प्रेक्षागृहात मिळणार्या टाळ्यांची नशा इतर कुठल्याही नशेच्या तुलनेत पराकोटीचीच असते. कारण, इतर नशा कांही तासांत ओसरतात पण ही नशा ओसरत नाही, वाढतच जाते. बोलटाला आपण बोलट आहोत ह्याचे भान येतच नाही. नट बनण्याच्या महत्त्वाकांक्षेत आणि मिळणार्या टाळ्यांच्या लाटांवर तो किनार्यापासून बराच लांब वाहत जातो आणि टाळ्या मिळेनाशा झाल्या, लाटा उचलून धरेनाशा झाल्या की बोलट गटांगळ्या खाऊ लागतो. नाकातोंडात पाणी जाऊन वास्तवाची जाणीव व्हायला लागते पण किनारा बराच दूऽऽऽर राहिलेला असतो. कित्येक 'नटां'वरही अशी वेळ येते.
ह्यावर उपाय म्हणजे लवकरात लवकर स्वतःचा वकूब ओळखून पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे रहावे. दर दोन-पाच वर्षांनी स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचे मुल्यमापन करून भविष्याची बेगमी करून ठेवावी. कुठलीही हौस आपले 'व्यसन' बनणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
हल्लीचे अभिनेते बर्यापैकी जागरूक दिसतात ही एक चांगली बाब आहे.
बाकी पेठकरकाकांचे प्रतिसाद आपल्याला जाम आवडतात. सगळे प्रतिसाद अगदी विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक लिहिलेले असतात. मला नाही वाटत आजपर्यंत त्यांच्या प्रतिसादाने कुणी दुखावलं असेल. उलट दुखावलेल्यांना फुंकर घालण्याचे काम त्याचे प्रतिसाद करतात. धन्यवाद पेठकरकाका!
अनुभवावं लागतं. "नटसम्राट" मध्ये डॉ. लागूं ची भूमिका म्हणजे या अशा कलाकारांसाठी पुढे यणार्या भयंकर आयुष्याची चेतावणीच म्हणायला हवी. वेळीच सावध व्हावे. ग्लॅमर हे वयाप्रमाणे कमीच होणार पण आपण उतार वयात भिकेला लागणार नाही ह्याची काळजी घेणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे.
नटसम्राट पाहून एक आख्खी पिढी सुधारली .
माझे आज्जी आजोबा हे त्याच पिढीचे प्रतिनिधी .
हाताचा पैसा /घर /स्थावर मालमत्ता स्वताच्या हयातीत मुलांच्या सुनांच्या हाती द्यायची नाही .
''आम्ही निवर्तल्यावर
कुर्ल्याच्या चाळीची काय वासलात लावायची आहे ( इमले /मनोरे (गगनचुंबी ) बनवायचे आहेत ते बनवा'' )
इति आज्जी आजोबा
बाकी नटाला कैफ /उन्माद(लोकप्रियतेचा ) ह्या नादात कधी वारुणी त्याच्या शरीर व पर्यायाने आयुष्य /कारकीर्द पोखरते . हे त्याचे त्यालाच कळत नाही .
भगवान दादा ह्यांच्या बंगल्यातून चाळीतील प्रवास बद्द्दल एकदा ते म्हणाले .नुसत्या दारूच्या बाटल्या (रिकाम्या ) न फेकता भंगारात दिल्या असत्या तर एखादी जागा सहजच विकत घेतली असती .
मद्यप्राशन करू नकोस. ती बेवडा होण्याची पहिली पायरी आहे.
तुझ्या घरी कोणी नाही का? त्यांच्याबरोबर गप्पा मार. जालावर चॅट कर. काहीहि कर पण दारू नको.
मद्यप्राशन हे केवळ मित्रांच्या संगतीत गप्पा मारण्यासाठी तेवढा वेळ हॉटेलमध्ये बसण्याचे निमित्त म्हणून असावे. एकटा असतांना गजल लावून वाचन कर. जास्त मोकळा वेळ असेल तर संगीत शीक.
