समरसतेची ऐशी-तैशी
- Read more about समरसतेची ऐशी-तैशी
- Log in or register to post comments
- 3095 views
समरसतेची ऐशी-तैशी
===========
--राजीव उपाध्ये
गेल्या काही आठवड्यातल्या बातम्या जर व्यवस्थित समजाऊन घेतल्या तर काही ठळक गोष्टी लक्षात येतात - संघाने आजवर सोडलेल्या पुड्यांपैकी ’समरसतेच्या’ पुडीला छानपैकी चुना लागलेला आहे.
संघाच्या शंभरीच्या निमित्ताने जो उन्माद बाहेर पडला त्यात एक गोष्ट परत-परत उगाळली गेली, ती म्हणजे संघ बदलला पण टीकाकार तिथेच आहेत. हा उन्माद संघाच्या दिशाभूल करण्याच्या रणनीतीला साजेसाच आहे. पण एक लक्षात घेतले पाहिजे की उन्माद त्या व्यक्तीला/समूहाला नेहेमी बेसावध ठेवतो. हा बेसावधपणा मग कमकुवत बाजूला उघडं पाडतो.
कळलं च नाई
- Read more about कळलं च नाई
- Log in or register to post comments
- 405 views
इवले इवले डोळे, खूप खूप खेळले,
दमून झोपी कधी गेले, कळलं च नाई.
इवले इवले डोळे, खेळता खेळता रडले,
रडता रडता कधी हसले, कळलं च नाई.
इवले इवले डोळे, छोटे छोटे डोळे,
मोठे कधी झाले, कळलं च नाई.
इवले इवले डोळे, दूर निघून गेले,
कधी परत येतात, कळलं च नाई.
इवले इवले डोळे, परत फिरून आले,
नवीन इवले डोळे, सोबत कधी आले कळलं च नाई.
बघ
- Read more about बघ
- Log in or register to post comments
- 1187 views
बघ
ती सावलीच ठरली वरचढ उन्हावरी बघ
माझाच जीव जडला माझ्या व्यथेवरी बघ
वारीत पांडुरंगा सावध रहा जरा तू
मारेल चोर डल्ला तुझिया विटेवरी बघ
म्हणतात जे मराठी चित्रपट अता न चाले
नसते पकड जराही त्यांची कथेवरी बघ
साहेब जे कधीही दिसले मुळी न मजला
होते हजर परंतू कायम पटावरी बघ
वाऱ्यामुळे खरेतर पडली कळी उमलती
आरोप त्या बिचाऱ्या आला दवावरी बघ
करतात यार आग्रह बहुतेक याचसाठी
मी बोलतो खरे ते, थोडी पिल्यावरी बघ
दिवाळी अंक २०२५ - निळ्यागर्द समुद्रकिनारी.. - भटकंती
- Read more about दिवाळी अंक २०२५ - निळ्यागर्द समुद्रकिनारी.. - भटकंती
- Log in or register to post comments
- 1891 views
दिवाळी अंक २०२५ - घरटे - कथा
- Read more about दिवाळी अंक २०२५ - घरटे - कथा
- Log in or register to post comments
- 3698 views
दिवाळी अंक २०२५ - तो जिंकला : अ ट्रान्स्प्लांट स्टोरी - कथा
- Read more about दिवाळी अंक २०२५ - तो जिंकला : अ ट्रान्स्प्लांट स्टोरी - कथा
- Log in or register to post comments
- 1766 views
दिवाळी अंक २०२५ - AI चा घो(र) - कविता
- Read more about दिवाळी अंक २०२५ - AI चा घो(र) - कविता
- Log in or register to post comments
- 705 views