नवा जिल्बिवाला
समस्त अभ्यागत नवं तांब्याधारकांस कढई सह समर-पीत
:-p ब्लॉग माझा आहे तिथे, पीठही आहे भरपुर तिकडुन भरुन तांब्या इथे, जिलब्या तळिन चुरचुर नवि कढई दिसता माझे,हात लगेच उठतात तेल गरम असो/नसो,पटपट तांब्या फिरवतात. जरि काढल्या जिलब्यांवरती,फिरु लागल्या माश्या मी म्हणेन,''बघा की नुस्त,का वाजवता ताशा?'' मला(हि) लेखक/कवि व्हायचय,तांब्या जरा फिरवु द्या अखिल जिलबि पाडक संघाचं,राष्ट्रीय संमेलन भरवु द्या एकाच दिवशी टाकेन मी,दोन दोन पराती जिलब्या मि.पा. वरच्या प्रत्येक स्टॉलवर म्हणिन मी, ''मलाच घ्या'' नंतर मी पळुन जाइन,घेऊन माझा तांब्या... पळता पळता मनात म्हणिन,कुठं शिरलावतास रे ठोंब्या? :-p प्रतिसाद इथले वाचुन वाचुन,मी म्हणेन चला कारण हे म्हणतात मला,नवा जिलबिवाला =))💬 प्रतिसाद
आ
आदूबाळ
Sat, 04/06/2013 - 21:28
नवीन
ब्लॉगवरि जर नसेल काही, तर होई मम चित्ता कष्ट
चेपु पालथे घालिन सारे, परि करीनच काही कॉपी पेष्ट!
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sun, 04/07/2013 - 08:55
नवीन
टाकून जाऊ जिल्ब्या मिपावर आठवड्यातून चार
इतर धाग्यांना प्रतिसाद देण्या मात्र आम्हा मारामार !
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 04/06/2013 - 21:38
नवीन
नकोस जिलबीवाल्या रागाने इतका पाहू
एका हॉस्टेलातले आपण, मिळून मिसळून राहू
.
येता नवा आचारी, मापे काढणार्यांचीच घाई
संस्थळाच्या प्रगल्भतेला हे म्हणे शोभत न्हाई
.
=)) =)) =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 04/07/2013 - 03:24
नवीन
@येता नवा आचारी, मापे काढणार्यांचीच घाई>>> =)) आप्ला हा इचार असा हाय की शोभुन दिसावा,पण ज्याची बाजु घेतो आपण तो किमान फडकं मारणारा(तरी) असावा.
कॉपि-पेश्ट सम्राटांना आचारी म्हणू नये,,,मला पाठिंबा देत न्हाइस....म्हनुन तुला- हे घे!!!
...हे घे!!!...
हे घे!!!... 
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 04/07/2013 - 10:37
नवीन
=)) =)) =))
गुर्जी पाठिंबा तर आल्वेज तुम्हालाच हाय. काय करणार आपल्या लोगोतच जिलबी हाय मोठ्ठी.
अशी जिलबी पाडून दाखवला तर पाठींबाच नाय तर तुमच्यासाठी कायपण.

- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 04/07/2013 - 14:39
नवीन
..............
@अशी जिलबी पाडून दाखवला तर पाठींबाच नाय तर तुमच्यासाठी कायपण.>>> 
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Sun, 04/07/2013 - 15:14
नवीन
क्या बात! काय सृजनशीलता आहे!
मिपावर एक दिवस "जिल्बी-शिमगा" जाहीर करून त्या दिवशी मुखपृष्ठावर हा फटू चिकटवावा अशी संमंला विनंती...
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 04/07/2013 - 19:22
नवीन
चित्रमहर्षींचे काव्यगुण पाहून मुग्ध झालो आहे. मास्क काढल्या गेला आहे.
_/\_
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Sun, 04/07/2013 - 05:06
नवीन
अखिल भारतीय जिलेबी पाडु चालक मालक संघाला व पर्यायाने अध्यक्षांना अतृप्त आत्माजी यांना स्थापना दिना निमित्त हार्दीक शुभेच्छा,आपणास व आपल्या जिलेबी पाडणार्या कारागीरांस नुतन जिलेबी पाडु वर्ष सुखाचे व समृद्धीचे जावो हीच इच्छा.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 04/07/2013 - 07:21
नवीन
@चालक मालक संघाला व पर्यायाने अध्यक्षांना अतृप्त आत्माजी यांना>>> :-O :-/
पाप कुणाचे शाप कुणाला - एक मराठि नाटक :-b :-b :-b
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 04/07/2013 - 05:33
नवीन
डोक्यावरती ठेवून कढई आणि हाती घेउनी झारा,
नवकवींना पाहूनी आत्मुदाचा चढतो पारा,
आले किती, टिकतील किती, जातील किती, कुणी सांगेल का हो मजला
नवजिलब्या कितीही पडू दे, परी मीच आद्य जिलबीवाला, मीच आद्य जिलबीवाला.
---
कढाईवाला आत्मा (चित्र अभ्याकडून)

- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 04/07/2013 - 10:05
नवीन
......
दु.दु.अगोबा-बॉक्सिंग आत्मा 
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 04/07/2013 - 10:44
नवीन
गुर्जी हे दु.दु. म्हणजे राज्मान्यराजश्री सारखे दुष्ट दुर्जन का हो?
आणि हा अगोबा कोण? का असे नाव ठेवलेय? ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 04/07/2013 - 19:26
नवीन
अगायायायायायायायायायाया....................
सुपरमार्केटच उठिवलं की हो ते बुवांचं!!!!!! हसवून हसवून मारतंय बगा हे वल्ली =)) =)) =))
येस्स, आत्मूस हाच तो आद्य जिलबीपाडक ऊर्फ जिलबीवाला.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 04/07/2013 - 05:49
नवीन
आत्मा जिलबीवाला आहे...आत्मा अमर आहे ..अत: जिलबीवाले अमर आहेत. ( कोणी कितीही बोंबा मारा !!!!)
- Log in or register to post comments
ज
जेनी...
Sun, 04/07/2013 - 06:09
नवीन
:D :D
- Log in or register to post comments
स
स्पा
Sun, 04/07/2013 - 06:26
नवीन
चान चान
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 04/07/2013 - 06:53
नवीन
हॅहॅहॅ... ;)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sun, 04/07/2013 - 07:29
नवीन
स्वत:च्या त्या रांगोळ्या अन दुसर्याच्या त्या जिलब्या का? बॉर !
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 04/07/2013 - 07:56
नवीन
@दुसर्याच्या त्या जिलब्या का? बॉर ! >>> =)) आपले ते परतिसाद ,दुसय्राची ती चिखलफेक :-b
एकाने दुसय्रास तळावे,थोडा झारा सैल धरा,आमचा तांब्या तुम्ही भरा. :-b =))
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sun, 04/07/2013 - 08:11
नवीन
आमचे प्रतिसाद अन दुसर्याचे पण...दुसरेच रडारड करतात त्याला आमचा नाईलाज आहे. बहुतेक आजकाल मिपावर कमकुवत मनाचे लोक जरा जास्तीच झाले दिसताहेत. चालायचंच.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 04/09/2013 - 17:54
नवीन
+१.
गुर्जींची जिबलीकविता नेहमीप्रमाणे मस्तच. ;)
- Log in or register to post comments
श
श्रिया
Sun, 04/07/2013 - 07:58
नवीन
- Log in or register to post comments
स
सुहास झेले
Sun, 04/07/2013 - 11:54
नवीन
लईच ;-)
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sun, 04/07/2013 - 12:41
नवीन
वा छान आहे जिल्बी
- Log in or register to post comments
प
पक पक पक
Sun, 04/07/2013 - 13:37
नवीन
आत्मसु पुन्हा आपल्या होमपीच वर परतले ..... :bigsmile:
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 04/07/2013 - 14:59
नवीन
नवलेखकांना होते मिपावर लिहायची घाई
पण हल्ली त्यांना जिल्बीची भेट कुणी न देई
पाहून हे आत्मा घेतो कविता लिहायचे कष्ट
त्या कवितेला जिल्बी म्हणतो अगोबा दुष्ट!
:P :D
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 04/07/2013 - 15:21
नवीन
@पाहून हे आत्मा घेतो कविता लिहायचे कष्ट
त्या कवितेला जिल्बी म्हणतो अगोबा दुष्ट! >>>



- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Sun, 04/07/2013 - 15:33
नवीन
=))
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 04/07/2013 - 18:54
नवीन
अभ्या-वल्ली-आत्मा कितिक जिलब्या पाडत बसा |
कुठे चित्राची वा कुठशि कवितेची भसभसा |
हसे लोळे तेणे जिवचि खुश खासा बघ तसा |
अजोनी पाडा हो बहुत जिलब्या, खाइन कसा ||१||
मिपाजालस्थाने हि खलु कवयः सन्ति बहवः |
परं तेषां मध्ये विरलतरलोऽयं कविवरः |
स आत्मा अत्रुप्तः सृजति ननु काव्यं जिलबिवत् |
कुकाव्यं जायेत क्वचिदपि कु-जिल्बी न भवति ||२||
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Sun, 04/07/2013 - 19:13
नवीन
=)) =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 04/07/2013 - 21:16
नवीन
@स आत्मा अत्रुप्तः सृजति ननु काव्यं जिलबिवत् |
कुकाव्यं जायेत क्वचिदपि कु-जिल्बी न भवति ||२||>>>
साष्-टांग नमन हे माझे
वाघुळा ब्याटम्यानिका
वृत्त परफेक्ट घट्ट मात्रा
तृप्त हो मनकर्णिका 
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Wed, 04/10/2013 - 14:34
नवीन
=)) =)) =)) =))
च्यायला
जिलब्या जिलब्या करत
आतडी दुखे पर्यंत हसवतात
- Log in or register to post comments
न
नाना चेंगट
Sun, 04/07/2013 - 20:32
नवीन
जबरा !
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Mon, 04/08/2013 - 01:07
नवीन
च्यायला
ह्या कवीच्या कविताच नाही तर खरड वही सुद्धा वाचनीय आहे.
आमचा मिपावर सर्वत्र वावर असतो. म्हणून आपले निरीक्षण नाही तर मत नोंदवत आहे.

- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 04/08/2013 - 05:42
नवीन
अतृप्त आत्मा पंचतारांकित नगरीत डान्स कम्पीटीशनला आला होता तेंव्हाचा फटू हाय काय ?
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 04/08/2013 - 05:49
नवीन
जिलब्या खायला व कविता वाचायला मनापासून फारसे आवडत नसले तरी ही रचना खरंच आवडली.
- Log in or register to post comments
अ
अधिराज
Mon, 04/08/2013 - 09:33
नवीन
लई भारी! लई भारी!! नवीन जिल्बीवाला जिल्ब्यांसकट कुठं गायब झाला म्हणायचा?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 04/08/2013 - 11:45
नवीन
@जिल्ब्यांसकट कुठं गायब झाला म्हणायचा?>>> =)) अन्नसंपादक सुरक्षा मंडळानी त्याचा पेस्टवलेला बाधक माल जप्त केला,:-p म्हणुन चिडुन गायब झाला असेल. ;-)
- Log in or register to post comments
प
पिंगू
Mon, 04/08/2013 - 10:09
नवीन
किलोभर जिलब्या पार्सल करुन कसबा पेठेत पाठवून द्या..
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Mon, 04/08/2013 - 14:26
नवीन
हिंडून फिरून भांड्यावर येउन रहायले ब्वा तुमी …तांब्या काय कढई काय...
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 04/08/2013 - 14:39
नवीन
भांडे, भांडण, इ.इ. ची पापुल्यारिटी पाहूनच बुवाण्णी "भांडे का लपविता?" अशी आपल्या मनातील खंत प्रश्नार्थक रूपाने व्यक्त केली असावी =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 04/08/2013 - 19:32
नवीन
आले आले ऐतिहासिक मालोजी राव आले.अता खर्या अर्थाने असे म्हणता येइल की,भांडे वाजो लागले. ;)
- Log in or register to post comments
ल
लीलाधर
गुरुवार, 04/11/2013 - 08:53
नवीन
हे पहा जिलबी पाडणारे

- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/11/2013 - 11:46
नवीन
@हे पहा जिलबी पाडणारे >>> =)) आंम्ही ठरवुन-पाडतो...
आपण नुस्तं ऊंऊंऊंऊंऊंऊंऊं....... केलत तरी पडते. :-p
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sun, 12/27/2015 - 12:11
नवीन
=))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 12/27/2015 - 13:09
नवीन
दुत्त दुत्त!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 12/28/2015 - 11:41
नवीन
बघा! कवतिकं केली तर म्हणए दुत्त! दुत्त!!
करु का तुमची तक्रार? =))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 12/28/2015 - 11:45
नवीन
=))
- Log in or register to post comments
व
विश्वव्यापी
Mon, 12/28/2015 - 11:31
नवीन
नव नवीन जिलेबी वाले येतात मिपावरी
नावे ठेवतात , नाकं मुरडतात , तरीही खातात , सर्व मिपाकरी
-))
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »