Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मूर्तीपूजा

र
राही
Sun, 12/22/2013 - 07:36
🗣 118 प्रतिसाद
सगुणोपासकांच्या श्रद्धा आणि भक्तीप्रती पूर्ण आदर आहे. कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा). देवाला सगुणरूपात मानल्याने हिंदूंत मूर्तिपूजा रूढ झाली आणि ती हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण बनली. या बरोबर देवळे, पुजारी, दैनिक सोहळे, उपचार, प्रसाद, हार, फळे ,फुले, नैवेद्य, दागिने-मुकुट-माळा-कंठ्या, गर्दी, फसवणूक, लुबाडणूक, अस्वच्छता, अराजक आदींची एक मोठी व्यवस्था/अव्यवथा उभी राहिली आणि आता ती इतकी दृढमूल झालेली आहे की त्याशिवायचा हिंदुधर्म कल्पिताच येत नाही. 'योग-याग-विधी, येणे नोहे सिद्धी, वायाच उपाधी, दंभ धर्म II' हे आणि अशी अनेक संतवचने आहेत. आधुनिक काळात 'ओ माय गॉड' सारखे चित्रपट येतात जातात, देव मूर्तीत नाही म्हणून सांगतात पण ते तात्पुरतेच. या विरुद्ध बोलायचे म्हणजे रूढीभंजनाचा, पाखंडीपणाचा आरोप पत्करायचा, कदाचित 'हिंदुद्वेष्टे'पणाही स्वीकारायचा. तोही स्वीकारायला हरकत नाही पण उगीच कटुता आणि तेढ वाढते, जे उद्दिष्ट नाही. बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते? खरोखर हे विषय जटिल आहेत. यावर चर्चा करताना हेतूंच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाणे अपरिहार्य आहे. आणि एकदा का तुमची इंटेग्रिटी क्वेश्चन होऊ लागली, तुमची कळकळ समोरच्याला समजेनाशी झाली की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून वातावरण तप्त होणार, रणकंदनही माजणार. आज महाराष्ट्रातल्या काही चळवळी मूर्तीपूजेला दुसरा काही सशक्त पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत पण आधी म्हटले तसे त्यांना विरोधही प्रचंड आहे. पण हळूहळू (अगदी हळूहळूच) हे बदलेल, काही शतकांनी का होईना, स्पिरिचुअलिटीच्या (रिलिजन नव्हे) खर्‍या रूपाचे लोकांना आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे. (सध्याचे हिंदू लोक मूर्ख आहेत आणि पुढे कधीतरी ते शहाणे होतील असे म्हणणे नाही, तसा अर्थ कृपया कोणी काढू नये.)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 32836 views

🗣 चर्चा (118)
स
सुहास.. Mon, 12/23/2013 - 09:31 नवीन
नॉट ईंटरेस्टेड ईन सब्जेक्ट !! मिपावर अश्या चर्चा आधी ही झालेल्या आहेत आनि त्यातुन काही साफल्य झालेल नाही ... उगा फुकाची बॅडबिड्थ वापरायचे धंदे ( वांझोटे धंदे च्या चालीवर ;) )
  • Log in or register to post comments
म
म्हैस Mon, 12/23/2013 - 09:44 नवीन
कसं असतं निर्गुण निराकार ईश्वराची संकल्पना लोकांना झेपत नहि. तो गुणातीत आहे , डोळ्यांना दिसत नाही, स्पर्शाने जाणवत नाही प्रयोगशाळेत तो सिद्ध करता येत नाही म्हणजे तो नाहीच अशी लोकांची धारणा होते . मग तो कोणीतरी गूढ आहे आणि त्याची प्राप्ती हि आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे अशी मतं होतात . म्हणून सामान्य लोकांसाठी मूर्तीपूजा , कर्मकांड सांगितली आहेत कारण मूर्ती समोर असली कि लगेच हाथ जोडले जातात , सात्विक भाव जागृत होतात, देवावर लक्ष केंद्रित होतं म्हणून हि मूर्तीपूजा. आता बघा न वाटेत एखादं मंदिर लागल तर आपण लगेच हाथ जोद्तो. बाकी मग दिवस भरात देवाची आठवण आपल्याकडून होत नहि. ५ मिनितेसुधा ध्यानात बसणं , ५ मिनटाच्या वर नास्मरण करण जमत नहि. योग तर फार दूरची गोष्ट आहे. खरं तर मूर्तीपूजा हि अध्यात्माची सगळ्यात पहिली पायरी आहे . पण मूर्ती आणि देवूळ ह्याच्यातच सगळा ईश्वर सामावला आहे असा समजून लोक त्याच्यापुढे जायलाच तयार नसतात . ज्यांनी हि पायरी already ओलांडली आहे त्यांच्यासाठी मूर्तीपूजा आणि कर्मकांड गौण अहेत. मागच्या एका लेखात देव सर्वशक्तिमान आहे मग त्याने ४ देवळ वाचवून स्वतःच रक्षण का नाही केला असा हास्यास्पद प्रश्न विचारला होता . अनेक वेळा सांगूनही देवळाच्या बाहेर चा देव हि संकल्पना काही प्रश्नकर्त्याला पटली नहि. सुशिक्षितांची हि गत तर अडण्यांची काय असणार? देवळात असणारी ती अस्वछता , भक्तीचा अभाव, लुटालूट बघता देव देवळात असतो का अशी शंका येते . अर्थात हे फक्त हिंदूच नाही तर प्रत्येक धर्मात असत. त्याचं मुल कारण माणसाची स्वार्थी, कुरघोडी करण्याची वृत्ती , अति लोभ हे आहे इथे धर्माचा किवा देवाचा संबंध नाही .
"तो माझ्या सोबत आहे" हे एकदा का मनाने स्विकारले (सेल्फ सजेशन) की माणूस काळालाही भिडायला तयार होतो.जे गॉड लव्हींग आहेत ते कर्मकांडांच्या वाटेला जात नाहीत. आणि जे गॉड फीअरींग आहेत ते देवभक्तीच्या खुळचट कल्पनांमध्ये अडकून पडतात.
