चांदणचुरा !

चांदणचुरा !

प्रेम एकदाच होतं आयुष्यात !
त्या नंतर उरते ती
फक्त जिवंत राहण्यासाठीची धडपड, बस्स !

भरती ओहोटी ने कोरडे झालेले
ते डोळे पुसून घ्यायचे ,
उसवलेलं पुन्हा विणून घ्यायचं ,
तू नाहीयेस इथे म्हणून
चंद्राची समजूत काढायची ,
झोंबणाऱ्या गार वार्याला
मिठीमध्ये सामावून घ्यायचं ,
बरंच काही सांडलेले
पुन्हा गोळा करून चालत राहायचं !

हूर हूर लावणारी ती रोजची निःसंग संघ्याकाळ
एकदा पार पडली, कि मग सारं आलबेलच !

आधुनिक भारतातले सावकार

छगन तसा एक सरळमार्गी व्यावसायिक आहे. त्याचा धंद्याचे गणित एकदम साधे आहे, आपल्या कामामुळेच लोक आपला संदर्भ पुढे पाठवतात, त्यामुळे प्रत्येक काम जीव ओतून केले पाहिजे हा त्याचा भ्रम आहे. असेच एके दिवशी तो त्याच्या मित्राच्या ऑफिसमध्ये काही कामानिमित गेला असता त्याला तेथे मगन भेटतो. मगन त्याचा लहानपणीचा मित्र, दोघे एकाच शाळेत होते. १० वी नंतर छगन सायन्सला तर मगन कॉमर्सला गेल्याने त्या दोघांचा तसा काहीच संबंध नव्हता. मगन आता एक आर्थिक सल्लागार आहे.

(अगं, जे घडिलेचि नाही)

आमची प्रेर्णा : अगा जे घडिलेचि नाही

एके रात्री - दुसरी सोबत, कवेत घेऊन तिसरीला
चत्वारि कुचमर्दित बसलो (खबर नव्हती पहिलीला)

पंचप्राणां धाप लागली, षड्रिपुंना तोषविले
सप्तमभोगें एकेहाती, अन्यभोगांसी लाजविले

अष्टभाव हे अनुभवतां, नवमद्वारीं योग साधला
गळुन गेले माझे मीपण दशदिशांत आनंद उरला !

-
शृंगाररात्री

_

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.

शशक-पिंप आणि कपाट

थोड्याच महिन्यांपूर्वी आम्ही विरारहुन मामाच्या खोलीत लालबागला राहायला आलो आहोत.विरारला शांतता होती, पण ही खोली रस्त्याला लागूनच आहे. मला तर अजिबात आवडली नाही ही जागा.उजाडले की रस्त्यावरचे कर्कश आवाज चालू. पण काय करणार? मला नोकरी नाही आणि आईला पण . डोक्यावर छप्पर आहे हेच महत्वाचे. शिवाय मामाकडून दर महिन्याला खर्चासाठी दहा हजार रुपये मिळतात ते वेगळेच. त्यामुळे कसेबसे भागते.त्यात खालचा सँडविचवाला अंकल मस्त आहे. माझी उधारी ठेवतो. त्यामुळे नाश्त्याची सोय होते. तिथे काम करणारी दोन मुलेसुद्धा ओळखीची झाल्येत. मेसेज केला की काय पाहिजे ते घरी आणून देतात.पण ही आई मला त्यांच्याशी बोलूच देत नाही.

पुस्तक परिचय: बनगरवाडी - लेखक: व्यंकटेश माडगुळकर

मला कल्पना आहे बहुतांश मिपाकरांनी हे पुस्तक आधीच वाचलं असेल. ज्यांनी ते वाचलेलं आहे त्यांच्या आठवणींना उजाळा व ज्यांनी वाचलं नाहीये त्यांना या पुस्तकाबद्दल माहिती मिळावी यासाठी हा परिचय लिहीत आहे.

काही दिवसांपूर्वी मी ही कादंबरी वाचली..लेखक व्यंकटेश माडगुळकर यांची मी वाचलेली ही पहिलीच कादंबरी होती. आणि पहिलीच कादंबरी वाचून मी लेखकाच्या प्रेमात पडलो.. मी आत्तापर्यंत वाचलेल्या कादंबऱ्यांपेक्षा ही एक वेगळ्या धाटणीची कादंबरी आहे असं मला जाणवलं.. या सगळ्यामुळे या कादंबरीबद्दल लिहायचा मोह मला आवरता आला नाही.

रामाचा प्रभाव

यावर्षीच्या गुढीपाडव्याला पहाटे तुळशीबागेतल्या राम मंदिरात सायकलवर गेलो होतो. तिथे गणपतीबाप्पा, राम लक्ष्मण जानकी, महादेव आणि इतर देवतांच्या दर्शनाने नववर्षाची सुंदर सुरुवात झाली. 

बाहेर नववर्ष शोभा यात्रेसाठी तयारी चालु होती. रामाचा मोठा कोदंडधारी पुतळा एका ट्रकवर होता आणि असेच इतर ट्रकसुद्धा यात्रेसाठी सजवले जात होते. 

दोन शशक- नीट

"अहो, तुम्ही नका ना त्याला सारखे सारखे टोचून बोलू. आपण दोघे डॉक्टर आहोत म्हणजे त्याने सुद्धा डॉक्टरच व्हायला पाहिजे का? एकुलता एक मुलगा आपला.नसेल त्याची इच्छा तर त्याला जे करायचे ते करू दे ना?"