गुन्हा ?
http://www.firstpost.com/india/no-muslims-ad-in-99-acres-starts-fresh-debate-on-discrimination-1218351.html
वरील बातमी च्या संदर्भाने विचार करताना असा प्रश्न उद्भवला , की सगळीकडे मोहल्ले ,आहेत त्या मोहल्ल्या मध्ये इतर धर्मियांना रहाणे सोडाच ,पण एखाद्या कामासाठी आत जाणेही मुश्किल वाटते . काही वर्षापूर्वी भिवंडी येथे पोलिस चौकी उभारण्यावरून घडलेल्या दंगलीची पार्श्वभूमी आठवां …
अशा परिस्थितीत जर एखाद्या समुदायाने / सोसायटीने / बिल्डर ने आमच्या परिसरात विशिष्ट पंथाचे /समाजाचे लोक नकोत अशी भूमिका घेतली ,तर तो गुन्हा कसाकाय व का ठरावा?
🗣 चर्चा
(53)
य
यसवायजी
Wed, 12/25/2013 - 18:05
नवीन
(एकमेका सहाय्य करु या तत्वावर) काही 'फक्त शिक्षक'/ LIC एजंट्स/ डॉक्टर्स यांच्या सोसायट्या असल्या तर मला काही वावगे वाटत नाही. शेजारी राहणार्या इंजीनीयरला का त्रास व्हावा त्यात?
जर समजा उद्या मी कुठेतरी परदेशी असे ठरवले की आम्ही भारतीय एकत्र राहू, काय प्रॉब्लेम आहे काय कुणाला?
जातींच उदाहरण एवढ सोपं नाहीय माहित्ये,
पण तरी ज्यांना कुणाला झिंग्यांच्या वासानेच उलटी होते, 'रक्ती'चं साधं नाव ऐकलं तरी घाम फुटतो, अशा लोकांनी ठरवलं की बाबा, आपण एकमेकांना ओळखतो, इतरांना त्रास न देता आपणच वेगळे राहू. कुणाला बंदी आहे असं नाही, पण प्रवेश फक्त शाकाहार्यांनाच आहे. अर्थात शाकाहार हा अजुनही काही विशिष्ठ जातीत बहुतकरून पाळला जातो ही वस्तुस्थीती आहे. मग बाहेर आम्ही भले सर्वांच्या गळ्यात-गळे घालून हिंडतो.
अजुन विचार चाललाय.. बदलायला तयार आहे..
(घरी तुप-मेतकुट-भात, आणी बाहेर झिंगे/रक्ती काहीही चालणारा/चापणारा)
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
Wed, 12/25/2013 - 18:48
नवीन
कोणत्याही जाती-धर्म-आहाराच्या सिंगल मुली-स्त्रीयांना घर ( आख्खा फ्लॅट किंवा शेअरिंग कसही ) मिळायला काय काय आणि किती अटी घालतात हे माहित असेल तर वर लिहिलेली नोटीस फारच दुय्यम आहे.
आणि या अटी फक्त घरमालकच नव्हे तर अख्खी सोसायटी घालते. येण्या-जाण्याची वेळ, भेटायला येणारे लोक, घातलेले कपडे आणि तत्सम दैनंदिन जीवनातल्या सर्व गोष्टींवर अटी/नियम असतात.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 12/25/2013 - 19:46
नवीन
अहो एका सोसायटीत मला जागा भाड्याने मिळवताना सोसायटीने फक्त विवाहीत/ कुटुंबीयानाच जागा देता येईल अशी अट घातली होती. त्यातसुद्धा अॅग्रीमेंटवर नवराबायको दोघांच्या सह्या हव्यात .....
त्या अटीने माझी इतकी त्रेधा तिरपीट उडवली विचारु नका. अर्थात मिपाकरानी मला त्यासाठी बरेच सल्ले दिले.
ते सगळे सल्ले या इथे http://misalpav.com/node/14496
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2