कदाचित जरा उपदेशाचं वाटेल पण सुधीर काकांनी सांगितलेली गोष्टही फार महत्वाची आहे. 'मद्याचा आनंद -> ते -> मद्याचं व्यसन' ही फार फार सूक्ष्म रेषा आहे. ती ओलांडली नाही की सर्व साधलं!
माझा एक अगदी जवळचा मित्र ह्यात गुरफटला आणि त्यातून त्याला बाहेर काढताना काय यातना झाल्या त्या आठवल्या की अंगावर काटा येतो, तेव्हां जपून!
एकटा असताना मद्यप्राशन करू नकोस. ती बेवडा होण्याची पहिली पायरी आहे.
काका, ज्या आपलेपणाने आणि काळजीने आपण सा॑गताय, त्याबद्दल खर॑च आभारी आहे. नाहीतर हल्ली कोण कोणाला विचारतो?
असो, एकट॑ असताना काय किवा मित्रा॑सोबत काय, उठसुठ "घेणे" नक्कीच करत नाही! आणि ह्यापुढे तस॑ वाटल॑च तर आपला प्रेमाचा सल्ला नक्कीच विचारात घेईन.
हे जे॑व्हा घडल॑ ते॑व्हा का कोण जाणे फार एकट॑ एकट॑ वाटत होत॑ आणि वेळ कसा घालवावा अगदीच उमजेना, म्हणून...
कदाचित जरा उपदेशाचं वाटेल पण सुधीर काकांनी सांगितलेली गोष्टही फार महत्वाची आहे.
काय हे चतुर॑गराव, तुम्ही सगळे मोठे आहात माझ्याहून, हक्क आहे तो तुमचा सगळ्या॑चा. आणि उपदेशाच॑ म्हणाल तर मी त्याला प्रेमळ सल्ला म्हणेन.
शेवटी कळपातल॑ अवखळ कोकरू वाहावत चालल॑ तर त्याला तुम्हीच सगळे वठणीवर आणणार ना?
'मद्याचा आनंद -> ते -> मद्याचं व्यसन' ही फार फार सूक्ष्म रेषा आहे. ती ओलांडली नाही की सर्व साधलं!
आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, ती ठेवेनच.
खूपच छान लेख आहे..
लेखाबरोबर प्रतिक्रिया ही तितक्याच चांगल्या आणि मार्गदर्शक आहेत.
अशी परिस्थिती सुप्रसिद्ध मराठी नट गणपत पाटील यांची होती. कोल्हापूर मधे आम्ही असताना पाहिले आहे.
हल्लीचे अभिनेते बर्यापैकी जागरूक दिसतात ही एक चांगली बाब आहे.
पेटकरांशी सहमत.
'जनार्दन नारो शिंगणापूरकर' उर्फ बोलट. पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली'मधील ही व्यक्तीरेखा अमर आहे. पुलंच्या शब्दांत...'जनू 'बोलट' होता. नाटक कंपनीत ज्याच्या नांवाची जाहिरात होते तो नट आणि बाकीचे 'बोलट', अशी एक विष्णुदास भाव्यांच्या काळापासून चालत आलेली कोटी आहे. ह्या दरिद्री कोटीचा जनक कोण होता कोण जाणे, परंतू जनू हा त्या कोटीचा बळी होता.....'
..खरं तर त्यांचा ओझरता उल्लेख लेखांत कुठेतरी यायला हवा होता.
हे वाचायचं राहील होतं. अनुभव चांगला शब्दबध्द केला आहे. वर पेठकर, चतुरंग यांनी म्हटल्याप्रमाणे कुठं थांबायच हे कळलं पाहीजे, दुर्देवाने ब-याचदा तोवर वेळ निघुन गेलेली असते.
मनापासून आणि कळकळीने लिहीलंय रे धम्या...खूप छान!
पण तरूणपणी धुंदीत जगून, भरपूर मौज करून झाली म्हातारपणी फरपट तर काय बिघडलं असं वाटतं कधीकधी. च्यायला म्हातारपणासाठी पैका वाचवता वाचवता मध्येच गचकलो तर काय घ्या? सालं तारूण्यात मुक्तपणे नाय जगलं की मग म्हातारपणी केसरीच्या टूर करणं नशिबी येतं. :-)
<< हा शब्द आहे तसा बर्यापैकी जुन्या काळचा. नारायणराव-बालग॑धर्व या॑च्याकाळचा. नायकाची काम॑ करणारा तो "नट" आणि हल्ली ज्याला "सपोर्टी॑ग ऍक्टर" म्हणतात तो म्हणजे "बोलट". >>
शास्त्रीय दृष्ट्या पाहायचं तर नटीला (अभिनेत्री) नट म्हणायला हवं आणि नटाला (अभिनेता) बोल्ट.
<< खरच, का अस॑ होत असेल?
का हे नाट्यक्षेत्र एव्हढ॑ बदनाम आहे?
का हे लोकनीट जगत नाहीत?
का ह्या॑ची फरफट होते?
का ह्या॑ना कोणी वाली नाही? >>
नाटकात काम करण्याचा अनुभव मलाही आहे. त्यावरून सांगतो. तीन अंकी नाटक असतं, ते संपल्यावर यातली बहुतांश मंडळी ४ था अंक (अपेयपान) साजरा करतात (मोहन जोशी आणि सतीश तारेंचे किस्से माहीत असतीलच ना?) आणि काही तर त्यानंतरही ५ वा अंक (अशय्यासोबत) करतात. आमच्यासारखे जे याला विरोध करतात, त्यांना बहुतेकदा तीन अंकी नाटकात डावलले जाते. हौशी एकांकिका सादर करण्यापुरता मर्यादित वाव अशांना मिळतो.
नाही हो. आमच्या अल्पमतीनुसार नट आणि बोल्ट या मेकॅनिकल इंजिनीयरींगच्या टर्म्स आहेत. नाही म्हणायला ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयरींगला असताना कॉम्प्युटरच्या पिनांमध्ये मेल आणि फीमेल भानगड असते असा अभ्यास केला आहे ;)
<< आमच्या अल्पमतीनुसार नट आणि बोल्ट या मेकॅनिकल इंजिनीयरींगच्या टर्म्स आहेत. >>
<< नाही म्हणायला ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयरींगला असताना कॉम्प्युटरच्या पिनांमध्ये मेल आणि फीमेल भानगड असते असा अभ्यास केला आहे >>
चांगलाच अभ्यास की तुमचा. मग तुम्हाला असा प्रश्न पडायलाच नको. की तुम्हाला उत्तर माहिती असूनही ते माझ्याकडूनच हवे आहे? ठीक आहे तुम्हाला हवेच आहे तर या प्रश्नाचे उत्तर तुमच्याच माहितीच्या आधारे देतो. कॉम्प्युटरच्या पिनांमध्ये मेल फिमेल कशाच्या आधारे ठरवितात? जरा तोच निकषा तुमच्या या नट बोल्ट नावाच्या मेकॅनिकल इंजिनियरींगच्या टर्म्सना लावा की.
हा निकष लावला की मग कुलुप चावी, इलेक्ट्रीकच्या पिना, नट बोल्ट इत्यादी अनेक व्यवहारातील गोष्टींना मेल फिमेल च्या उपमा दिल्या जातात हे इथली चित्रे पाहिली की लगेच कळेल (खरे म्हणजे ते तुम्हाला आधीच कळले आहे ह्या बद्दल मला खात्री आहे).
http://blogorelli.typepad.com/b_l_o_g_o_r_e_l_l_i/2007/10/is-the-10-sin-b.html
जरा ही चित्रे ही पाहा.
नट
http://www.badog.biz/catalog/images/nut.jpg
बोल्ट
http://www.bombayharbor.com/productImage/0812294001230089250/Hex_Bolt.jpg
http://www.arrowboltandscrew.com/images/main_structural_bolts.jpg
नट - बोल्ट
http://174.123.135.195/uploads05/51/A/Stainless_steel_nuts_and_bolts126668170.jpg
http://www.mhent.co.in/images/pic_1.jpg
http://irishnewsreview.files.wordpress.com/2011/07/bolt.jpg
http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/47/Bolt-with-nut.jpg
http://blogorelli.typepad.com/photos/uncategorized/2007/10/24/nut_bolt.jpeg
आता यापेक्षा जास्त इस्कटून सांगितलं ना तर माझं या संकेतस्थळावरचं सदस्यत्वच इस्कटून टाकलं जाईल.. (तुमची तीच इच्छा आहे का?)
लेखाच्या सुरुवातीला जरा वेगळीच कल्पना झाली. वाटलं , असेल दारुबाजीवरचा !
पण नंतर गाडी सुसाट सुटली. लिखाण आणि विषय दोन्हीही भावले
(अशा लेखांसाठीच मिसळ ओळखली जावी ही इच्छा)
ध मु, तुला आलेला अनुभव सुन्न करणारा होता खरेच.
'निवडुंग' चित्रपटाची आठवण झाली.
स्वाती
आयला धम्या...तू एवढा विचार करत असशील असे वाटले नव्हते
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)
चालायच॑च् ...येतो कधीमधी झटका.
त्यातून मिसळबोध वाचनात आल्यामुळे "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" चे तत्त्व अ॑गिकारावेसे वाटल॑.
असो, आता मी पूर्ण बरा झालो आहे.
आपला,
- वैचारिक झटक्यातून सावरलेला
ध मा ल.
प्रेक्षागृहात मिळणार्या टाळ्यांची नशा इतर कुठल्याही नशेच्या तुलनेत पराकोटीचीच असते. कारण, इतर नशा कांही तासांत ओसरतात पण ही नशा ओसरत नाही, वाढतच जाते.
बोलटाला आपण बोलट आहोत ह्याचे भान येतच नाही. नट बनण्याच्या महत्त्वाकांक्षेत आणि मिळणार्या टाळ्यांच्या लाटांवर तो किनार्यापासून बराच लांब वाहत जातो आणि टाळ्या मिळेनाशा झाल्या, लाटा उचलून धरेनाशा झाल्या की बोलट गटांगळ्या खाऊ लागतो. नाकातोंडात पाणी जाऊन वास्तवाची जाणीव व्हायला लागते पण किनारा बराच दूऽऽऽर राहिलेला असतो. कित्येक 'नटां'वरही अशी वेळ येते.
ह्यावर उपाय म्हणजे लवकरात लवकर स्वतःचा वकूब ओळखून पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे रहावे. दर दोन-पाच वर्षांनी स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचे मुल्यमापन करून भविष्याची बेगमी करून ठेवावी. कुठलीही हौस आपले 'व्यसन' बनणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
हल्लीचे अभिनेते बर्यापैकी जागरूक दिसतात ही एक चांगली बाब आहे.
बाकी पेठकरकाकांचे प्रतिसाद आपल्याला जाम आवडतात. सगळे प्रतिसाद अगदी विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक लिहिलेले असतात. मला नाही वाटत आजपर्यंत त्यांच्या प्रतिसादाने कुणी दुखावलं असेल. उलट दुखावलेल्यांना फुंकर घालण्याचे काम त्याचे प्रतिसाद करतात. धन्यवाद पेठकरकाका!
राजमुद्रा :)
अनुभवावं लागतं. "नटसम्राट" मध्ये डॉ. लागूं ची भूमिका म्हणजे या अशा कलाकारांसाठी पुढे यणार्या भयंकर आयुष्याची चेतावणीच म्हणायला हवी. वेळीच सावध व्हावे. ग्लॅमर हे वयाप्रमाणे कमीच होणार पण आपण उतार वयात भिकेला लागणार नाही ह्याची काळजी घेणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे.
धमालाचा हा अनुभव फार काही सांगून जातो.
-(नाट्यवेडी) प्राजु
बोलट म्हणजे काय ते मलाही योगेश च्या एकांकिकेतूनच कळले होते...१९९९ च्या पुरुषोत्तम मध्ये पाहिली होती
छान लिहिलंत....
धमाला,
छोटेखानी, परंतु सुरेखच लिहिलं आहेस रे. आवडलं!
और भी लिख्खो..
तात्या.
हा अनुभव वाचल्याबद्दल आणि आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला सर्वा॑चा मनःपुर्वक आभारी आहे.
असाच लोभ ठेवा ही विन॑ती.
आपला,
- ध मा ल.

चतुरंग