Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

चारोळ्यांचे रुचकर लोणचे.

स
सस्नेह
Sat, 12/01/2012 - 17:28
(मा जागुतै यांची क्षमा मागून) साहित्य : दोन छटाक नवोदित मिपाकर (किंचित) कवी दोन चमचे यमके दोन चमचे चंद्र/ चांदणे/ पाऊस / आभाळ यापैकी आयत्यावेळी जे हाताला लागेल ते. काही लाडिक खरडी. एक चिमुट तरल भावना किंचित ठेचून. अर्धी वाटी तिखट प्रतिसाद पाव वाटी आंबट प्रतिसाद. २-३ गोग्गोड प्रतिसाद. (हे शक्यतो नवमिपाकरांचे असावे ) फोडणीसाठी बेताचे उपरोधिक प्रतिसाद. कृती : प्रथम नवोदित कवी लाडिक खरडीमध्ये घोळवून एक महिना मुरत ठेवावेत. या काळात आंबट तिखट प्रतिसादांचा अभ्यास करावा. यानंतर मुरलेल्या कवीच्या मिश्रणात ठेचलेल्या भावना चांगल्या मिसळून घ्याव्यात. मग पत्येक ओळीच्या शेवटी एक एक यमक पेरावे. अधून मधून चंद्र/ चांदणे/ पाऊस / आभाळ शिंपडावे. आता मिपावर प्रसिद्ध करावे. मग आंबट तिखट प्रतिसादांची आयती झणझणीत फोडणी त्यावर येऊन पडेल. आता ‘लाडिक खरडी’ वाल्यांना मध्ये मध्ये गोग्गोड प्रतिसाद पेरण्यास सांगावे. झाले रुचकर चारोळ्यांचे लोणचे तयार ! किमान पन्नास प्रतिसादांची ग्यारंटी ! वाढत्या प्रतिसादांबरोबर लोणचे अधिकाधिक मुरात जाते. टीप : राजकारणी धाग्यांमुळे आलेल्या अरुचीवर प्रभावी उपाय करणारे व तोंडास चव आणणारे आहे. a

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10007 views

💬 प्रतिसाद
स
स्पंदना Tue, 12/04/2012 - 03:26 नवीन
अग स्नेहांकिता सापडला बघ (किंचित) कवी ! ए पकडा पकडा याला. मला लोणच घालायच आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 12/06/2012 - 08:57 नवीन
आम्हाला नवकवींची अ‍ॅलर्जी आहे. त्यास पर्याय म्हणुन नवलेखकू किंवा नवफोटूग्राफू चालतील काय? त्या अनुशंगे पाककृतीत काय काय बदल करावे लागतील त्याबद्दल थोडे दर्शन द्यावे. * (अर्रर्र वर 'थोडे' आणि 'दर्शन'च्यामध्ये 'मार्ग' लिहायचे राहुन गेले तेव्हा ते मार्ग घालुन वाचावे.)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 12/06/2012 - 09:48 नवीन
पन आमचं ‘दर्शन’ चालंल का ? नाय, म्हंजे जाणकारांच्या चष्म्यातून आम्ही आता ‘नव’ लेखक राहिलो नाही, असं वाट्टंय...
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 12/07/2012 - 01:45 नवीन
त्याला (पकशी गणपाला, गणपा पकशी नाही पकवतो आहे, म्हणजे खाना पकवतो) तू नवीच ना? देउन टाक दर्शन. उगा भाव नको खाउ.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 20 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 22 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 26 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा