गुन्हा ?
http://www.firstpost.com/india/no-muslims-ad-in-99-acres-starts-fresh-debate-on-discrimination-1218351.html
वरील बातमी च्या संदर्भाने विचार करताना असा प्रश्न उद्भवला , की सगळीकडे मोहल्ले ,आहेत त्या मोहल्ल्या मध्ये इतर धर्मियांना रहाणे सोडाच ,पण एखाद्या कामासाठी आत जाणेही मुश्किल वाटते . काही वर्षापूर्वी भिवंडी येथे पोलिस चौकी उभारण्यावरून घडलेल्या दंगलीची पार्श्वभूमी आठवां …
अशा परिस्थितीत जर एखाद्या समुदायाने / सोसायटीने / बिल्डर ने आमच्या परिसरात विशिष्ट पंथाचे /समाजाचे लोक नकोत अशी भूमिका घेतली ,तर तो गुन्हा कसाकाय व का ठरावा?
सदस्यांनी जे काही मुद्दे मांदायचे असतील ते कृपया वयक्तिक पातळीवर न उतरता मांडावेत. फुकटात सेक्युलरवाद्यांना पोसायला "इंग्लंड- अमेरिका" म्हणजे भारत नव्हे,
लोकशाही राष्ट्रात प्रत्येकाला (किंवा समूहाला) आपला शेजारी कोण असावा हे निवडण्याचे स्वातंत्र्य असावे असे नक्की वाटते.असं असेल तर मग, मुंबईत शाकाहारी जैन्/गुजराती लो़कांनी उच्चभ्रू वसाहतींत फक्त शाकाहारीच (पक्षी: जैन्/गुजराती) पाहिजेत असं ठरवलं तर मग तुमच्यासारखे लोक का विव्ह्ळत होते मग? आमची मुंबै इ. ? आणि लोकशाहीत धर्मावर आधारित शेजारी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. आपल्या सोईप्रमाणे लोकशाहीची व्याख्या करु नका.अशावेळी सरकारच्या मतदारांनी सरकारवर दबाव आणून सरकारला हस्तक्षेप करायला लावणे उचितवदतो व्याघातन्यायाचे उदाहरण इथे चांगले लागू पडते. आधी नीट काय म्हणायचेय ते ठरवा, घाई नाही. :)हे कोण ठरवणार लोकशाही म्हणजे काय ते? आणि लोकशाहीत लोकांना त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्याचा मान राखला जात नसेल तर ती लोकशाही काय कामाची?भारतातील लोकशाही कशा प्रकारची असावी हे आधीच ठरलेले आहे- तुम्ही त्यादिवशी वर्गात हजर नव्हतात! :) त्यामुळे, आता इथली लोकशाही तुम्हाला पटत नसेल तर तुमच्या सोईची धर्माधिष्ठित लोकशाही जिथे असेल तिथे (म्हण्जे- पाकिस्तान, सोमालिया, नेपाळ, ग्रीस वा इ. ) जाऊन स्थायिक होण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेच, त्याचा जरूर लाभ घ्यावा. पण भारतात राहायचं असेल तर लोकशाहीची सर्वमान्य व्याख्या मान्य करण्यावाचून आणि तसे वागण्यावाचून गत्यंतर नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो- हिंदूमहासभेचे अग्रणी नेते, जहाल हिंदुत्ववादी श्री श्यामाप्रसाद मुखर्जी हे घटना समितीचे सदस्य होते. तेव्हा, १९४६-१९५० पर्यंतच्या काळात अशाप्रकारची चर्चा झालेली आहे (ती संसदेच्या कागदपत्रात त्याचे मिनट्स स्वरुपात पाहायला उपलब्ध आहे) या साधकबाधक, उलटसुलट चर्चांचे फलस्वरुप म्हणजे आजची घटना आहे. आणि त्यातही वैधानिक मार्गाने बदल करण्याचा मार्ग उपलब्ध आहे. तो करायचा असेल तर तुमचे बहुमतातले सरकार निवडून आणा आणि काय ते बदल करा. पण तोपर्यंत आहे ते चालवून घ्या.लोकाना काय कळणार की देशसेवेचे व्रत पूर्ण करण्यासाठी आपण यवनी प्रदेशात राहून त्यांनाच शिव्या घालण्याची कामगिरी कशी शिताफीने पूर्ण करत आहात ते . धन्यवाद मंदार कात्रे .
भिवंडी येथे पोलिस चौकी उभारण्यावरून घडलेल्या दंगलीची पार्श्वभूमीहा मुद्दा गैरलागू होतो कारण दंगल जमावाने केली होती. वसाहतीमध्ये परधर्माच्या कोणा एकट्या दुकट्या माणसाला जागा दिली तर तो दंगल करू शकणार नाही.अशा परिस्थितीत जर एखाद्या समुदायाने / सोसायटीने / बिल्डर ने आमच्या परिसरात विशिष्ट पंथाचे /समाजाचे लोक नकोत अशी भूमिका घेतली ,तर तो गुन्हा कसाकाय व का ठरावा?कोणत्या कायद्याखाली हा गुन्हा ठरतो? याबद्दल कोणीच काही लिहिलेले नाही. ही गोष्ट योग्य की अयोग्य असणे आणि हा गुन्हा असणे किंवा नसणे यात फरक आहे.