दोन्ही गोष्टींशी एकदम सहमत. भक्ती जसजशी वाढीस लागते तशी पहिल्यांदा घडणारी गोष्ट म्हणजे भयाचा नाश . तेव्हा घाबरून भक्ती करणं हा भक्तीचा देखावा झाला.प्रेमाने केलेली भक्ती देवाला अपेक्षित असते
मुस्लिमांच्या इच्छेविरुद्ध भारत एक ठेवण्यासाठी जितकी शक्ती ब्रिटिशांना वापरावी लागली असती तेवढी शक्ती हिंदूंच्या इच्छेविरुद्ध पाकिस्तान निर्माण करण्यासाठी नक्कीच वापरावी लागली नाही.
ह्याच्याशी सुधा एकदम सहमत अहे. मुसलमानात सुधा वेल्वेग्ल्या जाती आहेत आणि त्या आपापसात लढत असतात . पण हि लढाई उच्च नीच तेच्या कल्पनेतून उद्भवली असते. अल्ला आणि इस्लाम धर्म ह्यांच्याबाब्तीत मुसाल्मानांच्यात दुमत आढळत नाही . हिंदू मात्र आपल्याच देव धर्माच्या related फुटकळ गोष्टींवरून एकमेकांशी भांडत बसतात . तेव्हा वाईट गोष्टींना हद्दपार करून आपणच आपला धर्म बळकट केला पाहिजे असं वाटत
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 12/23/2013 - 10:06 नवीन
@ प्रसाद : बौद्ध धर्म भारतातून नामशेष झाला हे खरे पण भारताबाहेर तो पुष्कळ पसरला. या उलट भारताबाहेर थोडाफार पसरलेला हिंदूधर्म मात्र नेपाळ वगळता त्या त्या ठिकाणी नामशेष झाला. @ वल्ली : प्रतिसाद नेहेमीप्रमाणे आवडला आणि सहमत आहे. @राजेश : मूर्तीपूजा, गोमांसनिषेध, जातिव्यवस्था, पुनर्जन्मावर विश्वास ह्या गोष्टी सर्वसाधारणपणे हिंदूधर्मनिदर्शक मानता येतील. पण यातील जातिव्यवथा सोडून अन्य तीन न मानताही मनुष्य हिंदू असू शकतो. जात मात्र जन्मानेच त्याला चिकटते. तो धर्मांतर करू शकतो, जात्यंतर मात्र नाही. कान टोचलेले असणे हे एक बाह्य लक्षण मानता येईल. पण या कृतीचीही सक्ती नाही. @ प्यारे-१ : गीता, वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे हे माहीतही नसलेला एक फार मोठा समाज हिंदू आहे. मग त्यावर श्रद्धा असणे दूरच. 'गुणकर्मविभागशः' हे वचन सुप्रसिद्ध आणि बहुपरिचित आहे. भगवंतांनी गुणकर्मानुसार काही केले असेल, परंतु पुढे त्यांच्या हिंदू अनुयायांनी जाती जन्मसिद्ध केल्या आणि आज हिंदूंमध्ये जातिव्यवस्था दृढमूल आहे.
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 12/23/2013 - 11:22 नवीन
मूर्तिपूजा संपूर्ण नष्ट करावी असे नाही. तशी ती होणारही नाही. पण आज जे स्तोम माजले आहे ते कमी व्हावे असे वाटते. एकोणिसावे शतक हे भारतीय प्रबोधनाचे शतक होते. या काळात ब्रह्मसमाज, आर्यसमाज, प्रार्थनासमाज, थोड्याफार प्रमाणात सत्यशोधकसमाज यांनी मूर्तिपूजेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. आर्यसमाजाचे मर्यादित यश वगळता बाकीच्यांना अपयशच आले, पण आधुनिक समाजधुरिणांच्या मनात हा विचार घोळत होता आणि आजही आहे; तो केवळ हिंदू धर्मावर हल्ला करायचा या हेतूने नाही, तर हिंदू धर्म हा आचरणास सोपा आणि सुटसुटीत व्हावा यासाठी आहे. ब्रह्मसमाजाने हिंदूंची कर्मकांडे सोपी करणे हे उद्दिष्ट मानले होते. उदाहरणादाखल त्यांनी सत्यनारायणाची पूजा तळागाळात रूढ केली. ( त्या आधीही कदाचित ती होती असेल पण ब्रह्मसमाजाच्या प्रयत्नांमुळे ती बहुजनसमाजाभिमुख झाली. हे लो. टिळकांच्या सार्वजनिक गणपतीसारखेच. ) त्या काळच्या प्रचलित पद्धतीविरुद्ध ही पूजा होती. इथे यज्ञ- यागाची आवश्यकता नव्हती, संस्कृताची नव्हती, सोंवळे-ओवळे नव्हते. कोणीही ही पूजा करू शकत असे. आणि नैवेद्यही अगदी साधा, कोणालाही परवडणारा गव्हाचा शिरा. ही पूजा अल्पावधीतच लोकप्रिय झाली खरी पण विरोध असा की तिचेच आज अवडंबर होऊन बसले आहे. म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या रूढी, प्रथा तपासून पहायला हव्यात. दत्तोपासना काही शतकांपासून सुरू झाली. त्या आधी ती नव्हती, किमान सार्वत्रिक नव्हती. मग त्या आधी कोणत्या प्रथा होत्या असतील? काही तरी होते असेलच ना? तात्पर्य, या रूढी, प्रथा बदलत राहतात. नवे नियम येतात. (भारतीय) माणसाची जीवनशैली झपाट्याने बदलते आहे. या बदलाच्या काळात रूढींची नव्याने चिकित्सा व्हावी. भोळ्या-भाबड्या जनतेला 'हे सर्व कशासाठी' हा प्रश्न पडावा, हे प्रयोजन.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 12/23/2013 - 14:40 नवीन
एवढंच प्रयोजन आहे होय! मग असो.
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 12/23/2013 - 17:02 नवीन
ते समाजधुरिणांचे प्रयोजन होते. ह्या लेखाचे प्रयोजन शेवटी दिले आहे. हे सर्व का? कशासाठी हा प्रश्न 'भोळ्याभाबड्या' जनतेच्या मनात उभा रहावा या साठी. खरे तर हे सर्व सगुणोपासनेपासून सुरू झाले. सगुणोपासना, मूर्तिपूजा, कर्मकांडे हे विषय एकमेकात गुंतलेले आहेत. त्यातल्या मूर्तिपूजेचा वेगळा विचार व्हावा या हेतूने हा धागा वेगळा करण्याची विनंती संपादकांना केली होती. त्यांनी तसा तो केला या साठी त्यांचे आभार. सगुणोपासनेवर लिहिताना बरेच काही मनात आले. ते एका प्रतिसादात मावण्याजोगे नव्हते म्हणून त्यावर वेगळा धागा काढण्याचे मनात आहे. चर्चेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 12/23/2013 - 18:36 नवीन
हे तर मी इथेच उघड विचारलं होतं :
तुम्हाला बहुदा सत्यशोधनात मूर्तीपूजा आवश्यक आहे का? असा प्रश्न आहे.
त्याला तुम्ही प्रतिसाद दिला नाहीत. आणि चर्चा विषय असा मांडल्यानं :
बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते?
चर्चा भरकटली आहे.
  • Log in or register to post comments
ज
जयनीत Mon, 12/23/2013 - 13:07 नवीन
मूर्तीपूजा अथवा विभूतीपूजे बद्दल आक्षेपचा प्रत्यक्ष घडलेला एक किस्सा... एका दुस-या धर्माचा हिरीरीने प्रचार करणारा एक माणूस मुद्दा मांडत होता. त्याच्या मते रामाला हिंदू लोक देव मानतात ते फार चूक करतात. (अर्थात किती हिंदू लोक रामाला देव मानतात किंवा किती लोक एक विभूती मानतात हा वेगळा मुद्दा आहे पण त्याच्या मते राम हा हिंदुंचा देव आहे आणि त्याला रामाचे देवत्व खोडून काढायचे होते) त्याचे म्हणणे असे जेव्हा सीताहरण झाले तेव्हा राम फारसा दूर गेला नव्हता जवळपास जंगलातच तर होता. जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा तिने केलेला आक्रोश जर रामाला त्याच वनात ऐकू आला नाही तर तो दूर वर असलेल्या भक्ताच्या प्रार्थना काय ऐकणार? म्हणून रामाची पूजा करणे चूक आहे अन लोकांनी त्याच्या सर्वव्यापी देवाची आराधना करावी. प्रश्न…. जर त्याचा देव सर्वव्यापी आहे, अन तोच मनुष्याचे रक्षण करू शकतो तर मग त्याने का सीतेचे रक्षण केले नाही? मुद्दा हा की मूर्तीपूजा असो वा कुठल्याही वेगळया उपासना पद्धती त्यात फारसा फरक नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 12/24/2013 - 09:47 नवीन
तसा विचार करायचा तर ख्रिस्ताला तर साक्षात सूळावरच चढवलं होतं की हो.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 12/23/2013 - 20:29 नवीन
सर्वप्रथम: या विषयावर मिपावर झालेली आधीची (किमान एक) चर्चा २०१० सालातली आहे. गेल्या तीन वर्षात हा विषय चच्रीला गेला नसेल हे शक्य वाटत नाही. :) तरी देखील चर्चेत थोडीफार मुद्यांची भर.. देवाला सगुणरूपात मानल्याने हिंदूंत मूर्तिपूजा रूढ झाली आणि ती हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण बनली. हे कुणाचे मर्यादीत निरीक्षण असेल पण मूर्तीपूजा करणाराच हिंदू असू शकतो असे कुठेही म्हणलेले नाही, अर्थात ते लक्षण नाही. तेच जाती-पातीचे आहे. अगदी थोडक्यात बोलायचे झालेच तर "ओन्ली" पेक्षा "ऑल्सो" (सर्वसमावेशक) असणे इतकेच काय ते हिंदू धर्माचे लक्षण आहे.. सुप्रिम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे:
When we think of the Hindu religion, unlike other religions in the world, the Hindu religion does not claim any one prophet; it does not worship any one god; it does not subscribe to any one dogma; it does not believe in any one philosophic concept; it does not follow any one set of religious rites or performances; in fact, it does not appear to satisfy the narrow traditional features of any religion or creed. It may broadly be described as a way of life and nothing more.
अमेरीकन हेरीटेज डिक्शनरीप्रमाणे हिंदू धर्माचा अर्थः
A diverse body of religion, philosophy, and cultural practice native to and predominant in India, characterized by a belief in reincarnation and a supreme being of many forms and natures, by the view that opposing theories are aspects of one eternal truth, and by a desire for liberation from earthly evils.
या दोन्हीकडे मूर्तीपुजेचा अथवा जातीपातीचा विषय देखील काढलेला नाही. वर दिलेल्या दुव्यातील चर्चेत माझेच काही प्रतिसाद मिळाले त्यातील काही भाग... खालील एकात्मता मंत्र त्याचे चांगले वर्णन करतो. (हिंदी विकीपिडीयामधून)(http://hi.wikipedia.org/wiki/एकात्मता_मंत्र) यं वैदिका मंत्रदृशः पुराणाः इन्द्रं यमं मातरिश्वा नमाहुः | वेदान्तिनो निर्वचनीयमेकम् यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति || शैवायमीशं शिव इत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरीति स्तुवन्ति | बुद्धस्तथार्हन इति बौद्ध जैनाः सत् श्री अकालेति च सिख्ख सन्तः || शास्तेति केचित् कतिचित् कुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या | यं प्रार्थयन्ते जगदीशितारम स एक एव प्रभुरद्वितीयः || एकात्मता मंत्र का अर्थ प्राचीन काल के मंत्र दृष्टा ऋषियों ने जिसे इन्द्र (देवताओं के राजा, वर्षा के देवता), यम (काल के देवता), मातरिश्वा (हर जगह विद्यमान) कहकर पुकारा और जिस एक अनिर्वचनीय (जिसका वर्णन नहीं किया जा सके) को वेदांती (वेद, शास्त्र के ज्ञाता) ब्रह्म शब्द से निर्देश करते हैं. शैव जिसकी शिव और वैष्णव जिसकी विष्णु कहकर स्तुति करते हैं. बौद्ध और जैन जिसे बुद्ध और अरहंत (जिसका कोई अंत न हो ) कहते हैं. जिसे सिख संत सत श्री अकाल (कालातीत या समय से परे का सत्य) कहकर पुकारते हैं. जिस विश्व के स्वामी को कोई शास्ता (शास्त्र निर्माता) तो कोई कुमार (अखंड ब्रह्मचारी), कोई जिसको स्वामी, माता - पिता कहकर भक्तिपूर्वक प्रार्थना करते हैं, वह प्रभु एक ही है और अद्वितीय है यानि उसका कोई दूसरा जोड़ या विकल्प नहीं
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 12/25/2013 - 03:47 नवीन
दर काही वर्षांनी (‍आं.जा. वर तीन-चार वर्षांनी) नवी पिढी तयार होते, जिला अभिव्यक्त व्हायचे असते आणि जुने संदर्भ माहीत नसतात. गांधी, सावरकर, कश्मीर, आरक्षण या विषयांवर अनेकदा पुस्तके लिहिली जातात, चर्चाही होत राहतात. बहुतेक आंजालीय चर्चा वाचलेल्या आहेत. या धाग्याचे निमित्त म्हणजे प्यारे-१ यांचा दत्तजयंतीचा धागा. मूर्तिपूजा ही हिंदू असण्याची अट नाही. किंबहुना तशी कोणतीच अट हिंदू असण्यासाठी नाही. पण निदान नव्वद टक्के लोक मूर्तिपूजा करीत असावेत, (याचा नक्की विदा मजजवळ नाही. हे निव्वळ एक मर्यादित निरीक्षण आहे) म्हणून मूर्तिपूजा हे हिंदूंचे एक लक्षण मानता येईल, अट नव्हे. जर मूर्तिपूजा धर्माने सांगितलेलीच नाही, जर ती आवश्यकच नाही, तर आपण ती का करतो आणि तिचे इतके स्तोम का माजले आहे हा प्रश्न आहे. आपण हिंदूच राहावे यासाठी अर्थातच कोणी काही करीत नाही कारण तशी आवश्यकताच नाही. मग भोळी भाबडी जनता आणि तिचे (माझ्या मते तात्पुरते) समाधान याकडे स्पष्टीकरण वळते. मूर्तिपूजा आणि सगुणोपासना हे एकमेकांशी घट्ट बांधले गेले आहेत. मूळ रोख सगुणोपासनेवरच होता. पण मूर्तिपूजा हे एक दुय्यम आणि मूर्त अंग असल्यामुळे आधी त्यावर चर्चा होऊ दे असे वाटले. सगुणोपासना आणि भोळीभाबडी जनता यावर लिहायचे आहेच. पण ते आणखी एका धाग्यात. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 12/25/2013 - 06:18 नवीन
आहो तेच तर लिहील अशी अपेक्षा होती! एनी वे, एकदा लिहून पाहा, "भोळीभाबडी जनता" काय करते ते.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 12/24/2013 - 00:43 नवीन
बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते? आमच्या मते हिंदू म्हणजे ईश्वर अल्ला वेगळे नाहीत असे समजतो .सबब मशीदीत चर्चमधे जायला आम्ही तयार असतो, तसे केले तर आमचे मन आम्हाला खात नाही. आम्ही चर्चमधे गेल्यावर होली वाटर तितक्याचे श्रद्धेने प्राशन मरतो जितक्या श्रद्धेने राउळातील तीर्थ ! असे करण्यात ज्याला शरम व संकोच वा अपराधीपणा वाटतो तो अहिंदू. ( म्हण्जे तो वाईट माणूस आहे असे नव्हे.त्याचा आपला एक नजरिया आहे.)
  • Log in or register to post comments
द
दिवटा कारटा Tue, 12/24/2013 - 04:01 नवीन
"देवाला सगुणरूपात मानल्याने हिंदूंत मूर्तिपूजा रूढ झाली आणि ती हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण बनली." केवळ काही लोकांच्या पोटापाण्याच्या सोयीसाठी मूर्तिपूजा रूढ झाली व त्याच्या आजूबाजूने सगळी थोतांडं उभी केली गेली. आज तो बाजार एवढा मोठा झालाय की त्यातून कुणाचीही सुटका नाही. नसलेल्या देवाला दगडात बसवून स्वतःची पोटे भरणे हाच एकमेव धंदा. मग त्याला "सगुणोपासना", "भक्ती", "श्रध्दा" अशी लेबलं चिकटवली की झालं, आत सगळा धंदाच.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 12/24/2013 - 09:48 नवीन
हं.. चान चान.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Wed, 12/25/2013 - 18:36 नवीन
केवळ काही लोकांच्या पोटापाण्याच्या सोयीसाठी मूर्तिपूजा रूढ झाली व त्याच्या आजूबाजूने सगळी थोतांडं उभी केली गेली.
यात आक्षेप फक्त "काही" लोकांना का असावा? मारामारी करून पोट भरणारे सैनिक, इकडचे तिकडे विकून पैसा जमा करणारे व्यापारी हे का वगळावेत? काही लोकांच्या पोटपाण्याच्या सोयिसाठी युद्ध केले जाते असे म्हटले तर?
  • Log in or register to post comments
S
SAKHARBHAT Wed, 12/25/2013 - 16:18 नवीन
मूर्तीपूजा हे हिंदू धर्मीय असण्याचे व्यवच्छेदक लक्षण मानण्याचे कारण नाही. मुळात हिंदू धर्मात अनेक तत्वज्ञाने सामावलेली आहेत. आणि त्यापैकी काही थेट नास्तीकातावादीही आहेत. उदाहरणार्थ लोकायत तत्वज्ञान अथवा चार्वाक तत्वज्ञान हे त्यापैकीच. आणि हे विचार हिंदू तावज्ञानाचे भाग होते आणि आहेत. निर्गुण, निराकार ईश्वर ही संकल्पना देखील हिंदू तत्वज्ञानात समाविष्ट होती. मूर्तीपूजेचेच स्तोम माजाण्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यातला सोपेपणा आणि बुद्धीपेक्षा भावनेकडे असलेला झुकाव. या एकूणच विषयावर Dr अमर्त्य सेन यांच्या Argumentative Indian या पुस्तकात फार तर्कपूर्ण आणि छान विवेचन आहे. आजच्या काळात मला वाटत केवळ मुर्तीपूजेवर रोख ठेवण्याऐवजी धर्म ही संकल्पनाच कशी अडगळीत टाकता येईल याचा विचार होण्याचीही गरज आहे. उदाहरणार्थ जर मला मूर्तीपूजा पटत नसेल तर मी ती करू नये, त्यामुळे मी हिंदू ठरतो की नाही या प्रश्नाला फारसे महत्व असू नये.
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 12/25/2013 - 17:54 नवीन
लोकायत अथवा तत्सम तत्त्वज्ञाने हा निश्चितच हिंदूधर्माचा भाग आहे पण त्याचे अनुयायी फार कमी आहेत. बहुसंख्य लोक ज्याचा अनुकार करतात अशी मूर्तिपूजा आणि सगुणोपासना ही दोन अंगे आहेत म्हणून त्याचा विचार केला. मूर्तिपूजा आणि सगुणोपासना आपण मनातून काढून टाकू शकत नाही मग धर्माला अडगळीत टाकण्याचा रॅडिकल विचार तर कित्येक योजने दूरच. रिलिजन आणि स्पिरिचुआलिटी असेही एक द्वंद असते. (हिंदू) धर्माला दूर लोटले तरी त्या (हिंदू) धर्मातली स्पिरिचुआलिटी पाहिजे असेही वाटत असते. वरती म्हटल्याप्रमाणे हे प्रश्न फार जटिल आहेत आणि ते भोळ्या-भाबड्या जनतेचा विचार करून हळूवारपणेच उकलायला हवेत. तत्त्वज्ञांनी, संतांनी बरेच काही सांगून ठेवले आहे पण त्यातले सोयीस्कर तेवढेच उचलायचे ही जनरीत असते.
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 12/25/2013 - 18:00 नवीन
@ वल्ली आणि बॅट्मन, सहमत आहे. आदिवासीच काय, अनेक आदिम लोकसमूहात मूर्तिपूजा ओबडधोबड स्वरूपात प्रचलित होती. त्यातल्या काहींनी तिचा (वेळीच) त्याग केला तर काहींनी तिचे उन्नयन केले आणि पुढे स्तोम माजवले.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 12/25/2013 - 18:11 नवीन
पण मूर्तीपूजेमुळेच भारत कलाक्षेत्रात संपन्न झाला. अप्रतिम अशी शिल्पे निर्मिली गेली. ऐहोळे, पट्टदकल, वेरूळ, बेलूर हळेबीडू, कोणार्क, खजुराओ सारखी अप्रतिम मंदिरे बांधली/कोरली गेली. सूर्य, दशावतार, शिव, सप्तमातृका, अष्टदिक्पाल, रामायण, महाभारतातील प्रसंग, सुरसुंदरी, नायिकापट्ट असे अनेक प्रकार कोरले गेले. ह्या सर्व मूर्तींचे विभ्रम वैग्रे पाहणे विलक्षण आनंददायी असते.
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 12/25/2013 - 18:44 नवीन
इतरत्र, विशेषतः ग्रीक आणि रोमन संस्कृतींमध्ये देखील शिल्प आणि स्थापत्य विकसित होत होतेच. ग्रीक कलेचा प्रभाव अफ्घानिस्तान-ताजिकिस्तान भागात पडून इण्डोग्रीक अथवा गांधार कलेचा जन्म झाला हे सर्वश्रुत आहे. अर्थात पहिल्या सहस्रकात आपल्याकडे भूषणावह अशा फार मोठ्या शिल्पवैभवाचे निर्माण झाले हे खरेच.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 12/25/2013 - 21:16 नवीन
पूजनासाठी घडवलेल्या मूर्ती व केवळ सौन्दर्यनिर्मितीसाठी घडवलेल्या मूर्ती यात निश्चितच फरक असतो. आपापल्या सौन्दर्यदृष्टीचे अन आदर्शाचे आरोपण या मूर्तीवर केले गेले. त्या त्या भागातल्या पूजकांनी ते भाव त्या मूर्तीवर पाहिले. केवळ याच कारणासाठी गांधार कलेतील बुध्दमूर्ती या अपोलोसारख्या सुंदर पण निर्जीव भासतात, त्याउलट इथल्याच मूर्तीकारांनी साकारलेली मथुरा शैलीतील बुध्दमूर्ती सजीव व भावपूर्ण भासते. मूर्तीपूजेसारख्या विषयावर मला काहीच ज्ञान नाही पण मूर्ती हि कलावस्तू म्हणून पाहता हे जाणवले.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 12/26/2013 - 05:44 नवीन
अत्यंत सुरेख निरिक्षण. शिल्पकलेचा विषय कोणताही असू शकतो आणि देव या प्रेरणेनं सुंदर शिल्प तयार झालेली आहेत हे खरं आहे, पण त्याचा अर्थ शिल्पकलेला विषय मिळाला इतकाच आहे. देव ही कल्पना आहे या गोष्टीला त्यानं बाधा येत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/26/2013 - 09:40 नवीन
>>> पण मूर्तीपूजेमुळेच भारत कलाक्षेत्रात संपन्न झाला. अप्रतिम अशी शिल्पे निर्मिली गेली. ऐहोळे, पट्टदकल, वेरूळ, बेलूर हळेबीडू, कोणार्क, खजुराओ सारखी अप्रतिम मंदिरे बांधली/कोरली गेली. +१११११११११... मूर्तीपूजेमुळे सगुणभक्तीचे अत्यंत उच्च स्वरूप निर्माण झाले. त्यातून भक्तिभावाने ओथंबलेल्या रचना, काव्य व साहित्य निर्माण झाले. त्याचवेळी मूर्तीपूजेचा तिरस्कार केल्याने काही धर्मात मूर्तीपूजकांविषयी तिरस्काराचे व विध्वंसाचे वातावरण निर्माण झाले.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 12/26/2013 - 09:51 नवीन
मूर्तीपूजेचा तिरस्कार अज्ञानी (किंवा धर्मांध) लोक करतात. एखादी गोष्ट व्यर्थ आहे हे कळल्यावर सूज्ञ तिचा तिरस्कार करत नाही (इतरेजनांचा तसा गैरसमज असतो); तो फक्त मूर्तीपूजा स्वच्छंदाप्रत (किंवा मुक्तीप्रत) नेऊ शकत नाही इतकंच सांगण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 12/26/2013 - 11:14 नवीन
हे (मात्र) शतधा(दा) मान्य.
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 12/26/2013 - 11:31 नवीन
अनेकानेक उत्तमोत्तम शिल्पांचा,मंदिरांचा खजिना भग्न आणि दुर्लक्षित अवस्थेत इतस्ततः पडलेला पाहून असे वाटते की या वास्तूंत एखाद्या देवाच्या मूर्तीची स्थापना करावी ज्या योगे भोळीभाबडी जनता तिकडे आकर्षित होऊन राबता वाढेल आणि व्यवस्थित देखभाल होईल. पण लगेचच असेही वाटते की हीच भोळीभाबडी जनता दुरुस्तीच्या, देखभालीच्या नावाखाली वर्गण्या/खंडण्या/देणग्या उकळेल, वेगवेगळे फ्लेक्स लावून मसल फ्लेक्स होतील आणि शेवटी भगभगीत ऑइल पेंट, जुन्या फरश्या-शिलाखंड उचकटून टाकून त्या जागी संगमरवर किंवा साध्या गुळगुळीत टाइल्स्स, सगळीकडून लोंबणार्‍या विजेच्या तारा हेच सर्व तिथे डौलात विराजमान होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 12/26/2013 - 11:40 नवीन
पूर्णपणे सहमत. पण अजून तरी अशा गोष्टी सुप्रसिद्ध अशा जुन्या मंदिरांबाबतच घडतात. उदा. कोल्हापूरची महालक्ष्मी, पंढरपूरचा विठोबा. अर्थात हल्ली काही जुन्या मंदिरांना ऑइलपेन्टने रंगवण्याचे फ्याड आलेय. तर त्याहीपेक्षा अप्रतिम असलेली जुनी मंदिरे मात्र भग्नावस्थेत पडून राहून जीर्णोद्धाराची वाट बघत असतात. काही वेळा वाटते की ती आहेत तशीच राहू द्यावीत. निदान त्यांचा बाजार होण्यापासून तरी वाचतोय.
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 12/25/2013 - 18:47 नवीन
@धन्या, हरिपाठ माझाही आवडता आहे. प्रतिसाद आवडला. त्या संदर्भात अधिक काही पुढे कधी तरी‌. अवतार, अर्धवटराव, स्नेहांकिता या व इतर बहुतेकांचे प्रतिसाद आवडले. अगदी श्री. म्हैस यांचाही. राजेश घासकडवी यांनी चर्चेत नेमकेपणा आणला. वल्ली, बॅटमन यांनी नेहमीप्रमाणे अचूक माहितीची भर घातली. प्रकाश घाटपांडे यांनी एक वेगळाच मुद्दा मांडला. सं. क्षी. यांनी 'भरकटलेल्या' चर्चेला मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. (शेवटी ती भरकटलीच ती वेगळी गोष्ट. ) या सर्वांचे आभार. श्री. प्यारे-१ यांच्यामुळे तर ही चर्चा सुरू झाली. त्यांचे प्रतिसाद वाचनीय असतात; येथेही होते. चर्चेत भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही आभार.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 12/26/2013 - 05:33 नवीन
प्रयत्न केला. (शेवटी ती भरकटलीच ती वेगळी गोष्ट.)
ज्या लेखवरनं ही चर्चा सुरु झाली तिथे तुम्ही :
अख्खी गीता स्थितधी: होण्यासाठी उपाय सांगते
असा सुरेख प्रतिसाद दिला होता म्हणून लेखाबद्दल वेगळ्या अपेक्षा होत्या. अर्थात काही विद्वान (ज्यांचे विषयाचे प्रगाढ ज्ञान त्यांच्या प्रत्येक प्रतिसातून दिसते), निव्वळ व्यक्तिगत प्रतिसाद धोरणात बसवून चर्चा कशी भरकटेल याची खबरदारी घेतात. त्यांना इतरांनी यावेळी फाट्यावर मारल्यांने चर्चेचा विषयाशी संबंध राहिला. तुम्हाला "स्थितधी:" म्हणजे काय (याचा अनुभव नसला तरी) कल्पना असावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी धारणारहित चित्त ही सर्वात प्रार्थमिक आणि अत्यंत अनिवार्य गोष्ट आहे. देव ही विचारांबरोबर भावविश्वही व्यापून टाकणारी अत्यंत चुकीची धारणा आहे. कोणताही शब्द (उदाहरणार्थ : आत्मभान) केवळ माहिती आहे म्हणून वापरणं आणि ती निराधार स्थिती आहे त्यासाठी कोणतंही आलंबन नसायला हवं हे समजणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 12/26/2013 - 06:38 नवीन
कोणताही शब्द (उदाहरणार्थ : आत्मभान) केवळ माहिती आहे म्हणून वापरणं आणि ती निराधार स्थिती आहे त्यासाठी कोणतंही आलंबन नसायला हवं हे समजणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
मानसशास्त्रामध्ये आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) चा अर्थ मला काय वाटत आहे (व्हॉट आय अ‍ॅम फीलींग), मी काय विचार करत आहे (व्हॉट आय अ‍ॅम थिंकींग) आणि मी काय कृती करत आहे (व्हॉट आय अ‍ॅम डूईंग) याची नेमकी जाणिव असणे. तुम्हाला अध्यात्माच्या अनुषंगाने "आत्मभान" या संकल्पनेत काय अभिप्रेत आहे?
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 12/26/2013 - 06:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 12/26/2013 - 06:10 नवीन
शेवटी काय साद्ध्य झाले म्हणे?
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 12/26/2013 - 06:21 नवीन
प्रतिसाद वाचूनही कळले नसेल तर हा विषय तुमच्या आवाक्याबाहेरचा आहे असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 12/26/2013 - 06:31 नवीन
प्रतिसाद वाचूनही कळले नसेल तर हा विषय तुमच्या आवाक्याबाहेरचा आहे असं मला वाटतं.
आम्ही अडाणीच आहोत , तुम्हाला जेवढे समजलेय तेवढे आम्हाला सोप्या शब्दात सांगा म्हणेज झाले
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 12/26/2013 - 06:46 नवीन
तुमची विनम्रता, जिज्ञासा पाहून आम्ही संतोष पावलो आहोत. तुमच्यासारख्या सरळ आणि साफ मनाच्या शिष्याच्या शोधात आम्हीही होतो. अनाकलानामुळे झालेल्या समाजाच्या धार्मिक विभाजनाप्रती जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करतो. त्यामुळे आम्हाला जेवढे समजलेय तेवढे तुम्हाला सोप्या शब्दात नक्की सांगू.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 12/26/2013 - 09:32 नवीन
देव या कल्पनेनं समाजाचं धार्मिक विभाजन झालंय ही उघड गोष्ट जर तुम्हाला पटली असेल तर तुमच्या या प्रश्नाला :
तुम्हाला अध्यात्माच्या अनुषंगाने "आत्मभान" या संकल्पनेत काय अभिप्रेत आहे?
उत्तर देण्यात अर्थ आहे. सगुणोपासना "स्थितधी:" अवस्थेप्रत" नेऊ शकेल अशीच जर तुमची धारणा असेल (जी आतार्यंतच्या सर्व प्रतिसादात दिसून येते) तर याविषयावर चर्चा करण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/26/2013 - 09:35 नवीन
धृतराष्ट्र महाराज,
सगुणोपासना "स्थितधी:" अवस्थेप्रत" नेऊ शकेल अशीच जर तुमची धारणा असेल (जी आतार्यंतच्या सर्व प्रतिसादात दिसून येते) तर याविषयावर चर्चा करण्यात अर्थ नाही.
असे असेल तर सगुणोपासनावाले अहद ज्ञानेश्वर तहद तुकाराम-रामदास यांपैकी स्थितधी: कोण नव्हते ते सांगा, म्हणजे आमच्यासारख्या अज्ञ बालकांना मार्गदर्शन होईल.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 12/26/2013 - 09:49 नवीन
त्यांनी 'मागेच' उपरोल्लेखित सगळ्यांना अडगळीत टाकलंय. सरांचे जुने लेख वाच रे बॅटमॅन! मला वाटतं रुणूझुणू सेरिज आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/26/2013 - 09:52 नवीन
अच्छा ते होय =)) रैट्ट. तो भ्रमर चावूनच हा धृतराष्ट्र बनला असावा.
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 12/26/2013 - 18:37 नवीन
उत्तर देण्यात अर्थ आहे.
चर्चा करण्यात अर्थ नाही.
सारं काही तुम्हीच ठरवणार. त्यापेक्षा राहू दया. मला मानसशास्त्रानूसार "आत्मभान" शब्दाचा अर्थ कळला आहे तेव्हढा पुरेसा आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/27/2013 - 10:40 नवीन
@मला मानसशास्त्रानूसार "आत्मभान" शब्दाचा अर्थ कळला आहे तेव्हढा पुरेसा आहे.>>> धनाजी आपण शिंपल पाव शांपल खाणारी/पचणारी माणसं. आपण हे असले निव्वळ तोंडानी खाता येतात एव्हढ्याच कारणास्तव "पदार्थ" म्हणविल्या जाणार्‍या कःपदार्थांन्ना तोंडीच का लावावं? :) सोडून दे ना यारं!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 12/26/2013 - 10:40 नवीन
मुळात हिंदु असण्यासाठी आस्तिक असायचीच गरज नाही. अर्थात पूजनाचीच गरज नाही. एखादी व्यक्ती नास्तिक असूनही हिंदू असू शकते. नास्तिकांनी आचरायचे नियमही स्पष्ट आहेत. तेव्हा मूर्तीपूजा = हिंदू हे अपूर्ण वाटते. बाकी हिंदू हा सर्वसाधारणपणे घेतला जातो त्या अर्थाने धर्म नसून एका उपखंडात तयार झालेली जीवनपद्धती आहे, हे श्री वाजपेयी यांचे मत मला चिंत्य व योग्य वाटते.
  • Log in or register to post comments
म
म्हैस गुरुवार, 12/26/2013 - 11:03 नवीन
त्यासाठी धारणारहित चित्त ही सर्वात प्रार्थमिक आणि अत्यंत अनिवार्य गोष्ट आहे. देव ही विचारांबरोबर भावविश्वही व्यापून टाकणारी अत्यंत चुकीची धारणा आहे.
धारणारहित चित्त .......ह्याचा अर्थ सांगाल का? आजपर्यंत कुणी असा काही ऐकलय का? :-)
अर्थात काही विद्वान (ज्यांचे विषयाचे प्रगाढ ज्ञान त्यांच्या प्रत्येक प्रतिसातून दिसते), निव्वळ व्यक्तिगत प्रतिसाद धोरणात बसवून चर्चा कशी भरकटेल याची खबरदारी घेतात.
किती ती jealousy …. ENO घ्या हवं तर
असे असेल तर सगुणोपासनावाले अहद ज्ञानेश्वर तहद तुकाराम-रामदास यांपैकी स्थितधी: कोण नव्हते ते सांगा, म्हणजे आमच्यासारख्या अज्ञ बालकांना मार्गदर्शन होईल.
चल म्हणजे आपण अज्ञ आहोत हे तरी तुम्ही accept केलत. हे हि नसे थोडके
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 12/27/2013 - 12:09 नवीन
हि चर्चा वाचत असताना इरावती कर्वे यांच्या "युगांत" ची आठवण झाली. पुस्तकातील शेवटच्या लेखाचा समारोप करताना बाईंनी असे लिहिले आहे "हे सर्व लिहित असताना एका मित्राने एक विचार मांडला. वेद, उपनिषदे, महाभारत अशी सुरुवात झाल्यावर आपल्या सबंध समाजाने पलटी का खाल्ली? इतक्या कणखरपणे आयुष्याचा विचार केल्यावर भक्तीमार्गाचा स्वप्नाळूपणा व विभूतीपूजा त्याने कशी पत्करली? गोमांसासुध्दा सर्व तर्‍हेने मांस खाणारे शेवटी गाईचे शेणखाउन व मूत पिउन, एका चार पायाच्या जनावराला आपली माता कशी समजु लागले?" हा फक्त एक उतारा वाचुन अनेकांचा बाईंविषयी गैरसमज होण्याचा संभव आहे. पण युगांत संपूर्ण वाचल्यावर त्यांना काय म्हणायचे होते ते नक्की समजते.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 12/27/2013 - 12:13 नवीन
सहमत आहे. पण अर्थात बरेच पदर आहेत म्हणा त्याला. असो.
  • Log in or register to post comments
र
राही Fri, 12/27/2013 - 12:33 नवीन
आपली अधोगती का आणि कशी झाली, कधीपासून झाली, मुळात ती झाली हे तरी खरे का असे अनेक प्रश्न चर्चिले जातात आणि त्यांची अनेकानेक उत्तरे अनेकांनी आपापल्या परीने शोधली आहेत. गोमांसभक्षण सार्वत्रिक होते हे इरावतीबाईंचे मत त्यांनी 'युगान्त' शिवाय अन्य पुस्तकांतूनही मांडले आहे. दुर्गाबाईंनीही मांडले आहे. या विषयी मिसळपाववरील एका चर्चेत बरीच अवतरणे, उद्धृते दिली गेली होती. कोणाला दुवा मिळाल्यास द्यावा. मुद्दा भक्तिमार्ग अनुसरण्याचा किंवा गोमातेला पूज्य मानण्याचाच केवळ नाही, तर सर्वंकषपणे विवेकहीन होण्याचा आहे. पण त्यावर पुढे कधी तरी.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 12/27/2013 - 12:42 नवीन
उदाहरणे अनेक देता येतील. मुख्य मुद्दा इतकाच की गाय हा खाद्यपशू होता, यद्यपि "गाय" किंवा "म्हैस" जास्त खाल्ली जात नसे कारण शेवटी ती पिलांना जन्म देते. बैल अन रेडे मात्र दाबून खाल्ले जात असत. कारण तेव्हा शेतीवर फोकस तितकासा नव्हताच. "होऊ दे गोमांसाचा खर्च, खिल्लार आहे घरचं" अशी स्थिती होती. पुढे पुढे शेतीचा प्रसार झाल्यावर साहजिकच हा फोकस निमाला. अन (भौतेक) जैन-बौद्धांची काँपीटिशन कमी करायला म्हणून ब्राह्मण व्हेज झाले इ.इ. यात आधीच्या पेक्षा जास्त इल्लॉजिकल असे काही नाही. अगदी वैदिक काळात निर्गुण का असेना, उपासना होतीच. प्राणी मारून त्यांचे हवि आकाशातील देवांना अर्पण करणे हीदेखील सगुणोपासनेइतकीच मोठी अंधश्रद्धा म्हणावी लागेल. नंतर त्यातली हिंसकता कमी झाली. पण एका बाबतीत सहमत आहे. वेदकाळापासून ब्राह्मणकाळात कर्मकांडाचे प्रस्थ वाढले त्यावर रिअ‍ॅक्शन म्हणून उपनिषदे तयार झाली. त्याच्या पुढे मात्र तितके फंडामेंटल काम झालेले दिसत नाही. जे काही आहे त्याचे या ना त्या प्रकारे विवरण करणे इतकाच उद्योग नंतरच्या लोकांनी केलेला दिसतो. जी षड्दर्शने आहेत त्यांच्या कन्सॉलिडेशननंतरच्या काळाबद्दलही असेच म्हणता येईल. बराच काळ ती व्हायटॅलिटी गमावली-विशेषतः गुप्त काळानंतर. अगदी शंकराचार्य इ. असले तरीही. पुढे संतांनाही स्वतःचे काही करण्याइतका अवसरच मिळाला नाही असे दिसते. हा समाजस्थितीचाच परिपाक म्हणावा लागेल.
  • Log in or register to post comments
र
राही Fri, 12/27/2013 - 17:39 नवीन
म्हणूनच जुन्या रूढी पुन्हा पुन्हा तपासून पहायला हव्यात. 'आत्म'परीक्षण व्हायला हवे. बौद्ध-जैनांनी एक झटका दिला तेव्हा आम्ही खडबडून जागे झालो आणि नंतर झोपी गेलो आहोत ते आजपर्यंत. अधूनमधून प्रबोधनाच्या चळवळी झाल्या पण त्यांना मर्यादितच यश मिळाले. पारमार्थिक सोडून द्या, ऐहिक दृष्टीने पहाताही दुसरे सहस्रक अंधारयुग होते. परकीयांच्या आक्रमणांना आम्ही तोंड देऊ शकलो नाही. आधी पाडाव आणि मग त्यामुळे (संस्कृतीचा) र्‍हास या कारणमीमांसेपेक्षा आधी र्‍हास आणि मग त्यामुळे पाडाव हेच मला अधिक पटते. आधी डीक्लाइन आणि नंतर फॉल. आमच्याकडे नवनिर्माण झाले नाही, पुनरुज्जीवन झाले नाही, इतरत्र मात्र ते झाले; याला चक्रनेमिक्रमच म्हणावे कायं? की जो शिखरावर जाईल तो खाली येईलच वगैरे? या बाबतीत मला तेव्हाचे आम्ही आणि भारतातले आजचे पारसी यांची स्थिती (संख्या सोडता) सारखी वाटते. पारश्यांना आपला वंश, धर्म लयाला जाईल किंवा संकर होईल याची इतकी भीती वाटली की त्यांनी आपले धर्मनियम अधिकाधिक कडक केले. त्यांनी स्वतःला आक्रसून टाकले. आणि त्यांची संस्कृती अधिकाधिक आकसत गेली. म्हणून (भोळ्या-भाबड्या जनतेकरिता) वैचारिक प्रबोधनाची एक जोमदार चळवळ पुन्हा सुरू व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 12/27/2013 - 18:30 नवीन
नक्की आहे कुठे? आणि ती जोमदार चळवळ कुठे आणि केंव्हा चालू होणार आहे?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा