Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

सफर क्राकोची - ३

N
nishant
Sun, 01/13/2013 - 22:38
💬 18

Book traversal links for सफर क्राकोची - ३

  • ‹ सफर क्राकोची - २
  • Up
सफर क्राकोची - १ सफर क्राकोची - २ थंडीचे दिवस असल्याने दुपारीच कधीतरी सुर्यास्त झाला होता; त्यामुळे पुन्हा क्राकोच्या main square मधे पोचेपर्यंत ख्रिसमस मार्केट आणि माक्रेट हॉल, दिव्याच्या प्रकाशात झगमगत होता. त्यात वरुन पडणारा कापसा सारखा पांढरा शुभ्र बर्फ, कडाक्याची थंडी आणि कडाडुन लागलेल्या भुकेमुळे अजिबात वेळ न घालवता सरळ हॉट वाईनचा स्टॉल गाठला. गरमा गरम वाईन आणि त्या सोबत रोस्टेड पोटॅटो, मश्रुम, कबाब हादडायला सुरवात केली. सुट्टीचा सिझन असल्याने सर्वत्र आमच्या सारख्या प्रवाशांची वर्दळ चालुच होती. त्यात स्टॉल्स मध्ये विकायला ठेवलेल्या पोलंडच्या काही खास अशा handmade crockerys, पॉलिश टॉफिज, सॉसेजेस हे सगळेच आकर्षित करत होते. सँटाक्लॉज बरोबर फोटो काढायला तर लहानांन पासुन मोठ्यां पर्यंत सगळ्यांचीच गर्दी, त्यात गंमत म्हणजे हा सँटा गिफ्ट देण्या ऐवजी प्रत्येका कडुन फोटोचे पैसे उकळत होता!! बाकी मार्केट मधे कुठे कोण बेधुंद पणे नाचत होते, गात होते तर कुठे वाईन आणि एकुनच दारुचा overdose झाल्याने नुसतेच झिंगत होते; पण ह्याचा कुणाला कसला त्रास असा जाणवत नव्हता. उलट हे सगळे अनुभवण्यात गंमत वाटत होती आणि त्यामुळे Aushwitz बघताना आलेला उदासपणा केव्हा गायब झाला हे समजले देखिल नाही. m1 * Main market hall kfh * Clock टॉवर m3 * रोस्टेड पोटॅटो, मश्रुम आणि हॉट वाईन sd * पॉलिश चिज df * पॉलिश handmade crockery dfg * हॉट वाईन स्टॉल kjh * Main square ksjdfg * हॉस्टेलकडे जाणारा रस्ता रात्री उशिरा पर्यंत आम्ही मार्केट मधेच फिरत होतो. त्यातला main market hall हा शेकडो वर्षांपासुन क्राकोमधल्या लोकांसाठी खरेदीची मुख्य जागा होती, पण आता मात्र आत मधे टुरिस्टसाठिच सगळ्या वस्तु विकायला ठेवल्याचे दिसले. तसे आम्ही नेहमी प्रमाणे सफरीची आठवण म्हणुन काही वस्तु पटापट खरेदी करुन होस्टेल वर निघालो. दिवसभर झालेल्या भटकंतीमुळे झोप कधी लागली हे समजले देखिल नाही. दिवस तिसरा: सकाळी उशिराच डोळे उघडले. आवराआवर होई पर्यंत सकाळचे ११ वाजुन गेले होते. आजचा दिवस ख्रिसमसचा असल्याने बहुतेक सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे गावात फिरताना आद्ल्या दिवशी सारखी वर्द्ळ दिसली नाही, तर त्या उलट एक शांत क्राको अनुभवता आले. आमचा आजचा कार्यक्रम क्राकोचे UNESCO world heritage चा दर्जा लाभलेले Salt mines बघायचा होता, परंतु आज ख्रिसमस असल्याने mines बंद आहेत असे हॉस्टेल मधेच समजले, त्यामुळे आम्ही सगळे थोडे हिरमुसलोच. तरी पुढच्या खेपेस या mines बघायला नक्की परतु, अशी मनाची समजुत काढुन जेवायला हॉटेलात शिरलो. जेवताना आम्ही खास पोलंडचि speciality असलेले egg soup मागवले होते. मी सोडुन कुणालाही आवडले नाही. मित्राने पोलंडमधे मिळणारी Hot beer मागवली, जी त्याच्या घशाखाली उतरता उतरत नव्ह्ती. बाकी जेवण बरे होते. त्या-त्या गावचे काहितरी खावे असे आम्ही फिरताना नेहमीच करतो. कधी तो प्रयोग सफल होतो आणि मृणालिनीबाई लगेच मिपावर त्याची पाकृ आपल्यासाठी सादर करतातच ;) lkfh * क्राको रेल्वे स्टेशन fgkhl * युरोपियन तिळाच्या फ्रेश ब्रेडचा स्टॉल lkgh * क्राकोमधे फेरफटका मारताना... uir * City tour car po * बग्गी oi * दुपारी ४ वाजता... संध्याकाळी ५ पर्यंत आमचा फेरफटका पुर्ण झाला आणि क्राकोच्या आठवणींन सोबत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. असे हे UNESCO world heritage site असलेले क्राको शहर जरी छोटेसे आणि आडबाजुला असले तरी इथे येणार्‍या प्रत्येकाला मोहुन टाकते हे नक्कीच!!! समाप्त

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5819 views

💬 प्रतिसाद
र
रेवती Sun, 01/13/2013 - 23:42 नवीन
सुरेख फोटोंनी सजलेली मालिका. या भागात आलेले फोटू मोहवून टाकणारे आहेत. पोलीश क्रोकरी गोड दिसत आहे.
  • Log in or register to post comments
N
nishant Tue, 01/15/2013 - 19:10 नवीन
प्रवासवर्णन आवड्ल्याब्द्द्ल आभारी :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 01/14/2013 - 01:02 नवीन
सुंदर फोटोज. क्राको मध्ये फेरफटकात डाव्यावाजुला इमारतीच्या वर जी स्कल्पचर्स दिसताहेत त्याचा एखादा स्पष्ट फोटो असेल तर टाका ना.
  • Log in or register to post comments
N
nishant Tue, 01/15/2013 - 19:07 नवीन
फोटो आवड्ल्या ब्द्द्ल धन्यवाद .. त्या स्कल्पचर्सचा मी समोरुन फोटो घेतलाच न्हव्ता, कदाचित तेव्हा तेथे असे काहि खास वाट्लेच नसावे.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 01/14/2013 - 08:36 नवीन
सगळे फोटो सुंदर...पण बहुतेक सगळे काळोखातले आहेत...पण तुमचा पण नाइलाझ दिसतोय कारण थंडिमुळे दिवस फार कमी असेल.
  • Log in or register to post comments
N
nishant Tue, 01/15/2013 - 19:11 नवीन
फोटो आवड्ल्या ब्द्द्ल धन्यवाद .. :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/15/2013 - 19:24 नवीन
फोटो सुंदर आहेत, क्राको सुंदर आहे यावर पुन्हा एकदा विश्वास बसला. क्राको टूरीझमकडून थोडी रॉयल्टी मागून घ्या! ;-) पहिला फोटो एच.डी.आर. करणं शक्य आहे का? आणखी सुंदर दिसेल. (एकच फोटो काढला असेल, पण रॉ-फॉरमॅटमधला असेल तर अजूनही एच.डी.आर. बनवता येईल.) पोलिश व्होडका प्यायलीत का? पोलंडमधे एक खास व्होडका मिळते, झुब्रोव्का नावाची. त्या बाटलीत कोणत्यातरी गवताची काडी टाकलेली असते आणि तिचा विशेष स्वाद त्या व्होडकाला येतो. ही व्होडका अमेरिकेत आणायला बंदी होती (किंवा आहे). पण ही व्होडका चविष्ट असते खरी! तुम्ही प्यायलेली गरम वारूणी मसालेदार होती का?
  • Log in or register to post comments
N
nishant Wed, 01/16/2013 - 12:37 नवीन
प्रतिसादाब्द्द्ल आभारी :) आप्ल्या प्रतिसादांमुळे Europe मधल्या बाकि देशांचि माहिति देखिल लिहैला आवडेल. *पहिला फोटो एच.डी.आर. करणं शक्य आहे का? मला HDR Photography चि जास्त आवड नाहि, त्यामुळे तसे नाहि केले. *पोलिश व्होडका प्यायलीत का? मी फ्क्त wine पित अस्ल्यामुळे :) वोड्का try नाहि केला. पण एकुण्च Central-Eastern European म्द्य जब्रि असतात.. त्यत Hungary चे "Unicum" , पोलंड्चा Vodka, Czech Republic, Slovakia चा "Bechrova".. चेलेंजिग मान्ले जातात ;) *तुम्ही प्यायलेली गरम वारूणी मसालेदार होती का? होय.. मसालेदार आणी चविश्ट :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 01/16/2013 - 12:48 नवीन
फोटो आणि वर्णन आवडले.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 01/16/2013 - 12:51 नवीन
मस्त. :)
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 01/16/2013 - 13:23 नवीन
क्या बात है . मस्तच अमोल केळकर मला इथे भेटा
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर Wed, 01/16/2013 - 13:34 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 01/16/2013 - 14:16 नवीन
अप्रतिम!!
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Wed, 01/16/2013 - 14:35 नवीन
क्राकोची सफर आवडली रे निशांत :) फोटोबद्दल काय बोलणार ,ते तर नेहमीच सुरेख असतात पोलिश क्रोकरी खास आवडली :) क्रोकरीप्रेमी सानिका :)
  • Log in or register to post comments
र
रोहन अजय संसारे गुरुवार, 01/17/2013 - 05:28 नवीन
सुंदर फोटो आले आहेत
  • Log in or register to post comments
अ
अशोक सळ्वी Mon, 01/21/2013 - 11:32 नवीन
सफर छान चालू आहे. चालु राहू द्या. पूढ्चा देश कोणता?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 01/21/2013 - 12:47 नवीन
जबराट.............!
  • Log in or register to post comments
N
nishant Mon, 01/21/2013 - 14:10 नवीन
सर्व प्रतिसादांसाठि धन्यवाद.. पूढ्चि सफर लवकरच ;)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 56 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 8 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 12 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 15 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा