Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

राजापुर गुंफा (पाचगणी)

द
दशानन
Mon, 12/28/2009 - 08:35

  • Log in or register to post comments
  • 10083 views


वाचनखूण लावा
| 10083 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
अ
अवलिया Mon, 12/28/2009 - 08:48 नवीन
श्री रा रा राजेजीसाहेब आपला लेख वाचला. वेगवेगळ्या स्थानांना भेट देवुन तेथील भावलेल्या गोष्टींचे आपण वर्णन करता आणि अतिशय आस्थेने आपण केलेल्या सुचनांचे पालन करण्याचे मनापासुन सांगता हे पाहुन आपले फार कौतुक वाटते. आपल्यासारख्या माणसांची आज जगाला गरज आहे. समाजाला गरज आहे. मिपाला गरज आहे. आपले समाजावरचे ऋण कधीही न फिटणारे आहेत. आपण दिलेला बारिक रेतीवरुन गाडी हळु चालवा हा सल्ला केवळ राजापुरच नव्हे तर विजापुर, गाणगापुर, श्रीरामपुर, नवापुर अशा अनेक पुरांमधे (सिंगापुर सोडुन तिथे रस्ते चकचकित असतात असे ऐकले आहे) तसेच बादामधे (जसे औरंगाबाद, अहमदाबाद, अलाहाबाद) तसेच किरकोळ शहरे जसे मुंबई, पुणे, दिल्ली वगैरे (न्युयार्क, वाशिंग्टन, जकार्ता नाही) इथे उपयोगी पडेल. आपला लेख सर्वकालीक मार्गदर्शक असुन वाचनखुण म्हणुन मी साठवला आहे. चर्चेत जसजशी भर पडेल तसतसा विदा खुप उपयोगी पडेल म्हणुन मी विकीपिडीयावर पण टाकण्याच्या विचारात आहे, परंतु ते कसे करायचे हे माहित नसल्याने आमच्या एका मित्राला विनंती करणार आहे, जो (केवळ हेच काम करण्यात) तज्ञ आहे असे त्याचे मत आहे. आपल्याला पर्यटनासाठी शुभेच्छा ! धन्यवाद. --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Mon, 12/28/2009 - 08:48 नवीन
बर्‍याच वर्षापुर्वी एकदा गेलो होतो राजापुरला. तेव्हा पायर्‍या वगैरे नव्हत्या. पुन्हा गेलात तर वासोटा वगैरे करुन या. मायणी पण या सीझनमधे बरे वाटते.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 12/28/2009 - 08:48 नवीन
राज्या लेका आता मात्र तुझा लै हेवा वाटायला लागलाय बघ. मस्त भटकतो आहेस यार !!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 12/28/2009 - 09:57 नवीन
तुमच्या सारख्या देव'तुल्य लोकांचा आशिर्वाद. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 12/28/2009 - 08:49 नवीन
श्री. राजे-जी, निषेध निषेध निषेध!! आपणांस पुण्यास येऊन ही जी दर आठवडा बाजारी भटकायची सवय लागलेली आहे ती काही बरी नाही...ह्या सवयीपायी (क्षमा असावी गाडीपायी) आपण या देशाचे किती पेट्रोल वाया घालवत आहात ह्याची आपणास काही काळजी आहे का नाही....निषेध निषेध निषेध!! असो..आता धागा उघडलाच आहे तर तू आपला मित्र म्हणून प्रतिसाद दिला... फोटो के व ळ अ प्र ति म!!!! पहिला, दुसर्‍या ओळीतला चौथा आणी मधल्या ओळीच्या ओळीखालच्या ओळीतला दुसर्‍या फोटोच्या बाजुचा तिसरा फोटो मस्त... टीपः हे फोटो लिंक मधले आहेत.. :) --चाकssssफिरवा
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Mon, 12/28/2009 - 09:06 नवीन
ऑफिसातुन फोटो दिसए नाहिएत... घरि जाउन पाहतो... सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे तुमचा फिरण्याचा अवाका जबरदस्त आहे निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 12/28/2009 - 09:17 नवीन
ह्म्म्म. ऑफिस मधून चोरुन फोटो कसे पहावेत हे आम्हाला तुम्हाला सुचवावे लागेल हे पाहून नवल वाटले. असो, फोटो दिसल्यावर पुर्ण प्रतिसाद शुध्द भाषेत लिहा, वर चार ओळीमध्ये चार चुका आहेत. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 12/28/2009 - 09:20 नवीन
शुध्द भाषेत शुध्द नाही शुद्ध हा योग्य शब्द आहे. असो. --अवलिया
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 12/28/2009 - 09:21 नवीन
पाचगणी जवळ पण राजापूर आहे हे माहित नव्हते. आतापर्यंत राजापुरची गंगा हाच वाक्यप्रयोग माहित होता. बाकी राजापुची गुंफा मस्तच आहे. ( अवांतर : वाईच्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेतलेत का ? ) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 12/28/2009 - 09:23 नवीन
>>( अवांतर : वाईच्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेतलेत का ? ) तेथे जाणे जमले नाही रात्र झाली होती महाबळेश्वर वरुन खाली येण्यासाठी. पुढील वेळी नक्की. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
ख
खादाड Mon, 12/28/2009 - 09:29 नवीन
छान फोटो !=D> तुमच्या उत्साहाला सलाम ! =D>
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/28/2009 - 10:35 नवीन
राजे, आपल्या भटकंतीमधील राजापूरची छायाचित्रे मस्त. गुहेतील वेगवेगळे कुंड, दगडावर कोरलेली शिल्प, डोंगर,जंगल, छायाचित्रांमुळे राजापूर आपल्या डोळ्याने पाहता आले. वर्णन वाचायला मजा आली. आपले आभार. मात्र माहितीचा तपशील अपूर्ण आहे, असे वाटते. गुगलून पाहिल्यावर 'राजापूर' बद्दल बरीच माहिती कळते जी तुमच्या लेखात नाही. राजापूर गंगेचे स्थान मानल्या जाते. तिथेच गरम पाण्याचे कुंडही आहेत. तसेच, विष्णुमुर्तीवरुन पांडवकालीन संदर्भ स्पष्ट होत नाही. गुंफा,कब्जा,प्रजाती, वगैरे शब्द दिसलेत पण त्यांच्याकडे मित्र म्हणून दुर्लक्ष केले. :) असो, अजून वर्णन येऊ द्या. अगदी तपशिलवार...![म्हणजे, जमलेच तर मराठी विकिपीडियात भर घालीन] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 12/28/2009 - 10:46 नवीन
>>गुगलून पाहिल्यावर 'राजापूर' बद्दल बरीच माहिती कळते जी तुमच्या लेखात नाही. राजापूर गंगेचे स्थान मानल्या जाते. तिथेच गरम पाण्याचे कुंडही आहेत. अहो, ते राजापुर वेगळे हे इनमीन चार घरटी असलेले छोटे खाणी वाई तालुक्यातलं गाव आहे साहेब. >>विष्णुमुर्तीवरुन पांडवकालीन संदर्भ स्पष्ट होत नाही. वर दिलेल्या फोटो संग्रहामधील भिंती शिल्पांचे फोटो जर व्यवस्थीत पाहीले गेले तर पांचाली व पाच पांडव, श्री कृष्णाचा हात इत्यादी दिसेल ( गावातील लोकांनी देखील सांगितले की गुंफा पांडव कालीन आहेत काही वर्षामागे विश्व हिंदु परिषद तर्फे काही संशोधन तेथे आले होते त्यांचे देखील असेच मत होते. हे देखील गावातील व्यक्तीनेच सांगितले.) ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Mon, 12/28/2009 - 10:54 नवीन
मूर्त्या शक्यतो त्या व्यक्तीच्या निर्वाणानंतर लोक उभे करतात. ( मायावतीबाई अपवाद) .. त्यामुळे पांडव्/कृष्ण दिसत असतील तर त्या मुर्ती त्या नंतरच्या काळातील असाव्यात एवढाच अंदाज निघू शकतो. राजेसाहेब पिकासो फोटो दिसत नाही आहेत. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 12/28/2009 - 10:57 नवीन
ह्यावर मी काही लोकांशी इमेल संवाद चालू केला आहे जास्त माहीती मिळाली की देतो. फोटो दिसत नाही आहेत :( बॆन असेल तुमच्या कार्यालयात. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/28/2009 - 11:11 नवीन
>>राजापुर वेगळे हे इनमीन चार घरटी असलेले छोटे खाणी वाई तालुक्यातलं गाव आहे साहेब. हम्म, तसे होऊ शकते राव. सॉरी सेठ. [रत्नागिरीतल्या राजापूरात गरम पाण्याचे झरे असावेत] >>वर दिलेल्या फोटो संग्रहामधील भिंती शिल्पांचे फोटो जर व्यवस्थीत पाहीले गेले तर पांचाली व पाच पांडव, श्री कृष्णाचा हात इत्यादी दिसेल तस्सं नसतं राजं, फोटोवरुन पांडवकालीन ठरवणे तसे कठीण वाटते. काही ऐतिहासिक उल्लेख असले की त्याचा काळ ठरवता येतो. काहीएक हजार वर्षापुर्वीची शिल्प इतकी सुव्यवस्थित राहणे जरा अशक्य वाटते. उदा. साठी पाहा मी एक फोटो डकवतोय. अहिल्याबाई होळकरांच्या काळातील आहे. त्यांनी जी मंदिरं उभी केलीत त्या मंदिरातील सजावटीत एक शिल्प कोरलेले आहे. फोटो वरुन त्याला मी कृष्णकाळातील म्हणनार नाही. :) Image removed. असो, पुढील प्रवासवर्णनासाठी शुभेच्छा..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 12/28/2009 - 11:36 नवीन
ती पांडवकालीन लेणी आहेत अशी लोककथा मी ऐकली (वर प्रतिसादामध्ये दिला आहे संदर्भ) आणि अन्य साधनं उपलब्ध नसतील तेव्हा लोककथा हा ऐतिहासिक संदर्भ समजला जातो. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
S
sneharani Mon, 12/28/2009 - 10:39 नवीन
छान वर्णन केलयं... फोटोचा स्लाईड शो सुध्दा मस्त झालाय. आवडले. (स्वगत : असा वेळ मिळत असता तर भटकायला...)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 12/28/2009 - 11:15 नवीन
ठीक आहे!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/28/2009 - 12:02 नवीन
लेख छान आहे. टिंग्याची प्रतिक्रीया बरी आहे. (सविस्तर चिरफाड लवकरच करु.) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 12/28/2009 - 12:47 नवीन
राजे फोटो चांगले आहेत. ह्या गुफा नेहमीच्यापेक्षा वेगळ्या दिसतात. :)
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 12/28/2009 - 13:06 नवीन
आडवाटेने जाऊन फारशी माहित नसलेली ठिकाणे पाहण्याची तुमची उमेद थक्क करणारी आहे. असेच अजून फिरा (आणि लेख लिहा). गुंफा ह्या मराठी शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तुम्हाला गुहा असे म्हणायचे आहे, असे मी समजतो! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Mon, 12/28/2009 - 13:25 नवीन
छान स्लाईड शो!
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 12/28/2009 - 15:50 नवीन
पांडव कालिन गुंफा म्हणजे काय? गुंफा काय फक्त पांडव कालीन लोकच खोदत होते का? गुंफा पांडव कालीन होत्या ह्याला पुरावा काय? तुम्ही पुरातन विभागात कामाला आहात काय? असे बरेच प्रश्न पडले आहेत.त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. आपली गाडी अशीच देवाच्या भरोश्यावर कुठे ही लावु नका. असेच एकदा भटकताना मी गाडी एका गावात दुकाना शेजारी पार्क केली. आल्या नंतर परत गाडी चालु करतो तर ती चालु झाली नाही. सगळे चेक केले पण सर्व काही व्यवस्थित होते. जवळच्या मिस्त्री कडे गेल्यावर समजले कि माझ्या गाडी चा नवा प्लग काढुन तिथे जुना प्लुग बसवला आहे.तेव्हा फिरताना काळजी घ्या. वेताळ
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Tue, 12/29/2009 - 17:10 नवीन
पांडव कालिन गुंफा म्हणजे काय? गुंफा काय फक्त पांडव कालीन लोकच खोदत होते का? गुंफा पांडव कालीन होत्या ह्याला पुरावा काय? तुम्ही पुरातन विभागात कामाला आहात काय? असे बरेच प्रश्न पडले आहेत.त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.
उर्वरीत प्रतिसादात सातत्याने व्यक्तिगत आरोप दिसत असल्याने संपादीत करण्यात येत आहे. - मिपा संपादक
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Wed, 12/30/2009 - 07:27 नवीन
उर्वरीत प्रतिसादात सातत्याने व्यक्तिगत आरोप दिसत असल्याने संपादीत करण्यात येत आहे.
खुलाश्या बद्दल आभारी आहे. पण लाल शाईत लिहिणारा\री हा\ही कोण बरे संपादक? मिपावर संपादक कोण आहेत ही जाहीर गोष्ट आहे असे असताना निनावी संपादन करण्याची काय बरे गरज पडावी? पारदर्शकता ठेवल्यास उलट गैरसमज पसरत नाहीत
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Mon, 12/28/2009 - 21:29 नवीन
राजे, मस्त फिरत आहात. फोटो मस्त आले आहेत, कुंडाचा फोटओ खास आवडला. अजुन फिरा आणी अजुन लिहा. --टुकुल
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 12/29/2009 - 11:52 नवीन
हो नक्की नक्की. आता परत ३ दिवस सुट्टी आहेच ;) ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/29/2009 - 06:13 नवीन
फोटो बरे दिसत आहेत, सवडीने वाचून सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे. अदिती ----------------------------------- नास्तिक असल्यामुळे माझा देवावर विश्वास नाही, पण स्वतःवर आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 12/29/2009 - 14:33 नवीन
छान आले आहेत. दगडाची झीज पटकन होत असल्याने बहुदा शिल्पे चांगल्या अवस्थेत नाहीत. स्लाईड-शो मध्ये दोन सतीचे दगड दिसतात ( हात असलेला), तसेच काही शिल्पे ही योगिनींची असावीत असे वाटले. तुमच्या भटकंतीचा फायदा आम्हाला असाच होत राहू दे!
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 12/29/2009 - 14:38 नवीन
>>>दोन सतीचे दगड दिसतात अरे बरोबर. खुपदा शोधाशोध केली पण योग्य माहीती मिळत नव्हती त्या हाता बद्दल. (मला श्री कृष्णांचा हात असावा असे वाटत होते) पण नाही ते सतीचे हात आहेत. जाभ्या खडकामध्ये कोरले असल्यामुळे त्यांचे अस्तित्व पण ठिसुळच आहे, त्यासाठीच त्याची जपवणूक करणे आवश्यक आहे. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 12/29/2009 - 18:54 नवीन
तसेच त्यात काही वीरगळही आहेत का? वाटते आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 12/31/2009 - 10:40 नवीन
वीरगळ म्हणजे काय ??? ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 42 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 48 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा