Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

टोमॅटो पुरी

स
स्वाती दिनेश यांनी
Tue, 03/26/2013 - 17:48  ·  अन्न हे पूर्णब्रह्म
अन्न हे पूर्णब्रह्म

साहित्य- टोमॅटो प्युरी १ वाटी किवा मोठे २ चांगले लालबुंद टोमॅटो,
मिरपूड, धनेजिरे पूड, ओवा - प्रत्येकी १ लहान चमचा,
तिखट व मीठ - स्वादानुसार
कणिक, तेल
कृती- टोमॅटो पाण्यात घालून उकळणे, ते शिजत आले की चाळणीवर घालणे आणि जरा कोमट झाले की साले काढून उरलेला गर कुस्करणे व नंतर मिक्सर मधून फिरवून घेणे.
किवा- तयार प्युरी घेणे. त्यात तिखट, धनेजिरे पूड, मिरपूड, ओवा, तिखट, मीठ घालणे.चमचाभर तेल घालणे. त्यात मावेल एवढी कणिक घालून घट्टसर भिजवणे.१५-२० मिनिटे झाकून ठेवणे.
तेल तापत ठेवणे.
पुर्‍या लाटून मध्यम आचेवर तळणे.
हिरव्या चटणीबरोबर खाणे.
चटणी- २-३ मिरच्या चिरुन, कोथिंबिर,२ लसूणपाकळ्या, एका पेराएवढं आलं, मीठ चवीनुसार, १/२ चमचा साखर हे सगळे एकत्र करुन मिक्सर मधून फिरवणे, थोडे पाणी घालणे.

.


वाचनखूण लावा
| 36637 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 36637 views

य
यशोधरा Tue, 03/26/2013 - 17:51 नवीन
ख ला स! स्वातीताई, तूच गं तूच!
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Tue, 03/26/2013 - 17:56 नवीन
प्युरी पासून पुरी.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Tue, 03/26/2013 - 18:04 नवीन
नाश्तासाठी चहापुरी म्हणजे माझा ऑलटाईम फेवरेट प्रकार.. १५-१६ सहज जातात.. हा प्रकार सुद्धा मस्तच दिसतोय.. फोटो खासच आहे ... पुर्‍या गरमागरम असल्यासारखा इफेक्ट जाणवतोय बघूनच.. :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 03/26/2013 - 18:33 नवीन
कस्स्स्स्सल्या भारी फुगल्यात! ;)
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 03/29/2013 - 12:04 नवीन
मस्त फुगल्यात पुर्‍या. पुर्‍या अशा नीट फुगणं म्हणजे कणिक मळण्यापासून ते त्या लाटण्यापर्यंत सगळं व्यवस्थित झाल्याचं लक्षण आहे. नाहीतर कणिक जरा जास्त पातळ झाली तर पुर्‍या कितीही नीट लाटल्या तरी फुगत नाहीत किंवा कणिक व्यवस्थित आहे पण सगळीकडे सारख्या लाटल्या गेल्या नाहीत तरी त्या फुलत नाहीत. एकच मोठी पोळी लाटून वाटीने त्यातून छोट्या पुर्‍या कातून काढण्याचा एक विचित्र प्रकार काही ठिकाणी वेळ वाचवण्यासाठी करताना पाह्यला आहे. अशा लोकांनी पुर्‍या करण्याचे कष्ट घेऊ नयेत असं माझं स्पष्ट मत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 03/29/2013 - 12:33 नवीन
१. सूडच्या होणार्‍या बायकोचे हाल होणार. २. सूड स्वतः स्वैपाक करुन तिला जेवायला घालणार. :)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 03/30/2013 - 08:21 नवीन
सुड, काळजी करु नको, अशा सगळ्या त्रासदायक शक्यतांवर उपाय आहेत माझ्याकडे.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Tue, 03/26/2013 - 20:40 नवीन
मस्त दिसतायत पुर्‍या एकदम.. टम्म फुगल्यात अगदी.. :D
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 03/26/2013 - 21:20 नवीन
मस्त प्रकार. मला आधी टोम्याटो पुर्‍या माहित नव्हत्या. छानच दिसतायत.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 03/27/2013 - 01:18 नवीन
लाल पूर्‍या हिरवी चटणी!! काय कॉम्बीनेशन आहे. मस्ताड।
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 03/27/2013 - 06:28 नवीन
सुरेखच दिसतायत पुय्रा!!
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 03/27/2013 - 06:59 नवीन
मस्त :)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 03/27/2013 - 07:10 नवीन
झकासच
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Wed, 03/27/2013 - 08:18 नवीन
रंग ही सुंदर आला आहे :) मस्तचं
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 03/27/2013 - 10:22 नवीन
जबरी पुर्‍या बनल्या आहेत..
  • Log in or register to post comments
N
nishant Wed, 03/27/2013 - 11:26 नवीन
मस्त दिसतायत पुर्या..
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 03/27/2013 - 11:40 नवीन
फोटो पाहून तोंपासु......
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 03/27/2013 - 15:58 नवीन
रंग अगदी सुरेख आलाय. चटणीबरोबर कॉम्बिनेशन झकास दिसतंय. चटणीमधे खोबरं नाही का घातलं?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/27/2013 - 19:47 नवीन
पाहातक्षणीच भूक खवळली..... Image removed. स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स Image removed.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी गुरुवार, 03/28/2013 - 08:33 नवीन
पिझ्झा पुरीनंतर आता टोमॅटो पुरी ,वाह मस्तच !!!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 03/29/2013 - 11:45 नवीन
पुढच्या वेळी येताना बनवुन घेऊन येणे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 03/29/2013 - 12:24 नवीन
व्वा टोमॅटो पुर्‍या मस्त दिसत आहेत. टोमॅटो प्युरी बनविताना अर्ध्या लिंबाच्या आकाराचे बीट (सालं काढून) त्यात मिसळले तर अधिक चांगला रंग येईल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/30/2013 - 07:09 नवीन
आज्जेच्या वरच्या मता प्रमाणेच म्हणतो. :) आवडेश... :) (श्रीखंड-पुरी प्रेमी) :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा