Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

हिर्‍यांचे हार

स
सर्वसाक्षी
Fri, 11/25/2011 - 19:03
सकाळच्या कोवळ्या उन्हात लुसलुशीत गवतावर फिरत असताना अचानक पायाशी एका गवतहीन भागात एक सुबक जाळे दिसले. shoot निरखुन पाहता लक्षात आले की सूक्ष्म दवबिंदुंनी जाळ्याचे धागे पूर्णतः आच्छादले गेले आहेत. प्रत्येक थेंब सुबक गोलाकार पैलु न पाडलेल्या पण उपजतच गोलाकार असलेया हिर्‍यासारखा आणि जाळ्याचा प्रत्येक धागा हिर्‍याच्या हाराच्या एकेका पदरासारखा. जसजसा प्रकाश त्या जाळ्यावर खेळु लागला. तसतसे त्या हिर्‍यांचे तेजही खुलत गेले. टिपताना लक्षात आलेच नव्हते, पण प्रतिमा पडद्यावर पाहताना उमगले; अरे, ते हिरे जडवुन हार गुंफणारा जवाहिरी तर तिथेच होता. n3 n1 n2 n4 n5 n6 n7 चला, तेवढीच घटकाभर चैन. मला आपले हेच हिरे परवडणारः)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24879 views

💬 प्रतिसाद
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 11/25/2011 - 19:05 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 11/25/2011 - 19:11 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 11/25/2011 - 19:56 नवीन
वाह!! शिर्षक वाचुन लगबगीने आले अन हे हार पाहुन छान वाटलं.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 11/25/2011 - 21:40 नवीन
मी पण फसलो. खरे हिरे तर परवडणारे नाही त्या पेक्षा हिर्‍यांचे हार तरी पाहू असे म्हटले तर येथे एका कोळीणीने हार घातलेला! :-)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 11/25/2011 - 20:08 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Fri, 11/25/2011 - 20:29 नवीन
फारच छान. (शिर्षक वाचुन वाटले की तिरूपतीला कोणीतरी हि-याचे दागीने दान पेटीत टाकले आहेत. त्या विषयी काही आहे की काय.) ;) ;-) :wink:
  • Log in or register to post comments
क
कुंदन Fri, 11/25/2011 - 20:29 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 11/25/2011 - 22:16 नवीन
सारे शब्द खुजे आहेत या पुढे. सर्वसाक्षी हा मौल्यवान खजिना आमच्या सोबत शेअर केल्या बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sat, 11/26/2011 - 08:52 नवीन
हेच म्हणतो. ह्या निसर्गाच्या कलाकृतीपुढे खर्‍या हिर्‍यांचीही काय औदाक आहे ? फोटो फार आवडले :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 11/27/2011 - 14:56 नवीन
असेच म्हणते
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 11/25/2011 - 22:52 नवीन
फारच सुंदर. धन्यवाद. बौद्धांच्या लेखनात एक कल्पना आहे - इंद्राच्या रत्नांची. त्याची प्रकर्षाने आठवण झाली. http://en.wikipedia.org/wiki/Indra%27s_net
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 11/26/2011 - 03:37 नवीन
परवाच तुमचे दवबिंदूंचे फोटू बघितल्यावर माझा मुलगा म्हणालाच होता की बाबा स्पायडरवेबवरती असलेले थेंब फार छान दिसतात आणि आज तुमचे तेही फोटू हजर, क्या बात है! अतिशय मनोहारी किमया फार उत्तम प्रकारे कॅमेर्‍यात बंदिस्त केली आहेत. अभिनंदन! -कोळीरंगा
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sat, 11/26/2011 - 04:47 नवीन
The best things in life are free. पूर्वी माझ्या घराच्या खिडकीतून शेजारच्या छपरावर पावसानंतर असेच अनेक हिरे दिसत. तेव्हा माझ्या आयुष्यातील खरी श्रीमंती जाणवली.... हे हिरे / हा खजिना मझ्याकडुन कोण चोरु शकणार? तुमचे हिर्‍यांचे हार अतिशय आवडले.
  • Log in or register to post comments
व
विलासराव Sat, 11/26/2011 - 05:08 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/26/2011 - 05:08 नवीन
लैच भारी आले राव फोटो. सुंदर. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यकु Sat, 11/26/2011 - 05:34 नवीन
क्यूट!!!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 11/26/2011 - 07:10 नवीन
दुसरा शब्दच नाही.. शेवटून दुसरा फोटो जाम आवडलाय.:)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 11/26/2011 - 07:17 नवीन
सुंदर.... सुप्परलाईक ! अवांतरः 'चला आता कोळी शोधणं आलं' असं कोणी म्हणतंय का? ;)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 11/26/2011 - 07:22 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 11/26/2011 - 07:58 नवीन
ज ब रा ट !
  • Log in or register to post comments
र
राजघराणं Sat, 11/26/2011 - 08:11 नवीन
जय हो
  • Log in or register to post comments
क
कच्चा पापड पक्… Sat, 11/26/2011 - 10:43 नवीन
अप्रतिम ....!! पण एक सांगा , तुमचा फोटो काढताना ..फोटो कोणी काढला?
  • Log in or register to post comments
म
मिहिर Sat, 11/26/2011 - 13:45 नवीन
मस्तच! फोटो खूप आवडले.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 11/26/2011 - 14:55 नवीन
अशी हिर्‍याच्या हारांची कारागिरी कोणा माणसाला शक्यच नाही!!
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 11/26/2011 - 16:47 नवीन
मस्तच रे मस्त एकदम
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 11/26/2011 - 17:58 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/26/2011 - 21:00 नवीन
हायक्लास,फर्मास, झक्कास....तुमच्या निरिक्षण शक्तीला सलाम .डोळ्यांचं पारणं फिटलं बघुन
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Sun, 11/27/2011 - 03:58 नवीन
वा! सर्वसाक्षीजी मन प्रसन्न केलेत!! तुम्हाला जगाकडे पाहण्याची अलौकिक दृष्टी आहे. गवतात कोळियाने, विणले सुरेख जाळे । सावज तयात यावे, आशा मनात पाळे ॥ धृ ॥ थंडीत पहाटेच्या दव, साखळून आले । सावज बनून थेंबही, जाळ्यात कैद झाले ॥ १ ॥ अडकून बिंदू शतशः, झुंबर तयार झाले । कोवळ्या उन्हात तेजे चमकून रत्न झाले ॥ २ ॥ ते रत्नहार सारे, जाळ्यास भार झाले । चिंतीत कोळी झाला, सावज फरार झाले ॥ ३ ॥ मग रत्न-पारखाया, एक “सर्वसाक्षी” आला । दृश्यास जोखणारा, एक जवाहीरा मिळाला ॥ ४ ॥ उकलून एक एक, पृथक पदर पदर केला । दवबिंदू एक एक, जणू सुट्टा हिराच केला ॥ ५ ॥ जरी रत्नहार भासे, धागा गहाळ झाला । त्या “ईश्वरी”१ कलेचा, चित्रात कळस झाला ॥ ६ ॥ १. “ईश्वर”च “सर्वसाक्षी” म्हणवतो, नाही का! - नरेंद्र गोळे २०११११२७
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 11/27/2011 - 05:43 नवीन
नं १ प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 11/27/2011 - 15:37 नवीन
अतिशय सहजसुंदर उत्तम कविता! खूप दिवसांनी अशी छान कविता वाचायला मिळाली! -रंगा
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 07/09/2021 - 08:06 नवीन
नरेंद्र गोळे जी, खुप सुंदर रचना ! ❤️
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 11/27/2011 - 05:38 नवीन
अप्रतिम कविता! सहज सुंदर काव्य. सर्वसाक्षी - म्हणजे ईश्वर हे खरे पण माझा हे नाव घेण्यामागचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपला 'साक्षीभाव' सतत जागृत असावा, जे जसे आहे ते तसे ग्रहण करावे त्यात पूर्वग्रह वा स्वतःच्या पसंतीचा, सोयीचा कल नसावा म्हणजेच आपल्याला जे दिसले ते तसेच सर्वांना सांगावे, आणि सदसदविवेकबुद्धी कायम जागृत असावी ही भावना. माझ्या चित्रासाठी इतकी सुरेख कविता दिल्याबद्दल आभार. एक विनंती - आपली ही कविता आपल्या जालनिशीवर अवश्य द्या आणि त्यात यापैकी कुठलेही वा सर्च चित्रे खुशाल द्या. आपला स्नेहांकित साक्षी
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Sun, 11/27/2011 - 13:07 नवीन
नमस्कार सर्वसाक्षीजी, त्यात पूर्वग्रह वा स्वतःच्या पसंतीचा, सोयीचा कल नसावा >>>>> सत्य वचन! संत सोहिरा अगदी हेच म्हणतातः "विवेकाची ठरेल ओल ऐसे की बोलावे बोल आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे हरी भजनाविण काळ घालवू नको रे" आपली विनंती म्हणजेच आज्ञा मानून http://srujanashodha.blogspot.com/2011/11/blog-post_27.html#links या दुव्यावर आपल्या इच्छेनुरूप हे कोळ्याचे जाळे पुन्हा प्रकाशित केलेले आहे.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 11/27/2011 - 08:10 नवीन
मस्त फोटु इतका नाजुकशा धाग्याने इतके दव कसे पेलले आहेत याचे विषेश कॉतुक वाट्ले :)
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Sun, 11/27/2011 - 13:09 नवीन
नाजुकशा धाग्याने इतके दव कसे पेलले>>>>> आहे खरे कौतुक!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 11/27/2011 - 15:35 नवीन
हा निसर्गाचा अफलातून चमत्कार आहे. अतिशय नाजूक दिसणारे हे जाळे महामजबूत असते. विश्वास बसणे कठिण वाटेल परंतु ह्याची टेन्साईल स्ट्रेंग्थ (ताण सहन करण्याची क्षमता) उत्तम दर्जाच्या पोलादाइतकी असते!! धागा विलक्षण तन्यता (ताणले जाणे) राखून असतो. उणे ४० से. ते अधिक २२० से. इतक्या प्रचंड तापमान फरकातही तो उत्तम काम करतो. त्यामुळे हे दवबिंदूंचे ओझे ते धागे लीलया पेलतात! :) -(कोळ्याच्या जाळ्यात गुरफटलेला) रंगा
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 11/28/2011 - 05:41 नवीन
>>>>(कोळ्याच्या जाळ्यात गुरफटलेला) रंगा कॉलिंग रेवतीकाकू कॉलिंग ;)
  • Log in or register to post comments
क
किचेन Sun, 11/27/2011 - 09:59 नवीन
शीर्षक वाचून वाटल होत कि कोणत्यातरी हिर्यांच्या प्रदर्शनाचे फोटो असतील. फोटो अप्रतिम! मान गये ...आपकी पारखी नजर और हिरोन्का जोहरी ...दोनो को! (फक्त हे फोटो आमच्या ह्यांच्यापर्यंत पोहोचू देऊ नका! नायतर पुढच्या वाढदिवसाला मिपावर 'एका कोळियाने केलेले दागिने घातलेली मी' असा धागा निघेल )
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 11/27/2011 - 15:43 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 11/27/2011 - 15:57 नवीन
विलक्षण रत्नहार. कोळ्याची कला, निसर्गाने भरभरून दिलेले दान आणि सर्वसाक्षीजींची पारखी नजर. एकच कौतुकोद्गार्....व्वा!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 11/28/2011 - 04:55 नवीन
दुसरा फोटो आवडला...
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Mon, 11/28/2011 - 12:21 नवीन
अप्रतिम !
  • Log in or register to post comments
म
मिश्रेया Mon, 11/28/2011 - 16:30 नवीन
असा हार तर कुणालाहि मिळणे अश्क्यच. किति छान आहे. असेच सुन्दर निसर्गा चे रुप दाखवत जा.
  • Log in or register to post comments
म
मोबाइल Tue, 11/29/2011 - 01:37 नवीन
खुप सुन्दर
  • Log in or register to post comments
व
वन्दना सपकाल Tue, 04/29/2014 - 17:45 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 04/29/2014 - 17:56 नवीन
वा!!!रसिकतेला सलाम.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 07/09/2021 - 08:05 नवीन
एक नंबर आहेत फोटो. सुंदर. मोती पाहून फिटले डोळ्यांचे पारणे !.
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Fri, 07/09/2021 - 08:25 नवीन
छान आहेत फोटो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/09/2021 - 08:59 नवीन
हल्ली मला जाहिरात करण्याच्या अनेक संधी मिळु लागल्या आहेत. :))) हिरा है सदा के लिये...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 07/09/2021 - 12:50 नवीन
सुंदर. खूपच
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 47 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 59 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा