Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

कोकणसफरीतील विसाव्याचं स्थान - 'उत्तम फार्म'

भटकंती

कोकणसफरीतील विसाव्याचं स्थान - 'उत्तम फार्म'

सदस्य
— लेखन
— प्रतिक्रिया
2026 पासून
📅
सदस्य झाले
13 March 2026

या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही.

या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.

प्रास
Sat, 12/08/2012 - 08:47

सिमेंट कॉंक्रिटच्‍या जंगलामध्‍ये राहणा-या प्रत्‍येकालाच नैसर्गिक जंगलांची एक ओढ असते. शहरापासून दूर निसर्गाच्‍या सानिध्‍यात काही काळ व्‍यतित करुन स्‍वतःसाठी नवी उर्जा मिळवून पुन्‍हा आपपल्‍या कामांना जुंपून घेणारी जनता आजकाल प्रत्‍येक शहरात आढळते. कदाचित यामुळेच काही तरुणांमध्‍ये डोगर-द-यामंधून, जंगलांमधून, नदीच्‍या खो-यांमधून फिरवणारी ट्रेकींगची आवड वाढीला लागल्‍याचे आढळून येते. असं असलं तरी अनेकांना अशा ट्रेकींग प्रकारात होणा-या श्रमाची जाणीवच हतोत्‍साही करते. अशा लोकांना निसर्गाच्‍या सानिध्‍याचं आकर्षण असतं पण त्‍यासाठी अतिरिक्‍त श्रम करणं नको असतं. निसर्ग त्‍यांना त्‍यांच्‍या रिक्रीयेशनसाठी हवा असतो. चार दिवस आपल्‍या धावपळीच्‍या – धकाधकीच्‍या जीवनापासून दूर, नदीकाठच्‍या जंगल प्रदेशात, झाडाखाली पहडून विश्रांती घेत आजूबाजूचा निसर्ग अनुभवत श्रमपरिहारातून पुढच्‍या धावपळीच्‍या आयुष्‍यासाठी उर्जा मिळवणं असा त्‍यांचा विशुध्‍द हेतू असतो. त्‍यांच्‍या अपेक्षा अगदी साध्‍या असतात. त्‍यांना निसर्ग सान्निध्‍य देणारी, मूलभूत सोयींनी युक्‍त असणारी, मानवी गजबटापासून दूर असणारी आणि त्‍यांना अपेक्षित असलेला श्रमपरिहार आणि उर्जा दोन्‍ही देऊ शकणारी अशी जागा हवी असते. माझा स्‍वतःचा सहभागही मी उपरोल्‍लेखित व्‍यक्तिंमध्‍येच करतो. कामाच्‍या संबंधाने कोकणात फिरत असताना केवळ योगायोगानेच वरील सगळया मागण्‍या पूर्ण करू शकणारी जागा मला सापडली आणि तीच आता तुमच्‍यापुढे प्रस्‍तुत करत आहे.

सिंधुदुर्गामध्‍ये कणकवली तालुक्‍यातील प्रसिध्‍द फोंडाघाट गावाजवळ दोन-तीन दिवसासाठी राहण्‍याची सोय बघत असताना जवळच्‍याच कौंडये गावातील ‘उत्‍तम फार्म’चं नाव समजलं. तिथे निश्चित सोय होतेय हे कळल्‍यामुळे सरळ कौंडयेचाच रस्‍ता पकडला. तिथे नेणारा रस्‍ता इतका सुंदर होता की त्‍यामुळे उत्‍तम फार्मबद्दलच्‍या अपेक्षाही वाढीला लागल्‍या.

उत्‍तम फार्मकडे नेणारा रस्‍ता.

उत्‍तम फार्मकडे नेणारा रस्‍ता.

उत्‍तम फार्मकडे नेणारा रस्‍ता पावसात नुकताच न्‍हालेला. हा रस्‍ता उत्‍तम फार्मच्‍या मधूनच गेला आहे. वर दिसणारा पूल (ब्रीज) हा नव्‍यानेच बांधला गेलाय. रस्‍त्‍यासाठी उत्‍तम फार्मने आपली काही जागा सोडून दिल्‍यामुळे विभागलेलं ‘उत्‍तम फार्म’चं माडांचं बन.

रस्त्याने विभागलेलं ‘उत्‍तम फार्म’चं माडांचं बन

रस्त्याने विभागलेलं ‘उत्‍तम फार्म’चं माडांचं बन.

या ब्रीजवर आल्‍याबरोबरच जाणवलं त्‍याखालच्‍या नदीचं खळाळतं अस्तित्‍व पण लक्ष मात्र वेधून घेतलं त्‍यावरील या बंधार्‍याने!

बंधा-यावरून उधाण येऊन ओसंडणारं पाणी.

बंधा-यावरून उधाण येऊन ओसंडणारं पाणी.

डाव्‍या बाजूच्‍या बंधार्‍यावरुन येणारं पाणी उजव्‍या बाजूला असं नदीरूपात वाहतं.

खालच्‍या अंगाला दिसतेय जुन्‍या साकवाची जागा

खालच्‍या अंगाला दिसतेय जुन्‍या साकवाची जागा.

जरा वळून पाहताना रस्‍ता असा दिसला

जरा वळून पाहताना रस्‍ता असा दिसला.

हा ब्रीज पार करून जाताच आपल्‍याला उजव्‍या बाजूला अशी दिसते उत्‍तम फार्मची जागा -

हिरवाईतून दिसणारा उत्‍तम फार्म

हिरवाईतून दिसणारा उत्‍तम फार्म.

उत्तम फार्मवर राहण्याची सोय दोन प्रकारची आहे. वरच्या चित्रात दिसणार्‍या चिरेबंदी खोल्या आणि प्रशस्त असा तंबू.

उत्तम फार्म मध्ये राहण्यासाठी सुसज्ज तंबू

उत्तम फार्म मध्ये राहण्यासाठी सुसज्ज तंबू.

एका चिरेबंदी खोलीमध्ये स्वयंपाकधर आणि डायनिंग रुम बनवलेली आहे. पूर्णवेळ स्वयंपाकी (खानसामा) आणि आवश्यक त्या भाज्या नि वाणसामानाने भरलेलं स्वयंपाकघर ही माझ्यासारख्या हौशी बल्लवासा़ठी पर्वणीच होती. या सोयीचा मात्र मी पुरेपूर वापर करुन घेतला.

सकाळ – संध्याकाळच्या रीकाम्या वेळेत उत्तम फार्म मध्ये फेरफटका मारताना टिपलेली काही दृश्ये –

उत्तम फार्मकडे आणणारा रस्ता

उत्तम फार्मकडे आणणारा रस्ता.

उत्तम फार्मवरुन दिसणारा ब्रीज व बंधारा

उत्तम फार्मवरुन दिसणारा ब्रीज व बंधारा.

उत्तम फार्मवरुन दिसणारी नदी

उत्तम फार्मवरुन दिसणारी नदी.

उत्तम फार्मचं माडांचं बन नि दालचिनी लागवड

उत्तम फार्मचं माडांचं बन नि दालचिनी लागवड.

सकाळी दाराशी पडलेला पारिजातकाचा सडा

सकाळी दाराशी पडलेला पारिजातकाचा सडा.

मुक्कामादरम्यान उत्तम फार्मच्या व्यवस्थापकांशी बोलताना ते किती मोक्याच्या जागी वसलंय याची नीट कल्पना आली. तिथून साधारण १८ किमी वर दाजीपूर अभयारण्य आहे. इथे गव्यांचं साम्राज्य आहे. साधारण १० किमी वर नापणे धबधबा आहे, सुमारे ५० किमी वर समुद्रकिना-यावरचं कुनकेश्वर महादेवाचं स्थान आहे, जवळपास ७५ किमी वर डॉल्फिन्सच्या झुंडी पहाण्यासाठी प्रसिध्द वेंगुर्ला आहे. त्याशिवाय १०० किमी वर कोल्हापूर – राधानगरी अभयारण्य आणि दूधसागर धबधबाही आहे. व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार ब-याचदा पर्यटक पहिला मुक्काम गणपतीपुळ्याला करतात आणि तिथून सकाळी निघून दुपारपर्यंत कौंड्याला येतात कारण गणपतीपुळे इथपासून कौंड्ये फक्त १५० किमी वर आहे.

माझ्या वास्तव्याच्या शेवटच्या दिवशी उत्तम फार्म मधली एक अलिबाबाची गुहाच माझ्यासमोर उघडली आणि त्यासाठी मला कोणत्याही परवलीच्या शब्दाची आवश्यकता लागली नाही. उत्तम फार्म तर्फे कौंड्ये गावक-यांसाठी केलेली वाचनालयाची सोय तिथे राहायला येणा-या पर्यटकांसाठीही उपलब्ध होती. दोन-तीन मोठी कपाटे भरुन असलेली मराठी – इंग्लीश भाषेतली उत्तमोत्तम पुस्तकं समोर बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर तीन-चार तास मी बकुळीच्या झाडाखालच्या पारावर बसून अरुण कोलटकरांच्या ‘द्रोण’ या दीर्घ कवितेचा आणि वा. वि.मिराशींच्या ‘कालिदास’ विषयक अभ्यासपूर्ण लेखनाचा आस्वाद घेतला. दरम्यान चहा – कॉफी नि त्याबरोबरच्या अमनचमन खाऊचा रतीब बसल्या जागेवरच मिळण्याची सोय झाली होती.

कौंड्ये गावातल्या जीवनाचा केंद्रबिन्दू तिथलं पावना देवीचं मंदिर आहे. नवरात्रीमध्ये आणि विशेषत: दस-याच्या दिवशी इथे मोठा उत्सव असतो. या उत्सवात समस्त गावकरी येतातच पण गावातले मुंबईला वास्तव्याला असलेले चाकरमानी देखिल यावेळी आवर्जुन उपस्थित असतात. सव्वाशे वर्षापूर्वीचं हे मंदिर ही उत्तम फार्मच्या लगतच आहे.

उत्तम फार्मच्या आंब्याच्या वनालगतच पावना देवीचं मंदिर

उत्तम फार्मच्या आंब्याच्या वनालगतच पावना देवीचं मंदिर.

पावना देवी मंदिर

पावना देवी मंदिर.

पावना देवीच्या मंदिराकडे नेणारा गर्द झाडीतील रस्ता

पावना देवीच्या मंदिराकडे नेणारा गर्द झाडीतील रस्ता.

मंदिराच्या आवारातील विरगळ आणि ब्राह्मणदेव

मंदिराच्या आवारातील विरगळ आणि ब्राह्मणदेव.

विरगळ जवळून

विरगळ क्र. १ (जवळून)

विरगळ (दुसरा) जवळून

विरगळ क्र. २ (जवळून)

एकूण काय, तर कामानिमित्ताने ओळखीचं झालेल्या उत्तम फार्मवर निसर्ग सान्निध्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि सोबतच जवळच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी पुन्हा एकदा आवर्जुन मुक्कामाला येण्याचं ठरवून अस्मादिकांनी मुंबई नामे सिमेंट – कॉन्क्रिटच्या जंगलाकडे कूच केले.

  • Log in or register to post comments
  • 10093 views
💬 प्रतिसाद

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा