Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आळस, कंटाळा व फिरंग्याची भेट !!!!

छ
छोटा डॉन
Mon, 03/03/2008 - 09:26
💬 8 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5695 views

💬 प्रतिसाद (8)
स
सृष्टीलावण्या Mon, 03/03/2008 - 11:49 नवीन
एकच गोष्ट डोळ्यासमोर येते.... आम्ही मॅक्सम्युलरमधून परतताना जंहागिरच्या आसपास बरेच परदेशी विशेषत: युरोपीयन्स भटकताना दिसायचे... तेव्हा माझी एक मैत्रिण (जिचा चेहरा लाघवी होता ती ) त्यांच्याकडे पाहून जोरात ओरडायची, "गोरेगोमटे". जे ऐकून रस्त्यातील सगळी हसायची पण फिरंग्यांना कळायचेच नाही लोक का हसतात. बरे तिच्यावर रागवावे तर तिचा चेहरा इतका निरागस दिसायचा की त्यांना काय बोलावे तेच कळायचे नाही. . . परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 03/03/2008 - 16:56 नवीन
कुणीतरी आहे माझ्यासारखं....मि.पा. वरच्या एकूणएक लेखांना प्रतिसाद द्या...जमेल तिथे आपली मते मांडण्यासाठी मोठा प्रतिसाद दिलात की जास्त वेळ जाईल...बाहेर जेवायला जा.. कितीही काम दिसलं तरी परवा साठी ठेवून द्या...सगळं काय एकदम करायचं?..सही आहे हो खरंच व्ही. पी आले होते एक प्रेझेंटेशन द्यायला मधे, आम्ही मजा केली...पिझा पार्टी आणि चीझकेक एन्जॉय केला.. तेव्हा करा टाईमपास.....
  • Log in or register to post comments
ल
लेले Mon, 03/03/2008 - 18:58 नवीन
चा॑गलय राव तुम्हा इ॑जिनिअर लोका॑च असा टाईम्-पास करायला मिसळ पाव वर तरी येता येत. पण आमचि 'LIFE' मधे हे काहि जमत नाहि. कारण जाऊन पड्लोय त्या M.B.B.S.ला साला असला फावला वेळच मिळत नाहि. त्यामुळे ज्या लोका॑ना असा वेळ आहे त्या॑नी फुल्ल एन्जोय करुन घ्या राव...............
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/04/2008 - 04:11 नवीन
चालू द्या. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 09:13 नवीन
दुकान असे पाहायचे की दुकानावरचा मालक खडूस असला पाहिजे. तर बाहेरून अंदाज बांधायचा की याच्याकडे काय मिळत नाही. ती वस्तु आहे की नाही ते विचारायचे. नसेल तर उत्तम. असल्यास दुसरी नसलेली गोष्ट. उदा. 'लव्हेंडर ड्यू' किंवा 'ऍरामस्क' साबण. बहुतेक दुकानात नसतो. आणखी पंधरा जण त्याच्या दुकानात ती वस्तु मागायला पाठवायचे. परत फिरतांना आपल्या मातृभाषेत दुकानाला 'काय फालतू दुकान आहे अशी खडुस्ला ऐकू जाईल अशी दूषणे द्यायची. मग त्या मालकाचे थोबाड पाहायचे. एकदा करून पाहा. उत्कृष्ट टाईम पास. रस्त्याने टकल्या माणूस चालतांना दिसला तर ए टकल्या म्हणून आरोळी ठोकावी आणी सभ्य चेहरा करून (तो आहेच) खाली पाहून पदपथ बदलावा. हे खास सृष्टिलावण्य ताईंसाठी. मी आज दांडी मारून घरी बसून मॅच पाहातोय हे सूज्ञांच्या लक्षात आले असेलच.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/04/2008 - 16:27 नवीन
रस्त्याने टकल्या माणूस चालतांना दिसला तर ए टकल्या म्हणून आरोळी ठोकावी आणी सभ्य चेहरा करून (तो आहेच) खाली पाहून पदपथ बदलावा. हे मात्र जड जाऊ शकते हं. फर्ग्युसन मधल्या कार्ट्यांचा एक किस्सा सांगतो - रुपालीच्या बाहेर कार्टी टवाळक्या करत थांबलेली. एक काळाकुळकुळीत माणूस रस्त्याने निघालेला. एक कार्टं दुसर्‍याला "ए तू माझ्या मागे फटफटीवर बैस त्या काळ्याशेजारुन जाताना तू मोठ्यांदा 'ए ~~ काळ्या' असं ओरडायचं!" दुसरा बरं म्हणून त्याच्या मागं बसला आणि ठरवल्याप्रमाणे केलं. थोडं पुढं जाऊन ह्यानं फटफटी उभी केलीन की - दुसर्‍याची जाम तंतरली, तो जोरजोरात "ए, अरे हे काय, चल चल अरे लवकर चल तो आला!!" हा ढिम्म हलायला तयार नाही?!?!?! शेवटी तो गाडीवरुन उतरून पसार झाला आणि इकडे बघणारे हसून हसून खल्लास!!! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Tue, 03/04/2008 - 16:38 नवीन
माझी दुसरी एक मैत्रिण तर त्याहून भारी होती. रस्ताने जाताना कोणी मध्यमवर्गीय काकू दिसल्या की बोलायला थांबायची आणि अगदी सलगीने काय, कश्या आहात? सध्या काय चाललयं? हल्ली दिसत नाही इ. इ. बोलायची. त्यांचा प्रश्नांकित चेहरा पाहून आपण गाडीत भेटलो नव्हतो का असे लाघवीपणे म्हणायची. आता मुंबईत आगगाडीत कोणीही कोणाला भेटते आणि चेहरे थोडीच लक्षात राहतात.. वर जाताना २-३ वेळा वळून वळून टाटा करायची. त्या बिचार्‍या काकू बुचकळ्यात. . . . परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 03/10/2008 - 12:03 नवीन
अजुन एक, समोरून येनार्य्याच्या पायाकदे लाम्बुन बघत यायच, आनि तो जवल आल कि म्हनयच, चप्पल ऊलति आहे ना?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 53 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 5 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 9 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 12 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा