक्तव्ये आणि कॄती ठाकर्‍यांनी केली नव्हती काय? आणि तरीही त्यांना काही शिक्षा झाली नाही मग मोदी दोषी कसे? राजीव गांधींनीही इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख शिरकाणासंदर्भात सूचक वक्तव्ये केली होती त्याबद्दल काय? महात्मा गांधींच्या हत्येनंतर ब्राह्म्णांची घरे जाळली गेली आणि त्यात नंतर मुख्यमंत्री झालेले एक दिग्गज गाढव नेते पण सहभागी होते. त्यांच्यावर तर खटलाही दाखल झाला नाही. असो.
  • Log in or register to post comments
स
सचीन Fri, 12/27/2013 - 07:38 नवीन
अरेरे! काय हा अन्याय मोदी सारख्या सरळ साध्या माणसावर. लेख वाचून डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Fri, 12/27/2013 - 07:40 नवीन
उगी उगी
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 12/27/2013 - 07:46 नवीन
आम्च्या हाकेला ओ देवून आले एकदाचे.. "हाता"वर "घड्याळ" आणि डोळे(डोके)बंद सचीनचा पंखा नाद्खुळा
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिन्कर Sat, 12/28/2013 - 10:22 नवीन
दिल्लीत केजरीवाल आले आणि मोदींची मिडीया पब्लिसीटी गायब झाली.. छान, योग्य वेळी केजरीवाल यांच्या प्रतिमेने आणि चांगल्या नेतृत्वाने मोदीला निप्रभ केले...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 12/28/2013 - 10:26 नवीन
अभिनंदन! जे पप्पूला रात्रंदिवस मेहनत करून जमलं नाही, ते केजरीवालांनी करून दाखवलं. पुन्हा एकदा त्रिवार अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 12/30/2013 - 04:29 नवीन
=))
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 12/30/2013 - 12:27 नवीन
आता मोदीविरोध करायचा तर आप चे शेपूट धरले पाहीजे. कितीही वाकडे असले तरी.
  • Log in or register to post comments
स
सचीन Fri, 12/27/2013 - 07:49 नवीन
ह्या लेखाची प्रत काढून न्यायालात दिली पाहिजे न्यायमूर्तींचे हि डोळे पाणावतील
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 12/27/2013 - 16:15 नवीन
त्यातील माहिती न्यायालयाच्या निकालपत्राचा गोषवार्‍यावरच आधारीत आहे.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 12/27/2013 - 07:59 नवीन
कुणाला पटो न पटो. आवडो न आवडो. पण मोदींना गोध्राचे ओझे कायमचेच वागवीत रहावे लागणार आहे. जसे गांधींना ५५ कोटींचे आणि नेहेरूंना कश्मिरचे ओझे वागवीत रहावे लागत आहे. यात खरे-खोटे, योग्य-अयोग्य याचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Fri, 12/27/2013 - 08:02 नवीन
माझ्या मते गोध्राचे ओझे मोदींपेक्षा विचारवंतच वाहत आहेत. सर्वसामान्य जनता बाबरी विसरली, मुंबै स्फोट दंगे, गोध्रा गुजरात सर्व काही विसरली आहे. रोजच्या महागाई, टंचाईपुढे भुतकाळ आठवून वेचून वेचून आसवं गाळायला वेळ कुठे ? विचारवंतांचे तसे नसते, हेच करायला त्यांना पैसे मिळतात.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 12/27/2013 - 16:49 नवीन
कुणाला पटो न पटो. आवडो न आवडो. पण मोदींना गोध्राचे ओझे कायमचेच वागवीत रहावे लागणार आहे. सहमत. पण त्यातील कारण वेगळे आहे... उदाहरणादाखल ३ दंगली घेऊयात जेथे ३ मुख्यमंत्री हे त्या दंगली तात्काळ आटोक्यात आणण्यास कमी पडले. मुंबईची १९९३ ची दंगल, गोध्रा प्रकरणानंतरची २००२ ची गुजरात दंगल आणि गेल्या काही महीन्यांपूर्वी झालेली उत्तर प्रदेशातील - मुझफ्फूरनगरची दंगल. तिन्ही मधे नेतृत्व कमी पडले. पण मोदींचे राक्षसीकरण केले गेले. जसे गांधींना ५५ कोटींचे आणि नेहेरूंना कश्मिरचे ओझे वागवीत रहावे लागत आहे. ५५ कोटी पाकीस्तानला द्यावेत हा गांधीजींचा आग्रह होता हे वास्तव आहे. नथुरामने ते त्यांच्या उपोषणाला जोडले ह्याला ठोस पुरावा नाही. काश्मीरचा प्रश्न युएन मधे नेण्याचे श्रेय/अपश्रेय नेहरूंकडे जाते. तेच सार्वमतासंदर्भात... या दोन्हीचे अनेक संदर्भ आहेत पण येथे विषयांतर टाळत आहे. हवे असल्यास खरडूयात अथवा वेगळी चर्चा करूयात. फरक नेहरू-गांधींवर काश्मीर-५५ कोटींबद्दल टिका करणे योग्य का अयोग्य ह्यात दुमत होऊ शकेल. पण त्यामुळे गांधीवाद्यांचे अथवा गांधीवादाचे राक्षसीकरण केले गेले नाही. कुठल्याही विचारधारेला आवडणे-नावडणे, त्यावरील वैचारीक टिका सगळे समजू शकते. गांधीवादावर टिका करणार्‍या विचारवंतांनी आणि राजकीय नेत्यांनी कधी खोट्याचा आधार घेतला नाही. पण गुजरात दंगलीनंतर समाजवादी विचारवंतांनी अत्यंत खोट्याचा आधार घेतला. आणि ते मी केवळ मोदींच्या संदर्भातच म्हणत नसून ते अगदी अमेरीका-इग्लंड मधील अनिवासी भारतीयांचे देखील राक्षसीकरण केले गेले, जे कधीच सत्य ठरवता आले नाही. हे अक्षम्य आहे आणि असले दुफळी माजवणारे विचारवंत खरे राक्षस आहेत, वेगळी रुपे घेऊन पब्लीकमध्ये येतात इतकेच...
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Fri, 12/27/2013 - 16:56 नवीन
नाही?? बरे. >>गांधीवादावर टिका करणार्‍या विचारवंतांनी आणि राजकीय नेत्यांनी कधी खोट्याचा आधार घेतला नाही.<< बरे. >> पण गुजरात दंगलीनंतर समाजवादी विचारवंतांनी अत्यंत खोट्याचा आधार घेतला. << ब ऽ र!! (फार एक्झांपल?) --- महोदय, चष्मा तसे दिसते, इतकेच म्हणतो. तुमचा चष्मा भगव्या काचेचा आहे, असेही म्हणतो.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 12/30/2013 - 12:30 नवीन
महोदय, चष्मा तसे दिसते, इतकेच म्हणतो. तुमचा चष्मा भगव्या काचेचा आहे, असेही म्हणतो. सहमत. काही लोकांचा हिरवाळलेल्या लाल काचेचा असतो पण त्याला सगळ्यांनी स्वच्छ आणि बिनरंगी म्हणावे असा अट्टहास असतो इतकेच.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Mon, 12/30/2013 - 19:33 नवीन
पेशवे, तुमचा रंग कोणता? ते सांगता का जरा?
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 01/03/2014 - 11:15 नवीन
तोच जो तुम्हाला तुमच्या चष्म्याच्या रंगामुळे दिसतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/27/2013 - 08:09 नवीन
>>> कुणाला पटो न पटो. आवडो न आवडो. पण मोदींना गोध्राचे ओझे कायमचेच वागवीत रहावे लागणार आहे. जसे गांधींना ५५ कोटींचे आणि नेहेरूंना कश्मिरचे ओझे वागवीत रहावे लागत आहे. गांधींचा ५५ कोटी प्रकरणात व नेहरूंचा काश्मिर प्रश्नाचा विचका करण्यात प्रत्यक्ष सहभाग होता. पण गुजरात दंगलीचा डाग विनाकारण मोदींवर लावला जात आहे आणि फक्त काँग्रेसी विचारांचे निधर्मांधच हा दोषारोप करतात. सर्वसामान्य जनतेचा या आरोपांवर विश्वास नाही व न्यायालयाने अनेकवेळा त्यांना निर्दोष जाहीर केलेले आहे. पण ५५ कोटी प्रकरणात व काश्मिर प्रश्नाचा विचका करण्यामध्ये गांधी-नेहरू नव्हते असे कोणीच म्हणत नाही कारण ती वस्तुस्थिती होती. मोदी प्रकरणात मात्र गोबेल्स तंत्राने खोटा प्रचार गेले १२ वर्षे रात्रंदिवस सुरू आहे. न्यायालयात अनेकवेळा उघडे पडूनसुद्धा काँग्रेसवाले कोडगेपणाने तोच प्रचार सुरू ठेवत आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 12/27/2013 - 08:35 नवीन
यू प्रूव्ड माय पॉईंट ;) गांधी-५५ कोटी, नेहेरू-कश्मिर ही तुणतुणी जशी "काही" मंडळींकडून (कुठल्याही ठोस पुराव्याविना) कायमच तुणतुणवली जातात. तसेच काहीसे मोदी-गोध्रा प्रकरण आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/27/2013 - 08:47 नवीन
>>> यू प्रूव्ड माय पॉईंट गांधी-५५ कोटी, नेहेरू-कश्मिर ही तुणतुणी जशी "काही" मंडळींकडून (कुठल्याही ठोस पुराव्याविना) कायमच तुणतुणवली जातात. तसेच काहीसे मोदी-गोध्रा प्रकरण आहे. तुम्हाला माझा प्रतिसाद समजलेला नाही. पुन्हा एकदा प्रयत्न करतो. गुजरात दंगलीसाठी मोदींवर काँग्रेसकडून दोषारोप केले जातात. परंतु मोदी त्यात दोषी नाहीत हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. पण गांधी-नेहरू प्रकरणाचे तसे नाही. काश्मिर प्रकरणाचा नेहरूंनी स्वतः विचका केला हा इतिहास आहे. तो कोणीही (काँग्रेसवाले सुद्धा) नाकारत नाहीत. ५५ कोटी प्रकरण सुद्धा गांधींमुळेच घडले हा इतिहास आहे. गांधी व नेहरू या घटनांकरता प्रत्यक्ष व्यक्तिगत जबाबदार होते. तो घडलेला इतिहास होता. त्यात खर्‍याखोट्या आरोपांचा प्रश्नच उद्भवत नाही. मोदींच्या बाबतीत मात्र कोणताही पुरावा नसताना सातत्याने खोटे आरोप केले जात आहेत, ज्या आरोपांना न्यायालयाने सुद्धा नाकारले आहे.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 12/27/2013 - 09:30 नवीन
पुन्हा तेच! विचका केला असे "काही" लोक मानतात. परंतु तसे मानण्यास ठोस पुरावे नाहीत.
  • Log in or register to post comments
ब
बाळकराम Sat, 12/28/2013 - 02:04 नवीन
सहमत. गृहीतक आणि निष्कर्ष यातील फरक न कळल्यामुळे बर्‍याच हिंदुत्त्ववादी लोकांचा हा गोंधळ आहे, त्यात भर अज्ञानाची आणि पूर्वग्रहांची. पाकिस्तानची निर्मिती होण्यास गांधीजी पूर्णपणे कारणीभूत होते हे धादांत असत्य इतकी वर्षे या लोकांच्या माथी त्यांच्या बोलवित्या धन्यांनी मारले आहे की हे लोक स्वतंत्र आणि विचक्षण बुद्धिने विचारच करु शकत नाहीत. यामुळे आणि अनेक पूर्वग्रह आणि अज्ञान यामुळे जडित झालेल्या यांच्या बुद्धिने गांधीजी हेच केवळ फाळणीला कारणीभूत असा निर्णयसुद्धा देऊन टाकला आहे. त्यामुळे आपण म्हणतो तेच सत्य असा एक प्रलापी विभ्रम यांना होत असतो. याला उपाय एकच- सावरकरप्रणित वस्तुनिष्ठ आणि विज्ञानवादी हिंदुत्त्ववादाचे संघप्रणित सत्यापलापी, पराभूत हिंदुत्त्ववादावर आरोपण. ते हे होवू देणार नाहीत कारण ते राजकीयदृष्ट्या सोयिस्कर नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 12/28/2013 - 10:04 नवीन
>>> विचका केला असे "काही" लोक मानतात. परंतु तसे मानण्यास ठोस पुरावे नाहीत. काश्मिरची सध्याची दारूण अवस्था, तिथे उघडउघड होत असलेल्या भारतविरोधी कारवाया, त्या राज्याला दिली गेलेली स्वतंत्र राज्यघटना व विशेष दर्जा, तिथे व तिथून फोफावत असलेला दहशतवाद इ. गोष्टी पाहिल्या तर पाकिस्तानविरूद्ध जिंकत आलेलं युद्ध अर्धवट सोडून माऊंटबॅटनच्या सल्ल्याने काश्मिर प्रश्न यूनोत नेऊन व नंतर त्या राज्याला विशेष दर्जा देऊन त्या प्रश्नात यूनोची व ३७० व्या कलमाच्या कायमस्वरूपी पाचरी मारून ठेवून विचका केला हे उघड सत्य आहे. विचका झालेलाच नाही किंवा विचका झाला याचे पुरावे नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर पुढे बोलणंच खुंटलं.
  • Log in or register to post comments
स
सचीन Fri, 12/27/2013 - 09:24 नवीन
गुरुजी उत्कृष्ठ प्रतिसाद. अहो गांधी, नेहरूच ठीक आहे हो पण मोदींवर डाग साक्षात मोदींवर डाग! ये नाही हो सक्त गुर्जी . अरेरे बिच्चारे मोदी. त्यांच्या सारख्या पुरोगामी,सत्शील,चारित्र्यवान,धर्मनिरपेक्ष, जातीय सलोखा राखण्यासाठी झटणारा समाजसुधारक इ..आणि त्याच्यावर डाग.. नही ये डाग झुटे है गुरुजी आप बराबर कहते है..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 12/28/2013 - 09:58 नवीन
>>> त्यांच्या सारख्या पुरोगामी,सत्शील,चारित्र्यवान,धर्मनिरपेक्ष, जातीय सलोखा राखण्यासाठी झटणारा समाजसुधारक इ.. हे सर्व गुणविशेष त्यांच्या बाबतीत खरे आहेत, नाही का?
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 12/27/2013 - 08:17 नवीन
स्वाध्वी प्रज्ञासिंग ह्याच्या विरुध्द कोणताही पुरावा न सापडल्यामुळे त्याना निर्दोष मुक्त करण्यात येइल असे त्यात म्हटले आहे.मग इतकी वर्ष सरकार आणि तपास यत्रंणा काय झक मारत होत्या काय?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/27/2013 - 08:26 नवीन
>>> स्वाध्वी प्रज्ञासिंग ह्याच्या विरुध्द कोणताही पुरावा न सापडल्यामुळे त्याना निर्दोष मुक्त करण्यात येइल असे त्यात म्हटले आहे.मग इतकी वर्ष सरकार आणि तपास यत्रंणा काय झक मारत होत्या काय? साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित, असीमानंद व इतर ८-९ जणांविरूद्धचे आरोप पूर्ण राजकीय आरोप आहेत. त्यांच्याविरूद्ध कणभरही पुरावा नाही. ऑक्टोबर २००८ पासून हे सर्वजण तुरूंगात आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र पोलिस, एटीस - १, एसआयटी, सीबीआय, एटीस - २ आणि एनआयए या सर्व तपाससंस्थांनी तपास करून कणभरही पुरावा तयार करता आलेला नाही. त्यामुळेच आजतगायत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले नाही व आरोपपत्र नसल्यामुळे खटलाच सुरू होत नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बॅकफूटवर ढकलण्यासाठी हिंदू संघटनांशी संबंधित असलेल्या या लोकांवर खोटे आरोप करून त्यांना गेली ५ वर्षे डांबून ठेवण्यात आले आहे. आजतगायत त्यांना जामीन दिलेला नाही.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 12/27/2013 - 08:34 नवीन
पण फक्त हिंदु संघटनाना दडपण्यासाठी कॉग्रेस व सेक्युलर लोकानी स्वाध्वीना खोट्या आरोपाखाली अटक करुन त्याचा छ्ळ केला.निदान आता तरी त्याना लवकर तुंरुगातुन सोडवावे.
  • Log in or register to post comments
स
सचीन Fri, 12/27/2013 - 09:28 नवीन
आता ह्या क्षणी ते तुरुंगातून सुटले पाहिजेत
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Fri, 12/27/2013 - 09:40 नवीन
कायच्या काय? त्यांनी काय लालूसारखा करोडोचा चारा खावून त्यातले चार पैसे भाट मन्ड्लिंना चारले आहेत की डोके विकून खानग्रेस समोर सपशेल शरणागति घेतलिय? का ते सुडो-सेक्युलर हाय्त??? बाजारात चार पैसे, चार मतं किम्वा निदान दम्दार पाय्चाटुपणा असा भक्कम खजिना असल्याशिवाय माय्बाप सर्कार तुरूम्गातून कस्काय सोडणार? हे काय चार खोट्या गोड शब्दाचा लेख लिहिण्याएवढं सोपय होय??? :)
  • Log in or register to post comments
स
सचीन Fri, 12/27/2013 - 09:43 नवीन
मग नेमके केलेय तरी काय?
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 12/27/2013 - 09:40 नवीन
सचीनभौ ,मग लावा वशिला , दोन्हीकडे तुमचेच सरकार आहे .
  • Log in or register to post comments
स
सचीन Fri, 12/27/2013 - 09:45 नवीन
अरेच्च्या असही असत काय मला वाटले केंद्र सरकार पूर्ण देशाचे असते?
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 12/27/2013 - 10:18 नवीन
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दुग्धस्नान हसन मुश्रीफ कोल्हापूर: बुलडाण्यात अंगावर शाईचा अभिषेक झाल्यानंतर आमदार हसन मुश्रीफ यांचा आज दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. कोल्हापुरामधील सर्किट हाऊसवर राष्ट्रवादीच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीम यांना दुग्धस्नान घातलं. बुलडाण्यातल्या समाधान योजना कार्यक्रमात राष्ट्रवादी अपंग सेलचा जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवेने मुश्रीफ यांच्या अंगावर शाई फेकली होती. त्यानंतर त्याला अटक करुन जिल्हाध्यक्ष पदावरुन निलंबित करण्यात आलं. ही शाई उतवण्यासाठी मुश्रीम यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. हसन मुश्रीफ यांच्यावर शाई फेकली त्यानंतर आज सकाळी हसन मुश्रीफ रेल्वेने कोल्हापुरात परतले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना थेट सर्किट हाऊसवर नेलं आणि दुधाने अभिषेक केला.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा