Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

लेटेष्ट संपादन.

र
रेवती यांनी
Tue, 12/14/2010 - 15:52  ·  जुणी पाटीलकी
जुणी पाटीलकी

वाचनखूण लावा
| 301 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 301 views

स
संपादक मंडळ Tue, 12/14/2010 - 15:58 नवीन
धागा अप्रकाशित करून सदस्यास तसे कळवले आहे. रेवती
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 12/14/2010 - 16:04 नवीन
कुणाला हा धागा संपादित करावासा वाटत असल्यास बघा बुवा! दुवा http://www.misalpav.com/node/15848.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 12/15/2010 - 10:43 नवीन
"मित्र-मैत्रिणीला लग्नात कोणते गिफ्ट द्याल ..." हा तद्दन फालतु आणि अश्लिलतेकडे झुकणारा धागा उडवला आहे. व्यनी पाठवला नाही, इच्छाही नाही. अवांतर : कुणाला गिफ्ट वगैरे देणे हा आमचा वैयक्तिक अपमान वाटला ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
स
संपादक मंडळ Wed, 12/15/2010 - 11:57 नवीन
सन्जोपरावांच्या धाग्यात अश्लिल प्रतिसाद आणि महिलांना अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल 'छत्रपती' आणि 'नरेशकुमार' ह्यांना आत्ताच ताकिद दिली आहे, नाही ऐकले तर बॅन करुन टाकु. इथे महिलांना लज्जा येईल असे काहीही खपवुन घेतले जाणार नाही, नो काँप्रमाईझ ! प्रतिसादही उडवले आहेत - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
स
संपादक मंडळ Wed, 12/15/2010 - 15:44 नवीन
http://www.misalpav.com/node/15877#comment-267771 या यशवंत एकनाथ यांच्या धाग्यावर संमंकडून दिलेली सूचना हा माझा उद्योग आहे आणि टार्‍यालाही जरा संयम बाळगायचा फुकटचा सल्ला व्यक्तिगत संदेशातून दिलेला आहे. रेवती
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 12/15/2010 - 16:18 नवीन
त्यांनी धाग्यावर आणि व्य. नि तून 'त्यांचेच कसे बरोबर' हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दुर्लक्ष केले आहे. महिला व पुरुष सदस्य बरोबरीने भाग घेऊ शकतील अश्याच धाग्यांना संमं प्रोत्साहन देते एवढे सांगून विषय बंद केला आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 12/16/2010 - 05:44 नवीन
रेवती, खालील व्यनिसंवाद तू त्या धाग्यावर लिहायच्या आधीचा आहे. हा व्यनि मी संपादक मंडळाला सीसी न करता फक्त नीलकांतला सीसी केला याबद्दल मी दिलगीर आहे. यापुढे काळजी घेईन. **************************** Displaying messages 1 - 9 of 9 Participants: यशवंत एकनाथ, नीलकांत and बिपिन कार्यकर्ते बिपिन कार्यकर्ते 15 डिसें 2010 - 18:52 तुम्ही नेहमीच लिहिता आणि चांगले लिहिता (तुमच्या रिअ‍ॅक्शन्स मला कधीकधी एकांगी / टोकाच्या वाटतात, पण तो वैयक्तिक मताचा भाग झाला ) म्हणून एक विनंती करतो आहे. मिपाच्या धोरणानुसार ढकलपत्रातील मजकूर किंवा जालावरील इतरत्र असलेला मजकूर / साहित्य वगैरे जसेच्या तसे प्रकाशित करू नये असे गायडिंग प्रिन्सिपल आहे. नायगावकरांच्या कवितेच्या धाग्याला हे धोरण लावले तर ते उडवावे लागेल. व्यक्तिशः मला असे काहीसे आणि त्यावरील चर्चा मिपावर यायला आवडेल. पण मग तुम्ही थोडेसे त्या कवितेबद्दल लिहा ना, म्हणजे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते इत्यादी. म्हणजे ते राहू देता येईल. शिवाय, असे काहीसे लिहायची तुमची कपॅसिटी आहेच म्हणून विनंती करतोय. धोरणाचा भाग असल्यामुळे नीलकांतला सीसी करतोय. बिपिन. Delete message यशवंत एकनाथ 15 डिसें 2010 - 18:56 मला ती कविता टाकतानाच ती उडेल असं वाटलं होतं. पण तुम्ही दिलेला काही लिहीण्याचा पर्याय सोपा वाटतो. लिहून इथेच तुम्हाला पाठवू काय? तुमच्या रिअ‍ॅक्शन्स मला कधीकधी एकांगी / टोकाच्या वाटतात, पण तो वैयक्तिक मताचा भाग झाला योग्य ती खबरदारी घेण्याचा शक्यतोवर प्रयत्न करीन Delete message Block author बिपिन कार्यकर्ते 15 डिसें 2010 - 18:59 मला दाखवणे आवश्यक नाही. इथे प्रशासकिय अनुमती नाही. आणि नकोच. अर्थात मला कोणीही मत विचारले तर सांगतो मी. पण प्रस्तुत प्रकरणात, तुम्ही थोडेसे स्वतःचेही असे काही लिहा ना. त्याने काम भागेल. अर्थात तुम्ही काही तरी दमदारच लिहाल म्हणा. आणि ते चुकीचे असेल / धोरणाविरूद्ध असेल तर आम्ही आहोतच ना अ‍ॅक्शन घ्यायला. ... जस्ट जोकिंग. एकांगी / टोकाच्या प्रतिक्रियांना विरोध नाही, त्या एकांगी / टोकाच्या पद्धतीने व्यक्त करायला विरोध आहे. Delete message यशवंत एकनाथ 15 डिसें 2010 - 19:09 हा: हा: हा: ओक्के सरजी! त्या धाग्या साठीचा मजकूर कुणाकडे पाठवू, जेणेकरून त्याची तिथे भर पडेल? तुम्हाला पाठवतोय. काही बदल असतील तर अवश्य करावेत. Delete message Block author बिपिन कार्यकर्ते 15 डिसें 2010 - 19:13 ओके पाठवा. लवकर. मी निघेन ऑफिसमधून. Delete message यशवंत एकनाथ 15 डिसें 2010 - 19:17 ये लिजिये सरकारः जे न देखे रवि, ते ते देखे कवि किंवा जे जे न देखे रवि ते ते देखे कवि असं अथवा ते मूळ जसं असेल तसं काहीसं आहे! तर मुद्दा एवढाच की कवीकडे सर्वव्यापी नजर असते. बा.सीं. मर्ढेकरांची "पिपात मेले ओल्या उंदीर" या कवितेवर आजही त्या कवितेतून नेमकं, म्हणजे अगदी पक्कं काय व्यक्त होतं त्यावर चर्चा चालू आहेत. काही असो, कवी काहीतरी नेहमीच नवं दाखवून जात असतो. कधी आपल्या ते नजरेत येतं कधी येत नाही. लोकप्रिय, हास्यस्फोट्क, महाराष्ट्राचे अत्यंत लाडके कवी श्री. अशोक नायगावकरांची "सुलभ शौचालय" (खरं म्हणजे नायगावकरांनी तिला शीर्षक दिलेलं नाहीय, नुसताच सकाळच्या वेळचा अनुभव म्हटलंय) ही कविताच पहा ना. अगदी साध्यासुध्या शब्दांत सामान्य माणसाची अतिसामान्य तरिही तेवढी कळीची (!) समस्या त्यांनी या कवितेत मांड्ली आहेच; पण त्याच सामान्य माणसाला झालेली खुशी शासनाला शालजोडीतले मारून मोठ्या समाधानाच्या, अतिशय भोळ्याभाबड्या टोनमध्ये व्यक्त केलीय. त्यांची शाकाहार ही कविता सर्वप्रथम ऐकली होती तेव्हा मी अक्षरश: जमीनीवर खाली पडून गडाबडा लोळत हसलो होतो आणि रडतानाही डोळ्यात पाणी येणार नाही एवढं पाणी डोळ्यांतुन निघालं होतं. श्री. अशोक नायगावकरांच्या शैलीबद्दल इथल्या शक्य त्या सगळ्यांची मतं वाचायला आवडेल. Delete message Block author बिपिन कार्यकर्ते 15 डिसें 2010 - 19:19 उत्तम. विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद. बदल करतोय. Delete message यशवंत एकनाथ 15 डिसें 2010 - 19:21 ये क्या बात हुयी क्या? थॅंक्स! Delete message Block author बिपिन कार्यकर्ते 16 डिसें 2010 - 10:07 धाग्यावरील संपादक मंडळाचे आणि तुमचे बोलणे वाचले. आपला हा व्यनिसंवाद संपादक मंडळाबरोबर शेअर करत आहे. Delete message Displaying messages 1 - 9 of 9 **************************** मला स्वतःला या धाग्यात काहीच वावगे वाटले नाही. अर्थात, दंगा कोणत्याही विषयावरून घालता येतो. तसाच इथेही सुरू झाला. शिवाय, सर्वच स्त्रीसदस्यांना मोकळे न वाटवाणार्‍या गोष्टींचे निकष वेगवेगळे असतील. इथेच आपण नीधप ने लिहिलेल्या टॉयलेट्सवरील लेखाचे स्वागत केलेच होते.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 12/16/2010 - 13:18 नवीन
नायगावकरांची कविता आणि त्यावर यशवंताने दिलेला लेख मला 'अश्लिल' वाटला नाही. रुढ अर्थाने जरी त्यात काही शब्द तसे असले तरी ते वापरण्यामागचा 'हेतु' मी इथे पडताळुन पहातो व कवितेला झुकते माप देतो. अर्थात नायगावकरांनी ह्या कवितेच्या मार्गत सरकारी व्यवस्थेवर जो आसुड ओढला आहे त्याला जबाब नाही, बहुतेक हाच त्या कवितेचा हेतु आहे, असो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे गुरुवार, 12/16/2010 - 14:25 नवीन
नायगावकरांची कविता आणि त्यावर यशवंताने दिलेला लेख मला 'अश्लिल' वाटला नाही.
+ १ सहमत
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/16/2010 - 15:39 नवीन
बिपिनदा, यकुंनी मला व्य. नि. पाठवून तुझ्याशी बोलणे (लिहिणे) झाल्याचे सांगितले. सुदैवाने ४० % बाबी आपण सारख्याच बोललो आहोत. मलाही कवितेबद्दल काहीच म्हणायचे नाही. सदस्य चांगल्या धाग्याचाही खफ करतात मग हा धागा काय म्हणून सोडतील हा मुद्दा आहे. आणि फक्त मीच हे म्हणते आहे असे नाही तर कोणत्याही स्री सदस्याने (नाईलाजाने मी दिला) त्यावर प्रतिसाद न देणे हे काहीतरी सांगण्यासारखेच आहे. शुचितैही कधीकधी असे धागे काढते कि तिची बाजू समजून न घेता बरेचदा टवाळी केली जाते. कधीकधी आपली बाजू बरोबर असूनही विचार प्रकट करण्याचे ठिकाण बरोबर नसते. यकुंना निरोप पाठवताना 'महिला व पुरुष सदस्यांना भाग घेता येण्याजोगा धागा असणे' यावर भर दिलेला आहे. उद्या कोणी स्त्री सदस्य 'कपाळावरील टिकल्या' किंवा 'पायातील पैजण' असले धागे काढू लागल्या तर विषय अश्लील नसूनही मर्यादा घालाव्या लागतील.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 12/20/2010 - 06:16 नवीन
शुचीचा 'दत्तगुरुंचा' धागा बराच वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. आपल्याला लक्ष ठेवावेच लागेल, मी आत्ता काही प्रतिसाद उडवले आहेत. तसेच, आमोद शिंदे ह्या आसामीस त्याच्या नेहमीच्या दंगेखोर कमेंट्सना वैतागुन मी एक खरमरीत व्यनी पाठवुन जाब विचारला आहे, त्याचे उत्तर येईलच. माझा आजचा दिवस कदाचित बिझी असण्याची शक्यता असल्याने बाकीच्यांनी प्लीज लक्ष घालावे. आमोद शिंदेचा हा सेकंडलास्ट अपराध समजावा :) त्याने आज शुचीला 'मनोरुग्ण' संबोधले आहे. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 12/20/2010 - 08:01 नवीन
श्री. आमोद शिंदे त्यांच्या दुसर्‍या आयडीतून उपक्रमावरून असल्याच वैयक्तिक हल्ल्यांमुळे प्रतिबंधित झाले आहेत असे ऐकले आहे. त्यामुळे लक्ष ठेवणे उत्तम.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 12/20/2010 - 17:07 नवीन
होय, आमोद शिंदे आला कि असलेच प्रतिसाद देतो. पण लेखातील या वाक्यावरून पुढील गोष्ट ही माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - मिपाच्या धोरणावोरुद्ध काम चालले आहे असे वाटते. माझ्यामते हे लेखन अप्रकाशित व्हायला हवे. काय म्हणतात बाकिचे संपादक?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 12/22/2010 - 17:08 नवीन
http://www.misalpav.com/node/15939 इथे आता काहीही चालू आहे आणि सदस्य वहावत जात आहेत, त्या भरात कोणीही काहीही बोलत आहे. धागा वाचनमात्र केला आहे... http://www.misalpav.com/node/15922 हा शुचिचा वरिजिनल धागाही वाचनमात्र करत आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/23/2010 - 00:07 नवीन
विजुभाऊंच्या चिलिया बाळाच्या धाग्यावरचे प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत. बरेचसे फालतूच आहेत मग त्यावरून वाद सुरु होत होते. अदितीने माझ्या ख. व. मध्ये तक्रार केली त्यावर बघते म्हणून सांगितले आहे. याठिकाणी कारण नसताना अदितीही उपप्रतिसाद देवून मध्येच आली आणि तक्रार करायला लागल्याचे जाणवले. डॉनच्या वरिल प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे आमोद शिंदेचा हा सेकंडलास्ट अपराध समजावा यानंतरचा सदर धाग्यावरचा लास्ट समजावा कि नाही हे सगळ्यांनी ठरवावे असे वाटते. आमोद शिंदे हा फक्त लावालाव्या करायलाच येतो कि काय असे वाटते. त्याने बरेच शत्रू निर्माण केले असावेत.
  • Log in or register to post comments
स
संपादक मंडळ Fri, 12/24/2010 - 16:16 नवीन
शिवाजी महाराजांच्या चर्चेतले बरेच अनावश्यक प्रतिसाद उडवले आहेत. तसेच चर्चा चुकीच्या मार्गाने जात आहे असे वाटल्याने मुळ धाग्यातही त्यासंबंधी सुचना टाकली आहे. लक्ष असावे ही विनंती - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
स
संपादक मंडळ Wed, 12/29/2010 - 14:46 नवीन
यशोधराच्या मृत्युपत्राच्या धाग्यावर पराने आधी खोडी काढून नंतर संमंकडे तक्रार सुरु केली आहे. त्याला उत्तर दिले आहे. या आयडीला किंवा अवलिया यांना कधी शिक्षा होणार ते एक नीलकांत जाणे. असे वागणे मिपावर खपवून घेतले जाते हे बघूनच आमोद शिंदे, नरेशकुमार, मृत्युंजय हे आयडी वाट्टेल ते लिहू लागले आहेत. रेवती
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 01/05/2011 - 16:12 नवीन
सर्वांना नवीन वर्षासाठी अनेक शुभेच्छा!! मी सुट्टी संपवून परत आले आहे, पण येते काही महिने इथे लक्ष देणे अवघड होईल असे लक्षण दिसते आहे. तेव्हा गैरसमज नसावेत. माझ्याकडून जमेल तेवढे करत राहीन.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/25/2011 - 16:46 नवीन
पराच्या प्रतिसादातील खालील वाक्य प्रतिसादातून वगळले आहे. अन्य कोणा संपादकास खालील वाक्य पुन्हा प्रतिसादात टाकायचे असल्यास माझी हरकत असणार नाही. वाक्य खाली लिहिले आहे - ''ह्या घटनेपासून प्रेरीत होउन मिपावरील अवांतरखोर अवांतर रोखण्यासाठी आलेल्या अप्पर संपादकांबरोबर काही गंभीर गुन्हा करणार नाहीत अशी आशा बाळगतो'' -दिलीप बिरुटे [दीर्घ रजेवरील संपादक]
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 01/26/2011 - 16:22 नवीन
चांगले केलेत! [दीर्घ रजेवरील संपादक] हे टायटल तुम्हाला कसे मिळाले? ;)
  • Log in or register to post comments
स
संपादक मंडळ Sat, 01/29/2011 - 01:25 नवीन
विजुभाऊंनी 'हांडवो' या पाकृतीमध्ये वापरलेली चित्र आंतरजालावरून घेतली आहेत. तसा उल्लेख करणे आवश्यक असताना केलेला नाही. त्यांना संदेश पाठवून योग्य त्या सुधारणेची विनंती केली आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद न आल्यास धागा अप्रकाशित करावा असे वाटते. तसेच रमेश आथवले या सदस्यांना चर्चा या सदरात भाग घेता येत नसल्याबद्दल तक्रार आहे. याचे कारण तांत्रिक आहे की अजून काही याचे स्प्ष्टीकरण मी देवू शकले नाही. कोणी मदत करू शकेल काय? रेवती
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sat, 01/29/2011 - 12:59 नवीन
चित्रे ही आंतरजालावरून घेतलेली आहेत त्याबाबत आपण एवढं कठोरे व्हायला हवं का? कारण आपण पहिल्यापानावर लावतो ती चित्रे सुध्दा अशीच कुठून तरी घेतलेली असतात. याबाबत काय करता येईल? कारण आताच घडलेलं उदाहरण म्हणजे अण्णांच्या दिवशी त्यांचे फोटो आंतरजालावरून घेतले नसते तर वर तयार केलेले कोलाज कसे तयार केले असते? यावर आपण लेख लिहीतांना तसे नमुद करावे अशी विनंती करावी का? इतरांचं काय मत आहे? - नीलकांत
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 01/29/2011 - 14:46 नवीन
सगळी चित्रे आपल्याकडे असणे शक्य नाही. आंतरजालावरून घ्यावी लागतात हे कबूल. काही महिन्यांपूर्वी एका मिपा सदस्याने स्वत: काढलेली त्यांच्या ब्लॉगवरची चित्रे दुसर्‍याच कोणत्यातरी भाषेत असलेल्या स्थळावर दिसली. त्याना नक्कीच विचित्र वाटले. साधे आभारही मानलेले नसल्याने थोडे दुखावल्यासारखे झाले म्हणूनच त्यावेळी तसा धागा आला आणि काही जणांनी अश्याप्रकारचे अनुभव आल्याबद्दल सांगितले. त्यांची चित्रे चोरल्याने फार काही बिघडले असे नाही पण आभार मानण्याची आणि ज्याचे श्रेय त्याला देण्याची पद्धत पाळावी असे वाटते. विजुभाऊंच्या धाग्यात जी चित्रे आहेत ती काढण्यासाठी, पाककृती त्या पायरीला नेण्यासाठी मूळ व्यक्तीने केलेले कष्ट हे विजुभाऊंचे नाहीत तर निदान आभार तरी मानायला हवे होते असे वाटते. बाकी सगळे म्हणतील त्याप्रमाणे निर्णय घेऊ. दुसरा मुद्दा जो मला खूप दिवसांपासून खटकतोय. संपादकांनी धोरणाप्रमाणे केलेले संपादन किंवा सुचवलेल्या दुरुस्त्या यावर अंमलबजावणी केली जाते पण त्याची कुचेष्टा अनेक धाग्यातून केलेली दिसून येते. आजचे उदाहरण म्हणजे विजुभाऊ आणि अवलिया यांनी अमीत करकर्‍यांच्या 'ढेकूण' या धाग्यावर या संपादनाबद्दल टोमणे मारलेले आहेत. विकास यांच्या स्पेस शटलच्या धाग्यावरही तसे केल्याचे दिसेल. मध्यंतरी (तू बिझी असतानाच्या काळात) संपादकांवर वैयक्तिक चिखलफेक बरीच झाली. काही मनावर घेतली नाही तर काही गोष्टींचा थोडाफार त्रास झाला. आम्ही कोणाकडे तक्रार करायची हा प्रश्न आला. काही संपादक कंटाळून संपावर गेल्याचं अजूनही दिसतच आहे. कारण नसताना सारखी टीका तरी का म्हणून सहन करायची हा प्रश्न आहे. जमल्यास याचीही चर्चा व्हावी. मलाही यापुढे असले काही सारखे वाचायचा कंटाळा आला आहे. संपकरी संपादकांमध्ये सामील व्हावे असे कितीतरी वेळा वाटून गेले हे खरे.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sat, 01/29/2011 - 17:40 नवीन
चित्रांच्या बाबत आपली भुमीका मी विजू भाऊंना कळवतो. आणि अशी घोषणाच करतो. आता विषय चेष्टेचा. तर अशी चेष्टा आता सहन केल्या जाणार नाही. मी दिलेल्या संदर्भात कारवाई केली आहे. अशी यापुढे सुध्दा होईल. लवकरच फरक दिसेल. - नीलकांत
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 01/29/2011 - 22:36 नवीन
तातडीने निर्णय घेऊन कारवाई केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 01/30/2011 - 03:46 नवीन
आत्ता कळले माझ्या स्पेसशटलच्या धाग्यावर विजूभाऊ असे का म्हणाले ते (की छायाचित्रांना श्रेय द्या म्हणून). आणि पाठोपाठ अवलीयांनी त्यांना सहमती का दर्शवली ती. मी घेतलेली चित्रे ही विकीवरची असल्याने पब्लीक डोमेन मधली होती. शिवाय तो लेख हा अगदी साधा म्हणजे काही शोध निबंध वगैरे नसल्यामुळे मी तेथे संदर्भ देत बसलो नाही. जेंव्हा पब्लीक डोमेन मधले नसलेले वापरतो तेंव्हा मात्र संदर्भ देतो. असो. आता मी तेथे विकीचा संदर्भ देतो...
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sun, 01/30/2011 - 04:20 नवीन
खरं तर कलादालन व पाककृती सोडले तर इतरत्र कुठेही आपण असा दावा करीत नाही की हे फोटो आपण काढलेले आहेत. त्यामुळे वरचा रेवतींचा आक्षेप समजणासारखा आहे. मी तसे विजू भाऊंना कळवतो. प्रत्यक्ष विजूभाऊंवर कारवाई झाल्यामुळे ते चिडलेले आहेत. मी त्यांना शांत केलंय. वर दिलेले स्पष्टीकरण मागाहून पाठवतो. विकीचा दूवा नाही दिला तरी चालेल. - नीलकांत
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 01/30/2011 - 17:17 नवीन
प्रत्यक्ष विजूभाऊंवर कारवाई झाल्यामुळे ते चिडलेले आहेत हा मोठा विनोदच म्हणावा लागेल. आमची नावे न घेता कितीतरी वेळा पुणेरी आणि सदाशीवपेठी म्हणून यथेच्छ ठोकत असतात. जालावर अशी चेष्टा चालते म्हणत म्हणत अती झाले तरी बरेचजण खपवून घेतात. एकदा दुरुस्ती सुचवल्याबद्दल इतका राग येण्याचे काही करण दिसत नाही. विजुभाऊंना जर एवढेही खपत नसेल तर त्यांनीही स्वत: प्रतिक्रिया देताना शब्द व्यवस्थित वापरायला हवेत. यापुढे जाऊन सांगायचे म्हणजे असले वागणे असूनही त्यांच्या धाग्याला प्रतिसाद देताना कितीतरी जण व्यवस्थितच प्रतिसाद देतात. आमोद शिंदे, अवलिया, परा यांच्याबद्दल तर न बोललेलेच बरे. त्यांच्या प्रतिक्रिया काढून टाकण्याचे कष्टही घ्यावेसे वाटत नाहीत. त्याबद्दलही मागच्या अठवड्यात एका धाग्यावर चेष्टा झाली.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 01/29/2011 - 23:45 नवीन
टार्‍याने माझ्या परवांगीशिवाय माझ्या पाककृतींची छायाचित्रे वापरून त्याचा वापर गलिच्छ धागा काढण्यासाठी केला आहे.. त्यावर ही कारवायी व्हावी.. (संपावरचा संपादक)केशवसुमार
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sun, 01/30/2011 - 04:04 नवीन
तो धागा अप्रकाशित केला आहे. -(कामावर परतलेला संपादक) नीलकांत
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sun, 01/30/2011 - 23:19 नवीन
शुचि यांच्या विनंतीवरून http://misalpav.com/node/16543 येथील पेन, प्रियालीच्या प्रतिसादातील पेन यांचा संदर्भासाठी चिकटवलेला मजकूर आणि दैत्य यांची पेन यांना कॉमेंट काढले आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 01/30/2011 - 23:47 नवीन
मी माझा प्रतिसाद काढला आहे कारण पेन यांचा प्रतिसाद काढल्याने माझ्या प्रतिसादाचे प्रयोजन नव्हते. तसेच तो प्रतिसाद शिल्पा ब यांना जोडला गेल्याने उगीच नसती पंचाईत झाली असती. मी शुचि यांचा प्रतिसादही काढला आहे. त्यांनी तक्रार केली हे ठीक. प्रतिसाद काढला हे ही योग्य. पण जर मूळ प्रतिसाद काढला तर शुचि यांचे "मी चित्राकडे तक्रार केली आणि हे काढायला लावले" हे वाक्यही प्रकाशित असण्यास अनावश्यक आहे. शुचि आणि पेन यांचे आपापसात बरे नाही हे माहित असल्याने उगीच आगीत तेल ओतणारे वाक्य आहे. कुणाला योग्य वाटत असल्यास पुनर्प्रकाशित करण्यात हरकत नाहीच. कळावे, प्रियाली.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 01/31/2011 - 00:40 नवीन
वाक्यही प्रकाशित असण्यास अनावश्यक आहे. शुचि आणि पेन यांचे आपापसात बरे नाही हे माहित असल्याने उगीच आगीत तेल ओतणारे वाक्य आहे. +१. काढले ते बरे केले.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 01/31/2011 - 06:29 नवीन
सहमत आहे. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 21 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 33 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 35 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 37 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 40 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा