चारोळ्यांचे रुचकर लोणचे.
(मा जागुतै यांची क्षमा मागून)
साहित्य : दोन छटाक नवोदित मिपाकर (किंचित) कवी
दोन चमचे यमके
दोन चमचे चंद्र/ चांदणे/ पाऊस / आभाळ यापैकी आयत्यावेळी जे हाताला लागेल ते.
काही लाडिक खरडी.
एक चिमुट तरल भावना किंचित ठेचून.
अर्धी वाटी तिखट प्रतिसाद
पाव वाटी आंबट प्रतिसाद.
२-३ गोग्गोड प्रतिसाद. (हे शक्यतो नवमिपाकरांचे असावे )
फोडणीसाठी बेताचे उपरोधिक प्रतिसाद.
कृती : प्रथम नवोदित कवी लाडिक खरडीमध्ये घोळवून एक महिना मुरत ठेवावेत.
या काळात आंबट तिखट प्रतिसादांचा अभ्यास करावा. यानंतर मुरलेल्या कवीच्या मिश्रणात ठेचलेल्या भावना चांगल्या मिसळून घ्याव्यात. मग पत्येक ओळीच्या शेवटी एक एक यमक पेरावे. अधून मधून चंद्र/ चांदणे/ पाऊस / आभाळ शिंपडावे.
आता मिपावर प्रसिद्ध करावे. मग आंबट तिखट प्रतिसादांची आयती झणझणीत फोडणी त्यावर येऊन पडेल. आता ‘लाडिक खरडी’ वाल्यांना मध्ये मध्ये गोग्गोड प्रतिसाद पेरण्यास सांगावे.
झाले रुचकर चारोळ्यांचे लोणचे तयार ! किमान पन्नास प्रतिसादांची ग्यारंटी !
वाढत्या प्रतिसादांबरोबर लोणचे अधिकाधिक मुरात जाते.
टीप : राजकारणी धाग्यांमुळे आलेल्या अरुचीवर प्रभावी उपाय करणारे व तोंडास चव आणणारे आहे.
आमच्या कडे बॅरल भर भरुन विडंबनारीष्ट उपलब्ध आहेअसं म्हणता ? मग येउद्या की एक झकास विडंबन ! शांपल तरी समजेल !बाकी काही अनुभवी मिपाकर कवी सुद्धा हे लोणचे वरचेवर घालत असतात बरे.बरोब्बर.. काही सदस्य प्रत्यक्षपणे लोणचे घालतात... काही अप्रत्यक्षपणे.. काही सदस्य कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवून असतात व कच्चा माल कमी पडू नये याची स्वतः जबाबदारी घेतात. काही सदस्य दिसेल त्या कच्च्या मालाचे लोणचे करतात. काही "पावरफुल" सदस्य बाकीच्या सदस्यांनी लोणचे घालू नये म्हणून बरणी घट्ट बंद करणे / बरणी लपवून समस्त जनांसाठी अदृष्य करणे अशा ही कला लीलया दाखवतात. मुरलेले लोणचे वर उपसून स्वाद चाखणे तर काहीजणांचा आवडीचा खेळ आहे!!! आत्तापर्यंत ऐकलेला खंग्री प्रकार. एका आग्यावेताळाने एका निष्पाप सदस्याला लोणचे घालण्यासाठी भरीस घातले, त्या बिचार्याने कच्च्या मालावर लैच परिश्रम घेवून लोणचे घातले, संस्कारीत केले (फोडणी वगैरे!) लोणचे भारी झाले आहे असे खाजगी चर्चांमध्ये कौतुकही झाले, आणि त्याच आग्यावेताळाने त्याच लोणच्याबद्दल वाईट्साईट बोलून लोणच्यासह सदस्याची पब्लीकमध्य साले काढली! :-D सर्वात वाईट वाटते ते आजारी सदस्यांचे :-( या सदस्यांना वेगवेगळे समिक्षकी आजार असल्याने स्वत:शिवाय दुसरे कोणीही बनवलेले लोणचे वाईट्टच दिसते!झाले रुचकर चारोळ्यांचे लोणचे तयार ! किमान पन्नास प्रतिसादांची ग्यारंटी !ब्वॉर! अग मागल्यावर्षी पासुन माझ्याकडे काही चारोळ्या पडलेल्या आहेत. आता बघतेच करुन तुझ्या पद्धतिने. बाकी हे लोचणे किती दिवस टिकते? आणि हे कधी आणि कुठे वाढावे?