हिर्यांचे हार
सकाळच्या कोवळ्या उन्हात लुसलुशीत गवतावर फिरत असताना अचानक पायाशी एका गवतहीन भागात एक सुबक जाळे दिसले.
निरखुन पाहता लक्षात आले की सूक्ष्म दवबिंदुंनी जाळ्याचे धागे पूर्णतः आच्छादले गेले आहेत. प्रत्येक थेंब सुबक गोलाकार पैलु न पाडलेल्या पण उपजतच गोलाकार असलेया हिर्यासारखा आणि जाळ्याचा प्रत्येक धागा हिर्याच्या हाराच्या एकेका पदरासारखा. जसजसा प्रकाश त्या जाळ्यावर खेळु लागला. तसतसे त्या हिर्यांचे तेजही खुलत गेले.
टिपताना लक्षात आलेच नव्हते, पण प्रतिमा पडद्यावर पाहताना उमगले; अरे, ते हिरे जडवुन हार गुंफणारा जवाहिरी तर तिथेच होता.
चला, तेवढीच घटकाभर चैन. मला आपले हेच हिरे परवडणारः)
निरखुन पाहता लक्षात आले की सूक्ष्म दवबिंदुंनी जाळ्याचे धागे पूर्णतः आच्छादले गेले आहेत. प्रत्येक थेंब सुबक गोलाकार पैलु न पाडलेल्या पण उपजतच गोलाकार असलेया हिर्यासारखा आणि जाळ्याचा प्रत्येक धागा हिर्याच्या हाराच्या एकेका पदरासारखा. जसजसा प्रकाश त्या जाळ्यावर खेळु लागला. तसतसे त्या हिर्यांचे तेजही खुलत गेले.
टिपताना लक्षात आलेच नव्हते, पण प्रतिमा पडद्यावर पाहताना उमगले; अरे, ते हिरे जडवुन हार गुंफणारा जवाहिरी तर तिथेच होता.
चला, तेवढीच घटकाभर चैन. मला आपले हेच हिरे परवडणारः)💬 प्रतिसाद
ग
गॉडजिला
Fri, 07/09/2021 - 16:28
नवीन
नाही हो तुम्ही फक्त हार तयार करणारा कारागीर पाहिला... हिरे जडवुन गुम्फायचे काम तर यत्र तत्र सर्वत्र असणार्या निसर्गाने केले आहे. तो फोटोत कधीच मावत नाही... मावणार नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2